ऑईली स्कीनची काळजी व त्यासाठी फेस वॉश

0
1143
ऑईली स्कीनची काळजी व त्यासाठी फेस वॉश
ऑईली स्कीनची काळजी व त्यासाठी फेस वॉश

 

नमस्कार, हल्लीच्या धावपळीच्या युगात आपले व्यक्तिमत्व जपणे फार गरजेचे आहे. आपण घरी असो किंवा कामावर, आपण आपल्या स्वतःची काळजी घ्यायला हवी. पण या धावपळीच्या युगात आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो, आपले आपल्यावर लक्ष राहत नाही. जागरण, अवेळी खाणे, पुरेशी झोप न होणे, मानसिक ताण तणाव, चिंता, याचा प्रादुर्भाव आपल्या चेहऱ्यावर शरीरावर होतो. त्याच्या अभावी आपले हार्मोन्स इन बॅलन्स होतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे होतात, तसेच रक्ताची कमतरता होते. असे दुष्परिणाम आपल्याला बघावयास मिळतात आणि त्याचबरोबर ऑईली स्कीनची काळजी घेणे हि कठीण होते.

तसेच तुमच्या चेहऱ्यावरील तौलिया ग्रंथी जागृत होऊन, तुमच्या चेहऱ्यावर तेलकटपणा हा स्पष्ट दिसतो. मग ज्या वेळी तुम्ही कोणताही मेकअप करतात, तो एक ते दिड तासातच तेलकट होताना दिसतो. प्रत्येकाची शरीरे वृष्टी हि वेगवेगळी असते, तसेच प्रत्येकाची तीन वेगवेगळी असते. कुणाची ऑईली, तर कोणाची सेन्सिटिव्ह, तर कुणाची कोरडी त्वचा असते. पण सगळ्यात जास्त ऑइली तेलकट त्वचेला जपावे लागते, खास करून उन्हाळ्यात, ऑइली स्किन वाल्यांचा चेहरा, काळवंडतो, चेहऱ्यावर पिंपल्स होण्याची समस्याही उद्भवतात. 

ऑइली (तेलकट)  स्किन कशी होते? 

तेलकट त्वचा राहिली, तर प्रत्येकाला त्याचा त्रास होऊ शकतो. कारण तेलकट त्वचा असल्यामुळे तुम्ही कोणताही मेकअप केला, तर तो जास्त काळ टिकत नाही. तसेच उन्हाळ्यात तेलकट , तेलकट त्वचा असलेल्या लोकांना फार त्रास होतो. ऑईली स्कीनची काळजी नाही घेतली तर शरीरावर ,व चेहऱ्यावर तुम्हाला ब्लॅकहेड्स व पिंपल्स सामना करावा लागतोय.  तर कोण कोणत्या कारणामुळे, तुमची त्वचा तेलकट होते ते बघूयात ! 

  • जास्तीचे तेलकट पदार्थ, मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे, तुमची स्किन ऑइली होते. 
  •  मासिक पाळी मध्ये, शरीरातील हार्मोन्स इन बॅलेंस होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या त्वचेतील तैलग्रंथी उत्तेजित होऊन तुमची त्वचा तेलकट होऊ शकते. 
  • सतत कोणतेही फेअरनेस क्रीम वापरल्यामुळे ही तुमच्या त्वचेतील तेलकट पेशी जागृत होऊन, त्वचेमधील रोम छिद्रे बंद होऊन, पिंपल्स व पुरळ येतात. 
  • आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक व मानसिक ताण आल्यामुळे तुमच्या तेलकट पेशी तयार होतात, त्यामुळे तुमची त्वचा तेलकट होते. 
  • तसेच वाढत्या प्रदूषणामुळे व वातावरणातील बदलामुळे, थंड व दमट वातावरणामुळे, तुमची त्वचा तेलकट होते. 
वाचा  पोटात गॅस होण्याची कारणे व उपाय

ऑइलीस्किन ची काळजी कशी घ्यावी ?

चला, तर आता आपण वरील दिलेल्या माहितीमध्ये तुमची त्वचा ऑइल  (तेलकट) कशी होते, हे जाणून घेतले आहेत. मग, आता ऑईली स्कीनची काळजी कशी घ्यावी ? कोण कोणते घरगुती उपचार करावेत? ते जाणून घेऊयात ! 

