खसखस खाण्याचे फायदे जाणून घेऊयात काय आहेत?

0
1179
खसखस खाण्याचे फायदे जाणून घेऊयात काय आहेत
खसखस खाण्याचे फायदे जाणून घेऊयात काय आहेत

नमस्कार मित्रांनो खसखस सगळ्यांनाच माहिती असेल. अगदी  छोटीशी तिचा बारीक दाना हातातही पकडता येत नाही, इतकी बारीक ती असते तीची चव न्यारीच असते. अफूच्या शेतांमध्ये ती पिकवली जाते. तसेच खसखसच्या मुळांपासून परफ्युम्स सुद्धा तयार केले जातात. खसखस ही आपल्या आहारात वापरल्याने, आपल्या शरीराला तिच्यातले गुणधर्म मिळतात. व ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. तसेच सण असो, स्वीट्स असो, त्यामध्ये खसखस चा वापर केला जातो. मसाला पदार्थांमध्ये तिची चव न्यारीच ! खसखस खाण्याचे फायदे खूप आहेत.

कारण खसखस घालून ग्रेव्ही बनवलेली भाजीची, चव खूप छान लागते. तसेच स्वीट पदार्थांचा राजा अनारसे त्याच्यावर खसखस विना शोभा तर येणारच नाही ना ! खसखस कुठेकुठे शोभून दिसते त्याचा नेमच नाही. अगदी मोत्यासारखी चमकते. खसखस घालून केलेला हलवा त्याची चव मनाला मोहून जाते. खसखस चा वापर हा स्वीट्स मिठाई, अनारसे, मसालेदार पदार्थ, भाज्यांमध्ये, तसेच हलवा इतके सारे पदार्थांत तिचा वापर केला जातो. आज आपण तिचा आपल्या शरीरासाठी कोणत्या प्रकारे फायदा होऊ शकतो ? ते जाणून घेणार आहोत. चला, तर मग जाणून घेऊयात, की खसखस खाण्याचे फायदे नेमके कोणकोणते ? 

खसखस पासून तुमच्या शरीराला होणारे फायदे:

मित्रांनो, खसखस पासून तुमच्या शरीराला खूप सारे फायदे होतात. तर मग ते नेमके कोणकोणते? चला तर जाणून घेऊयात! 

  • खसखस पासून तुम्हाला मिळणारे गुणधर्म :

खसखस पासून आपल्याला खूप सारे गुणधर्म मिळतात तिच्यामध्ये लोह, जीवनसत्व, कॅल्शियम, विटामिन ब, प्रथिने, तंतुमय पदार्थ, मॅग्नेशियम, फायबर, ओमेगा-3 ऍसिड, झिंक पोटॅशियम, आयर्न यासारख्या गुणधर्मांनी ती भरलेली असते, त्यामुळे आपल्या शरीरातील होणाऱ्या समस्येवर, ते गुणधर्म त्याचे काम करतात व आपल्याला आराम मिळतो. 

वाचा  शतावरी चे फायदे

तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते :

जर तुम्हाला बाहेरची इन्फेक्शन लवकर होते, सारखा आजारी पडण्याचे प्रमाण असते, सारखे सारखे सर्दी पडसे होते, अशावेळी जर तुम्ही तुमच्या आहारात नियमित खसखस घालून त्याचे पदार्थ खाल्ले, तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास चालना मिळते. कारण खसखस मध्ये झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर, यासारखे गुणधर्म असल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास चालना मिळते व कित्येक आजारांना लढण्यासाठी तुमच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. 

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत मिळते :

खसखस खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत मिळते. कारण खसखस मध्ये लोह, आयर्न यांचे गुणधर्म असतात. त्यामुळे शक्य शरीरात रक्ताची कमतरता दूर होते. तसेच स्त्रियांना सहसा करून, ॲनिमियाचा त्रास होतो, अशा वेळी त्यांनी त्यांच्या आहारात खसखस चा वापर करायला हवा. कारण मासिक पाळी दरम्यान अंगावरून रक्तस्राव जास्त प्रमाणात गेल्यामुळे, त्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आल्यामुळे, त्यांना अशक्तपणा, थकवा, चक्कर येण्यासारख्या समस्या होतात. त्यामुळे त्यांनी नियमित खसखस घालून, त्याचा हलवा करायला हवा. 

