फिश ऑईल कॅप्सूल चे फायदे व नुकसान

0
983
फिश ऑईल कॅप्सूल चे फायदे व नुकसान
फिश ऑईल कॅप्सूल चे फायदे व नुकसान

नमस्कार, मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत फिश ऑईल कॅप्सूल चे फायदे व नुकसान. मासे जे कोणाला आवडत नाहीत. जे माशांचे शौकीन असतील, ते त्यांच्या आहारात मासे हप्त्यातून दोन ते तीन वेळेस असतातच. तसेच मासे खाणे आपल्या शरीरासाठी गुणकारी असतात. कारण त्यामधील गुणधर्म आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. तसेच समुद्र किनारावरच्या लोकांच्या माशांच्या प्रजाती फार वेगळ्या असतात. जसे की सुरमई, झिंगा, बोंबील, पापलेट, मालवणी, वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपण आपल्या आहारात खातो. तसेच माशांमधील घटक द्रव्य आपल्या डोळ्यांसाठी तसेच आपल्या तब्येतीसाठी चांगले असतात.

माशांमध्ये आपण फिश फ्राय, फिश करी, फिश भुर्जी, फ्राय पापलेट, तसेच तळलेली मच्छी, यासारख्या गोष्टी करून खातो. काहीजण माशांची इतके शौकिन असतात, की नियमित ते त्यांच्या आहारात मासे खातात. तर आज आपण मासे फक्त खाण्यासाठी नाही, तर शरीरासाठी अजून कोण कोणत्या प्रकारे फायदेशीर ठरतात, ते जाणून घेणार आहोत. म्हणजेच माशांपासून बनवले जाणारे तेल त्याला फिश ऑईल असे म्हणतात. हे ऑइल आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. तर फिश ॲाईल चे कॅप्सूल आपल्याला मार्केटमध्ये, मेडिकल्स मध्ये कुठेही मिळतात. चला तर मग जाणून घेऊया की फिश ऑइल तुमच्या आहारात कसे वापरावे? व त्यापासून तुम्हाला होणारे फायदे व नुकसान? चला मग जाणून घेऊयात ! 

फिश ऑईल कॅप्सूल म्हणजे काय ? 

माशांचे तेल, हे तेल माशांच्या टिशू पासून बनवले जाते. म्हणजेच माशांच्या ऊतीं पासून बनवले जाते. हे तेल वापरामुळे तुमच्या शरीराला खूप सारे फायदे होतात. तसेच हे तेल तुम्हाला मार्केट मध्ये, तसेच मेडिकल स्टोअर्स मध्ये मिळेल. 

वाचा  जेवणानंतर कोणते आसन करावे व का करावे 

फिश ऑइल कॅप्सूल मधील गुणधर्म ? 

या कॅप्सूल मध्ये खूप सारे गुणधर्म आहे. जसे की ओमेगा थ्री, ओमेगा सिक्स, इपीए आणि डीएचए चे गुणधर्म असतात तसेच, फॅटी ऍसिड, सोडियम, फायबर्स, प्रोटिन्स, मिनरल्स, कॅलरीज, विटामिन डी, कॅल्शियम यासारखे गुणधर्म असल्यामुळे तुम्हाला त्याचे खूप फायदे होतात. 

फिश ऑईल कॅप्सूल घेतल्यामुळे तुमच्या शरीराला होणारे फायदे ? 

मित्रांनो फिश ऑईल कॅप्सूल ही आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. तर मग नेमके कोणकोणते फायदे आपल्याला होतात, ते जाणून घेऊयात. 

तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास फायदेशीर ठरते :

फिश ऑईल कॅप्सूल ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. कारण तिच्यामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड, फायबर, प्रोटीन यासारखे गुणधर्म असतात. ते तुमच्या रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यास चालना देते तसेच तुम्ही सारखे आजारी पडणे व्हायरल इन्फेक्शन लवकर आणि यासारख्या समस्या असतील तर तुम्ही नियमित तुमच्या आहारात किशोर कॅप्सूलची टॅबलेट घ्यावे त्याने तुम्हाला फरक पडेल

स्नायूंना बळकटी मिळते :

हो, फिश ऑईल कॅप्सूल मध्ये इपीए आणि डीएचए चे  गुणधर्म असल्यामुळे, तुमच्या स्नायूंना बळकटी येते. तसेच त्यामध्ये omega-3 आणि ओमेगा सिक्स यासारखे गुणधर्म असतात, त्यामुळे तुमच्या स्नायू संदर्भातील कमी समस्या होतात. 

तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते :

मित्रांनो, डॉक्टर लोक नेहमी डोळ्यांच्या आरोग्यासाठी तुम्हाला मासे खायला लावतात. पण कामाच्या दगदगीत तरी तुम्हाला मासे खायला भेटत नसतील, तर तुम्ही तुमच्या आहारात नेहमी कॅप्सूल घेऊ शकतात. कारण तिच्यामध्ये माशांचे गुणधर्म असतात. तसेच माशा पासून बनवलेले तेल हे तुमच्या शरीरासाठी व आरोग्यासाठी फायदेशीर असते. डोळ्यांखाली काळेपणा येणे, डोळे खोल जाणे, नजर कमकुवत होणे, यासारख्या समस्येवर फिश ऑईल कॅप्सूल फायदेशीर ठरते, तसेच नियमित ही कॅप्सूल घेतल्याने, वृद्ध लोकांना मोतीबिंदूचा त्रास होत नाही. 

नैराश्य मधून बाहेर निघता येते :

शारीरिक ताण, मानसिक ताण, कामाचं टेन्शन, यासारख्या गोष्टींमध्ये तुम्ही डिप्रेशनमध्ये म्हणजेच नैराश्य मध्ये, जाण्याच्या समस्या भरपूर प्रमाणात असतात. अश्यावेळी तुम्हाला खूप वेगवेगळे विचार येतात, अशा वेळी तुम्ही तुमच्या आहारात ओमेगा थ्री, ओमेगा सिक्स फॅटी ऍसिड, यासारख्या टॅबलेट घ्यायला हवी. कारण या टॅबलेट घेतल्या मुळे तुम्ही नैराश्यातून बाहेर यायला मदत मिळते. तसेच तुमचा त्याच्या मनावरही परिणाम होतो व तुम्हाला अगदी फ्रेश व ताजेतवाने सारखे वाटते. तसेच नियमितपणे, फिश ऑईल कॅप्सूल घेतल्यामुळे तुमचा मूडही चांगला राहतो. 

वाचा  हिरव्या मिरचीचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे

वजन कमी होण्यासाठी फायदेशीर ठरते :

बदलत्या जीवनशैलीमध्ये, अवेळी खाणे, अपूर्ण झोप होणे, शारीरिक ताण तणाव, बैठे काम, पाळीच्या तक्रारी यासारख्या गोष्टींचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. त्यामुळे तुमचे वळण्याची समस्या होते, आणि एकदा चे वजन वाढले की तुम्हाला आजारांना निमंत्रण होते. त्यासाठी जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर अशा वेळी जर तुम्ही तुमच्या आहारात नियमितपणे फिश ऑइल कॅप्सूलच्या टॅबलेट घेतल्या, तर तुमचं वजन कमी होण्यास फायदेशीर ठरते. कारण त्यामध्ये खनिजे तत्वे, ओमेगा थ्री, ओमेगा सिक्स फॅटी ऍसिड, यासारखे घटक द्रव्य असतात, आणि ते आपल्या शरीरासाठी वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुमच्या शरीरावर अतिरिक्त चरबी असेल, तर तेही निघून जाण्यास मदत मिळते. त्यासाठी तुम्ही नियमित ही कॅप्सूल घ्यावी. 

गुडघेदुखी सांधेदुखी वर आराम मिळतो :

वाढत्या वयाचा परिणाम, आपल्या शरीरावरही होतो. अशा वेळी खूप लोकांना सांधेदुखी, गुडघेदुखी यासारख्या समस्या होतात. जर त्यांनी त्यांच्या आहारात नियमितपणे फिश ऑइल कॅप्सूल चे प्रमाण घेतले, तर त्यांना त्यावर फायदा मिळतो. कारण त्यामधील गुणधर्म त्यांच्या जॉइंट्स पार्ट्स ला लवचिकता देण्यास मदत करतात. तसेच जर गुडघेदुखी, सांधेदुखीची समस्या असेल, तर तुम्ही तुमच्या मसाज करू शकतात. त्याने तुम्हाला आराम मिळेल. 