मसूर डाळीचा लेप वापरून बघा :

जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर तुम्हाला मसूर डाळीचा वापर हा फार फायदेशीर ठरेल. कारण, मसूर डाळीचे पीठ हे चेहऱ्याती तेल शोषून घेण्याची क्षमता असते, त्यासाठी तुम्हाला मसूरडाळ ही पाण्यात भिजवून, ती वाटून त्यात चिमूटभर हळद+ मध+ दही किंवा दूध यांचे मिश्रण एकजीव करून  तुम्ही तुमच्या चेहऱ्याला 15 ते 20 मिनिटे लावावे. 15 -20 मिनिटानंतर तुम्ही थंड पाण्याने चेहरा धुवावा, असे तुम्ही हप्त्यातून दोन वेळेस केले, तर तुमच्या तेलकट ग्रंथी मधील तेल कमी होऊन, तुमच्या त्वचेवर पिंपल्स व काळे डाग आले असतील, तर ते कमी होण्यास मदत मिळेल. 

मध आणि लिंबू चा वापर करून बघा :

हो, खरंच ज्यांची त्वचा तेलकट असते, त्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग व घामाचे चट्टे पडतात. त्यांच्यासाठी मध आणि लिंबाचा वापर फार फायदेशीर ठरेल. मध+लिंबाचा रस एकत्र करून, जर तुम्ही चेहऱ्याला लावले, तर तुमचा रंगही उजळेल. लिंबू मध्ये विटामिन सी असते. हे तुमच्या चेहऱ्या साठी फार फायद्याचे ठरते. 

मुलतानी माती चा फेसपॅक बनवा :

मुलतानी माती ही थंड असते. जर तुमच्या चेहऱ्यावर अतिरिक्त तेल येत असेल, पिंपल्स होत असतील, त्याचे डाग पडत असतील, अशा वेळी जर तुम्ही मुलतानी मातीचा वापर केला, तर तुम्हाला त्याने अधिक फायदा होईल. त्यासाठी तुम्ही मुलतानी माती पावडर+ त्यात चिमूटभर हळद +दोन ते तीन चमचे दूध+ विटामिन ई कॅप्सूल+ व गुलाब जल यांचे मिश्रण करून घ्या. तुमच्या चेहऱ्याला दहा ते पंधरा मिनिटे लावावे, नंतर चेहरा धुऊन टाकावे, त्याने तुमच्या , चेहऱ्याचे अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत मिळेल. 

टोमॅटोचा वापर करून बघा :

हो, आता तुम्ही म्हणाल, की टोमॅटो हा स्वयंपाक घरात वापरला जाणारा पदार्थ आहे. आणि तो चेहर्यासाठी कसा फायदेशीर ठरेल बरं ? तर खरच टोमॅटो हा नॅचरली तुमच्या स्क्रीन मधील तेलकटपणा कमी करण्यास फार फायदेशीर ठरेल. त्यासाठी तुम्हाला टोमॅटो घेऊन त्याला मधोमध अर्धा कापून त्यात साखरेचे दाणे टाकून, त्याने तुमच्या चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिट हळूवार  मसाज करावा, हा तुमचा नॅचरल स्क्रब पण होईल, आणि तुमच्या त्वचेमधील अतिरिक्त तेलही कमी होईल. अगदी साधा सोपा घरगुती उपाय आहे, हा करून बघा. 

कोरफड चा वापर करून बघा :

कोरफड म्हटले की सगळ्यांच्या नजरेसमोर कोरफडीच्या झाडाचे चित्र येते. कोरफड ही घरोघरी-  दारोदारी सगळ्यांकडेच असतेच. कोरफड चा वापर बऱ्याच काळापासून औषधी गुणधर्मांमध्ये ही केला जातोय. तसेच कोरफड ही सौंदर्यासाठी ही फार फायदेशीर ठरते, कोरफड चा वापर केल्यामुळे तुमचे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल व पिंपल्स काळे डाग फायदा होईल. त्यासाठी तुम्ही कोरफडचा गर काढून चेहऱ्यावर मसाज करावा. असे तुम्ही केल्यास तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जातील, व तेलही कमी होईल, व तुमचा रंगही उजळेल. कोरफड जेलने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मसाज केला, तर हे तुमच्या चेहऱ्यासाठी नॅचरली घरगुती मॉइश्चरायझर होईल. 

