सर्वप्रथम म्हणजे बर्याच लोकांची इच्छा असते की की प्रत्येकाचे केस सुंदर व निरोगी असावे. कारण सौंदर्य म्हटलं की केस आलेच. आणि केस आले की त्याची काळजी करणे किंवा त्याची निगा राखणे या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि बर्याच लोकांना केसांची निगा कशी ठेवावी हे देखील माहिती नसते. म्हणून बऱ्याच वेळेस त्यांच्या केसांवर बरेच वाईट परिणाम दिसून येतात आणि एकदा का केस खराब होण्यास सुरुवात झाली की ती लवकर थांबतच नाही.
मग एकामागून एक अडचणी येतच राहतात. म्हणजेच केसांमध्ये कोंडा होणे, केसांना फाटे केस विरळ होणे, टक्कल पडणे, केस कोरडे होणे केस पांढरे होणे, अशा बरेच समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. आणि कोणालाही आवडणार नाही की आपण या समस्येला सामोरे जावे. तसेच तरुण वयात तर नाहीच नाही म्हणून आज आपण काही असे उपाय आणि कारणे बघणार आहोत. ते जर तुम्ही लक्षपूर्वक केले तर त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येईल. चला तर मग जाणून घेऊया सुंदर व निरोगी केसांसाठी केसांची काळजी कशी घ्यावी किंवा केसांची निगा कशी राखावी.
Table of Contents
सुंदर व निरोगी केसांसाठी कोणती काळजी घ्याल ?
केस ओले ठेवू नये :
बरेच वेळेस आपण आंघोळ केल्यानंतर केस ओले ठेवतो आणि ओले ठेवल्यामुळे त्या केसांमध्ये कोंडा पडणे किंवा केसांचे आयुष्य कमी होणे या समस्यांना आपल्याला सामोरे जाऊ लागू शकते. म्हणून कधीही आंघोळ केल्यानंतर सर्वात पहिले केसं सुखावली पाहिजे.
वेळच्या वेळी तेल लावावे :
बरेच वेळेस मुलं, मुली जेव्हा कॉलेजमध्ये जातात तेव्हा बरेच वेळेस केस चिपचिप होतील म्हणून तेल लावत नाही आणि तेल लावल्यामुळे त्यांची केस कोरडी पडत जातात. तसेच केसांचा गुंता होणे अशा समस्या देखील उद्भवू शकतात. जर तुमचे केस कोरडे झाले तर केसांना फाटे फुटायला सुरुवात होईल ही प्रथम पायरी असते केसांना फाटे फुटणे याची म्हणून वेळच्यावेळी केसांना तेल लावणे फार गरजेचे आहे.
सुंदर व निरोगी केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय :
आपण सुंदर व निरोगी केसान बद्दल थोडीशी माहिती घेतली तसेच आपण कोणती काळजी घ्यावी हे देखील बघितले आता आपण जाणून घेऊया सुंदर व निरोगी केसांसाठी काही घरगुती उपाय चला तर मग बघुया.
एलोवेरा जेल :
कोरफड ही वनस्पती सौंदर्यवर्धक मानली जाते कारण या कोरफडीचे बरेचसे फायदे आहेत. आपल्या त्वचेवर त्याचबरोबर केसांवर सुद्धा तुम्ही जर कोरफडीचा गर लावला तर तुमचे केस चमकण्यास सुरुवात होईल. तसेच तुमच्या केसांची चांगल्या रीतीने वाढ देखील होईल. मुख्य म्हणजे कोंडा पडणे अशा समस्या तून देखील तुमची सुटका होऊ शकते. तर तुम्ही सर्वप्रथम ताज्या कोरफडीचा गर काढून घ्यावा. त्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी टाकून तो गर चांगला पातळ करून घ्यावा. तुम्ही मिक्सर मध्ये देखील हा गर पातळ करू शकता. त्यानंतर हळूहळू करून केसांवर डोक्याच्या कवटीवर हा गर लावून मसाज करावी आणि साधारण अर्धा तासानंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्यावे. हा उपाय आठवड्यातून दोनदा जरी तुम्ही केला तरी तुम्हाला तुमच्या केसांमधे एक वेगळा बदल जाणून येईल.
मेथीचे दाणे करतील कमाल :
तर सर्वप्रथम मेथी आपल्या आरोग्यासाठी आणि केसांसाठी फारच लाभदायी ठरते तर आपण मेथीचे दाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवावे. त्यानंतर ते मेथी चे दाणे मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे दही, एक चमचा मध व थोडासा कोरफडीचा गड टाकावा व हे मिश्रण थोडे पातळ करावे आणि मिश्रण तयार झाल्यास त्वरित केसांवर लावावे. हे मिश्रण जास्त वेळ केसांवर ठेवू नये साधारणता 10 ते 15 मिनिटांनी केस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे हा उपाय महिन्यातून एकदा केला किंवा 21 दिवसातून एकदा केला तरी चालेल.
केस काळी व दाट ठेवण्यासाठी काय करावे ?
तर आपण आता एक साधा व सोपा उपाय बघूया जेणेकरून तुमची केशव काळी व दाट राहण्यास मदत होईल चला तर मग बघुया.
कांद्याचा रस :
तर आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये वापरला जाणारा कांदा हा केसान करता खूप लाभदायी ठरू शकतो. तसेच कांद्याचा रस तुम्ही जर केसांवर लावला तर तुमची केस तरुण वयामध्ये पांढरे होण्याची शक्यता फार कमी होते. तसेच तुमचे केस खूपच विरळ झाले असतील तर ते दाट होण्यास मदत होते. आणि कांदा नवीन केस उगवण्यासाठी देखील फार गुणकारी ठरतो कांद्याचा रस केसांना लावला नंतर हरबल शाम्पूने केस धुवावे जेणेकरून केसांना कांद्याचा वास येणार नाही आणि तुमची केस देखील सुरक्षित राहतील.
सुंदर व निरोगी केसांना कसे धुवावे ?
बऱ्याच वेळेस आपण केसांना कोणत्या पद्धतीने धुतो हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. आता आपण केसांवर उपाय बघितली त्याची कारणे बघितली आता आपण जाणून घेऊया की आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये थोडेसे बदल करून आपल्या केसांना सुंदर व निरोगी कसे ठेवू शकतो.
चुकीच्या पद्धती बदला :
सर्वप्रथम म्हणजे केस धुतल्यानंतर ती कोरडी सुकवावी. तुम्ही रोज केस धुऊ नये. आठवड्यातून दोनदा केस धुवावेत आणि केस धुतल्यानंतर ती चांगली कोरडी झाल्यानंतर त्यावर शुद्ध नारळाचे तेल लावावे. तसेच जर तुम्ही शाम्पू लावून केस गळत असतील तर हर्बल शाम्पू वापरावा केमिकलयुक्त शाम्पू वापरू नये. शाम्पू लावून झाल्यानंतर केसांवर कंडिशनर देखील लावू शकता. जेणेकरून तुमची केस मऊ होतील तसेच केस धुताना तुम्ही जर पाण्यामध्ये गुलाबजल टाकली तर त्याचा तुमच्या केसांना सकारात्मक परत दिसून येईल गरम पाण्याने केस धुऊ नये.
तर आपण आज आपले केस सुंदर व निरोगी कसे ठेवावे, कोणत्या पद्धतीने ठेवावे हे देखील आपणच जाणून घेतले. तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद !