ड्राई स्किन ची काळजी व त्यासाठी फेस वॉश

0
1450
ड्राई स्किन ची काळजी व त्यासाठी फेस वॉश
ड्राई स्किन ची काळजी व त्यासाठी फेस वॉश

 

          मित्रांनो, प्रत्येकाची त्वचा ही वेगळ्या प्रकारची असते. काहींची त्वचा ही ऑईली असते. तर काहींची त्वचा ही कोरडी असते. प्रत्येक व्यक्तीची त्वचा यामध्ये फरक असतो. तसेच प्रत्येक ऋतूनुसार तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेत देखील फरक जाणून येत असतो. जसे की उन्हाळ्यात त्वचा ही ऑईली होते तर हिवाळ्यात ड्राई स्किन होते. प्रत्येकाचे स्किन वेगवेगळी असल्यामुळे त्याला त्या स्कीन प्रमाणे काळजी घ्यावी लागते.

         जर तुमची त्वचा ड्राय आहे? म्हणजे त्वचा कोरडी आहे.तर तुमच्या त्वचेची काळजी कशी घ्यायची? तुमचा स्किंनकेअर रुटीन कसा असावा? तसेच कुठले कुठले प्रोडक्स ड्राई स्किन साठी योग्य आहे? हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायला हवे. तुम्हाला तुमच्या स्किन चा प्रकार ओळखता आला पाहिजे.तुमची स्कीन ड्राय होऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या नियमित आहारात कुठल्या कुठल्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे हे देखील तुम्हाला माहीत असायला हवे. तुम्ही तुमच्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केल्याने  तुमची त्वचा कोरडी होऊ शकणार नाही. तसेच आहारात तूप, आळशी,सूर्यफुलाच्या बिया, ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करणं गरजेचं आहे. तुमची स्किन मॉइश्चरायझर राहावी यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिले पाहिजे. ड्राई स्किन कशी होते काय होते तिची काळजी कशी घ्यावी कुठले फेसवॉश वापरावे हे जाणून घ्यायला हवे.चला तर मग, याची माहिती आपण जाणून घेऊया.

ड्राई स्किन कशी होते व का होते?

मित्रांनो,बऱ्याच जणांना माहीत नसते की आपली स्कीन  ड्राय का होते? आणि कशामुळे होते? स्कीन ड्राय का होते हे तुम्हाला जाणून घेणे गरजेचे असते तुमच्या त्वचेतील मॉइस्चरायझर चे प्रमाण कमी झाल्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडू शकते. बऱ्याच जणांना पाणी जास्त पिण्याचे देखील सवय नसते. पाणी शरीराला पुरेसे न मिळाल्याने देखील त्वचा कोरडी होत असते. त्यामुळे तुम्हाला शरीराला पुरेसे प्रमाणात पाणी प्यायला हवे. पाणी कमी प्यायल्याने त्वचा कोरडी होत असते. त्वचा कोरडी पडल्यामुळे सुरकुत्या लवकर येत असतात. तसेच त्वचा कोरडी पडल्यामुळे बऱ्याच जणांना रिंकल ची समस्या उद्भवत असते. ड्राई स्किन झाल्यामुळे त्वचा लवकर काळवंडते. ड्राई स्किन कशामुळे होते त्याची कारणे कोणती खालील प्रमाणे जाणून घेऊया.

वाचा  पालेभाज्या खाण्याचे फायदे

ड्राय स्कीन का होते?

 • पाणी व दुधाचा वापर कमी केल्यामुळे स्किन लवकर ड्राय होते. शरीरातील रोम छिद्रांमध्ये तेल सोडणाऱ्या ग्रंथी असतात ज्या त्वचेला कोरडी होण्यापासून वाचवतात. पाण्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि दुधामुळे शरीराला योग्य ऑइल मिळत असते.
 • फेसवॉश चा व साबणाचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे.
 • जास्त गरम पाण्याचा वापर केल्यामुळे देखील स्कीन ड्राय होत असते.
 • टोनर चा वापर केल्यामुळे.
 • स्किन चा प्रकार न माहित असताना कुठल्याही मॉइस्चरायझरचा वापर केल्यामुळे.

ड्राय स्कीन होण्याची लक्षणे कोणती?