दम्याचा त्रास कमी होतो :

मित्रांनो, जर तुम्हाला दम्याचा त्रास आहे. तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय, अशा वेळी जर फिश ऑईल कॅप्सूल घेतली, तर तुम्हाला फायदे मिळतात. कारण कॅप्सूल घेतल्यामुळे त्यामधील इपीए आणि डीएचए, तसेच ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स फॅटी ऍसिड हे गुणधर्म तुमच्या स्नायूंमधील सूज आलेली कमी करण्यासाठी मदत करते. तुमच्या श्वसनमार्गातील तसेच फुफ्फुसांमधील आलेली सूज  कमी करतो. तसेच श्वास घेण्याच्या क्रियेला तुम्हाला त्रास होत नाही. त्यामुळे दम्याच्या आजारात तुम्ही विटॅमिन डी असलेले, तसेच फिश ऑइल कॅप्सूल घेऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला त्याच्यावर आराम मिळतो. 

वाचा  गर्भधारणेदरम्यान रक्तस्त्राव होणे या समस्येची विविध कारणे व घरगुती उपचार

तुमच्या सौंदर्यासाठी फायदेशीर ठरते :

बाहेरील प्रदूषणामुळे, तसेच बदलत्या हवामानामुळे, त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होतो. तसेच केसांवरही होतो. त्यामुळे केस गळतीची समस्या होणे असो, किंवा चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स असो, किंवा अंगावर कोरडेपणा येणे, त्वचा रुक्ष होणे, यासारख्या समस्या असतील, तर अशा वेळी तुम्ही तुमच्या आहारात समावेश करा. कारण यांमधील गुणधर्म तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असतात. तसेच त्यामध्ये ओमेगा-3, ओमेगा सिक्स, फायबर, मिनरल, खनिज तत्त्वांचा साठा असतो. त्यामुळे , फिश ऑईल कॅप्सूल ही तुमच्या सौंदर्यासाठी फायदेशीर ठरते व तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग वगैरे असतील, तर ते जाण्यास मदत मिळते, आणि केसांमधील समस्या असेल, तर त्याही लवकर कमी होण्यास मदत मिळते. 

फिश ऑईल कोणत्या वेळी घ्यावे ? 

मित्रांनो, वरील माहिती मध्ये आम्ही तुम्हाला सांगितले आहे की फिश ऑईल  कॅप्सूल घेतल्याने, तुम्हाला कोण कोणत्या प्रकारचे फायदे, होऊ शकतात, हे सांगितलेलेच आहेत. पण कॅप्सूल घेण्याची वेळ ही तुम्हाला माहिती नसते. तर ही कॅप्सुल घेण्यापूर्वी तुम्हाला अगोदर काहीतरी खायचे आहे, म्हणजे दिवसातून तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ कोणत्याही वेळी, एक वेळ ठरवून ती  नियमित घ्यावी. तसेच तुम्हीही घेण्यापूर्वी डॉक्‍टरांना विचारूनच घेऊ शकतात. 

फिश ऑईल कॅप्सूल मुळे होणारे नुकसान ? 

फिश ऑईल कॅप्सूल ही आपल्या शरीरासाठी चांगले असते. पण तिचे प्रमाण जास्त घेतले, किंवा डॉक्टरांना न विचारता घेतले, तर तुम्हाला त्यामुळे त्याच्या वासामुळे तीव्र डोकेदुखी, मळमळ होणे, जुलाब होणे, यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे ही कॅप्सूल घेताना तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत. 

चला तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्ही फिश ऑईल कॅप्सूलमुळे तुमच्या शरीराला होणारे फायदे व त्याचे नुकसान, त्याचा तुम्ही वापर कोणत्या प्रकारे करू शकतात, हे सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here