दाढ दुखी वर गोळी व घ्यावयाची काळजी

0
6901
दाढ दुखी वर गोळी व घ्यावयाची काळजी
दाढ दुखी वर गोळी व घ्यावयाची काळजी

 

नमस्कार, दाढीचे दुखणे अतिशय कठीण दुखणे असते. ज्या वेळी आहे तुमची दाढ दुखते त्यावेळी तुम्हाला असह्य वेदना होतात. दाढ दुखायला वयाची अट नसते, ही कोणत्याही वयात ही दुखू शकते दाढ दुखी सारख्या समस्या लहान मुलांना जास्त प्रमाणात बघावयास मिळतात. कारण लहान मुले ही चॉकलेट आणि गोड पदार्थ जास्त प्रमाणात खातात. त्यामुळे चॉकलेट त्यांच्या दातात अडकून त्यांची दाढ दुखी ची समस्याही होऊ शकते.चॉकलेट अडकल्यामुळे दाढीला कीड लागते आणि  दाढ मध्ये खड्डा पडून रूट कॅनल व दाढी मध्ये पांढरे सिमेंट भरावे लागते. या सारख्या समस्या त्यांना येतात. तसेच अतिगोड पदार्थ खाल्ल्याने व  गरम, अतिथंड पदार्थ खाल्ल्याने ही दाढ दुखी ची समस्या होते. त्यासाठी तुम्ही योग्य ती काळजी घ्यायला हवी. दाढ दुखायला लागली तर तुमचे डोकेदुखी ही होते कारण की डोक्याच्या नसा आणि दाढीच्या नसा एकच असतात

 शिवाय दाढ दुखली की आपल्याला जेवण जात नाही. आणि त्यामुळे आपल्याला अशक्तपणा ही येऊ शकतो. मग दाढ दुखत असेल, अशावेळी तुम्ही कोणते घरगुती उपाय करू शकतात, ते जाणून घेऊयात. 

दाढ दुखी वर विविध घरगुती उपाय

पेरूची पाने खाऊन बघा:

दाढ दुखी ची समस्या असेल, अशावेळी जर तुम्ही कच्च्या पेरूची झाडाची पाने चावून खाल्ली, तर तुमची दाढ दुखी ही त्वरित थांबते. शिवाय तुम्ही पेरूची कच्ची पानेही मिक्सरमध्ये दळून त्याच्या पाण्याने चूळ भरून, गुळण्या कराव्यात, म्हणजे तुमच्या दातामधील जे अन्नपदार्थ अडकलेले असतील, तसेच हिरड्यांना सूज आली असेल ती त्याने कमी होते. अगदी साधा सोपा उपाय आहे करून बघायला हरकत नाही. 

वाचा  लहान मुलांना उन्हाळी लागणे या समस्येवर घरगुती उपाय

हिंगाचा वापर करून बघा:

आता तुम्ही म्हणाल, की हिंग हा मसाल्याचा पदार्थ आहे. तो दाढ दुखी साठी कसा फायदेशीर ठरेल? हो ! दाढ दुखी साठी तुम्ही हिंगाचा वापर करू शकतात. तुम्हाला त्याने फरक पडेल. त्यासाठी तुम्ही हिंग हा कोमट पाण्यात टाकून त्यात सेंदवमिठ घालून त्या पाण्याने तुमची चूळ भरावयाची असे तुम्ही दिवसातून दोन वेळेस केल्यास तुम्हाला फरक जाणवेल. 

लवंगाचे तेल वापरून बघा:

लवंग मध्ये अँटीबॅक्टरील गुणधर्म असतात. जर तुम्हाला दाढदुखी सारख्या समस्या असतील अशावेळी जर तुम्ही लवंगाचे तेल तुमच्या दाढीला लावले, तर तुमची दाढदुखी च्या समस्याही त्वरित दूर होईल. लवंगाचे तेल हे तुम्हाला मार्केट मध्ये केमिस्टकडे मेडिकल स्टोअर्स मध्ये हि मिळेल करून बघा. 

बर्फाचा शेक घ्या:

ज्यावेळी तुमची दाढ दुखते अशावेळी तुमच्या हिरड्या ही सुजतात, शिवाय तुमचा जबडा, गाल ही सुजतात. अशावेळी जर तुम्ही बर्फ  एका कपड्यात गुंडाळून तुमच्या सुज असलेल्या जागेवर त्याने शेक दिला तर तुमची सूजही त्वरित कमी होईल शिवाय दाढीचे दुखणेही थोडे प्रमाणात का असेना, कमी होईल. हा एक बिना खर्चिक उपाय आहे करून बघा. 

