मूळव्याध होण्याची कारणे मूळव्याधीची मुख्य लक्षणे व उपाय

0
1267
मूळव्याध होण्याची कारणे मूळव्याधीची मुख्य लक्षणे व उपाय
मूळव्याध होण्याची कारणे मूळव्याधीची मुख्य लक्षणे व उपाय

नमस्कार, मूळव्याध म्हणजे काय ? मुळव्याध च्या बाबतीत अनेक शंका-कुशंका हल्ली आता लोकांमध्ये बघायला मिळत आहेत. मूळव्याध कसा होतो, तसेच मुळव्याध झाला आहे, हे अनेक लोकांना समजून येत नाही. मूळव्याध चे दुखणे हे मुके दुखणे असते, त्याचे दुखणे आपण बाहेर कोणालाही जास्त सांगायला लाजतो. मुळव्याध अनेक कारणांनी होतो. मूळव्याध होणे म्हणजे, एकदम गंभीर आजार होणे नाही. पण त्यावर उपायही करता येतात. तसेच मूळव्याध मध्ये कोंब येणे, आणि रक्तस्राव होणे, ही समस्या असते. तसेच संडासला बसताना त्रास होणे. मूळव्याधीमध्ये तीन प्रकार असतात. एक मुळव्याध, दुसरा बवासीर, आणि तिसरा भगंदर या तीन स्टेप मुळव्याध मध्ये असतात. भगंदर हे लीला स्टेप असते ज्यामध्ये शस्त्रक्रिया करावी लागते. जर तुम्ही  वेळीच पहिल्या स्तेप वर उपचार केले, तर त्याने तुमची मूळव्याधाची समस्या लवकर कमी होते. आज आपण आपण जाणून घेणार आहोत, की मूळव्याध कसा व कोणत्या कारणांनी होतो ? चला तर मग जाणून घेऊयात ! 

कोणत्या कारणांनी मुळव्याध होतो ? 

मुळव्याध म्हणजे काय? तर मुळव्याध म्हणजे गुदाद्वारा जवळ कोंब येऊन, तेथे रक्त येणे. तसेच शौचास बसताना त्रास होणे. म्हणजे मूळव्याध होय. मुळव्याध अनेक कारणांनी होतो. ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात! 

  • मुळव्याध तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने, ही होऊ शकतो. 
  • तसेच जेवण करताना, कोरडे जेवण करणे, सुके पदार्थ खाणे. यासारख्या समस्यांनी ही शौचास त्रास होतो, व तेथे मूळव्याध सारखे लक्षणे तयार होतात. 
  • गर्भावस्था म्हणजे प्रेग्नेंसी मध्ये, ही मुळव्याधाची लक्षणे जाणवतात. 
  • लठ्ठपणा म्हणजेच, व जे लोक वजनाने जाड असतील, अशा लोकांना ही मुळव्याध होण्याची शक्यता असते. 
  • वाढत्या जीवनशैलीत हायब्रीड पदार्थांचे अति सेवन, व चुकीचा आहार घेतल्यामुळे, ही मूळव्याध होऊ शकतो. 
  • तसेच ज्या लोकांना रोजच्या रोज पोट साफ होत नसेल, तसेच शौचास साफ होत नसेल, अशा लोकांनाही मूळव्याध होऊ शकतो. 
  • बद्धकोष्टता चा त्रास ज्या लोकांना आहे, अशा लोकांना ही मुळव्याध होतो. 
  • जे लोक कमी पाणी पितात, व पातळ असा आहार घेत नाही, अशा लोकांना ही मूळव्याध होऊ शकतो. 
वाचा  चेहऱ्यावर निर्माण झालेले फोड जाण्यासाठी घरगुती उपाय

मुळव्याध याची काही लक्षणे ? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला कोणत्या कोणत्या कारणांनी मूळव्याध होऊ शकतो, हे सांगितले आहेत. आता आपण जर तुम्हाला मुळव्याध होतोय, त्याचे काही लक्षणे आपण जाणून घेणार आहोत. 

