राइस ब्रेन ऑइल चे फायदे? 

0
446
राइस ब्रेन ऑइल चे फायदे
राइस ब्रेन ऑइल चे फायदे

नमस्कार, मित्रांनो राइस ब्रेन ऑइल म्हणजे नेमकी काय? हे अनेकांना माहिती नसते. हे हे एक तेल आहे, खाद्यपदार्थ करताना वापरता येते. आपण मार्केटमध्ये गेलो असणार, तिथे भरपूर प्रकारचे तेल बघितले असणारच, त्यामध्ये सनफ्लावर ऑईल, सोयाबीन ऑईल,शेंगदाणा तेल, पामोलिन तेल, तीळ तेल, राई तेल, ऑलिव्ह ऑइल, अशा निरनिराळ्या प्रकारच्या व्हरायटी आपल्याला मार्केटमध्ये दिसतात. त्याप्रमाणे त्यांचे गुणधर्मही असतात.

तसेच आज आपण राईस ब्रॅन ऑईल म्हणजे नेमके काय? या बाबतीत जाणून घेणार आहोत, हे तेल वापरल्याने आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे होतात. तसेच त्याच्यामध्ये पोषक तत्व व गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे आपण निरोगी व स्वस्थ राहण्यास मदत मिळते. चला, तर मग मित्रांनो राईस ब्रेन ऑईल वापरल्याने तुम्हाला कोणत्या प्रकारचे फायदे होतात, ते जाणून घेऊयात ! 

राइस ब्रेन ऑइल म्हणजे नेमके काय ? 

मित्रांनो, राइस ब्रान ऑइल म्हणजे  हे तांदळाच्या कोंडा पासून बनवले जाते.त्या कोंड्यामध्ये भरपूर पोषक द्रव्ये असतात. त्यामुळे ते तेल बनवले जाते. त्याचा कलर थोडा तपकिरीसर असतो. याचा वापर तुम्ही कोणत्याही स्वयंपाकातील पदार्थाला वापरू शकतात. 

राइस ब्रेन ऑइल मधील गुणधर्म :

या तेलामध्ये भरपूर प्रमाणात गुणधर्म असतात, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. या तेलामध्ये ऊर्जा देणारे पोषक तत्व असतात. तसेच प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, शुगर, सेलेनियम, झिंक, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयरन, ऑंटीॲक्सिडेंट, विटामिन-इ, फॅटी ऍसिड यासारखे गुणधर्म असल्यामुळे, त्याचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. 

वाचा  लहान मुलांना शी होण्यासाठी उपाय

पीसीओडी तसेच पीसीओएस साठी फायदेशीर ठरते :

ज्या महिलांना, पीसीओडी तसेच पीसीओएस ही समस्या असते. त्यांना राईस ब्रेन ऑईल फार फायद्याचे ठरते. पीसीओडी तसेच पीसीओएस म्हणजे, गर्भाशयामध्ये गाठी तयार होणे. या तक्रारी मासिक पाळी अनियमित येणे, वजन वाढणे, चेहऱ्यावर लव येणे, तसेच हार्मोन्स बदलामुळे, या सगळ्या समस्या होतात. अशा वेळी त्यांना हेल्थी व योग्य आहार घ्यावा लागतो. अशावेळी त्यांनी त्यांच्या आहारामध्ये राईस ब्रेन ऑइल चा समावेश करावा. या तेलाने तुमचे शरीरातील हार्मोनचे संतुलन सुरळीत राहते, व तुमच्या या त्रासावर तुम्हाला आराम मिळतो. 

हृदयाचे आरोग्य जपता येते :

राइस ब्रेन ऑइल तांदळाच्या कोंड्या पासून बनवले जाते. हे तेल अगदी योग्य रीत्या आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. राइस ब्रेन ऑइल मध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, फायबर, तसेच लो कॅलरीज् असल्यामुळे, हे तुम्हाला फायद्याचे ठरते. तसेच ह्या तेलाच्या सेवनाने, तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी हे सुरळीत राहते. त्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा धोका टळतो. तसेच हृदयाचे आरोग्य ही सुरळीत राहते. या तेलाचा वापर करून तुम्ही कोणतेही खाद्यपदार्थ करू शकतात. ते खाण्यायोग्य असतात व पचायला हलके असतात. 

कर्करोगाचा धोका टळतो :

राइस ब्रेन ऑइल मध्ये अँटी अक्सिडेंट प्रमाण हे मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कर्करोगाच्या पेशी वर प्रतिबंध करण्यास ते फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्ही या तेलाचा वापर करून कोणतेही खाद्यपदार्थ खाल्ले, तर तुम्हाला ते फायद्याचे राहते. शिवाय शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही, व ते आपल्या शरीरासाठी फायदेशीरच राहते. 

