नमस्कार, हल्लीच्या बदलत्या वातावरणमुळे, थंड-गरम वातावरणामुळे, तसेच प्रदूषणामुळे, तसेच हायब्रीड खाद्य पदार्थांमुळे, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे आपल्याला खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच आपली झोप पूर्ण होणे. अवेळी जेवणे, तसेच चहा, कॉफी, ड्रिंक्स पिणे, यासारख्या पदार्थांचा वापर जास्त केल्या मुळे आपल्याला पोट दुखी, बेंबीच्या जवळ दुखणे, यासारख्या समस्या बघायला मिळतात. तर आज आपण याच मुद्यावर बोलणार आहोत, की तुमच्या बेंबी जवळ दुखणे, कशामुळे येते ? व त्यावर तुम्ही कोणते उपाय करू शकतात ? चला तर मग जाणून घेऊयात !
Table of Contents
बेंबी जवळ दुखणे याची कारणे ?
अनेक कारणांमुळे बेंबीजवळ दुखू शकते चला तर मग जाणून घेऊयात !
- जर तुम्ही तिखट मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात खात असतील, तर तुमच्या पोटात आग होऊन, बेंबीजवळ, पोटात दुखते.
- अवेळी जेवणे, याचा परिणाम तुम्हाला ऍसिडिटी, पित्त सारख्या समस्या होतात. त्यामुळे तुमच्या बेंबीजवळ दुखू शकते.
- ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, अशा लोकांच्या बेंबी जवळ दुखते.
- तुम्हाला पोटात कसले इन्फेक्शन झाले असेल, तर तुम्हाला बेंबी जवळ दुखणे की समस्या होऊ शकते.
- स्त्रियांना प्रेग्नेंसी दरम्यान पोटाला ताण गेल्यामुळे, बेंबीजवळ दुखू शकते.
- काहीजणांना ड्रिंक करण्याची फार सवय असते. त्यामुळे जास्त प्रमाणात अंमली पदार्थाचे व्यसन केल्यामुळे, पोटात तीव्र वेदना होतात, आग होते, त्यामुळे बेंबीजवळ जवळील भाग दुखू शकतो.
- तसेच स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान बेंबीजवळ, ओटीपोटात दुखू शकते.
बेंबी जवळ दुखत असल्यास, काही घरगुती उपाय !
वरील दिलेल्या माहितीमध्ये, बेंबीजवळ कोणत्या कारणाने दुखते, हे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत, तसेच यावर काही घरगुती उपाय जाणून घेऊयात !
बडीशोप चा वापर करून बघा :
अनेक जणांना पोटात आग होते, जळजळ होते, तसेच बेंबीजवळ दुखते. अशावेळी जर तुम्ही बडीशोप चा वापर केला, तर तुम्हाला फरक पडेल. त्यासाठी तुम्हाला बडिशोप आणि त्याला सैंधव मीठ लावून, भाजून ठेवायचे आहे. व हे मिश्रण दिवसातून तुम्हाला तीन वेळेस ते एक चमचा खायचे आहे, तसेच काही खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर खाल्ले तरी चालेल. त्याने पोटात आग होणे, जळजळ होणे, त्याच्या कारणामुळे बेंबीजवळ दुखू शकते. त्यामुळे बडीशोप खाल्ल्यामुळे तुमच्या पोटात दुखणे कमी होते, व बेंबी जवळ दुखणे ही कमी होते, तसेच तुम्ही रात्रीच्या वेळी बडीशोप पाण्यामध्ये भिजवून, सकाळी उठून उपाशीपोटी ते पाणी पिऊन नंतर बडीशोप खाऊन घ्यायचे आहे. त्यामुळे बेंबी जवळ दुखण्याचे समस्याही कमी होते.
