पोटातून आवाज येणे

0
1932
पोटातून आवाज येणे
पोटातून आवाज येणे

पोटातून आवाज येणे

नमस्कार, मित्रांनो तुम्हाला असे कधी झालंय का? तुम्ही एखाद्या मैफलीत बसले, किंवा मित्रांमध्ये बसले, अन् तुमच्या पोटातून सारखा सारखा आवाज येतोय, आणि तो तुम्ही दाबायचा प्रयत्न करत आहे, हो असे भरपूर जणांसोबत झाले असेल, बर का ! पण आपण त्या मागील कारणे माहीत नसतात.  पोटातून आवाज येणे, म्हणजे नेमके काय ?

 जसे की आपले पोट जोरजोरात ओरडत होते, असे नाही, पोटातून काहीतरी आवाज येतो, त्याचे कारण आपल्याला समजत नाही. अशा वेळी आपण फक्त समजतो की, आपल्याला भूक लागली आहे. आपले पोट जेवण मागत आहे, तसेच पोटातून आवाज येण्याची अनेक काही कारणे आहेत, आज आपण जाणून घेणार आहोत, की पोटातून आवाज का येतो ? कशामुळे येतो? कोणत्या कारणांमुळे येतो ? आणि पोटातून आवाज येत असेल, तर आपण त्यावर कोणते घरगुती उपाय करायला हवेत ? 

चला तर मग जाणून घेऊया, की पोटातून आवाज येण्याची कारणे ? 

पोटातून आवाज येण्याची कारणे ? 

पोटातून आवाज येण्याची अनेक कारणे आहेत. ती आज आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात ! 

  • ज्यावेळी तुम्हाला तीव्र भूक लागली आहे, अशा वेळी ही पोटातून आवाज येतो. 
  • ज्यावेळी तुमचे पचन संस्थेशी निगडित काही समस्या आली, त्यावेळीही पोटातून आवाज येतो. 
  • तसेच तुमच्या शरीरात पोटात जर वाताचे प्रमाण वाढले, तर अशा वेळी पोटात गुडगुड आवाज येतो.
  • तुम्हाला ऍसिडिटी, गॅस्ट्रो सारखी समस्या झाली असेल, अशा वेळी ही पोटातून आवाज येतो. 
  • तुम्हाला फूड इन्फेक्शन, म्हणजे अन्नाची अलर्जी झाली, तरीही पोटातून आवाज येतो. 
  • तसेच उग्र पदार्थ खाल्ल्याने, गॅसेस होऊन पोटातुन आवाज येतो. 
  • तसेच तुम्हाला भूक लागली, आणि तुम्ही टाळत आहात, तेव्हा रिकाम्या पोटी वायु ग्रंथी गोळा होऊन, एकमेकांना घर्षण होऊन पोटातून आवाज येतो. 
  • उपवास असलेल्या दिवशी पोटातून आवाज येतो. 
वाचा  पायाची नखे निळी होणे कारणे आणि घरगुती उपाय :-

पोटातून आवाज येत असल्यास कोणती लक्षणे असतात :

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला पोटातून आवाज येण्याची कारणे सांगितले आहेत. तसेच आता आपण लक्षणे जाणून घेऊयात! 

  • ज्यावेळी पोटातून आवाज येतो, तेव्हा पोटात गुडगुड होते.
  • पोटातून आवाज येतो, त्या वेळी पोटात थोड्या वेदनाही होतात. 
  • भूक लागलेली सारखे जाणवते. 
  • शौचास जावेसे वाटते, पोट साफ होत नाही. 
  • तसेच ढेकर ही येतात, 
  • तसेच गॅसेस बाहेर निघतात. 

पोटातून आवाज येत असेल तर त्यावर काही घरगुती उपाय ! 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला पोटातून आवाज येण्याची कारणे सांगितलेले आहेत. आता आपण जाणून घेणार आहोत, की पोटातून जेव्हा तुमचा आवाज येतो, त्यावेळी तुम्ही कोणते घरगुती उपचार करायला हवेत. चला तर मग जाणून घेऊयात! 

