खोबरेल तेल पिण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

0
1810
खोबरेल तेल पिण्याचे फायदे
खोबरेल तेल पिण्याचे फायदे

 

 

नमस्कार मित्रांनो नारळ हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नारळ आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. तसेच त्याच्यातले खोबरे हे चवीला अगदी स्वादिष्ट असते. खोबरे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे मिळतात. तसेच आपल्या शरीराला खोबर्‍यापासून लवचिकता येते. आपल्या शरीराला एक प्रकारची चकाकी येते, खोबरे यामध्ये आपल्या शरीराला स्निग्धता देणारे पदार्थ असते. खोबऱ्याचा वापर बर्फी, स्वीट, मिठाई, तसेच खोबऱ्याची चटणी, खोबर्‍याचा हलवा, खोबऱ्याचे तेल, खोबऱ्याचे दुध, खूप साऱ्या पदार्थामध्ये खोबऱ्याचा वापर केला जातो. तसेच आपल्या केसांचे सौंदर्य व शरीराचे सौंदर्य, चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी, खोबर्‍याचा खूप प्रमाणात वापर केला जातोय. तसेच खोबऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशियम, इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, खानिजेतत्वे, जीवनसत्वे, विटामिन्स, मॅग्नेशियम, सोडियम प्रथिने, यासारखे गुणधर्म असतात. तसेच खोबरे यामध्ये ग्लुकोज ची पातळी सुरळीत करणारे गुणधर्म असतो. तसेच खोबरेल तेलाचे ही उपयोग आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. तसेच खोबरेल तेलाचे ही आहे, जर तुम्ही खोबरेल तेल पिले, आपले शरीर सुदृढ ठेवण्यास मदत मिळते. म्हणूनच तर त्याला आपल्या पृथ्वीवरचे कल्पतरु वृक्ष असेही म्हणतात. गरीब-श्रीमंतापर्यंत सगळ्यांना परवडणारे असते, त्यामुळे तुम्ही जर तुमच्या आहारात खोबरेल तेलाचा वापर केला, तर त्यापासून तुम्हाला खूप सारे फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊया, की खोबरे तेल पिल्याने तुमच्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात?  जाणून घेऊयात खोबरेल तेल पिण्याचे फायदे.

खोबरेल तेल पिण्याचे फायदे जे शरीरासाठी महत्वाचे असतात:

मित्रांनो, खोबरेल तेल पिल्याने आपल्याला खूप सारे फायदे होतात. तसेच ते पचायलाही हलके असते, त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. कोण कोणत्या प्रकारचे फायदे होतात? ते जाणून घेऊयात. 

  • तुमचे वजन नियंत्रण येण्यास मदत मिळते.

जर तुम्हाला वजन वाढी विषयी तक्रारी असतील सारखे वजन वाढत असेल, अश्या वेळी जर तुम्ही तुमच्या आहारात खोबरेल तेलाचा वापर केला तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. खोबरेल तेल पिल्याने तुमच्या शरीरातील मेटाबोलिजम सिस्टीम हा सुधारतो. त्यामुळे शरीरातील फॅट जमा होत असेल, तर तो निघण्यास मदत मिळते. तसेच जर तुम्ही दररोज ग्रीन टी सोबत अर्धा चमचा खोबरेल तेल टाकून पिल्याने, तुमच्या शरीरातला लवचिकता येते. व पोटातील चरबी वितळून जाण्यास मदत मिळते, व वजन कमी होण्यास मदत मिळते. 

  • तुमच्या त्वचा कोरडी होण्यापासून वाचते.
वाचा  पापण्यावर असलेले केस गळणे कारणे व घरगुती उपाय

जर तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरात खोबरेल तेलाचा वापर केला, त्यासाठी शुद्ध नारळाच्या खोबरेल तेलाचा उपयोग करायला हवा. जर तुमची स्किन कोरडी असेल ड्राय असेल, रूक्ष असेल तसेच तसेच केस गळतीची समस्या असतील अशावेळी जर तुम्ही खोबरे तेला पासून बनवलेले पदार्थ तुमच्या आहारात सुरू केले तर त्यातले गुणधर्म तुमच्या शरीराला मिळते व त्वचेला स्निग्धता मिळते, त्वचा कोरडी होण्यापासून वाचते. 

  • तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

खोबरेल तेल मध्ये अँटीऑक्सिडेंट्स चे प्रमाण असते. तसेच त्याच्यामध्ये लोरिक ऍसिडचे प्रमाण असते. त्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला चालना मिळते. त्यामुळे तुम्हाला बाहेरच इन्फेकशन, व्हायरल इन्फेक्शन यासारख्या समस्या जर सारखे सारखे होत असतील तर तुम्ही तुमच्या आहारात शब्द खोबरेल तेल चा वापर करायला हवा. ते पचायला हलके असते, आणि शिवाय रोगप्रतिकारशक्ती, प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. 

  • मधुमेहींसाठी फायदेशीर ठरतं.

मित्रांनो जर तुमच्या शरीरामध्ये साखरेची पातळी वाढली की जुनी मधुमेह डायबिटीस सारखे आजारांना सामोरे जावे लागते. अशा वेळी तुम्ही तुमच्या आहारात शुद्ध खोबरेल तेलाचा वापर करावा यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिन लेव्हल वाढून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणण्यास मदत मिळते

  • हाडांना बळकटी मिळते.

खोबरेल तेलामध्ये स्निग्धता निर्माण करणारे गुणधर्म असतात. तसेच त्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस याचे गुणधर्म असल्यामुळे तुमचे सांधेदुखी, हात दुखी, गुडघेदुखी, कंबर दुखी, यासारख्या समस्या असतील तर तुम्ही तुमच्या आहारात खोबरेल तेलाचा वापर करायला हवा. तसेच चहामध्ये तुम्ही एक चमचा तेल टाकून पिल्याने,  तुमच्या हाडांना बळकटी मिळते. तसेच तुम्ही खोबरेल तेल गरम करून तुमच्या कंबरेच्या हाडला, सांध्यांना, गुडघ्यांना मसाज केला, तर त्यांची दुखने कमी होऊन, त्यांना मजबूती येण्यास मदत मिळते. 

  • त्वचा तजेलदार व चमकदार बनते.

खोबरेल तेलामध्ये अँटीबॅक्टरीअल्स तसेच अँटीफंगल्स चे गुणधर्म असतात. त्यामुळे  आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. जर तुम्ही नियमित सकाळी आणि संध्याकाळी एक चमचा खोबरेल तेल पिलेत तरी तुमच्या त्वचेमध्ये चमकदारपणा व तजेलदारपणा येतो. तसेच तुम्ही खोबरेल तेल कोमट करून तुमच्या संपूर्ण अंगाला त्याने मालिश केली, तर तुमच्या त्वचेवर कोरडेपणा असेल, तर तोही जाण्यास मदत मिळते. तुम्हाला जर त्वचाविकार तसेच त्वचेवर डाग असतील, तर ते दूर होण्यास मदत मिळते. 

  • पचनाची निगडित समस्या दूर होतात.
वाचा  पोटातून आवाज येणे

बऱ्याच वेळेला काहीजणांना अपचन, अजीर्ण यासारख्या समस्या होतात. तसेच पोट गच्च भरल्या सारखे वाटते. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या आहारात नियमित खोबरेल तेल वापर केला, तर तुम्हाला यासारख्या समस्या वर आराम मिळेल. कारण खोबरेल तेल मध्ये अंटीबॅक्टरियल गुणधर्म असतात. ते पोटातील बॅक्टेरिया दूर करण्यासाठी प्रभावशाली ठरतात. त्यासाठी नियमित जर तुम्ही एक चमचा खोबरेल तेल घेऊन त्यावर कोमट पाणी पिले, तर तुमच्या पचनसंस्थे मधील येणारे अडथळे दूर होण्यास मदत मिळते. 

 

टिप्पणी:- मित्रांनो खोबरे तेल म्हणजेच शुद्ध नारळ तेल होय. नाही तर काहीजण पॅरॅशूट चे तेल पिणार,   शुद्ध खोबरेल तेल घेण्यासाठी  तुम्हाला शुद्ध घाणीचे तेल, खोबरेल तेल घ्यायचे आहे. ते पिण्यासाठी फायदेशीर राहते. तसेच नारळ तेल हे सकाळच्या वेळी तसेच रात्री झोपते वेळी, एक चम्मच घ्यायचे असते. जर कोणाला त्यापासून काही त्रास होत असेल, तर त्यांनी घेण्यापूर्वी या डॉक्टरांना जरूर विचारून प्यावेत. 

 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला, नारळाचे खोबरेल तेल पिण्याचे, फायदे नेमके तुम्हाला कोणकोणत्या प्रकारे होऊ शकतात, ते सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

                      धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here