नमस्कार, मैत्रिणींनो, दर महिन्याला आपली सोबती, दर महिन्याला सोबत राहतेच. मैत्रीणच असते, आपण तरी विसरून जातो, पण ती न विसरता आपल्यासोबत येते. आपल्या शरीराची काळजी घेते. आपल्या आरोग्याची काळजी घेते. ती आपली जणू देवदूतच म्हणा ! पण ती कधी कधी खूप त्रास देते, कधी कधी खूप दुःख होते, कधी कधी रडायला लावते, तरीही ती आपल्या आरोग्याची काळजी घेतेस म्हणा ! आणि समजा ती आपल्याला भेटायला आलीच नाही, आपल्यापासून दुरावली गेलीच, तर आपण समजून घ्यायचे, की शरीराशी निगडीत आपल्याला काहीतरी समस्या होत आहेत. अशी सोबत ची मैत्रीण म्हणजे आपले मासिक पाळी होय. हो मैत्रिणिंनो, पाळी ही आपली मैत्रिण म्हणता येईल ! बिना विचारायचे दर महिन्याला येते.
कधीकधी तर तारखेच्या आधी येते, आणि समजा आपल्याला काही त्रास झाला, आपल्या शरीरात काही बिघाड झाला, तर तिची येणे लेट होते. मग समजायचे की आपण कोणत्यातरी मोठ्या समस्यांना समोर जात आहेत, तसेच ज्यावेळी ती जाते, तेव्हा आपल्याला खूप रडवते, त्रास देते, आणि ती जाते. नंतर कधी भेटायला येत नाही. तेव्हा आपल्याला तिची आठवण राहून जाते. त्यावेळी ती आपल्याला एक प्रमोशन देऊन जाते. म्हणजे आपण निवृत्त होतो. त्याला रजोनिवृत्ती असे म्हणतात. चला, तर मग आज आपण तिच्या विषयावर जाणून घेणार आहोत, ही मैत्रिण आपल्या आयुष्यात कधी येते, आणि कधी जाते. चला तर मग पाळी विषयी काही माहिती जाणून घेऊयात!
Table of Contents
मासिक पाळी कितव्या वर्षी येते ?
मासिक पाळी ही वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी येते. तसेच काही मुलींना मासिक पाळी ही अकराव्या ते बाराव्या वर्षी ही येऊ शकते. मासिक पाळी आली की मुली अगदी घाबरून जातात. त्यांना त्या बाबतीत काहीच कळत नाही. अशा वेळी एका आईला तिची मैत्रीण होऊन, तिला मासिक पाळी विषयी माहिती सांगावी लागते. मग सुरुवातीची दोन वर्षे होईपर्यंत आईकडून सगळ्या गोष्टी समजून घेतल्यावर, आपोआप मुली त्यांच्या मार्गाला लागतात, त्यानंतर पाळी ही सुरुवातीला आल्यानंतर अनियमित येऊ शकते, नंतर मग ती हळू नियमित येते.
स्त्रियांना मासिक पाळी का येत असेल ?
स्त्रियांना मासिक पाळी ही दर महिन्याला 21 ते 28 दिवसात येते, काही महिलांची मासिक पाळीचे चक्र हे 28 ते 35 दिवसांचे असते. मासिक पाळीचे चक्र हे बिघडले, तर त्यांना शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. जर मासिक पाळी चे चक्र बिघडले, तर त्याचा त्यांच्या शरीरावर व मनावर ही परिणाम होतो. त्यांच्या शरीरात हार्मोन इनबॅलेन्स झाल्यामुळे, ही मासिक चक्र बिघडू शकते. तसेच स्त्रियांना पाळी येते, तिच्यावर तिचे आयुष्य अवलंबून असते.
कारण स्त्री ही आई होऊ शकते. मासिक पाळी वर तिचे मातृत्व अवलंबून असते. जर स्त्रियांना मासिक पाळी आलीच नाही, तर त्या आई होऊ शकत नाहीत. कारण स्त्रियांची मासिक पाळी येते, त्यावेळी तिच्या शरीरातील बीजांड फलित होतात. मग पुरुषांची त्यांचा संबंध आल्यानंतर, त्यात पुरुषांचे शुक्राणू व बीजांड यांमध्ये फलित झाल्यावर, त्यांना प्रेग्नेंसी म्हणजेच गर्भधारणा राहते. त्यावरच त्या आई होऊ शकतात. तसेच हे स्त्रीबीज दर महिन्याला तयार होतात, आणि पुरुष शुक्राणूंची संबंध आला नाही, तर ते बीज फुटतात व त्यातील रक्तस्राव पाळीच्या स्वरूपात बाहेर निघते, आणि समजा स्त्रियांना थायरॉइड, हार्मोनल इन बॅलेन्स, यासारख्या समस्या असतील, तर त्याचा परिणाम त्यांच्या पाळीवर होतो.