  मित्रांनो,बऱ्याच जणांना त्वचेचा फरक कळत नसतो.जसे की त्यांची त्वचा ही कोरडी आहे की त्यांची त्वचा ही ओईली आहे की अजून दुसरीच कुठली आहे. ड्राई स्किन मध्ये तीन प्रकार पडतात.

1) थोडी ड्राय

2) भरपूर ड्राय

3)अशक्य ड्राय.

परंतु, तुमची त्वचा नेमकी कोणत्या प्रकारात वळते हे तुम्हाला कळायला हवे. ड्राय स्कीन वेगळी आणि डिहायड्रेटेड स्किन वेगळी असते.म्हणजे ज्याच्या मध्ये तेलच कमी आहे. त्वचेमध्ये आतील भागात लेयर असतात. आणि आतून नैसर्गिक रित्या सीबम नावाचे ऑइल बाहेर पडत असते. आणि ज्यांच्या त्वचेमध्ये हे ऑइल कमी पडते त्यांना बाहेर सुद्धा तेलाची गरज असते म्हणजेच त्यांची त्वचाही कोरडी झालेली असते.

जी डीहायड्रेटेड त्वचा असते ती कुठल्याही प्रचंड धुळीच्या ठिकाणी गेल्यानंतर,  वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर तसेच थंडीच्या दिवसांमध्ये देखील ज्यांची त्वचा तात्पुरती कोरडी पडते. त्यांच्या त्वचेमधील थोडसं पाण्याचं प्रमाण कमी झालेला असतं त्यांना फक्त पाण्याची कमी भरून काढावे लागते म्हणजेच त्यांची त्वचा कोरडी नसते.

कोरडी त्वचा पडणे म्हणजेच  त्या व्यक्तींना ऑइल त्यांच्या त्वचेवर  लावावे लागते. साधा नखाचा ओरखडा जरी ओढला गेला तरी त्यांच्या स्किन वर पांढऱ्या कलरच्या रेषा पडतात. अशा व्यक्तींनी त्यांच्या कोरड्या त्वचेची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते.

ड्राई स्किन साठी कोणता फेस वॉश वापराल?

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर फेसवॉश नेमका  वापरावा तरी कोणता? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो. तर मित्रांनो बाजारातून महागडे फेशवॉश घेऊन तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर त्याचा वापर करत असतात. पण फेस वॉश वापरणे आधी तुम्हाला तुमची स्किन ओळख करता आली पाहिजे. जसे की ओईली स्किन साठी कुठल्या प्रकारचा फेस वॉश वापरावा, व ड्राय स्किन साठी देखील कुठल्या प्रकारचा फेसवॉश वापरावा हे जाणून घेणे तुम्हाला गरजेचे असते. जर आपली त्वचा ही कोरडी असेल किंवा कळतच नसेल तर कुठल्याही प्रकारचा साबण किंवा फेस वॉश वापरणे अयोग्य ठरते. तुम्ही तुमच्या त्वचेसाठी कुठलाही केमिकल वाला, हार्ड, स्ट्रॉंग फेसवॉश पासून लांबच राहा.त्वचा कोरडी आहे म्हणून कुठल्याही प्रकारचा फेशवॉश वापरू नये का?चेहरा स्वच्छ करू नये का?असे नाही.

वाचा  जेवण झाल्यावर पोटात दुखणे कारणे व उपाय

तर मित्रांनो, काळजी करण्याची गरज नाही फेस वॉश वापरण्या ऐवजी तुम्ही क्लिंझिंग मिल्कचा वापर करून तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकतात. क्लिन्झिंग मिल्क अतिशय क्रीम सारखे असते. जवळजवळ तुम्ही मॉइस्चरायझर नीच चेहरा धुत आहेत की काय असे तुम्हाला वाटू लागेल. सकाळी उठल्या उठल्या अंघोळीचे दरम्यान किंवा रात्री झोपताना दोन्ही वेळेला अशा प्रोडक्ट ने धुवायचे आहे की जो अतिशय  माइल्ड असेल. माईल्ड म्हणजेच अक्षरशहा दुधासारखा.

