गुलाबाच्या फुलांची माहिती काय आहे जाणून घेऊया

0
1442
गुलाबाच्या फुलांची माहिती
गुलाबाच्या फुलांची माहिती

नमस्कार मित्रानो फ्री सिम्पलीफाईड इन्फॉर्मशन पोर्टल वर आपले स्वागत आहे. मित्रांनो जस कि तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे कि आपल्या देशातील बहुतांश लोकांना फुल हि खुप आवडत असतात. या मध्ये खास करून महिला वर्गाचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. प्रत्येक फुलाचं एक वेगळाच महत्व आहे. आज आपण अशाच एका फुलाची माहिती देणार आहोत ते म्हणजे गुलाबाचं फुल. पूर्ण जगात गुलाबाचं फुल हे प्रेमाचं प्रतीक मानलं जात. चला तर मग जाणून घेऊया गुलाबाच्या फुलांची माहिती. गुलाबाच्या फुलांचे प्रकार , त्यांचे उपयोग, उगम.

गुलाबाच्या फुलांची निर्मिती कशी झाली ?

गुलाबाच्या फुलाचं वैज्ञानिक नाव ROSA असे आहे. गुलाबाचे फुल हे ROSACEAE या बोटॅनिकल कुटुंबातील एक सुगंधित फुल आहे. गुलाब या नावाचा जन्म पारसी भाषेतून झाला आहे. नंतरच्या काळात याचे हिंदी भाषेत रूपांतरण करण्यात आले. हिंदी भाषेत रूपांतरण झाल्यानंतर याच्या गुलाब, गुलाबी यासारख्या निरनिराळ्या व्याख्या तयार झाल्या. गुलाबाचे झाड हे संपूर्णपणे काटेरी असते. गुलाबाचे झाड हे बारमाही फुले देणार झाड आहे. गुलाबाच्या फुलांच्या संपूर्ण जगात १०० पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. महत्वाचे म्हणजे यापैकी बहुतांश जाती या आशियाई देशांमध्ये सापडतात.
जगात अमेरिका, आफ्रिका, युरोप , फ्रांस यासारख्या देशांमध्येसुद्धा गुलाबाची शेती केली जाते. गुलाबाच्या फुलाचे सगळ्यात जास्त महत्व फ्रांस या देशात आहे. कारण या देशाला रोमान्स करण्याचा देश म्हणून ओळखले जाते. आणि गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतीक मानले जाते हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे.

वाचा  अक्रोड चे फायदे

गुलाबाच्या फुलांचे किती प्रकार आहेत?

चला तर मग आता आपण जाणून घेउया गुलाबाच्या फुलांचे किती प्रकार आहेत. यापैकी आपल्या भारत देशात किती प्रकारचे गुलाब आढळून येतात.

१) लाल गुलाब

गुलाबाचा हा प्रकार आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतो. मित्रानो लाल गुलाबाची लागवड करणे सोपे तसेच कमी खर्चिक आहे. लाल गुलाबाचे झाड अगदी सहजपणे कुठेही छोट्याश्या उगवू शकते. त्यामुळे आपण या झाडाची लागवड आपल्या घरी सुद्धा सहजपणे करू शकतो. लाल रंगाचे गुलाब हे खूपच मोहक आणि मनाला शांती देणारे फुल असतात. लाल गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते म्हणूनच जेव्हा प्रियकर आपल्या प्रेयसीजवळ प्रेम व्यक्त करण्यासाठी जातो तेव्हा तो सर्वप्रथम लाल रंगाचे गुलाब देतो.

२) सफेद गुलाब

सफेद गुलाब हे बहुतांश उत्तरेकडील भागात जास्त प्रमाणात आढळून येतात. सफेद गुलाब हे शांततेचं प्रतीक म्हणून मानले जाते . जर तुमचे एखाद्या जवळच्या मित्र किंवा मैत्रिणीसोबत भांडण झाले असेल तेव्हा सफेद गुलाब देऊन ते मिटवण्याचा प्रयत्न करू शकतात. विदेशांमध्ये सहसा याच पद्धतीचा अवलंब केलेला दिसतो. आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांना आपण चाचा नेहरू म्हणून सुद्धा ओळखतो त्यांनासुद्धा सफेद गुलाबाच्या फुलांची खूप आवड होती. त्यामुळे ते नेहमी आपल्या कोटवर सफेद गुलाबाचे फुल लावत असत.

३) पिवळा गुलाब

पिवळ्या रंगाचे गुलाब हे जगात मैत्रीचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला एखाद्या मुलीशी किंवा मुलाशी मैत्रीची सुरवात करायची असेल तर तुम्ही हा पिवळ्या रंगाचा गुलाब देऊन याची सुरवात करू शकतात. पिवळ्या रंगाच्या गुलाबांच्या फुलांचा सहसा कुठेही सजावटीसाठी जास्त उपयोग केला जातो.

४)काळा गुलाब

काळ्या रंगाचा गुलाब हा संपूर्ण काळा नसतो. काळ्या रंगाची गुलाबाच्या फुलावर हलक्या रंगाची शेड असते.