वाचा  अननस याचे आपण सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे व तोटे :

चंदन पावडर वापरून बघा :

चंदन पावडर ही प्रत्येकाच्या घरात असते. देवघरात देवपूजेसाठी आपल्याकडे चंदनाचे लाकूड असतेच. जर तुमच्याकडे चंदन हे घरात नसेल, तर हे तुम्हाला कुठल्याही मेडिकल  स्टोअर्स व ब्युटिशन स्टोअर्स मध्ये मिळेल. चंदनचा वापर हा पूजेसाठी नसून, तर तुमचे चेहर्यासाठी होऊ शकतो. चंदन हे अतिशय थंड वनस्पती आहे. चंदनाचा वापर हा पूर्वीपासून फेसपॅक मध्येही केला जातोय. त्यासाठी तुम्ही चंदन पावडर+ दूध+ मध यांचे मिश्रण एकजीव करून, चेहर्‍याला दहा ते पंधरा मिनिटे लावले, तर तुमच्या चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होईल. चेहऱ्यावर पिंपल्स असतील, तर त्यांची आग होत असेल, तर तीही कमी होईल. चंदन मध्ये फंगल इन्फेक्शन वर मात करण्याची क्षमता असते, त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला नॅचरली उजळण्यास मदत मिळेल. 

टिश्यू पेपरचा वापर करत जावा :

वातावरणातील बदलामुळे व तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे तसेच सौंदर्यप्रसाधनांचा अतिरिक्त वापर केल्यामुळे तुमची त्वचा ही तेलकट होते, ज्यावेळी तुम्हाला कुठेही बाहेर, काही कामानिमित्त जावे लागले, अशी यावेळी तुमच्यासोबत तुम्ही टिश्यू पेपरचा वापर करावा, कारण तुमची स्किन ऑइली असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अतिरिक्त तेल, हे एक ते दोन तासात दिसू लागते. अशा वेळी तुम्ही टिशू पेपरने तुमचे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल हे टिशू पेपरने टॅप करून हळू पुसून घ्यावे. टिशू पेपर हा तुमच्या तेलकट त्वचेसाठी तात्पुरते सोल्युशन आहे. 

थंड पाण्याचा वापर करावा :

ऑईली स्कीनची काळजी घेण्यासाठी ज्या लोकांची स्किन ऑइली असते, अशा लोकांनी त्यांचा चेहरा नेहमी थंड पाण्याने धुवावा, व त्यांनी चेहरा धुताना, नेहमी कडुलिंबाच्या पाण्याने तसेच ग्रीन टी च्या पाण्याने चेहरा धुवावा.

ऑइली (तेलकट) स्किन साठी कोणता फेस वॉश वापरावा? 

हार्मोन इन बॅलन्स मुळे, वातावरणातील बदलामुळे, तसेच अवेळी खानपान मुळे, अशक्तपणा, यांचा परिणाम आपल्या शरीरावर व चेहऱ्यावर होतो. अश्यावेळी तुमची स्किन काळवंडते, तेलकट होते, पुरळ येतात, डाग पडतात, डोळ्याखाली काळी वर्तुळे होतात. अशावेळी आम्ही तुम्हाला वरील दिलेल्या माहितीमध्ये कोण कोणती काळजी    घ्यावी? ते सांगितलेले आहेत. खास करून तेलकट त्वचेसाठी, उन्हाळ्यात त्रास होतो. उन्हाळ्यामध्ये तुमचा मेकअप हा एक दीड तासाच्या वर टिकू शकत नाही, तुमची स्किन ऑईली असल्यामुळे, तुम्ही तुमच्या चेहरा धुण्यासाठी कोणता फेशवाॅश वापरावा? हे आपण आता जाणून घेऊयात! 

वाचा  घरात कॅलेंडर असण्याचे फायदे

हिमालया नीम फेस वॉश वापरून बघा :

आता मार्केटमध्ये मेडिकल्स मध्ये हिमालया नीम निम फेस वॉश मिळतोय, हिमालया नीम फेस वॉश मध्ये निंबाच्या पत्त्यांचा वापर केलेला आहे, कडूलिंबाचे पानांचा वापर हा चेहर्यासाठी फार उपयोगी आहे, कडुलिंबाच्या पाण्याने जर तुम्ही चेहरा धुतला, तर तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल हे कमी होते. 

चार्कोल फेस वॉश वापरून बघा :

तुमची स्क्रीन तेलकट असेल, त्यावर काळे ब्लॅकहेड्स असतील, अशा वेळी तुमच्या चेहर्यासाठी चार्कॉल, फेस वॉश फायदेशीर ठरेल. कारण चार्कॉल फेस वॉश मध्ये कोळशाचे प्रमाण असते, कोळसा हा तुमच्या, चेहऱ्यातील तैलिय ग्रंथींमधून, तेल शोषून काढण्याचे काम करते, त्यासाठी तुम्ही चार्कॉल फेस वॉश, हातावर घेऊन तुमच्या चेहऱ्यावर त्याने पाच दहा मिनिटात मसाज करावा. आणि चेहरा धुवावा. असे तीन ते चार आठवडे केल्यास, तुम्हाला फरक नक्की जाणवेल. 

अजून कोण कोणते फेशवाश आहे जे तुमच्या तेलकट त्वचेसाठी ते बघूयात !

  • टी ट्री ऑइल कंट्रोल फेस वॉश, 
  • हर्बल फेस वॉश, 
  • ऑईल कंट्रोल ऑंटी अँस फेस वॉश, 
  • बायो पायनापल ऑइल कंट्रोल फेस, 
  • लोटस हर्बल फेस वॉश, 

अशी काही फेसवॉश ची नावे आम्ही तुम्हाला सांगितलेली आहेत. तसेच तुमची स्किन ऑइली आहे, आणि पुरळ होऊन त्यांची आग होत असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवून त्यांच्या सल्ल्यानुसार फेशवॉश घेऊ शकतात. 

ऑइली (तेलकट) स्किन साठी कोणकोणती औषधे व क्रीम वापरावे? 

म्हणतात ना, चेहऱ्याचे सौंदर्य हे त्याच्या आहारावर सुद्धा असते. अशावेळी तुम्ही काय खातात, काय पितात, कशा प्रकारच्या वातावरणात राहतात, त्याच्यावर तुमचे सौंदर्य राहते. जर तुम्ही सतत धुळीच्या वातावरणात, काम करत असाल, तर अशावेळी तुमची स्कीन हि अतिशय काळवंडते, व त्यावर , पुरळ व डाग निर्माण होतात. तसेच जर तुम्ही तेलकट पदार्थ खात असाल, तर त्याचा प्रादुर्भाव तुमच्या चेहऱ्यावर होतो. त्यामुळे तुमची स्कीन तेलकट होते,  व तुमच्या चेहऱ्यावर, नाकावर ब्लॅक हेड्स व पिंपल्स दूर होतात. अशा वेळी जर तुम्ही हर्बल औषध घेतले, तर तुम्हाला फरक नक्की जाणवेल. मग त्यावर कोणते औषधे घ्यायला हवेत हे जाणून घेऊया. 

त्रिफळा चूर्णाचा वापर करून बघा :

त्रिफळा चूर्ण हे आवळा, हरड, बेहडा यांच्या मिश्रणाने बनलेली असते. त्यामुळे त्याला त्रिफळाचूर्ण असे म्हणतात. तुमच्या पोटातील पचनाच्या समस्या, तसेच केस गळती, चेहर्यासंबंधित कोणतीही समस्या असेल, त्यावर रामबाण उपाय आहे. त्रिफळा चूर्ण घेतल्यामुळे तुमच्या चेहर्‍याचे सौंदर्य वाढते, तसेच तुमच्या शरीरातील रक्त हे प्युरिफायर होऊन, तुमचे सौंदर्य वाढते व ऑईली स्कीनची काळजी घेण्यास मदत होते. त्रिफळा चूर्ण चा वापर हा पौराणिक काळापासून केला गेलेला आहे, त्रिफळा चूर्ण हे तुम्हाला, कोणत्याही मेडिकल स्टोअर्स मध्ये मिळेल.  त्रिफळा चूर्ण हे तुम्हाला रात्रीच्या वेळी कोमट पाण्यात एक चमचा प्यावयाचे आहे. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला तेलकट त्वचेसाठी कोणती काळजी घ्यावी? त्यावर कोणता फेशवाश वापरावा? त्यावर कोणते औषधे घेऊ शकतात? हे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. तसेच तुम्हाला आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये, तुम्हाला कशाची ऍलर्जी असेल, तर तुम्ही  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

                          धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here