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते :

मित्रांनो, सतत बैठे काम, अवेळी जेवणे, जागरण, बदलत्या जीवनशैलीमध्ये बाहेरचे उघडायचे पदार्थ खाणे, जंकफूड खाणे, मैद्याचे बेकरी युक्त पदार्थ खाणे, या साऱ्या गोष्टींमुळे त्याचा परिणाम तुमच्या वजन वाढीवर होतो. त्यामुळे तुमचे वजन वाढते. आणि एकदा शरीरात स्थूलता आली, की तुमच्या शरीरावर अनेक आजारांचा आघात होतो. अशा वेळी तुम्ही तुमचे आहारामध्ये योग्यरीत्या वस्तूंचा वापर, तसेच भाज्यांचा, फळाचा, वापर करायला हवा.

वाचा  तोंडातील उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय

तसेच तुम्ही योग्य तेलाची निवड करायला हवी. त्यामध्ये जर तुम्ही राईस ब्रेन ऑइल ची निवड केली, तर तुम्हाला फायद्याचे ठरते. कारण त्यामध्ये लो कॅलरीज असते, तसेच कोलेस्ट्रॉल पातळी सुरळीत राहते. इन्सुलिन लेव्हल नियंत्रणात राहते. त्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी ही कमी होण्यासाठी ते मदत करते. 

राइस ब्रेन ऑइल ने वृद्धत्व लवकर येत नाही :

हल्ली बदलत्या जीवनशैलीमध्ये आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही तसेच आपल्या त्वचेची काळजी घ्यायला आपल्याला वेळ मिळत नाही त्यामुळे त्याच्या परिणामी आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर येणे तसेच त्वचा कोरडी पडणे रुक्ष होणे यासारख्या समस्या होतात अशावेळी तुम्ही तांदळाच्या कोंड्या पासून बनवलेले तेल आपल्या शरीरासाठी वापरले तर तुम्हाला खूप सारे फायदे होतात कारण त्यामध्ये , फ्री रॅडिकल्स चे प्रमाण असतात तसेच त्याच्यात आणखी एक्सीडेंट चे प्रमाण असते ते आपल्या शरीरातील वृद्धत्व वर नियंत्रण ठेवते व आपली स्किन तेजस्वी व चमकदार होण्यास मदत मिळते त्यामुळे तुम्ही तुमचे आहारामध्ये या तेलाचा वापर जरूर करावा

केसांच्या पोषणासाठी फायदेशीर ठरते :

जर तुमचे केस गळत असतील, त्याचे तुकडे पडत असतील, किंवा फाटे फुटत असेल, केसांमध्ये कोंडा होत असेल, केस गळतीची समस्या भरपूर प्रमाणात होत असतील, तर अशा वेळी तुम्ही या तेलाचा वापर जरूर करून बघा. कारण ह्या त्याच्या सेवनाने त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर व केसांवरही होतो.

त्यामुळे केसांची मजबुती राहते. शिवाय जर तुम्ही रात्रीच्या वेळी या तेलाने केसांना मालीश करून दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुतले, तर तुमच्या केसांमधील समस्या दूर होतात. कारण हे तेल तांदळाच्या कोंड्या पासून बनवलेले असतात, त्यामध्ये विटामिन ई स्त्रोत भरपूर प्रमाणात असतात. तसेच त्याच्यामध्ये फॅटी ऍसिड असते, ते आपल्या केसांच्या पोषणासाठी फायदेशीर ठरते. 

राइस ब्रेन ऑइल ने होणारे नुकसान ? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, हे तेल आपल्यासाठी कसे फायदेशीर असते, ते आम्ही सांगितलेले आहेतच. पण म्हणतात ना! कोणतीही गोष्ट प्रमाणात खावीत! प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्याने, त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तसेच या तेलाचे आहे. तुम्ही तुमच्या आहारामध्ये तेलाचा वापर अगदी कमी प्रमाणात करावा. कारण तेलाचा प्रमाण वाढले, तर तुम्हाला त्याच्या समस्या बघावयास मिळतात. त्यामुळे तुम्हाला कफ- खोकला यासारख्या समस्याही होऊ शकतात.

वाचा  पोटात गॅस होण्याची कारणे व उपाय

तसेच या तेलाचा वापर जास्त झाल्यामुळे, ज्या लोकांना अपचन, पित्त, ऍसिडिटी, गॅसेस सारख्या समस्या असतात, अशा लोकांना  पोटाशी निगडित समस्या होऊ शकतात. तसेच या तेलाने तुम्हाला अंगावर खाज येत असेल, किंवा एलर्जी होत असेल, तर तुम्ही त्याचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांना विचारूनच घ्यावेत. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला राईस ब्रेन ऑईल शरीरासाठी कशाप्रकारे फायदे करू शकतात, व कशाप्रकारे नुकसान करू शकतात, ते सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये उपचार करण्यापूर्वी, तुम्ही या तेलाचा वापर करण्यापूर्वी, डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावाच. तसेच आम्ही सांगितलेले माहितीमध्ये, तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here