चेहऱ्यावर निर्माण झालेले फोड जाण्यासाठी घरगुती उपाय

0
805
चेहऱ्यावर निर्माण झालेले फोड जाण्यासाठी घरगुती उपाय
चेहऱ्यावर निर्माण झालेले फोड जाण्यासाठी घरगुती उपाय

    आपण आपल्या शरीराची नेहमीच विविध रित्या काळजी घेत असतो. आपल्या शरीराला कोणतीही हानी होणार नाही किंवा कोणत्याही समस्या उद्भवणार नाही यासाठी आपण नेहमीच वेगवेगळे प्रयत्न करून आपल्या शरीराची काळजी घेत असतो. पण ही शरीराची काळजी घेत असताना बऱ्याच वेळेस आपल्या कडून काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. ज्यामुळे आपल्याला त्या संबंधित विविध समस्या उद्भवू शकतात.आपल्या प्रत्येकालाच आपले सौंदर्य वाढावे असे वाटत असते. पण काही वेगवेगळ्या समस्यांमुळे त्यांच्या सौंदर्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. सर्वात जास्त आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेत असतो कारण की आपल्या चेहऱ्यामुळे आपल्या शरीराचे सौंदर्य वाढविण्यास आपल्याला मदत मिळत असते. परंतु चेहऱ्यावर निर्माण झालेले फोड ते सौंदर्य कमी करू शकतात.

अनेक लोक आपल्या चेहऱ्यावरील सौंदर्य वाढविण्यासाठी विविध केमिकलयुक्त क्रीमचा वापर करतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या चेहर्याचे निगडित विविध समस्या उद्भवतात किंवा त्यांना त्या समस्येचे तोंड द्यावे लागू शकते.अशीच एक समस्या बऱ्याच लोकांना उद्भवते ती म्हणजे चेहऱ्यावर फोड निर्माण होणे. चेहऱ्यावर फोड निर्माण होणे अशा वेगवेगळ्या समस्यांमुळे त्यांच्या चेहऱ्यावरील सौंदर्य मध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. बरेच लोक विविध उपाय करून आपल्या चेहऱ्यावर सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न देखील करतात. पण विविध केमिकल मुक्त क्रीम चा वापर केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर त्याचे साईड इफेक्ट होऊन आपल्याला चेहऱ्याची निगडीत विविध समस्या निर्माण होऊ शकतात.चेहऱ्यावर फोड येणे ही समस्या अधिक तर महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. चेहऱ्यावर फोड येणे या समस्येची विविध कारणे देखील असू शकतात .

चेहऱ्यावर फोड निर्माण होण्याची विविध कारणे :-

      त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जर फोड निर्माण होत असतील तर त्याची मुख्य कारणे कोणती आहेत व कुठली उपाय करू आपण त्यांना दूर करू शकतो? हे आपल्याला माहीत असणे फार महत्त्वाचे असते. तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की चेहऱ्यावर फोड येणे या समस्येचे निगडित कोण कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो? चला तर मग बघुया!

  • केमिकलयुक्त क्रीमचा अतिवापर करणे :-

    आपले चेहऱ्याचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध केमिकलयुक्त क्रीमचा वापर करतो. पण त्या संबंधित आपल्याकडे पुरेशी माहिती नसल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर त्या केमिकलयुक्त क्रीमचा साईड इफेक्ट होऊ शकतो. ज्यामुळे आपले सौंदर्य तर बिघडतेच पण त्याचबरोबर आपल्याला चेहऱ्याशी निगडित विविध समस्या देखील उद्भवतात. चेहऱ्यावर फोड निर्माण होणे या समस्याचे मुख्य कारण म्हणजे आपण जर केमिकलयुक्त क्रीम चा जर अति प्रमाणात वापर करत असाल तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर फोड निर्माण होणे अशा समस्या उद्भवू शकतात.

  • चेहरा नेहमी अस्वच्छ असणे :-

     बऱ्याच वेळेस विविध कामांच्या त्रासामुळे आपण आपल्या चेहऱ्याकडे लक्ष देत नाही. त्याच बरोबर जर तुमचा चेहरा सतत अस्वच्छ असेल तर त्यामुळे देखील आपल्या चेहऱ्यावर फोड येणे अशा समस्या उद्भवू शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे चेहरा अस्वच्छ असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर बाहेर असणारे विविध जंतू व धुळीच्या कण चेहऱ्यावर चिटकतात. आपला चेहरा स्वच्छ न धुतल्यामुळे ते जंतू आपल्या चेहऱ्यावर तसेच राहतात व ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर फोड निर्माण होणे अशा समस्या आपल्याला उद्भवू शकतात. त्यामुळे आपण आपल्या शरीराची योग्य प्रमाणात काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे व चेहऱ्यावर फोड निर्माण होणे ही समस्या निर्माण होण्याचे चेहरा अस्वच्छ असणे हे एक मुख्य कारण असू शकते.

वाचा  स्वप्नात परदेश दौऱ्यावर जाताना दिसणे

चेहऱ्यावर निर्माण झालेले फोड घालवण्यासाठी विविध घरगुती उपाय :-

     मित्रांनो वरील भागात आपण बघितले की चेहऱ्यावर फोड निर्माण होणे या समस्येची कोणकोणती मुख्य कारणे आहेत? आता आपण बघणार आहोत की चेहऱ्यावर फोड निर्माण होणे या समस्येपासून आराम मिळण्यासाठी आपण कोण कोणते घरगुती उपाय करू शकतो?

  • चेहऱ्याला लिंबू ची पेस्ट लावून बघावे :-

     स्वयंपाक घरातील विविध जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण लिंबू चा वापर करत असतो.  त्याच बरोबर उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराची ऊर्जा परत मिळवण्यासाठी देखील आपण लिंबू चा वापर करत असतो. या लिंबूचे आपल्या शरीरासाठी देखील विविध फायदे होऊ शकतात. लिंबू मध्ये असणाऱ्या विविध पोषक तत्त्वे आपल्या शरीराशी निगडित विविध समस्या दूर करण्यास आपल्याला लिंबू मुळे मदत होऊ शकते. तुमच्या चेहऱ्यावर फोड निर्माण झाले असतील व ते जर तुम्हाला घालवायचे असेल तर तुम्ही चेहऱ्याला लिंबू ची पेस्ट लावून बघावी. कडुनिंबाचे पाच ते सात पाणी घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस टाकावा व हे मिश्रण एकत्रित करून तुमच्या चेहऱ्यावर जिथे फोड निर्माण झाले असेल त्या ठिकाणी लावावा. असे तुम्ही दिवसातून एकदा करावे असे जर तुम्ही सतत केले तर तुमच्या चेहऱ्यावर निर्माण झालेले दूर होण्यास तुम्हाला मदत मिळू शकते 

  • कोरफडीचा जेल लावून बघावा :-

     बर्‍याच जणांना माहीत असेल की कोरफडी मुळे आपल्या शरीराला देखील विविध फायदे होऊ शकतात. त्याचबरोबर जर आपल्याला शरीराशी निगडित इतर वेगवेगळ्या समस्या जर असतील तर ती समस्या दूर करण्यास कोरफड आपल्याला मदत करत असते. बऱ्याच वेळेस विविध कामांसाठी देखील कोरफडीचा वापर केला जातो. जर तुम्हाला चेहऱ्यावर फोड निर्माण होणे ही समस्या जर निर्माण होत असेल तर तुम्ही चेहऱ्यावर कोरफडीचा जेल लावावा. कोरफडीचा ताजा गर घेऊन आपल्या चेहर्‍यावर ज्या ठिकाणी फोड आलेले असतील त्या ठिकाणी लावावा व पाच ते दहा मिनिटे नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. असे जर तुम्ही केले तर तुमच्या चेहऱ्यावर निर्माण झालेले फोड दूर होण्यास तुम्हाला मिळू शकेल.

वाचा  स्वप्नात राजहंस दिसणे शुभ की अशुभ

    आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की चेहऱ्यावर फोड निर्माण होणे या समस्येची कोणकोणती कारणे आहेत व त्याचबरोबर कोण कोणते घरगुती प्रभावशाली उपाय केल्यामुळे आपल्या समस्या पासून आराम मिळू शकतो? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here