माइल्ड फेसवॉश :

कच्चे दूध + कापसाचा बोळा

तर मित्रांनो माइल्ड फेस वॉश हा तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात. थोड्याप्रमाणात कच्चे दूध घ्यायचे आणि कापसाच्या बोळ्याने तुमचा चेहरा हळुवारपणे साफ करून घ्यावा. याचा वापर तुम्ही फेस वॉश म्हणून करू शकतात. याचा वापर करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील घाण काढू शकता तुमच्या स्वच्छ करू शकतात.याने तुमच्या त्वचेचा कोरडेपणा जाण्यास मदत होऊ शकते.

Cetaphil :

मित्रांनो, जर तुमच्याकडे थोडासा बजेट असेल तर Cetaphil Skin Cleanser नावाचे प्रॉडक्ट आणून तुम्ही त्याचा वापर करू शकतात.हे कुठल्याही मेडिकल मध्ये तुम्हाला उपलब्ध होईल. या स्किन क्लिंजर ने तुम्ही तुमच्या कोरड्या त्वचेची काळजी घेऊ शकतात. हे प्रॉडक्ट खुप इफेक्टिव्ह आहे.

ड्राई स्किन साठी घरगुती उपाय

प्रत्येकाला आपल्या त्वचेची काळजी घ्यावीशी वाटते. ड्राई स्किन साठी कुठल्या प्रकारचे काळजी घ्यावी हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. बाजारातून महागडे प्रोडक्स आणून तुम्ही तुमच्या चेहऱ्याची काळजी घेऊ शकतात असे नाही. तर तुम्ही घरगुती उपाय वापरून देखील तुमच्या ड्राय स्किन ची काळजी घेऊ शकतात. तुम्ही तुमच्या कोरड्या त्वचेसाठी काय काय काळजी घ्यायला हवी हे जाणून घेणे फार गरजेचे आहे. चला तर मग  ड्राय स्किन साठी कोणते घरगुती उपाय करावेत हे जाणून घेऊया.

 • ड्राई स्किन साठी तुम्ही ऑलिव्ह ऑइल मालिश करावी.विशेषत: हिवाळ्यात स्कीन ड्राय होत असते. ऑलिव्ह ऑइल मसाज केल्यामुळे तुम्हाला भरपूर प्रमाणात फायदा होऊ शकतो.
 • ऑलिव ऑइल मध्ये एंटीऑक्सीडेंट चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे त्वचा ही डीहायड्रेट राहते.
 • कोरड्या त्वचेसाठी तुम्ही एलोवेरा जेल चा वापर करू शकतात. याने नैसर्गिक रित्या त्वचेला ओलावा मिळेल आणि त्वचा देखील उजळण्यास मदत  होईल.
 • त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी पपई देखील उपयुक्त राहील. पपईची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर मालिश केल्याने फायदा होईल.
 • स्किन हेल्दी ठेवण्यासाठी बदाम तेल मदत करेल आपली स्किन खूप अधिक ड्राय असल्यास आठवड्यातून दोनदा स्किनवर मालिश करावी याने स्किन चा ओलावा टिकून राहतो.
 • दही हे देखील एक मॉइश्चरायझर आहे .दह्याने चेहऱ्याची मालिश करून 20 ते 25 मिनिटे तसेच राहू द्या.याने त्वचेवरील ड्राय नेस दूर होईल.
 • रोज रात्री झोपण्यापूर्वी विटॅमिन ई आणि एलोवेरा जेल एकजीव करून ते तुमच्या चेहऱ्यावर लावावे. त्याने तुमच्या त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन त्वचा उजळ होईल.
वाचा  चेहऱ्याला हळद लावण्याचे उपाय व फायदे

वरील प्रमाणे,घरगुती उपाय करून देखील तुम्ही तुमचा चेहरा कोरडा होण्यापासून वाचवू शकतात. ज्यांची ड्राय स्कीन असेल त्यांनी ड्राय स्किन साठी काय वापरावे,आहारात कसले सेवन करावे याची माहिती जाणून घ्यायला हवी.तर आपण ड्राई स्किन ची काळजी कशी घ्यावी हे वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहेत आणि याने देखील तुमची मदत होत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती ट्रीटमेंट करू शकतात. आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्कीच आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here