इंटरनेट वापरण्याचे फायदे व तोटे

0
4542
इंटरनेट वापरण्याचे फायदे व तोटे
इंटरनेट वापरण्याचे फायदे व तोटे

नमस्कार मित्रानो, आज जाणून घेऊया इंटरनेट वापरण्याचे फायदे व तोटे याबद्दलची माहिती. इंटरनेट हे कोणाला माहिती नाही आहे आजकाल तरुण पिढी यामध्ये पूर्ण गुंतून गेलेली आहे. या इंटरनेट शिवाय दोन मिनिट सुद्धा राहवत नाही आणि राहणार तरी कसं इंटरनेट आता आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. मोठ्या मोठ्या ऑफिस कंपनी यांचे देखील काम इंटरनेट मुळे होतात. तुम्ही फक्त विचार करून बघा की जर तुम्ही एक दिवस इंटरनेट वापरले नाही तर तुम्ही त्या वेळेमध्ये काय कराल किंवा इंटरनेट नसेल तर तुमची कोणती कामे रखडली जातील.

आजकाल इंटरनेट म्हणजेच आंतरजाल हे पूर्ण जगभरात पसरलेले आहे या जगामध्ये एकही असा माणूस सापडणार नाही की जो इंटरनेट वापरत नाही. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व लोक इंटरनेट वापरतात. त्याचबरोबर इंटरनेटचे काही चांगले फायदे देखील आहे आणि तोटे देखील आहेत. कारण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसेच इंटरनेटच्या देखील दोन बाजू आहेत. आपण नेहमी एकच बाजू बघतो दुसरी बाजू जाणून घेत नाही आणि यामुळे आपल्या मनामध्ये या या गोष्टी विरुद्ध अनेक गैरसमज निर्माण होतात. म्हणून आज आपण दोन्ही बाजू जाणून घेणार आहोत. आंतरजाल म्हणजे इंटरनेट खरच आपल्याला फायदेशीर आहे.

म्हणजेच इंटरनेट आपल्या आयुष्याला आपल्या जीवनाला एक वरदान आहे की श्राप आहे. हे आज आपण जाणून घेणार आहोत. तसेच बरेच लोकं या गोष्टीपासून सहमत असतील की इंटरनेटचे फायदे आहेत तसेच त्याचे तोटे देखील आहेत. तर मित्रांनो आज आपण हे जाणून घेणार आहोत की इंटरनेट वापरण्याचे कोणकोणते फायदे आहेत व कोणकोणते तोटे आहेत. जेणेकरून आपण त्यावर कोणता तरी मार्ग काढू शकतो तसेच आपल्या हातून इंटरनेट वापरताना ज्या चुका होत आहे त्या कमी करण्यास देखील मदत होईल चला तर मग बघुया.

इंटरनेट वापरण्याचे फायदे :

बऱ्याच लोकांना इंटरनेट वापरण्याचे फायदे हे माहितीच असतील पण यातील काही फायद्याचा तुम्हाला माहिती नसेल तर आपण आज देखील जाणून घेणार आहोत. चला तर मग आता आपण जाणून घेऊया की इंटरनेट वापरण्याची कोणकोणते फायदे आहेत.

वाचा   मासिक पाळी मध्ये काय खावे काय खाऊ नये.

चुटकीसरशी काम होते :

चुटकीसरशी काम होता म्हणजेच आपल्याला इंटरनेटचा काय फायदा होतो की आपल्याला जर कोणतेही काम करायचे असेल तर आपण सरळ इंटरनेटचा वापर केला तर आपली कामे जलद रीतीने होण्यास मदत होते. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या कंपनीला मेल करायचे आहे किंवा लेटर पाठवायचे असेल तर आधी जेव्हा इंटरनेट नव्हते तेव्हा दोन ते तीन दिवस लागत होते. समोरच्या पर्यंत लेटर किंवा पत्र पोचण्यासाठी आता इंटरनेटमुळे आपण सहज कोणत्याही कामाचे लेटर हे जलद गतीने पाठवू शकतो.

म्हणजेच आपण हे लेटर पाठवले की काही सेकंदांमध्ये समोरच्या व्यक्तीला प्राप्त होते. अशाच प्रकारे जर तुम्हाला कोणताही प्रोजेक्ट बद्दल किंवा कशा बद्दल काहीही माहिती हवी असेल तर ती एका चुटकीसरशी तुम्हाला मिळते.

वेळेची बचत होते  :

इंटरनेट मुळे आपला वेळ वाचतो म्हणजेच आधी आपल्या लाईट बिल भरण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारचे बिल भरायचे असतील तर आपल्याला लांबच्या लांब रांगेमध्ये उभे राहावे लागते. पण आता इंटरनेटमुळे आपण सहज घरी बसून किंवा एका क्लिकवर लाईट बिल किंवा कोणत्याही प्रकारची बिल भरू शकतो. तसेच बँकेमुळे देखील पैसे टाकण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी बरेच वेळेस आपल्याला लांबच्या लांब रांगेमध्ये उभे राहावे लागत होते. तसेच आपल्या खिशामध्ये आपल्याला पैसेदेखील ठेवावे लागत होते पण आता इंटरनेटमुळे आपण भ्रमणध्वनीद्वारे म्हणजेच फोनद्वारे कोणालाही पैसे पाठवू शकतो किंवा कोणाकडूनही पैसे घेऊ शकतो तेही कुठेही न जाता.

लोकांना रोजगार उपलब्ध होतो :

आता तुम्ही म्हणाल की रोजगार उपलब्ध होतो तर जे लोक आयटी फिल्डमध्ये काम करतात म्हणजेच या आंतरजाल मुळे लोक गुगल्स युट्यूब तसेच अन्य सोशल मीडिया आणि इतर वेबसाईटमुळे शिवा कँटीन रायटिंग किंवा किंवा कंपनी मध्ये आय टी डिपार्टमेंट असतात. जेणेकरून ते त्यांच्या कंपनी इंटरनेटवर नेण्यासाठी विशिष्ट लोकांना त्याठिकाणी ट्रेनिंग दिले जाते व त्यांना त्याठिकाणी नोकरी दिली जाते जेणेकरून ते पूर्ण कंपनीचं आयटी वर्ग बघतील. 

वाचा  मोड आलेले मूग खाण्याचे फायदे जाणून घेऊया काय आहेत?

जगाचे एका कोपऱ्यापासून दुसऱ्यापर्यंत आपण सहज जोडले जाऊ शकतो :

इंटरनेट व आपण जगाच्या पाठीवर कोणत्याही कानाकोपर्‍यात मध्ये असू तरी देखील आपण एकमेकांशी जोडले जाऊ शकतो. ते म्हणजे इंटरनेट मुळे शक्य झालेले आहेत. तसेच तुम्ही माहितीची देवाण-घेवाण देखील जगाच्या कोणत्याही काना कोपरा पासून करू शकता.

शिक्षणासाठी फायदेशीर :

आता आपण तर बघितलं की कोरोनाव्हायरस आला होता तेव्हा शाळा कॉलेजेस बंद झाले होते. तेव्हा शिक्षक मुलांपर्यंत म्हणजेच विद्यार्थी विद्यार्थ्यांपर्यंत हे ऑनलाइन म्हणजे इंटरनेट मार्फत पोचत होते. मुले देखील इंटरनेट मार्फत शिकत होते. तर हा एक सर्वात मोठा इंटरनेटचा फायदा आहे की आपण इंटरनेटवरून मीटिंग घेऊन कोणताही प्रोजेक्ट किंवा कोणालाही काही शिकवू शकतो.

इंटरनेटचे तोटे :

आपण इंटरनेट चे फायदे बघितले आता आपण जाणून घेऊया की इंटरनेटचे कोण कोणते तोटे आहेत चला तर मग बघुया.

वेळेचा अपव्यय :

बऱ्याच वेळेस इंटरनेटमुळे आपल्या वेळेचा अपव्यय होतो. म्हणजे आपण जर सोशल मीडिया वापरत असू तर आपण दिवसभरातला बराचसा वेळ या वर घालवतो आणि याचाच परिणाम तुमच्या मुलांच्या शिक्षणावर देखील तुम्हाला दिसून येतो. व्हिडिओ गेम्स किंवा फोनचा वापर करतात ज्यामुळे तुमचा अमूल्य वेळ हा वाया जातो.

आरोग्याला हानी पोहोचते :

इंटरनेट मुळे आपल्या आरोग्य देखील  धोक्यामध्ये आलेले आहे. ते कसे तर आपण जर तासन्तास एका ठिकाणी बसून काम करत असू तर आपली मान किंवा पाठीच्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागू शकते. याच प्रकारे आपले डोळे देखील खराब होतात. आपलेच काय तर लहान लहान मुलं म्हणजेच पाच वर्षाच्या मुलीवर देखील मोबाईल वापरतात इंटरनेट वापरतात जेणेकरून लहान मुलांना लहान वयामध्ये देखील चष्मे लागतात आणि त्यांच्या आरोग्यावर देखील मोठा परिणाम होतो आहाराकडे दुर्लक्ष होते.

माहिती चोरीला जाऊ शकते :

इंटरनेट मुळे आपण जगाच्या कोणत्या कोपऱ्यापासून कोणत्याही कोपरापर्यंत संवाद साधू शकतो. तसेच आपली महत्त्वाची मौल्यवान माहिती म्हणजेच बँक डिटेल्स म्हणजेच क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, अकाउंट नंबर किंवा इतर काही कॉन्फिडन्स डीटेल्स हे इंटरनेटवर असतात जगभर पसरलेला असून आपली माहिती कधीही कोणीही चोरी  करू शकतो हे जितके सोपे नाही आहे पण बऱ्याच वेळेस माहिती चोरीला जाते. आपली ही महत्त्वाची माहिती चोरीला गेली तर आपल्याला त्याचे विपरीत परिणाम भोगायला लागू शकता.

वाचा  स्टीलच्या भांड्यावरील गंज दूर करण्याचे सोपे उपाय

तर मित्रांनो आज आपण बघितली कि इंटरनेट म्हणजेच आंतरजालाचे आपल्या आयुष्य मध्ये कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात व कोणकोणत्या प्रकारचे तोटे होतात. तसेच तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here