पाणी पीत जावे :

ज्यावेळी आपण एखाद्या धावपळीमध्ये असतो, तसेच आपल्याला जेवण करायला वेळ मिळत नाही, किंवा कुठे बाहेर असेल, अशा वेळी जर तुमच्या पोटातून आवाज येणे या समस्या होत असेल, तर अशा वेळी तुम्ही पाणी पिलात, तर त्या समस्येवर तुम्हाला आराम मिळेल. कारण पाणी पिल्याने तुमची तात्पुरती भूक ही भागवून जाते. आणि पाणी पिल्याने पोटातून आवाज येण्याचे थांबते, हा फार उपाय प्रभावशाली आहे करून बघा. 

वेळेवर जेवण करा :

जर तुम्हाला एखादे कामानिमित्त बाहेर जायचे, आणि तिथे वेळ होत असेल, तर अशावेळी तुम्ही घरातूनच जेवण करून जावे, कारण की काही लोकांची अशी सवय असते, की त्यांना भूक सहन होत नाही, त्याच्यामुळे त्यांचे डोके दुखते, तसेच पोटातून आवाज येतो. अशा वेळी तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी, तुम्ही जेवण वेळेवर करायला हवेत. जेवण वेळेवर केल्यामुळे, तुम्हाला पोटातून आवाज येणे, यासारख्या समस्या होत नाहीत. 

फळांचे ज्यूस पिऊ शकतात :

कामावर तुम्हाला तुमच्या आहारावर लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, अशा वेळी तुम्ही कुठेही कामानिमित्त बाहेर जात असाल, अशावेळी तुम्ही फळांचा ज्यूस एका बॉटलमध्ये भरून ठेवू शकतात. आणि तुम्हाला वाटले की, तुमच्या पोटातून आवाज येत असेल आणि भूक लागली असेल, अशावेळी तुम्ही तात्पुरता इलाज म्हणून फळांचा ज्यूस पिऊ शकतात. त्याने भूक मंदावते आणि आवाज येण्याचे समस्या कमी होतात. 

वाचा  उन्हाळ्यातही आणि सुंदर तजेलदार चेहरा पाहिजे असेल तर काय करावे

लिंबू पाणी पिऊन बघा :

अवेळी खानपान, जागरण, यामुळे तुम्हाला ऍसिडिटी, गॅसेस सारख्या समस्या होतात. त्यावेळी तुमच्या पोटात गुळगुळण्या सारखे वाटते, आणि शिवाय पोटातून आवाजही येतो. अशा वेळी जर तुम्ही लिंबूपाणी +काळे मीठ + त्यात खाण्याचा सोडा टाकून पिल्याने, तुमच्या पोटातील आवाज येणे, गुडगुड होणे, यासारख्या समस्यांवर तुम्हाला त्वरित आराम मिळतो. शिवाय ऍसिडिटी लवकरात लवकर मोकळी होते. 

ओवा चा वापर करून बघा :

जर तुम्हाला वाताचा, तसेच गॅसेसचा, गॅस्ट्रोचे त्रास असेल, अशा वेळी पोटात आवाज येण्याची शक्यता असते. तसेच तुम्ही उग्र पदार्थांमध्ये चना डाळ, तूर डाळ, उडदाची डाळ, यासारख्या पदार्थ आणि पोटात जास्त गॅसेस भरण्याची शक्यता असते, अशा वेळ तुम्ही ओवा +काळे मीठ यांचे मिश्रण एकत्र करून खायला हवेत, त्याने तुमच्या पोटातील वाताच्या समस्या दूर होऊन, पोटात आवाज येणे, शिवाय गॅस होणे यासारख्या समस्या दूर होतात. 

व्यायाम करू शकतात :

जर तुम्हाला पोटात गॅस वाटत असेल, पोटफुगी सारखे वाटत असेल, तसेच पोटातून आवाज येत असेल, अशावेळी तुम्ही चालायला पाहिजेत, चालल्याने तुमचे पोटातील गॅस बाहेर निघण्यास मदत मिळते, व पोटातून आवाज येण्यासारखे, समस्या कमी होतात. तसेच तुम्ही उच्च पादासन व्यायाम करायला व त्याने पोटात गॅसेस बाहेर येऊन, पोट मोकळे होते. 

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला पोटातून आवाज येण्याची कारणे, लक्षणे व त्यावर काही उपाय सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेले घरगुती उपाय करूनही, जर तुम्हाला फरक जाणवत नसेल, तर तुम्ही अशा वेळी डॉक्टरांनाही दाखवू शकतात. आम्ही सांगितलेले उपायांमध्ये तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

                     धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here