त्यावेळी त्यांची पाळी हे लांबते किंवा तिच्या मध्ये अनियमितता येते. तसेच महिलांना चे स्त्रीबीज फुटलेच नाहीत, किंवा फलित झाले नाहीत, तर त्याचे गाठींच्या स्वरूपात रूपांतर होते. मग महिलांना यांना गर्भाशयामध्ये गाठी सारख्या समस्यांना समोरे जावे लागते. त्यामुळे मासिक पाळी हे वेळेवर येणे, फार महत्त्वाचे आहे. तसेच मासिक पाळी आल्यानंतर, महिलांना पोटदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी, यासारख्या समस्यांना समोरे जावे लागते. तसेच काहीच महिलांची मासिक पाळी ही रेगुलर असते.
मासिक पाळी किती वर्षानंतर जाते ?
मासिक पाळीचे चक्र हे बाराव्या वर्षापासून सुरू झाले, की पंचेचाळीस ते पन्नास या काळात जाते. या एवढ्या कालावधीमध्ये स्त्रियांचे मासिक चक्र हे नियमित येते. तर काही स्त्रियांचे मासिक चक्र हे हार्मोन्सवर अवलंबून असते, जर त्यांच्या शरीरात हार्मोन्स इनबॅलन्स सारख्या समस्या असतील, तर या चक्रामध्ये अनियमितता येते, तसेच मासिक पाळी ज्यावेळी जाते, त्यावेळी त्या काळाला रजोनिवृत्ती असे म्हणतात. त्याला मेनोपाॅझ असे म्हणतात. मेनोपॉझला पेरीमेनोपॉजल पीरियड्स ही असे म्हणतात.
ज्या वेळी महिलांना रजोनिवृत्तीचा काळ जेव्हा येतो, त्यावेळी त्यांना शारीरिक व मानसिक थकवा येतो, त्यावेळी त्यांची पाळी ही अगदी पंधरा पंधरा दिवसात यायला लागते, तर काही जणांची मासिक पाळी ही दीड ते दोन महिन्यानंतर यायला लागते. मग ती हळूहळू लांबत जाते, मग त्यानंतर पाळी ही जाते. रजोनिवृत्तीच्या वेळी खूप स्त्रियांना हा त्रास होतो. त्यावेळी काही स्त्रियांना अति रक्तस्राव होणे, रक्ताच्या गाठी जाणे, तसेच कंबर दुखणे, डोके दुखणे, अशक्तपणा येणे, डोळ्याखाली काळे डाग येणे, थकल्यासारखे वाटणे, तसेच लघवी करताना जळजळ होणे, योनी मार्गात अंकुचन पावल्या सारखे वाटणे, यासारख्या समस्या स्त्रीयांना रजोनिवृत्तीच्या वेळी होतात. त्यावेळी त्यांना अगदी चिडचिडेपणा येतो. तसेच रजोनिवृत्ती झाल्यावर स्त्रियांचे हार्मोन्स बदलाव आल्यामुळे, त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, वजन वाढणे, तसेच काही स्त्रियांचे केस गळतात, त्यांची हाडे ठिसूळ होतात.
त्यानंतर त्यांना गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, तसेच शारीरिक संबंधित इच्छा न होणे, त्याबद्दल सारखे राग-राग करणे, यासारख्या समस्या त्यांना बघावयास मिळतात. अशावेळी मेनोपाॅझ या वेळी घरातील व्यक्तींनी स्त्रियांना समजून घ्यायला हवेत. कारण या सारख्या समस्येमुळे त्यांना डिप्रेशन, नैराश्य यासारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते. त्यावेळी त्यांची आपोआप चिडचिड होते, त्यावेळी पुरुषांनी स्त्रियांना समजून, त्यांना त्यातून बाहेर काढायला हवे. त्यांना त्यांनी मोकळ्या हवेत फिरायला न्यावे, तसेच संगीत ऐकायला लावावे. तसेच हेल्थी आहार म्हणजे पौष्टिक असा आहार त्यांना द्यायला हवा. तसेच स्त्रियांनी मेनोपॉझ च्या वेळेस, म्हणजेच रजोनिवृत्तीच्या वेळेस, वयाच्या चाळीशी, त्यावेळेस चहामध्ये शुद्ध गाईचे तूप एक चमचा घ्यायला हवे. त्यामुळे त्यांच्या योनीमार्गात सैलसर पणा येत नाही, व त्यांची प्रकृती व आरोग्य उत्तम राहते.
चला, तर मग मैत्रिणींनो आज आम्ही तुम्हाला आपली मैत्रीण मासिक पाळी विषयी माहिती सांगितलेली आहेतच. ती आपल्या आयुष्यात केव्हा येते व केव्हा जाते, तिच्या विषयी संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात.
धन्यवाद !