  • तुम्हाला शौचास बसताना त्रास होतो. 
  • कधीकधी काही लोकांना शौचास बसल्या वेळी तेथून रक्तही येते. 
  • गुदद्वारात व जवळ तुम्हाला कोंब येतो. 
  • गुदाद्वाराजवळ आग होते, खाज येते, 
  • जर तुम्हाला शौचास होताना अतिशय कडक होत असेल, त्यावेळी तेथील जागा जळजळ करते, आग मारते, व तेथे दुखते. 
  • शौचास होत असताना, अतिशय रक्तप्रवाह होत गेल्याने, तुम्हाला ऍनिमिया होण्याची शक्यता असते. 
  • तसेच गुदाजवळच्या नसांना म्हणजे, शिरांना सूज येते. 

मुळव्याध वर काही घरगुती उपाययोजना ! 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला मूळव्याध होण्याची, कारणे व त्याची काही लक्षणे सांगितलेले आहेत. आता आपण मुळव्याध वर काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात! 

जास्तीत जास्त पाणी प्या :

मुळव्याधाचे  कारण म्हणजे, तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता येऊन, तुम्हाला शौचास करताना, अतिशय कठीण त्रास होय. यासाठी जर तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिलेत, तर तुम्हाला शौचास करताना, त्रास होणार नाही. शिवाय शरीरात पाण्याची कमतरता येणार नाही, तसेच तुम्ही सकाळी उठल्यावर, शौचास जाण्यापूर्वी, एक तांब्या कोमट पाणी प्यावे. त्याने तुम्हाला शौचास सुलभरीत्या होईल. 

साजूक तुपाचा वापर करा :

मुळव्याध होऊ नये म्हणून, तसेच त्यांना मूळव्याध झाला, अशा लोकांनी त्यांच्या आहारात साजूक तुपाचा वापर करावा. कारण जर तुम्ही जेवणामध्ये म्हणा, किंवा चहा मध्ये म्हणा, एक चमचा तूप रोजच्या रोज खाल्ले, तर तुमचं पोट साफ होते, व शौचास त्रास होत नाही, तसेच जर तुम्हाला गुदाद्वाराजवळ आग होत असेल, अशा वेळी तुम्ही कापसाच्या बोळ्यावर गावराणी तूप घेऊन गुदाद्वाराच्या जागी लावावे, त्याने खाज येणे, व त्या जागेची आग होणे, या समस्येवर तुम्हाला आराम मिळेल. 

वाचा  स्वप्नात चतुर पक्षी दिसणे शुभ की अशुभ!

कोरफड चे वापर करा :

अनेक लोकांना मूळव्याध ज्या वेळी जळजळ होते, त्या वेळी शौचच्या जागेवर आग होते, खाज येते, तसेच तेथून रक्त येते, अशा वेळी जर तुम्ही कोरफड जेल कापडावर घेऊन, तेथे लावल्यास, त्या जागेवर तुमची आग होणे, जळजळ होण्याची समस्येवर तुम्हाला आराम मिळेल. 

केळ व कापूर चा वापर करा :

आता तुम्ही म्हणाल, केळ आणि कापूर कसा खाणार, तर हो केळं आणि कापूर एकत्र करून खाल्ल्याने, तुम्हाला मूळव्याधीचा त्रास व थोडा आराम मिळतो. त्यासाठी तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी संडासला जाणे, अगोदर एक केळ घेऊन, त्यात छोटीशी कापराची वडी घेऊन, केळ सोबत ती खावी, व त्यावर थोड्या वेळाने कोमट पाणी प्यावे. याने शौचास मोकळी होईल, व गुदाद्वारा जवळ कोंब आला असेल, तोही कमी होईल, हा उपाय तुम्हाला दहा ते बारा दिवस करायचा आहे. याने तुमच्या मुळव्याध वर त्वरित आराम मिळेल. 