तुरटी चा वापर करून बघा:

ज्यावेळी तुमची दाढदुखी व दात दुखत असेल, अशावेळी तुम्ही तुरटीचा वापर करून बघा. कारण तुरटी मध्ये अँटीबॅक्टरील गुण असते जे तुमची दाढ दुखीवर त्वरित आराम देते. त्यासाठी तुम्ही तुरटी कोमट पाण्यात टाकून त्या पाण्याने चूळ भरावी, असे तुम्ही असे दोन ते तीन वेळेस केल्यास तुमच्या दाढी मधील अटकलेले अन्न व दाढी मधील कीड ही बाहेर निघून जाण्यास मदत मिळते. व तुमची दाढ दुखणे की त्वरित थांबते. 

आलं वापरून बघा:

जर तुम्हाला दात दुखी, दाढदुखी सारख्या समस्या असेल अशावेळी जर तुम्ही आलं हे दातामध्ये गच्च दाबून ठेवल्यास तुमची दाढ दुखण्याची समस्याही कमी होईल. ज्यावेळी तुम्ही दातात आले दाबतात, त्यावेळी लाळ पोटात न जाऊ देता, बाहेर काढावी. त्याने तुमच्या तोंडात जे इन्फेक्शन व दाढी मध्ये इन्फेक्शन झाले असेल ते बाहेर निघण्यास मदत मिळते. शिवाय तुम्ही अद्रक चा रस काढून, त्यात मध घालून दाढ दुखते त्या जागेवर कापसाच्या बोळ्याने लावावे तुम्हाला फरक जाणवेल. 

वाचा  गरोदर आहे हे किती दिवसात कळते

तुळशीच्या पानांचा वापर करून बघा:

तुळशी ही अँटीबॅक्टरील तसेच एंटीसेप्टिक असते. तुळशीचा वापर हा पूर्वीच्या काळापासून औषधी गुणधर्म मध्ये केलेला आहे. ज्या वेळी तुमच्या दात दुखीवर दाढ दुखी सारख्या समस्या असेल, अशा वेळी जर तुम्ही तुळशीच्या पानांचा वापर केला तर तुम्हाला अधिक फायदा होईल. त्यासाठी तुम्हाला तुळशीची पाने ही घेऊन त्याची पेस्ट करून, त्यात कापूरवडी मिक्स करून तुमच्या दाढदुखी च्या जागेवर कापसाच्या बोळ्याने लावावेत. त्याने तुम्हाला त्वरित फरक जाणवेल. शिवाय दाढी मध्ये किड असेल, तीही लवकर निघण्यास मदत होईल. अगदी साधा सोपा उपाय आहे, करून बघा. 

दाढ दुखीवर कोणती गोळी घ्यावी?

दाढ दुखीवर गोळी हे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी आणि ज्यावेळी तुम्हाला अर्जंट गोळी लागत असेल अशावेळी तुम्ही पेन किलर गोळी घ्यावी, जसे कारण पॅरासिटॅमॉल. अशी पेन किलर गोळी तुम्ही घेऊ शकतात. 

दाढ दुखी असेल त्या वेळी कोणती काळजी घ्यावी? 

  • अशावेळी तुम्ही कोमट पाण्याने चूळ भरावी. 
  • तुम्ही दिवसातून दोन वेळेस ब्रश करायला हवा. 
  • तुम्ही हप्त्यातून एकदा तरी कडुलिंबाच्या काडीने दातन करावी. 
  • शिवाय तुम्ही तुरटीच्या पाण्याने ही चुळ भरू शकतात. 
  • दाढ किंवा दात दुखत असेल, अशा जागेवर तुम्ही टी बॅग ने शेकावे. 

दाढ दुखी असेल अशावेळी काय खावे

दाढ दुखणे अतिशय तीव्र हे दुखणे होय, अशा वेळी आपल्याला बोलायला ही त्रास होतो. तसेच खायला खायला आणि चावायला त्रास होतो. अशावेळी तुम्ही पातळ लिक्विड पदार्थ घ्यावे, मग ते नक्की कोणते ? ते जाणून घेऊयात ! 

  • फळांचा ज्यूस
  • पातळ खिचडी
  • बिस्किटांची पेज
  • पातळ रव्याचा शिरा, उपमा
  • भाज्यांचे सूप

चला, तर मग आज आम्हाला आम्ही तुम्हाला तुमची दाढ दुखत असल्यास तिचे लक्षणे व दाढ दुखत असल्यावर कोणती काळजी घ्यावी, कोणते घरगुती उपचार करावेत व काय खावे, हे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत.

वाचा  पायी चालण्याचे फायदे? 

त्याच्यामुळे सांगितलेले घरगुती उपाय करूनही, तुम्हाला फरक जाणवत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तसेच दिलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका असेल, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

  धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here