चेहऱ्यावर लिंबू लावण्याचे फायदे व वापर कसा करावा ? 

0
1494
चेहऱ्यावर लिंबू लावण्याचे फायदे व वापर कसा करावा
चेहऱ्यावर लिंबू लावण्याचे फायदे व वापर कसा करावा

नमस्कार, लिंबू तर सगळ्यांनाच माहिती आहे, लिंबू हे एक फळ आहे. लिंबाचे दोन प्रकार असतात. एक ईडलिंबू आणि दुसरा कागदी लिंबू. लिंबू हा पिवळसर हिरवट रंगाचा असतो. चटपटी आंबट-चिंबट असतो. स्वयंपाक घरातला तर हा मुख्य राजा आहे. तसेच लिंबू हा पोह्यांवर, मसालेदार पदार्थ व भेळ, पाणीपुरी, मिसळ पाव पाव, भाजी, रुचकर पदार्थांमध्ये वापरला जातो. तसेच निंबु हा पाचक असतो. अपचनाची संबंधित कोणतेही समस्येवर, नींबू हा फार गुणकारी असतो. तसेच लिंबू मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. जे आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरते. तसेच लिंबू हा वातनाशक ही आहे, ज्यांना पोटात गॅस पोटफुगी, वजन वाढीचे समस्या असेल, त्यांच्यावर तर फार गुणकारी आहेत. दुसरा लिंबू आरोग्यासाठी गुणकारी आहे, तसेच लिंबू हा तुमचे सौंदर्यही फुलवतो. लिंबू चा वापर केल्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य ही फार छान राहते. चेहऱ्यावर लिंबू लावण्याचे फायदे हि बरेच आहेत.

जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल, तर तुम्ही लिंबु चा वापर केल्यामुळे त्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकतो, तसेच लिंबू हा चेहर्‍यासाठीही फार गुणकारी आहे, तसेच लिंबू सौंदर्य फुलवण्याचे काम करतो. तसेच, तुम्ही लिंबू ची सालि वाळवून त्याची पावडर ही करू शकतात.  तुम्ही, लिंबू ची सालीची पावडर रुचकर पदार्थांमध्येही वापरू शकतात. तसेच केसांना धुण्यासाठी ही लिंबू ची साल ची पावडर गरम पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुऊ शकतात. तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये लिंबू च्या सालीचा फेस पॅक ही करू शकतात. पण नींबू चा वापर हा तुम्ही तुमच्या चेहर्यासाठी कसा करावा? हे अनेक जणांना माहित नसते. चला, तर मग जाणून घेऊयात, की लिंबू चेहऱ्यावर कसा लावावा? व त्याने तुमच्या चेहऱ्याला कोणकोणते फायदे होतात? ते जाणून घेऊया ! 

लिंबाचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्याला कोणकोणते फायदे होतात ?

लिंबामध्ये विटामिन सी असते. हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण लिंबू मध्ये ऑंटी बॅक्टरियल गुणधर्म असतात. म्हणून लिंबू चेहर्यासाठी कसा फायदेशीर ठरतो, व चेहऱ्यावर लिंबू लावण्याचे फायदे कोणते ? ते जाणून घेऊयात. 

  • जर तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स असतील, तर ते दूर जाण्यास मदत होते. 
  • लिंबू चा वापर केल्याने तुमची काळवंडलेली, त्वचा उजळण्यास मदत होते. 
  • लिंबूच्या वापराने डोळ्याखालील काळी वर्तुळे जातात. 
  • लिंबूच्या वापराने तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जाते. 
  • उन्हाळ्यात तुमच्या चेहऱ्यावर जर, काळे चट्टे पडले असतील, तर ते जाण्यास मदत होते. 
वाचा  स्वप्नात मुलगी दिसणे शुभ की अशुभ!

चला, तर आता आपण लिंबू चेहऱ्याला वापरल्यास तुमच्या चेहऱ्याला कोणकोणते फायदे होतात, ते बघितलेले आहेत. आता लिंबू चेहऱ्याला कसा लावावा?  ते बघूयात. 

लिंबू चेहऱ्यावर कसा लावावा ? जाणून घ्या चेहऱ्यावर लिंबू लावण्याचे फायदे

अनेक काळापासून लिंबू चा वापर हा फक्त स्वयंपाक घरातच नाही, तर सौंदर्यप्रसाधनात, वापरला जातो हे अनेक जणांना माहित नसते,   लिंबू मध्ये विटामिन सी असते, जे आपल्या चेहऱ्या साठी फार प्रभावी ठरते.  चला तर मग जाणून घेऊया, की चेहऱ्यावर लिंबू लावण्याचे फायदे कोणते व लिंबू चा चेहर्यासाठी कसा वापर करावा. 

मध आणि लिंबू यांचे मिश्रण तयार करा :

बदलत्या जीवनशैलीमुळे, वाढत्या प्रदूषणामुळे, अनेक जणांच्या चेहऱ्यावर काळे डाग, वांग चे डाग, तसेच पुरळ होऊन चट्टे पडतात. मग अशा वेळी चेहऱ्यावरील काळपटपणा जाण्यासाठी, नींबू चा वापर केला जातो. तसेच लिंबू मध्ये विटामिन सी असते. त्यामुळे तुमचे सौंदर्य फुलवण्यात मदत होते. त्यासाठी तुम्हाला मध आणि लिंबू चा उपयोग करावा लागेल, त्यासाठी तुम्ही एका बाऊलमध्ये लिंबाचा रस अर्धा चमचा+ 4-5 ठेंब मध यांचे मिश्रण एकजीव करून, तुमच्या चेहऱ्याला 15 ते 20 मिनिटे त्याने मसाज करावा, जर तुम्ही असे केल्यास, तुम्हाला सात ते आठ आठवड्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरील, काळे डाग, वांग डाग कमी होताना दिसतील. अगदी साधा सोपा उपाय आहे, करून बघा. 

लिंबू च्या सालीचा फेस पॅक तयार करा :

लिंबू पेक्षा लिंबू ची साल मध्ये अनेक गुणधर्म असतात. त्यासाठी तुम्हाला लिंबाची साल ही उन्हात वाळवून, त्याची पावडर करून, एका बॉटलमध्ये भरून ठेवावेत. ही साल तुम्हाला कोणतेही वेळी कामी पडेल. जर तुमच्या चेहऱ्यावर पुरळ येऊन फुटत असतील,  त्याचे डाग पडत असतील, अशा वेळी तुम्ही लिंबाची साली ची पावडर दोन चमचे+ त्यात चिमूटभर हळद +अर्धा चमचा दही यांचे मिश्रण एकजीव करून तुमच्या चेहऱ्यावर लावावे, हा फेस पॅक लावल्याने तुमच्या चेहरा उजळेल, शिवाय डाग विरहित होईल, व तुमची त्वचा सॉफ्ट व मुलायम होईल. 

वाचा  जेवणानंतर गुळ खाण्याचे फायदे

लिंबाचा रस आणि कोरफडचा गर लावून बघा :

वाढत्या प्रदूषणामुळे, तसेच वेळी खानपान मुळे, आपण आपल्या स्वतःच्या चेहऱ्याची काळजी घेण्यास विसरून जातो. त्याचे अभावामुळे तुमची त्वचा काळवंडते, व चट्टे पडतात. त्यावेळी जर तुम्ही कोरफडचा गर आणि लिंबाची साल एकत्र करून चेहर्‍यावर लावून ठेवली, आणि एक ते दीड तासाने धुवून तुमचा चेहरा उजळेल, व चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल. 

लिंबाचा रस व मुलतानी मातीचा फेस पॅक तयार करू शकतात :

बदलत्या जीवनशैलीमुळे, तसेच मानसिक ताण यामुळे, शरीरात रक्ताची कमतरता आल्यामुळे, अशक्तपणामुळे, अनेक जणांच्या डोळ्याखाली ब्लॅक सर्कल, काळे डाग पडतात, तसेच त्यांचा चेहराही काळा दिसतो. तसेच नाकावर ब्लॅक हेड्स, आपल्याला भरपूर प्रमाणात बघायला मिळतात, मग अशावेळी जर तुम्ही लिंबाचा रस + मुलतानी मातीचा फेस पॅक चेहर्यासाठी वापरला, तर  तुम्हाला फार फायदेशीर ठरेल. त्यासाठी तुम्हाला मुलतानी माती अर्धा चमचा+ लिंबाचा रस + चिमूटभर हळद+ व दूध यांचे मिश्रण एकजीव करून, हा फेसपॅक तुम्ही चेहऱ्याला 15 ते 20 मिनिटे लावावे. त्यानंतर कोमट पाण्याने धुवावे. असे तुम्ही दोन ते तीन आठवडे केल्यास, तुमच्या चेहर्‍याचा रंगही उजळेल, व ब्लॅकहेड्स डार्क सर्कल, सारख्या समस्यांपासून  तुम्हाला आराम मिळू शकेल. 

टीप: 

लिंबू मध्ये विटामिन सी असते, तसेच त्याच्यात अंटीबॅक्टरियल गुणधर्म असतात. लिंबू हा चवीला आंबट असतो, तसेच लिंबू मध्ये ॲसिड असते. त्यामुळे लिंबू हा प्रत्येकाच्या चेहऱ्याला फायदेशीर ठरेल असे नसते, जर कुणाची  स्किन सेन्सिटिव्ह असेल, तर त्यांनी जर लिंबू चेहऱ्याला लावला, तर त्याची आग व जळजळ होण्याची शक्यता असते, त्यासाठी त्यांनी डॉक्टरांना विचारूनच लावावे. 

चला, तर आज आम्ही लिंबू पासून होणारे फायदे, व लिंबू तुमच्या चेहर्यासाठी कसा फायदेशीर ठरू शकतो? तसेच लिंबू तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कशा प्रकारे लावावे? हे तुम्हाला सांगितलेले आहेत. तसेच लिंबू पासून तुम्हाला कशी ऍलर्जी होऊ शकते, तेही सांगितले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

वाचा  नाकातून घाण वास येणे

     

                         धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here