हिंग चा वापर करा :
हिंगाचा वापर हा पूर्वीच्या काळापासून पोटदुखी, तसेच बेंबी दुखीसाठी, केला जात आहे. जर तुमच्या पोटात दुखत असेल, बेंबीजवळ दुखत असेल, अशा वेळी जर तुम्ही हिंग पाण्यात मिसळून ते पाणी पिले, तर तुम्हाला त्यावर त्वरित आराम मिळेल.
टी ट्री ऑइल वापरून बघा :
बऱ्याच वेळेला बेंबी जवळ दुखणे च्या समस्या भरपूर लोकांना बघायला मिळतात. त्या वेळी बेंबीजवळ भाग ताठर होऊन जातो, अशा वेळी जर तुम्ही टी ट्री ऑइल कोमट करून बेंबी जवळील भागात मसाज केल्यास, तुमच्या पोटात दुखणे व बेंबी जवळ दुखणे, ही समस्या हळू कमी होईल.
जिर वापरून बघा :
जिर हे गॅस, अपचन, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता या गोष्टींवर फार फायदेशीर असतो. जर तुम्ही जिर भाजून त्याची पावडर करून घ्यावी. नंतर त्यात अर्धा चमचा सेंधव मीठ टाकून, कोमट पाण्याबरोबर पिलेत, तर तुमची बद्धकोष्ठतेचा, शिवाय बेंबी जवळ दुखण्याचे समस्येवर, तुम्हाला त्वरित आराम मिळेल.
त्रिफळा चूर्णाचा वापर करा :
त्रिफळा म्हणजे आवळा, हरड, बेहडा या फळांचे मिश्रण होय. जर तुम्हाला अपचन, पोटदुखी, गॅसेस तसेच बेंबी जवळ दुखणे, यासारख्या समस्या असेल, तर तुम्ही त्रिफळा चूर्ण रोज सकाळ-संध्याकाळ एक ग्लास कोमट पाण्यामध्ये पिलेत, तर यासारख्या समस्यांवर तुम्हाला त्वरित आराम मिळेल.
लिंबू पाणी चा वापर करा :
जर तुम्हाला गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, पित्त यासारख्या समस्या असतील, तसेच काही जणांना उग्र पदार्थ खाल्ल्यामुळे, ही ऍसिडिटी होते. अशा वेळेस जर त्यांनी लिंबू पाणी चा वापर केला, तर त्यांना या समस्येवर आराम मिळतो.
बेंबी जवळ दुखत असल्यास, काय काळजी घ्यावी ?
खूप जणांना बेंबीजवळ दुखण्याचा त्रास होतो. मग त्या वेळेस त्यांनी काय काळजी घ्यावी, हे आपण आता जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात.
- बेंबी जवळ दुखत असल्यास, तसेच पोट ताठर होऊन जाते, दुखते, अशा वेळी त्यांनी तीळ किंवा खोबरेल तेलाने त्यांच्या पोटावर मालिश करायची.
- तसेच त्यांनी धूम्रपान करणे, कटाक्षाने टाळावेत.
- बाहेरील प्रोडक्स, बेकरीचे प्रोडक्स मैद्याचे प्रॉडक्ट त्यांनी टाळावेत.
- तिखट, मसालेदार पदार्थ, खाऊ नयेत, त्यामुळे पोटात अजून आग होऊन बेंबीजवळ दुखू शकते.
- तुम्ही कंबरेला बेल्ट ही लावू शकतात, त्यांनी बेंबीचे दुखणे कमी होते
- सतत त्यांनी पाणी पीत राहावेत.
- शिवाय त्यांनी हलका आहार घ्यावा, तो म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी, सूप, लापसी किंवा गोड रवा यासारखे पदार्थ खायला हवेत.
- तसेच बाहेरील दूषित पाणी पिऊ नये.
चला, तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला बेंबीजवळ कोणत्या कारणाने दुखते, त्यावर कोणते घरगुती उपाय करावेत, तसेच काय काळजी घ्यावी, हे सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेले उपाय करूनही, जर तुम्हाला फरक पडत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांना दाखवावे. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात.
धन्यवाद !