दुधाची साय चेहऱ्यावर कशी लावावी व त्याचे फायदे

0
1916
दुधाची साय चेहऱ्यावर कशी लावावी व त्याचे फायदे
दुधाची साय चेहऱ्यावर कशी लावावी व त्याचे फायदे

 

मित्रांनो, चेहर्यासंदर्भात सगळेजण जागृत असतात. आपला चेहरा मऊ, मुलायम,टवटवीत दिसावा चेहऱ्यावर कुठल्या प्रकारचे काळे डाग नसावेत, चेहरा चमकदार,ताजातवाना दिसावा यासाठी बरेच जण काही ना काही उपाय करत असतात. अनेक महिला पार्लर मध्ये जाऊन चेहरा वर उपाय करत असतात. दूध हे तर सगळ्यांनाच माहित आहे. दुधाचे एक ना अनेक फायदे आहेत. अनेक जणांची दिवसाची सुरुवात हे दूध पिल्याने होत असते. दुधाची साय खाणे देखील बऱ्याच जणांना आवडत असते. तर काही जण त्यांचे वजन नियंत्रित राहावे म्हणून दुधाची साय खाणे टाळत असतात. दुधामधून अनेक पोषक घटक आपणास मिळत असतात. केवळ दुधाचाच नाही तर दुधाच्या साय चा फायदा देखील तुम्हाला होत असतो. यामध्ये कॅल्शियम सोबतच विटामिन A,C, आयरन आणि फॉस्फरस देखील असते. तसेच अमिनो ऍसिड, व लॅक्टोज या घटकांचा समावेश असतो. दुधामुळे आपल्याला आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक फायदे मिळत असतात. दुधाचा वापर हा फक्त पिण्यासाठीच होतो असे नाही तर आपण सौंदर्याच्या दृष्टीने देखील दुधाची साय चा वापर करू शकतो.

चेहऱ्यावर प्राकृतिक निखार यावा यासाठी जुन्या काळातील महिला या दुधाच्या मलाई चा वापर करत होते. परंतु आजच्या काळातल्या बायका या फेअरनेस-क्रिम चा जास्तीत जास्त वापर करतात. आणि यामुळे त्यांना चेहरा संदर्भात अनेक समस्या उद्भवत असतात. तसेच बाजारातून महागडे क्रीम प्रोडक्स आणून ते त्यांच्या चेहऱ्यावर वापर करत असतात. याचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात तसेच चेहरा काळवंडतो. तसेच त्यांच्या चेहर्‍यावरील नैसर्गिक तेज कमी होते त्यांची चेहऱ्याची त्वचा ही कोरडी पडते किंवा कुठली ना कुठली साईड इफेक्ट होत असतात. यासाठी चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी?चेहर्यासाठी काय योग्य आहे हे जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. तुम्हालाही तुमचे चेहरा संदर्भात समस्या आहेत का? तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला नैसर्गिक तेच आणायचे आहेत का? त्यासाठी नेमके कोणते घरगुती उपाय केले पाहिजे? दुधाची साय चेहऱ्यावर लावल्याने कोणता फरक जाणून येईल? दुधाच्या सायचा वापर कसा केला पाहिजे? व केव्हा केला पाहिजे?चला तर मग या विषयी आपण जाणून घेऊया.

दुधाची साय चेहऱ्यावर कशी लावावी?

मित्रांनो दुधाची साय चेहऱ्यावर लावल्याने एक ना अनेक फायदे होत असतात. दुधाची साय चेहऱ्याला लावल्याने चेहरा हा चिरतरुण दिसू दुधाच्या साई पासून फेस पॅक तयार करून तो चेहऱ्याला लावण्याचे अनेक फायदे होत असतात. परंतु दुधाची साय चेहऱ्यावर कशा पद्धतीने लावावी हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे. चला तर मग हे आपण जाणून घेऊया.

वाचा  पायाच्या बोटात चिखल्या होऊ नयेत,काय काळजी घ्यावी.

दुधाच्या साय पासून स्क्रब बनवा :

निरोगी आणि मुलायम त्वचा बनवण्यासाठी तुम्ही दुधाच्या साय पासून स्क्रब बनवू शकतात. यासाठी 2 चमचे तांदळाचे पीठ यामध्ये 2 चमचे मलई घाला. हे व्यवस्थितपणे एकजीव करून घ्या. ही पेस्ट चेहर्‍यावर लावण्याआधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. आणि नंतर ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्याला लावा. दोन मिनिटे चेहऱ्यावर मसाज करा. नाक आणि मानेवर देखील तुम्ही हलक्या हाताने मालिश करू शकता. जेणेकरून या ठिकाणावरील घाण व डेड स्कीन निघून जाण्यास मदत होईल. दहा मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुऊन टाका.अशा पद्धतीने याचा वापर करू शकतात. आठवड्यातून तुम्ही तीन ते चार वेळा हा उपाय करू शकतात. याने तुम्हाला नक्कीच तुमच्या चेहऱ्यात फरक आढळून येईल.

