चेहऱ्यावर तीळ, चामखीळ यासाठी काही घरगुती उपाय

0
2039
चेहऱ्यावर तीळ, चामखीळ यासाठी काही घरगुती उपाय
चेहऱ्यावर तीळ, चामखीळ यासाठी काही घरगुती उपाय

नमस्कार, जर स्त्रिया गोऱ्या असतील, व त्यांच्या चेहऱ्यावर तीळ असेल, तर ती एकदम छान दिसतात. चेहऱ्यावर एक ते दोन असतील तरीही छान दिसतात. पण त्याचे प्रमाण अधिक असले, तर चेहऱ्यावर ते एक काळे डाग असल्यासारखे दिसतात. कोणताही मेकअप केल्यावर पार्लर मध्ये ओठांवर काळा डॉट देणे, हि प्रथा पूर्वीपासून आहे. आजी तर आपल्या कानामागे काजळाचा टिक्का लावायची, त्यांच्या म्हणण्यानुसार असे आहे, की चेहऱ्यावर काळा डाग ठेवला, की तुम्हाला कुणाची नजर लागत नाही. पण जर हेच प्रमाण जास्त असेल, तर चेहरा विद्रूप दिसू शकतो, बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो, की चेहऱ्यावर तीळ कशी येते? का येते? ते जाणून घेऊयात! 

चेहऱ्यावरील तीळ चामखीळ कशी येतात ?

चेहऱ्यावर तीळ हे काळया रंगाचे लाल रंगाचे येतात, तीळ चामखीळ येण्यामागे वैद्यकीय कारण आहेत, की आपल्या चेहऱ्यावर रोम छिद्र असतात, आणि जर तुम्ही सारखा मेकअप करत असाल, तर ती रोम छिद्रे बंद होऊन, रोम छिद्रे एकत्र येऊन, तिथे चामखीळ किंवा तीळ येतात. आपल्या चेहऱ्यावर मेलनोंसाईट्सच्या पेशी असतात. त्या मेलनिनचे पिगमेंटस तयार करतात. त्यामुळे तीळ व चामखीळ येतात. पण तुम्ही घाबरून जाऊ नका, त्यावर काही घरगुती उपाय आहेत. जे करून तुम्हाला थोडा फरक जाणवेल. चला, तर मग जाणून घेऊया, की तीळ व चामखीळ जाण्यासाठी काही घरगुती उपाय.

कोथिंबिरीचा रस वापरून बघा :

हो, तुम्हाला जाणून खरंच आश्चर्य वाटेल, की किचनची सुगरण आहे. आणि ती चेहर्यासाठी कशी फायदेशीर ठरेल? तर खरच जर तुमच्या चेहऱ्यावर तीळ व चामखीळ असतील, तर अशा वेळी तुम्ही कोथिंबिरीचा रस काढून, तुमच्या चेहऱ्यावर लावावे, लेप कसा तयार करावा, तर तुम्ही कोथंबीर काढून तिला मिक्सरमध्ये दळून, तिची पेस्ट तुमच्या तीळ, चामखीळ असलेल्या ठिकाणी लावावे, असे तुम्ही दोन ते तीन महिने केल्यास, तुम्हाला फरक जाणवेल. 

वाचा  ड्राई स्किन ची काळजी व त्यासाठी फेस वॉश

टी ट्री ऑइल चा वापर करून बघा :

टी ट्री ऑइल हे तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअर्स मध्ये मिळेल. या ऑइल चा वापर केला तर तुम्हाला  असलेले तीळ जाण्यासाठी व चामखीळ जाण्यास मदत होते, त्यासाठी तुम्ही टी ट्री ऑइल एका कापसाच्या बोळ्यावर घेऊन, तुमच्या चामखीळ व तीळ असलेल्या ठिकाणी लावावे, असे तुम्ही दिवसातून दोन वेळेस केल्यास, फरक जाणवेल, तसेच तुम्ही टी ट्री ऑइल चा फेसपॅक ही करू शकतात. त्यासाठी तुम्ही मुलतानी माती+ टी ट्री ऑइल + हळद यांचे मिश्रण एकत्र करून तो लेप तुम्ही चामखीळ, तीळ असलेल्या ठिकाणी लावून बघा, तुम्हाला फरक जाणवेल. 

