नमस्कार मित्रानो, आज आपण बघणार आहोत, योगा करण्याचे फायदे. आपल्या सर्वांचीच जीवनशैली बदललेली आहे. यामुळे याचा परिणाम आपल्या स्वास्थ्यावर देखील होत आहे. आपले स्वास्थ्य दिवसेंदिवस खराब झालेले आहे. तसेच कामाच्या दबावामुळे किंवा काही इतर कारणांमुळे आपल्याला आपले आपले आरोग्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. आणि याचे दुष्परिणाम आपल्या शरीराला होऊ शकतो. म्हणूनच आपण योगा करणे फार गरजेचे आहे. पण आजकालच्या पिढीला योगाचे महत्व व त्याचे फायदे ही माहिती नसल्यामुळे योगाकडे कडे दुर्लक्ष करतात. आजचे युवा आहे जिम मध्ये म्हणजेच व्यायामशाळेत जाऊन शारीरिक व्यायाम करतात.
त्यांना असे वाटते की व्यायाम शाळेमध्ये जाऊन त्यांचे आरोग्य चांगले होऊ शकते. त्यांची प्रतिकारशक्ती चांगली होऊ शकते. पण असे नाही जर तुम्ही योगा केला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्यायाम करण्याची गरज भासणार नाही. तसेच तुमचे शरीर सुदृढ होईल व त्याची वाढ देखील चांगल्या रीतीने होईल. तर मित्रांनो आपण याच विषयाची चर्चा करणार आहोत की नक्की आपण योगा का केला पाहिजे ? पूर्वीचे लोक योगा का करत असे तसेच योगा केल्यामुळे आपल्या शरीराला कोण कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतो चला तर मग बघुया.
Table of Contents
आपल्या शारीरिक वाढीसाठी योगा का गरजेचा आहे.
आपण योगाबद्दल एक छोटीशी माहिती तर बघितली आता आपण जाणून घेऊया की, बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की नक्की योगा केल्याने असा काय फायदा होतो. आपल्या शरीराला की आपण दररोज योगा केलाच पाहिजे. याच प्रकारे आपली शारीरिक वाढ योगामुळे कशी व कोणत्या प्रकारे सुदृढ होते किंवा याचे काही प्रमाण आहे का हे आपण जाणून घेऊया.
आपले शारीरिक वाढीसाठी योगा फारच उपयुक्त आहे. म्हणजे योगा केल्याने आपली शारीरिक वाढ चांगल्या रीतीने होऊ शकते का ? तर होय आपली शारीरिक वाढ उत्तम प्रकारे होऊ शकते. ती म्हणजे फक्त आणि फक्त योगामुळे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नसेल की योगामध्ये देखील खूप प्रकार आहेत. आपल्याला जो योगा माहिती आहे जी थोडीफार आसने माहिती आहेत तो फक्त एक योगाचा छोटासा भाग आहे. आपल्या पूर्वजांनी बरेचसे ग्रंथ हे योगावर लिहिलेले आहे. कारण त्यांना त्याकाळी माहिती होते की योगा हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे.
याचा आपल्या पुढच्या पिढीला फायदा होण्यासाठी पूर्वजांनी हे ग्रंथ साहित्य निर्माण केले आहेत. तसेच संस्कृतमध्ये देखील योगाचे महत्त्व सांगितले गेलेले आहेत. तसेच प्रत्येक अवयवाला योगाचा कोणत्या प्रकारे व कसा फायदा होतो हे देखील त्यांनी त्यामध्ये सांगितलेले आहे. पण बरेच वेळेस आपल्यापर्यंत हि योग्य माहिती न पोहोचल्यामुळे आपल्याला या गोष्टी माहितीच नाही. तर मित्रांनो आज आपण योगाचे काही फायदे जाणून घेणार आहोत जे आपल्या शारीरिक वाढीसाठी किंवा आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतात चला तर मग जाणून घेऊया.
योगामुळे शरीराला होणारे फायदे :
चला तर आता आपण आपल्या महत्वाच्या मुद्द्यावर येऊ या की योगामुळे आपल्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात चला तर मग बघुया.
