स्टीलच्या भांड्यावरील गंज दूर करण्याचे सोपे उपाय

0
541
स्टीलच्या भांड्यावरील गंज दूर करण्याचे सोपे उपाय
स्टीलच्या भांड्यावरील गंज दूर करण्याचे सोपे उपाय

नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया स्टीलच्या भांड्यावरील गंज दूर करण्याचे सोपे उपाय. हल्ली आजच्या धावपळीच्या जगामध्ये आपल्याला आपल्या कामांमध्ये देखील गोंधळ निर्माण होत असतो. कामाच्या काळजीने वेळेच्या अभावी घाईगडबडीत घरातील कसेही काम करून आपण कामासाठी पळत असतो. जेवण तयार करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची भांडी वापरत असतो. भांड्यांचे प्रकार म्हटले तर त्यामध्ये, अनेक प्रकार येतील. जसे की, स्टील, ॲल्युमिनियम, तांबे, पितळ इत्यादी. आजकाल आपण तांबे, पितळ भांड्याचा वापर न करता स्टीलच्या भांड्यांचा व नॉन स्टिक च्या भांड्यांचा जास्त वापर करत असतो.

जेवण बनवताना, अन्नपदार्थ शिजवताना भांडी खराब होत असतात. म्हणजेच, शिजवलेले अन्नपदार्थ भांड्याला चिटकून जाणे अथवा भांडी जळणे वगैरे. त्यामुळे डबल काम करत पुरते. तर अनेक वेळा आपल्याला कामाच्या घाईगडबडीत मध्ये आपण भांडे धुतल्यावर ते कोरडे न होऊ देता न पुसता जसेच्या तसे आपण मांडणी वर ठेवून देत असतो. परंतु, यामुळे कालांतराने अशा स्टीलच्या भांड्यांना गंज लागत जातो. किंवा अनेक वेळा आपण काही भांडी ही नेहमी न वापरता कधी कधीच वापरात काढत असतो. त्यामुळे, अशी भांडी गंजण्याची देखील शक्यता असते.

ओलाव्यामुळे अथवा त्याच्या बाजूच्या इतर भांड्यांच्या पाण्याच्या स्पर्शाने  त्यांना गंज  लागू शकतो. घरातील स्टीलच्या भांड्यांना जर गंज लागत असेल, तर ते काढणे देखील फार महत्त्वाचे ठरत असते. नाहीतर, अशा गंज लागलेले भांडे यामुळे तेथील इतर भांडे देखील खराब होण्याची शक्यता असते.बऱ्याच महिला या स्टिलच्या भांड्याला गंज लागल्यामुळे काळजीत येताना दिसून येतात. तुमच्या घरातील स्टिलच्या भांड्याना देखील गंज लागलेला आहे का? तुम्हालाही तुमच्या घरातील स्टिलच्या भांड्यांचा गंज काढावयाचा आहे का? तरी याबद्दल जास्त काळजी करू नका. स्टीलच्या भांड्यांना गंज लागला असेल, तर आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत.

आपल्या घरातीलच काहीतरी सोपे उपाय करून आपण आपल्या घरातील स्टीलच्या भांड्यावरील गंज काढू शकतो. यात जास्त काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या घरातील किचन मधील काही पदार्थ असे आहेत की त्यांचा वापर करून आपण स्टीलच्या भांड्यांना लागलेला गंज सहजरीत्या करू शकतो. तर मित्रांनो आज आपण स्टीलच्या भांड्यावरील गंज दूर करण्याचे सोपे उपाय या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग स्टीलच्या भांड्यात वरील गंज दूर करण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो याबद्दल खालील प्रकारे माहिती जाणून घेऊयात.

स्टीलच्या भांड्यावरील गंज दूर करण्यासाठी सोपे उपाय :-

अनेक वेळा पण घाई गडबडी मध्ये काम करत असतो. किंवा भांडी धुतल्यावर आपण ते कोरडे न होऊ देता न सुकवता, न पुसता मांडणी वर जसेच्यातसे ठेवून देत असतो. तसेच, कालांतराने या भांड्यांना लवकरच गंज लागत असतो. भांड्यांना गंज लागला तर बऱ्याच महिला या काळजीत येत असतात. परंतु जर स्टिलच्या भांड्याला गंज लागला तर जास्त घाबरण्याचे कारण नाही. किचन मधील काही वस्तूंचा उपयोग करून आपण स्टिलच्या भांड्यांचा गंज काढू शकतो. प्लॅस्टिकच्या भांडवली बंद करण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

वाचा  नाकाचे हाड वाढणे घरगुती उपाय

सोड्याचा वापर करून बघा :

तुमच्या  घरातील देखील स्टीलच्या भांड्यांना गंज लागला असेल, तर तुम्ही त्यासाठी घरातील किचन मधील बेकिंग सोड्याचा, खाण्याच्या सोड्याचा वापर करून स्टीलचे भांडे यांना लागलेला गंज अगदी सहज रित्या करू शकतात. त्यासाठी सर्वप्रथम एक ते दीड चमचा बेकिंग सोडा एका भांड्यात काढून घ्या. त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून घ्या. ही पेस्ट कोलगेट सारखी जाडसर झाल्यास एका ब्रश अथवा घासणी च्या सहाय्याने स्टीलच्या ज्या भांड्याला गंज लागला असेल, त्या गंज लागलेल्या ठिकाणी ब्रशच्या साह्याने बेकिंग सोडा घेऊन त्यावर घासा.

असे केल्याने स्टीलच्या भांड्यावरील गंज अगदी सहज रित्या निघण्यास मदत होते. शिवाय, गंज निघून त्या भांड्याला एक प्रकारे चकाकी देखील येऊ शकते. स्टीलचे भांडे यांना गंज लागल्यास तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर नक्कीच करून बघू शकतात.

लिंबाचा वापर करून बघा :

अनेक वेळा आपण घरातील स्टीलची भांडी धुतल्यावर ते कोरडे न होऊ देता, तसेच न पुसता जसेच्या तसे आपण मांडणीवर ठेवून देत असतो. किंवा काही स्टीलचे भांडे आपण नेहमीच्या वापरात काढत नाही. परंतु, इतर भांड्यांचा ओला स्पर्श त्या भांड्याला लागून त्या भांड्याला गंज लागू शकतो. तर अशा भांड्यांचा गंज काढण्यासाठी आपण लिंबाचा वापर देखील करू शकतो. घरातील स्टिलच्या भांड्याला गंज लागलेला असेल ते भांड्यावर बेकिंग सोडा व लिंबू याचा वापर करून तुम्ही त्याचा गंज काढू शकतात. त्यासाठी सर्वप्रथम एका वाटीमध्ये लिंबाचा रस काढून घ्यावा.

त्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यावा. एका ब्रशच्या साह्याने हे मिश्रण गंज लागलेल्या भांड्याला घासून घ्यावे. अशाप्रकारे देखील तुम्ही स्टीलच्या भांडण लागलेला गंज अगदी सहज रित्या काढू शकतो. तर मित्रांनो, स्टीलच्या भांड्यांना लागलेला गंज काढण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर नक्की करून बघू शकतात.

व्हिनेगरचा वापर करून बघा :

तुमच्या घरातील स्टीलच्या भांड्यांना गंज लागलेला असेल, तर त्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापर देखील करू शकतात. व्हिनेगरचा वापर करून स्टिलच्या भांड्यांचा गंज निघू शकतो. तसेच, एक वेगळ्या प्रकारचे शायनिंग देखील भांड्यांना येत असते. तुम्हाला देखील तुमच्या स्टीलच्या गंजलेला भांड्यांचा गंज काढावयाचा असेल, तर सर्वोत्तम स्टिलच्या भांड्याला गंज लागला असेल त्या ठिकाणी थोडेसे व्हिनेगर टाकून घ्यावे. आणि त्याला घसनीच्या अथवा ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित घासून घ्यावे. व्हिनेगरच्या मदतीने स्टीलचे भांडे यांना लागलेला गंज लगेच निघण्यास मदत होत असते.

वाचा  लहान बाळाचे कान फुटणे

शिवाय त्या भांड्यांना एक प्रकारे चमक देखील येऊ लागते.तुमच्या घरातील स्टीलच्या भांड्यांना गंज लागला असेल तर तुम्ही देखील वरीलप्रमाणे उपाय करून बघू शकतात. तर मित्रांनो, वरील प्रकारे लिंबाचा, बेकिंग सोड्याचा, व्हिनेगर चा वापर करून तुम्ही स्टीलच्या भांड्यांचा लागलेला गंज  काढू शकतात. शिवाय, याचा कुठल्याही प्रकारचा भांड्यांना साईड-इफेक्ट देखील होणार नाही. तसेच, तुमच्या भांड्यांना एक प्रकारे शायनिंग देखील येण्यास मदत होऊ शकते. त्यांना नक्कीच तुम्ही वरील प्रमाणे सोपे उपाय करून बघू शकतात.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कसे वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून करू शकतात.

धन्यवाद !

 

      

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here