अद्रक चा रस लावून बघा :

हो, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की अद्रक हे मसाला पदार्थांमध्ये वापरला जाणारा पदार्थ आहे, आणि तो चेहर्यासाठी कसा उपयोगी ठरेल. तर खरच जर तुमच्या चेहऱ्यावर चामखीळ आणि तीळ असतील अशा वेळी तुम्ही अद्रक चा रस चेहऱ्यावर लावल्यास, तुम्हाला फरक जाणवेल. तसेच ज्यांची स्किन ही सेन्सिटिव्ह, कोरडी असेल, अशा लोकांना अद्रक चा  त्रास होऊ शकतो, त्यासाठी त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अद्रक चा रस चेहऱ्याला लावून शकतात. 

लसणाचा रस लावून बघा :

लसून हे एंटीबॅक्टरियल एंटीफंगल गुणधर्मांनी भरलेले आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर चामखीळ व काळे तीळ असतील, अशा वेळी जर तुम्ही लसणाचा रस चेहऱ्याला लावला, तर त्याचा त्याचा फायदा तुम्हाला अधिक होईल. कारण लसुन तुमच्या चामखीळ आणि तीळ असलेली जागा कोरडी करून, तीळ व चामखीळ जाण्यास मदत होते. 

एप्पल साइडर विनेगर लावून बघा :

एप्पल साइडर विनेगर चा वापर हा सौंदर्यप्रसाधनांमध्ये आवर्जून केला जातो. कारण एप्पल साइडर विनेगर चा वापर केल्यामुळे, तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक सुंदरता येते. तसेच जर तुमच्या चेहऱ्यावर चामखीळ व तीळ असेल, अशा जागी जर तुम्ही कापसाच्या बोळ्यांमध्ये विनेगर घेऊन, ते लावल्यास तुमची चामखीळ व तीळ सुकून निघून जाण्यास मदत होते. 

वाचा  गुलाबाच्या फुलांची माहिती काय आहे जाणून घेऊया

बटाट्याचा रस लावून बघा :

बटाटा हा तुमच्या चेहऱ्या साठी फार फायदेशीर ठरेल. कारण बटाटा हा नैसर्गिक ब्लिचिंग चे काम करते. जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असेल, तर अशावेळी तुम्ही बटाट्याचे काप करून तुमच्या तीळ चामखीळ काळे डाग असलेल्या जागेवर ठेवावे, असे केल्यास तुम्हाला फरक जाणवेल. 

एरंडेल तेलाचा वापर करा :

जर तुमच्या चेहऱ्यावर चामखीळ, काळे तीळ असतील. अशावेळी तुम्ही जर एरंडेल तेलाचा वापर केला, तर त्याने तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही एरंडेल तेल हे एका कापसावर घेऊन तुमच्या चामखीळ असलेल्या ठिकाणी त्या तेलाने मसाज करा, असे तुम्ही दोन ते तीन आठवडे केल्यास, तुमच्या चामखीळ, तीळ या हळू कमी होतील. 

कोरफडचा गर लावून बघा :

कोरफड ही घराघरात प्रत्येकाच्या दारात असते. जर तुम्ही कोरफडीचा गर हा चेहऱ्याला लावला, तर तुमच्या चेहरा सतेज व उजळण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील कांती हळू कमी होते. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर नियमित कोरफडचा गर लावला, तर तुमच्या चेहऱ्यावरील चामखीळ व तीळ जाण्यास मदत होईल, कारण कोरफडीचा वापर केल्यामुळे तुमची चेहरा हा मुलायम होतो. व तीळ व चामखीळ जाण्याची मदत होते. अगदी साधा सोपा उपाय आहे, तुम्ही करुन बघायला हरकत नाही. 

चेहऱ्यावर तीळ, चामखीळ साठी लेझर ट्रीटमेंट करून बघा :

काही जणांच्या चेहऱ्यावर चामखीळ आणि तीळ चे प्रमाण इतके असते, की कोणताही मेकअप करायला त्यांना अवघडल्यासारखे वाटते. जर तुम्हाला या समस्या जास्त प्रमाणात असतील, तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन लेझर ट्रीटमेंट करू शकतात. जर तुम्ही चेहऱ्यावर लेझर ट्रीटमेंट केली, त्यावेळी तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, योग्य ती चेहऱ्याची काळजी घ्यावी लागेल. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर चामखीळ आणि तीळ कसे येतात, व त्यावर कोण कोणते घरगुती उपचार करायला हवेत , ते सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या घरगुती उपचारांमध्ये तुम्हाला कशाची ऍलर्जी  असेल, तर ती तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार  घ्यावे. तर आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका असेल, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगावे. 

वाचा  कुरळे केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय

धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here