जिऱ्याचा वापर करा :

अनेक लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. रोजच्या रोज पोट साफ होत नाही. तसेच शौचास बसताना त्या जागेची आग होते, व शौचास करताना त्रास होतो. अशावेळी जर तुम्ही जिऱ्याचे पावडर करून, रोज सकाळ-संध्याकाळ कोमट पाण्यात एक चमचा पिल्याने, तुमचे पोट रोजच्या रोज साफ होईल, व तुम्हाला मुळव्याधाची समस्या असेल. त्यावर ही थोडा आराम मिळेल. 

सुरण खा :

सुरण हे कंदमूळ आहे, ज्या लोकांना मूळव्याधीचा त्रास आहे, त्या लोकांसाठी हे प्रभावशाली आहे. त्यासाठी तुम्हाला सुरन आणून, त्याचा वरचे सालपट काढून घ्यावे. त्यानंतर त्याचे बारीक काप करून घ्यावे, व त्या कापांना तुम्ही शुद्ध गाईच्या तुपात तळून घ्यावेत, व त्यावर तुम्ही सेंधव मीठ किंवा साधे मीठ त्यावर टाकून, त्याच्या चकत्या तुम्ही खावेत. त्याने तुमच्या मूळव्याधीचे समस्येवर तुम्हाला आराम मिळेल. असा उपाय तुम्ही आठवड्यात तीन वेळेस करायचा आहे. 

वाचा  क्लीन शेव ही ठेवल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे

मुळा खा :

मुळा मूळव्याध वर गुणकारी आहे. तसेच  आयुर्वेदिक डॉक्टर ही मुळव्याध वर मुळा खायला लावतात. कारण मुळामध्ये तुम्हाला भरपूर  फाइबर्स, असतात. जे तुमची पचनक्रिया लवकरात लवकर सुधारतात. मुळा खाल्ल्याने तुमच्या गुदाद्वारा जवळील सूज व नसांना आलेली सूज ही लवकरात लवकर कमी होते. मुळा हा अतिशय थंड पदार्थ आहे. ज्यामुळे येथे तुम्हाला जळजळ व उष्णता यांचा त्रास होत नाही, तसेच ज्या लोकांना मुळ्याचा रस चा वास येतो, अशा लोकांनी मुळ्याचा रस काढून, त्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपातील जलेबी घेऊन ते मुळ्याच्या रसामध्ये टाकून खाल्ल्याने, मूळव्याधीचा त्रास बरा होण्यास मदत मिळते. 

योग्य आहार घ्या :

तुम्ही रोजच्या रोज योग्य आहार घ्यायला पाहिजेत. म्हणजे कसा, तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये शक्यतो, तिखट, मसालेदार, चायनीज, तसेच मैदा, ब्रेड, बिस्किटे, बेकरीचे प्रोडक्स टाळावेत. तसेच तुम्ही ज्या लोकांना मूळव्याधाचा त्रास आहे  अशा लोकांनी चहा, धूम्रपान करणे, कॉफी जास्त प्रमाणात पिणे, तंबाखू खाणे, साबुदाणा खाणे, सोयाबीन खाणे, यासारखे पदार्थ टाळावेत. तसेच त्यांनी त्यांच्या आहारात हिरव्या पालेभाज्या खावीत. हिरव्या पालेभाज्यांमध्ये, लोहाचे प्रमाण अधिक असते. तसेच ज्या लोकांना मूळव्याधाचा त्रास आहे, अशा लोकांच्या शरीरात लोहाचे प्रमाण, कमी होऊन जाते. अशा वेळी तुम्ही हिरव्या पालेभाज्या आवर्जून तुमच्या आहारात द्याव्यात. त्यामध्ये जास्त करून पालक ची भाजी खावी. तसेच तुम्ही कंदमुळ, सुरण, लिंबू, तूप, लोणी  यासारख्या भाज्या त्यांच्या आहारात घ्याव्यात. त्यांनी तुम्हाला मुळव्याध च्या समस्येवर त्रास होणार नाही. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला मुळव्याध म्हणजे काय, मुळव्याध होण्याची कारणे, लक्षणे व त्यावर काही उपाय सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेले उपाय करून, जर तुम्हाला फरक पडत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांनाही दाखवू शकतात. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

                   धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here