नवरत्न तेल लावण्याचे फायदे

0
1239
नवरत्न तेल लावण्याचे फायदे
नवरत्न तेल लावण्याचे फायदे

नमस्कार, मित्रांनो, “थंडा थंडा कुल कुल” नवरत्न तेल ॲडवटाईज आपण टीव्हीवर किती वेळा ऐकली असेलच. अभिताभ बच्चन या अभिनेत्याने या ॲडव्हर्टायझिंग चे प्रसारण केले होते. त्यावेळी सगळ्या जणांच्या तोंडात तेच गाण यायचे की “थंडा थंडा कुल कुल नवरत्न तेल है, आयुर्वेदिक तेल” हे गाणं लहान मुलं खेळता-खेळता म्हणायचे. नवरत्न तेल म्हणजे काय? तर नवरत्न तेल म्हणजे नऊ जडीबुटी, म्हणजे आयुर्वेदिक वनस्पती पासून बनवलेलं तेल आहे. या तेलाने आपल्या केसांना खूप फायदे होतात.

तसेच त्याच्यापासून आपल्याला आराम मिळतो. चला, तर मग आज आपण याच बाबतीत जाणून घेणार आहोत, की नवरत्न म्हणजे कोणते ? आणि नवरत्न तेलाचे आपल्याला पण कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात ? चला तर मग जाणून घेऊयात ! 

नवरत्न तेलाने शरीराला होणारे फायदे :

मित्रांनो, नवरत्न तेल वापरल्याने तुम्हाला फायदे होतातच, तर मग ते नेमके कोणकोणते? चला तर मग जाणून घेऊयात. 

नवरत्न तेल मधील घटक द्रव्य :

नवरत्न हे आयुर्वेदिक वनस्पती पासून बनवलेले असते. त्याच्यामध्ये भूंगराज, शिकेकाई, आवळा, ब्राह्मी, शैलजा, पुदिना तेल, तसेच पुदिना चे फुल, कम्फोर,  पेपरमेंट तेल, यासारखे घटक द्रव्य वापरून नवरत्न तेल तयार होते. हे तेल आपल्या डोक्यासाठी तसेच आपल्या केसांसाठी फार फायदेशीर ठरते. 

डोकेदुखी साठी फायदेशीर ठरते :

मित्रांनो, बदलत्या जीवनशैलीमध्ये जेवण वेळेवर न होणे, त्यामुळे शरीरात पित्त होते, अपचन होते, तसेच वाढता ताण तणाव , थकवा तसेच प्रवास करताना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो, तसेच उपवास असल्यास काहीही न खाल्ल्यास, डोकेदुखीचा त्रास होतो. त्यामुळे तुमची तीव्र डोकेदुखी होते. अशावेळी तुम्ही नवरत्न तेलाचा वापर करायला हवा. त्यामध्ये भृंगराज, तसेच ब्राह्मी हे आयुर्वेदिक वनस्पती असल्यामुळे, तुमच्या डोकेदुखी वर आराम मिळते. या तेलाने जन्मी डोक्यावर मालिश करावी. तसेच कपाळावर या तेलाने मसाज करावा. त्यामुळे तीव्र डोकेदुखी ही क्षणातच थांबते. 

वाचा  साखर ऐवजी कोणत्या गोष्टींचे सेवन आपण केले पाहिजे ?

शांत झोपेसाठी फायदेशीर ठरते :

मित्रांनो काही लोकांना झोप न लागणे, ही समस्या फार मोठ्या प्रमाणात बघावयास मिळतात. त्यासाठी ते खूप टॅबलेट घेतात, पण झोपेच्या टॅबलेट घेतल्याने आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे तुम्हीच असे करू नका. तुम्ही शक्यतो झोप लागत नसल्यास नवरत्न तेलाचा वापर करून बघावा. कारण की नवरत्न तेल हे शांत झोप लागण्यासाठी फार फायदेशीर ठरते. नवरत्न तेलामध्ये नऊ रत्नांचे गुणधर्म असतात. ते तुमच्या झोपेसाठी फायदेशीर ठरतात. नवरत्न तेल आणि तुम्हाला डोक्यावर 15 ते 20 मिनिटे मालिश करायचे आहे. त्यामुळे तुमच्या सगळे ताणतणाव निघतो, मालिश केल्याने डोक्याला शांतता लागते. शिवाय तुम्हाला झोप लागण्यास मदत होते. 

डोक्यातील टाळूला जखमा होणे, फोड येणे, खाज येणे, त्यासाठी फायदेशीर ठरते :

बऱ्याच वेळेला काहीजणांना डोक्यामध्ये फोड येतात, तसेच खाज येते, खाजून खाजून, टाळूवर नखे लागुन केस आणि टाळू मधून रक्त येते, त्यामुळे आपल्याला त्याचा फार त्रास होतो. अशा वेळी तुम्ही नवरत्न तेलाचा वापर करावा. कारण नवरत्न तेलामध्ये आयुर्वेदिक वनस्पती आहेत, ते आपल्या केसांमधील टाळूला, त्याचे पोषक घटक आपल्या मिळतात. मग त्याच्या समस्या आपल्याला होत नाही. 

केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते :

हल्ली बदलत्या जीवनशैलीमध्ये, आपल्या शरीरातील विटामिन्स, जीवनसत्त्वांचा अभाव, तसेच वाढत्या प्रदूषणामुळे, त्याचा परिणाम आपल्या केसांवरही होतो. तसेच हार्मोन्स बदलामुळे, त्याचा परिणाम केसांवर होतो. त्यामुळे केस अकाली पांढरे होणे, केसांची तुकडे पडणे, केस गळणे, केसांना दोन फाटे फुटणे, यासारख्या समस्या आपल्याला भरपूर प्रमाणात बघावयास मिळतात. अशा वेळी जर तुम्ही नवरत्न तेलाचा वापर केला.

तर तुम्हाला यासारख्या समस्या वर आराम मिळेल. त्यासाठी तुम्हाला हप्त्यातून तीन वेळेस रात्री झोपताना नवरत्न तेलाने मालिश करायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमट पाण्याने केस धुवायचे आहे, त्यामुळे तुमच्या केसांना चमकदारपणा व मजबुती येते. असे तुम्ही तीन ते चार महिने केल्यास, तुम्हाला केसांच्या समस्येवर फरक दिसेल, करून बघा. 

वाचा  नाकाला वास न येण्याची कारणे

गुडघेदुखी सांधेदुखी वर आरामदायी ठरते :

वाढत्या वयामध्ये आपल्याला गुडघेदुखी, तसेच सांधेदुखी, जॉइंट पार्ट्स दुखतात. तसेच वयस्कर लोक व्यक्तींचे, उठताना बसताना जॉइंट्स पार्ट मधून आवाज येतो, ठिसूळपणा जाणवतो. असे त्यांनी नवरत्न तेलाचा वापर केला, तर फायदेशीर ठरेल. नवरत्न तेल हे आयुर्वेदिक तेल आहे. या तेलाने तुमच्या गुडघ्यांवर, जॉइन पार्ट्स वर तसेच सांधेदुखीवर, नियमित मसाज करायचा आहे. त्यामुळे त्यांचे दुखणे थांबते, तसेच तुमच्या हाडांमधून आवाज येत असेल, तर कॅल्शियमचा स्त्रोत तुमच्या शरीरात कमी आहे, म्हणून कॅल्शियमयुक्त आहार ही घ्यावाच. 

नवरत्न तेलाचे नुकसान ? 

हा, प्रश्न अनेकांना पडतो, की नवरत्न तेलाची काही नुकसान आहे का ? पण मित्रांनो नवरत्न तेल हे आयुर्वेदिक तेल आहे. त्याचे नुकसान नाहीत. या तेलाने उलट आपल्याला आराम मिळतो. पण ज्यांना या तेलापासून ऍलर्जी असेल, खाज येत असेल, त्यांनी या तेलाचा वापर सहसा डॉक्टरांना विचारूनच करावा. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला नवरत्न तेल वापरल्याने, तुमच्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात, ते सांगितलेले आहेतच. नवरत्न तेल आयुर्वेदिक आहे. त्यामुळे वापरल्याने तुम्हाला कोणतेही नुकसान नाही. हे तेल वापरल्याने उलट तुम्हाला शांत चित्त झोप लागते. तसेच तुमचा ताण- तणावही कमी होतो, व तुमच्या शारीरिक समस्या वर आराम मिळतो. तसेच आम्ही सांगितलेल्या लेख तुम्हाला आवडला असेल, व आम्ही सांगितलेल्या, लेखामध्ये तुम्हाला काही  शंका- कुशंका असतील, तर मित्रांनो तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here