दुधाच्या सायने मसाज :

आपण ताज्या  मलई ने फेस क्रीम सुद्धा बनवू शकतो. ताज्या मलई मध्ये तेल असल्यामुळे त्यामध्ये वरून तेल घालण्याची गरज नाही. यामध्ये थोडीशी हळद + एक चमचा बेसन पीठ घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण चेहर्‍यावर लावण्याआधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. नंतर हे मिश्रण चेहर्‍यावर लावून चेहऱ्यावर मसाज करा. 5 मिनिटे मसाज केली तरीही चालेल. असे केल्याने चेहऱ्यावरील रक्तभिसरण,ब्लड सर्कुलेशन वाढते. ज्याने स्किन ही नॅचरल ग्लो होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही केमिकलयुक्त प्रोडक्स ची गरज भासणार नाही. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन-तीन वेळा करू शकतात.

दुधाच्या साय पासून फेसपॅक बनवा :

 •     दुधाच्या साय मध्ये मध मिसळून तुम्ही फेस पॅक तयार करू शकतात. दुधाची साय + अर्धा चमचा मध हे मिश्रण एकजीव करून घ्या. चेहऱ्याला लावणे आधी तुम्ही तुमचा चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करून घ्या. हा फेस पॅक तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावून दहा मिनिटे मसाज करा. पंधरा मिनिटे ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुऊन टाका. हा फेसपॅक लावल्याने तुमच्या चेहऱ्याची त्वचा चमकु लागते जर आपल्याला त्वचेवर पुरळ, सनबर्न किंवा काळे डाग असतील तर तुम्ही दुधाच्या साय पासून बनलेला हा नॅचरल फेस पॅक नक्कीच वापरून बघा. तुम्ही हा फेस पॅक नेहमी तुमच्या चेहऱ्यावर लावला तरीही चालेल किंवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा याचा वापर केला तरीही तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये चांगला फरक जाणून येईल.
 • दुधावरची साय + एक चमचा लिंबाचा रस + एक चमचा बेसन पीठ+ अर्धा चमचा मध+चिमुटभर हळद हे मिश्रण एकजीव करून घ्या. हे मिश्रण चेहऱ्याला लावण्याआधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. त्यानंतर हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्याला व मानेवर लावून घ्या. हा फेस पॅक 15 ते 20 मिनिटे राहू द्या. या फेस पॅक चा वापर केल्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा काळवट पणा दूर होऊन तुमच्या शरीराला एक नैसर्गिक चमक येण्यास मदत होईल.आठवड्यातून तीन ते चार वेळ लावू शकतात.
वाचा    केस वाढवण्यासाठी कोणते तेल वापरावे

दुधाची साय लावण्याचे फायदे :

 • साय चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरे चा रंग हा उजळण्यास मदत होते. हे एक नॅचरल मॉइश्चरायझर आहे.
 • चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटं दुधाच्या सायने मालिश केल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवावा. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून चेहऱ्याची स्किन हेल्दी बनते व चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.
 • चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी तुम्ही दुधाच्या साई चा वापर केल्याने नक्कीच फायदा होऊ शकतो.
 • चेहऱ्यावर दुधाची साय लावल्यामुळे चेहरा हा ताजातवाना आणि जवान दिसू लागतो.
 • चेहऱ्यावर दुधाची साय लावल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात.
 • दुधाची साय चेहऱ्याला लावल्यामुळे चेहऱ्यावर मुरूम येण्यापासून तुमच्या चेहऱ्याचे संरक्षण होते.
 • चेहऱ्याचा काळपटपणा जाण्यासाठी देखील तुम्ही दुधाच्या साय चा वापर करू शकतात.
 • चिरतरूण दिसण्यासाठी दुधाच्या साय चा उपयोग होतो.
 • ॲन्टी एजिंग क्रीम म्हणून तुम्ही दुधाच्या साई चा वापर करू शकतात.

दुधाची साय लावल्याने काय काय फायदे होतात हे वरील प्रमाणे आपण जाणून घेतलेले आहे. मित्रांनो,दुधाची साय नक्कीच तुम्ही लावून बघा. दुधाची साय लावल्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. दुधाची साय लावल्यामुळे तुमचे चेहऱ्यावर एक नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होईल. तर नक्कीच तुम्ही दुधाच्या साय चा वापर करून बघा.

तर मित्रांनो दुधाची साय चेहऱ्यावर लावल्याने आपल्या अनेक फायदे होतात. तसेच दुधाची साय  चेहऱ्याला कशी लावावी, कोण- कोणते फायदे होतात हे आपण वरील प्रमाणे बघितलेले आहे. तर नक्कीच मित्रांनो तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर देखील दुधाची साय लावून बघा. आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here