५) गुलाबी गुलाब

गुलाबी रंगाचे गुलाबाचे फुल दिसण्यात खूप सुंदर आणि मोहक असतात. कॅलस, फर्स्ट प्राईज, क्वीन एलिझाबेथ, मारिया, मृणालिनी हि गुलाबी रंगाच्या फुलांच्या जातीची नावे आहेत.

वाचा  सिताफळाच्या पानाचे फायदे

६) निळा गुलाब

निळ्या रंगाचे गुलाब हे फार क्वचित प्रमाणात आढळतात. हि फुले सहसा पश्चिमी देशामंध्ये आढळून येतात. मारिया, मृणालिनी,ब्ल्यू मून, नीलांबरी हि निळ्या रंगाच्या गुलाबाच्या फुलांच्या जातीची नावे आहेत.

७) केशरी गुलाब

केशरी रंगाचे गुलाब हे फार सुहासक आणि सुंदर असतात. समर हॉलिडे, फोकलोअर, अभिसारिका, सी पर्ल हि या गुलाबाच्या जातीची काही नावे आहेत.

गुलाबाच्या फुलांचे फायदे काय आहेत ?

मित्रांनो गुलाबाच्या फुलांचे अनेक फायदे आहेत तर जाणून घेऊयात याचे काय काय फायदे आहेत ते.

१) सगळ्यात महत्वाचे म्हणजे गुलाबाचे फुल हे सुवासिक असल्या कारणांने देवांना अर्पण करण्यासाठी आणि पूजाविधी साठी या फुलांचा वापर करण्यात येतो.
२)गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद, गुलाब जल, सुवासिक अत्तर, गुलाब तेल असे अनेक पदार्थ बनवण्यात येतात.
३)गुलाबाच्या फुलांची योग्य प्रकारे निवड करून त्यापासून काही आयुर्वेदिक औषधे सुद्धा बनविण्यात येतात.
४)लग्न समारंभ, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम येथे सजावट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुलाबाच्या फुलांचा वापर करण्यात येतो.
५) काम क्रीडा करताना सुद्धा गुलाबाच्या फुलांचा आणि पाकळ्यांचा उपयोग करण्यात येतो. असे मानण्यात येते कि गुलाबाच्या फुलांमधून दरवळणारा सुगंध काम क्रीडेचा आनंद घेण्यासाठी महत्वाची भूमिका घेतो. म्हणूच नवविवाहित जोडपे जेव्हा मधू चंद्राची रात्र साजरी करणार असतात तेव्हा त्यांचा बिछाना गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेला असतो.
६)गुलाबाच्या पाकळ्यांपासून चविष्ट असे गुलाब सरबत बनवले जाते. याचा मुख्य उपयोग मोठ्या समारंभांमध्ये केला जातो.

गुलाबाच्या फुलांची काळजी कशी घ्याल?

मित्रानो आतापर्यन्त आपण गुलाबाच्या फुलांची वेगवेगळी माहिती घेतली जशी कि त्यांचे प्रकार, त्यांचे उपयोग. आता आपण जाणून घेणार आहोत गुलाबाच्या फुलांची काळजी कशा प्रकारे घेतली जाते.
गुलाबाचे झाड हे बारमाही फुले देणारे झाड आहे. जर आपण या गुलाबाच्या झाडाची योग्य आणि नीट काळजी घेतली तर हि झाडे महिन्यातून कमीत कमी २वेळा फुले देण्याची शक्यता असते.
घरी जर गुलाबाच्या झाडाची लागवड करायची असेल तर यांची छोटी रोपे घेऊन लहान आकाराच्या कुंड्यांमध्ये लावावी. रोपे लावून झाल्या नंतर काही दिवस विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नियमित यांना पाणी घातले पाहिजेल.
साधारणतः महिन्यातून एकदा तरी गुलाबाच्या झाडाची छाटणी करायला हवी. असे केल्याने झाडांची वाढ उत्तम प्रकारे व लवकर होते.
गुलाबाचे फुल पूर्णपणे उमलल्या नंतर हळुवारपणे छोट्या कटर ने कापून घ्यावे.
या झाडाच्या पानांवर हलक्या स्प्रे ने पाणी मारावे आणि झाडाच्या खालच्या भागास पाणी घालावे जेणे करून कीड लालगत नाही.

वाचा  टोमॅटो चेहऱ्याला लावण्याचे फायदे

गुलाबाच्या झाडांना कुठल्या प्रकारची कीड लागू शकते?

मित्रानो गुलाबाच्या झाडाची योग्य काळजी नाही घेतली तर त्याला कीड लागू शकते. १) कोळी २) हुमणी कीड ३) वाळवी ४) पिठ्या ढेकुण
५)मावा ६)फुलकिडे ७) तुडतुडे ८) खवले कीड हे काही गुलाबाच्या झाडाला कीड लागण्याचे प्रकार आहेत.

धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here