प्रतिकारशक्ती वाढते :
आज कालच्या पिढीमध्ये प्रतिकारशक्तीही फार कमी होत चाललेली आहे. कारण आज कालची पिढी हे फास्ट फूड च्या अधीन झालेली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व लोक हे बाहेरचे अन्न खाद्य पदार्थ खातात. लहानांचा तरी ठीक आहे पण मोठे लोक पण कामांमध्ये ते गुण असतात. की त्यांना आपल्या आहाराचा भानच उरत नाही आणि यामुळेच त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होत जाते. पण तुम्ही जर का योगा करण्यास सुरुवात केली तर हळूहळू तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. कारण तुमचे शरीर हे कोणत्याही रोगापासून लढण्यासाठी बळावेल.
पचनक्रिया सुधारते :
आजची सर्वात मोठी समस्या म्हणजे आपण कोणते आहाराचे सेवन करतो. तो आहार आपल्याला नीट पचत नाही याचा अर्थ आपण जो आहार घेतो तो योग्य नसेल किंवा आपली पचनशक्ती तो आहार पचवण्यासाठी सक्षम नसेल. तर तुम्हाला जर तुमची वचन क्रिया सुधारायचे असेल तर तुम्ही पोटाचे व्यायाम म्हणजेच पोटाच्या निगडीत आसन करण्यास सुरू केले पाहिजे. जेणेकरून तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल आणि याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर देखील पडेल.
स्नायू बळावतात :
आजची पिढी व सर्वच मुले हे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना बळी पडलेले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोक मोबाइल लॅपटॉप फोन यामध्ये गुंतलेले दिसतात. लहानपणापासूनच मुलांना मोबाईल दिलेले असेल तर ते मुलं मैदानी खेळ खेळणार नाही. मग त्यांचे स्नायू कसे काय बाळावतील. पण याचे उत्तर देखील तुम्हाला युगामध्ये सापडेल जर तुम्ही योगा करत असाल तर जसे की सूर्यनमस्कार अशा प्रकारची आसने जर तुम्ही रोज करत असाल तर नक्कीच तुमचे स्नायू बळावण्यास मदत होईल.
शरीराला लवचिकपणा येतो :
बर्याचदा तुम्ही हे बघितले असणार की जे लोक योगा करतात त्या लोकांच्या शरीराला एक विशिष्ट प्रकारचा लवचिकपणा येत. ज्यामुळे त्यांना बरेच काम करण्यास अवघड होत नाही तसेच जर तुम्ही लहान वयापासूनच योगा करत असाल तर तुमचे शरीर हे लवचिक बनवू शकते.
अंगदुखी अशा समस्यांना पूर्वे पुर्णविराम लागतो :
आज बर्याच लोकांना काम केल्यानंतर त्यांचे हात पाय दुखू लागतात. म्हणजेच उठता-बसता ना त्यांच्या गुडघ्यातून आवाज येणे किंवा जर कम्प्युटर लॅपटॉप समोर बसून काम करत असाल तर मान दुखणे पाठीचा कणा दुखणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. पण जर तुम्ही योगा करत असाल तर तुमच्या शरीराला एक उत्तम तान मिळतो आणि या सर्व वेदनांपासून तुमची मुक्ती होते.
मन आणि डोके शांत होते :
योगा फक्त आपल्याला शारीरिकरीत्या सुदृढ व स्वस्त बनवत नाही. तर आपल्या शरीराला आतून देखील शक्तिशाली बनवतो. जर तुम्हाला सतत राग येत असेल तर यावर योगा हा एक रामबाण उपाय आहे. कारण जर तुम्ही योगा केला तर तुमचे मन डोके हे शांत होण्यास मदत होते. तसेच तुमच्या श्वसनक्रिये वर देखील तुमच्या उत्तम नियंत्रण येतो. त्यामुळे एकंदरीतच तुमचा राग कमी होण्यास मदत होते व तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताण तणाव असेल तर तो देखील दूर होण्यास मदत होते.
शरीरातील प्रत्येक अवयव वर आपले नियंत्रण घट्ट होते :
आपण योगा करताना अशा अवस्थेमध्ये असतो ज्यामध्ये आपण प्रत्येक अवयवांना डोक्याने, मनाने, श्वसनक्रिया ने नियंत्रण करत असतो. म्हणून हळूहळू कालांतराने प्रत्येक अवयवांवर चे नियंत्रण आपले घट्ट होत जाते आणि याचाच फायदा आपल्याला भविष्यामध्ये देखील होऊ शकतो.
तर मित्रांनो आज आपण बघितले की व्याकरणाचे आपल्या शरीराला कोणकोणत्या प्रकारे व कोणते फायदे होतात. याचप्रकारे आपण योगा बद्दल थोडीशी माहिती देखील जाणून घेतली. तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद !