कोरफड केसांना लावण्याचे फायदे व कसे लावावे

0
1135
कोरफड केसांना लावण्याचे फायदे व कसे लावावे
कोरफड केसांना लावण्याचे फायदे व कसे लावावे

    मित्रांनो आपण आपल्या शरीराची नेहमीच काळजी विविध पद्धतीने घेत असतो. ही काळजी घेत असताना आपल्याला विविध समस्या देखील निर्माण होतात अथवा उद्भवतात. असे म्हटले जाते की आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपले केस असतात. केस हे आपले शरीराचे सौंदर्य वाढविण्यास आपल्याला मदत करते. बऱ्याच वेळा टीव्हीवर किंवा इतर माध्यमांवर केलेल्या जाहिरातीमध्ये एखाद्या मॉडेलला बघून आपलेही केस तसेच असावे असे भरपूर जणांना वाटत असते. बऱ्याच स्त्रियांना आपले केस मुलायम व घनदाट असावे असे वाटत असते व यासाठी ते विविध प्रयत्न करत असतात. बाजारामध्ये उपलब्ध असणारा विविध घटकांचा वापर करून ते आपले स्वप्न पूर्ण करू बघतात पण पुरेशी माहिती नसल्यामुळे देखील त्यांच्या केसांना त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात किंवा त्यांच्या केसांना नुकसान होऊ शकते. अशा वेळेस आपल्याला पुरेशी माहिती माहिती असणे फार महत्त्वाचे असते. कोरफड केसांना लावण्याचे बरेच फायदे आहेत.

जर तुम्हाला तुमचे केस लांब, मुलायम व घनदाट व्हावे असे जर वाटत असेल तर तुम्ही विविध घरगुती उपाय यांचा वापर करून देखील तुमचे केस वाढवू शकतात.  घरगुती उपाय मुळे आपल्या अनेक समस्या दूर होण्यास आपल्याला मदत होते. जर तुम्हाला तुमचे केस वाढवायचे असतील तर तुम्ही तर तुम्ही कोरफडचा वापर केला पाहिजे. आपल्या आयुर्वेदानुसार कोरफडीला एक महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. अनेक विविध समस्या दूर करण्यास देखील आपल्याला कोरफड मदत करू शकते. कोरफडीचा वापर विविध ठिकाणी केला जातो व त्याचबरोबर कोरफड ही अत्यंत फायदेमंद व गुणकारी आहे.

त्यामुळे जर तुम्हाला तुमचे केस वाढवायचे असेल किंवा मग तुमच्या केसांच्या निगडित इतर समस्यांपासून जर तुम्हाला आराम मिळवायचे असेल जर तुम्ही कोरफडीचा वापर करून बघावा.  कोरफड जेल किंवा गर हा अत्यंत फायदेमंद असतो. विविध गोष्टींसाठी या गराचा वापर केला जातो. अनेक समस्या दूर करण्यासाठी देखील आपल्याला कोरफडीचा वापर होऊ शकतो. त्याचबरोबर जर तुम्हाला चेहऱ्याच्या निगडीत देखील विविध समस्या असतील तर त्या देखील दूर होण्यास आपल्याला मदत होऊ शकते.

कोरफड केसांना लावण्याचे फायदे :-

    आपल्यास केसांशी निगडीत विविध समस्या दूर करण्यासाठी आपण कोरफडीचा वापर केला पाहिजेल. पण त्याचबरोबर कोरफड केसांना लावल्यामुळे आपल्या केसांना विविध फायदे होऊ शकतात. तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कोरफड केसांना लावल्यामुळे आपल्या केसांना त्याचे कोणकोणते विविध फायदे होऊ शकतात व ते कसे लावावे ? चला तर मग बघुया !

  • केस सरळ होण्यास आपल्याला मदत मिळते :-

   कोरफड केसांना लावण्याचे आपल्या केसांना विविध फायदे होऊ शकतात. त्यामधील एक महत्त्वाचा फायदा कोरफड याचा वापर केल्याने आपल्याला होऊ शकतो तो म्हणजे आपले केस सरळ होण्याचे आपल्याला मदत मिळू शकते. बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांचे केस हे कुरले व गुंतागुंतीचे केस असतात व ते त्यांच्या केसांना सरळ करण्याच्या विविध पद्धतीने प्रयत्न करतात पण ते अपयशी ठरतात. पण जर तुम्हाला देखील तुमचे कुरले केस सरळ करायचे असतील तर तुम्ही केसांना कोरफड गर लावला पाहिजे कोरफडीचा गरामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध पोषक घटकांमुळे आपली केस ही सरळ होण्यास आपल्याला मदत मिळू शकते. जर तुम्ही तुमच्या केसांना कोरफडीचा जेल सतत जर लावले तर तुमचे केस सरळ होण्यास तुम्हाला मदत मिळू शकते. त्यामुळे आपल्या केसांसाठी हा एक महत्त्वाचा फायदा कोरफडीचा वापर केल्यामुळे आपल्यासाठी ठरू शकतो.

  • केसांमधील कोंडा दूर होण्यास आपल्याला मदत मिळते :-

   बऱ्याच वेळेस विविध केमिकलयुक्त क्रीमचा केसांवरती जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे किंवा केस अस्वच्छ असल्यामुळे आपल्या केसांमध्ये कोंडा निर्माण होणे ही समस्या आपल्याला उद्भवू शकते. त्याचबरोबर केसांमध्ये असलेला डेंड्रफ हा साचून त्या ठिकाणी केसांमध्ये कोंडा निर्माण होतो बरेच लोक या समस्येपासून आराम मिळण्यासाठी विविध उपाय करून बघतात पण त्याचा काही पुरेसा प्रमाणात फरक जाणवत नाही. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या केसांमधील निर्माण झालेला कोंडा दूर करायचा असेल तर तुम्ही कोरफडीचा वापर केला पाहिजे. कोरफडीच्या गरामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध घटकांमुळे आपल्या केसांमध्ये असलेला कोंडा दूर होण्यास आपल्याला मदत होते व त्याच बरोबर आपल्याला केसांच्या निगडित इतर कोणत्याही समस्या असेल तर त्या समस्यांपासून देखील आराम मिळण्यास आपल्याला मदत मिळू शकते. त्यामुळे केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी  आपण घरगुती उपाय चा वापर करू शकतो.

वाचा  प्रसूती म्हणजे काय जाणून घेऊया

कोरफडीचा गर केसांना कसा लावावा ?

    बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की केसांना कोरफडीचा जेल किंवा गर कसा लावावा? या संबंधित आपल्याला पुढील प्रमाणे माहिती दिलेली आहे :-

कोरफडीचा ताजा गर घेऊन त्यामध्ये थोडेसे नारळाचे तेल टाकावे व मिश्रण एकत्रित करून आपल्या केसांवरती व केसांच्या मुळांना लावावे. कोरफडीचा ताजा गर मध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध घटकांमुळे आपल्या केसांच्या निगडित विविध समस्या दूर होण्यास आपल्याला मदत मिळते. हे मिश्रण केसांवरती 25 ते 30 मिनिटे तसेच राहू द्यावे व त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. असे आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस करावे असे केल्यामुळे आपल्याला केसाच्या निगडित असणाऱ्या विविध समस्यापासून आराम मिळण्यास मदत मिळू शकते.

   आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की केसांना कोरफड लावल्या मुळे आपल्याला कोणकोणते विविध फायदे होऊ शकतात व केसांना कोरफडीचा गर कसा लावावा? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here