खसखस चा हलवा बनवण्याची पद्धत:-

हलवा बनवण्याची पद्धत, त्यासाठी तुम्हाला एक तास पाण्यामध्ये भिजवून ठेवावी. त्यानंतर ती मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. त्यानंतर शुद्ध गायीच्या तुपामध्ये चांगली लालसर शेकून घ्यावी. चांगले भाजल्यानंतर लालसर रंगाचे झाल्यानंतर, त्यामध्ये साखर टाकावी. त्यानंतर किसमिस, काजू, बदाम ची पूड टाकून खसखस चा हलवा तयार करावा. अशाप्रकारे खसखस चा हलवा तयार होतो. तो आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतो. 

डोकेदुखी वर आराम मिळतो

ज्या लोकांना तीव्र डोकेदुखीचा त्रास असतो, तसेच मायग्रेन सारखा त्रास असतो. अशा वेळी त्यांनी त्यांच्या आहारात खसखस चा वापर करायला हवा. कारण खसखस बुद्धीला चालना देणारे असते. तसेच तुमचा माथा शांत ठेवण्यास मदत करते. खसखस मधील विटामिन व गुणधर्म तुमच्या डोकेदुखी थांबण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यासाठी नियमित तुम्ही सकाळी उपाशीपोटी खसखस चा हलवा खाल्ला, तर तुम्हाला यासारख्या समस्येवर आराम मिळतो. 

वाचा  बेंबीतून पाणी येणे या समस्या ची वेगवेगळी लक्षणे व घरगुती उपचार :-

तुमच्या चेहऱ्यावरील डाग जाण्यास मदत मिळते :

हो, बाहेरच इन्फेक्शन तसेच मुरुमाचे डाग, डोळ्याखाली काळी वर्तुळे, यासारख्या समस्यांना खूप जणांना तोंड द्यावे लागतात. कितीही क्रीम वापरून तरी त्या जात नसतील, तर तुम्ही खसखस चा वापर करावा. त्यासाठी तुम्हाला खसखस भिजवून ठेवावी. नंतर तिची पेस्ट करून, तिच्यात थोडे दूध आणि मध यांचे मिश्रण टाकून, तुमच्या चेहऱ्यावर त्याचा लेप लावावा. असे नियमित हप्त्यातून तुम्ही तीन वेळेस केले, तर तुमचा चेहरा डाग विरहित होईल. शिवाय तुमची त्वचा मुलायम व चमकदार होईल. 

तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते :

खसखस चा वापर तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला ठरतो. कारण त्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, झिंक, आयर्न, ओमेगा-थ्री फॅटी ऍसिड यासारखे गुणधर्म असतात. तसेच त्यामध्ये लोहाचे ही प्रमाण असते. त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी हृदयासाठी फायदेशीर ठरते. तसेच तुमच्या रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल ते काढण्यास मदत करते. त्यामुळे तुम्हाला रूदयाची संबंधित तक्रारी दूर होतात. तसेच खसखस हे प्रमाणातच घ्यावी. तिचा वापर जास्त प्रमाणात करू नये आणि करायचा असला, तर डॉक्टरांना ही विचारून घेऊ शकतात. 

झोप येण्यासाठी फायदेशीर ठरते :

धावपळीच्या जीवनात मानसिक ताण तणाव, चिंता, भय या साऱ्या गोष्टींमुळे तुम्हाला झोप येत नाही. झोप न आल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर त्याचा थकवा लगेच दिसून येतो. अशक्त असल्यासारखे वाटते. चिडचिड होते, अशावेळी जर तुम्ही तुमच्या आहारात खसखस चा वापर केला, तर तुम्हाला फायदेशीर ठरते. त्यासाठी तुम्हाला खसखस भिजवून, त्यामध्ये दूध टाकून, थोडीशी साखर टाकून, त्याची पेज तयार करून, रात्री झोपण्यापूर्वी ते खायचे आहे. त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते. पण खसखस पाण्यात भिजवायला टाकण्यापूर्वी, एक ते दिड चमचा घ्यावी. जास्त प्रमाणाच्या बाहेर घेऊ नये. जास्त प्रमाणात घेतली तर ती घातक ठरू शकते. 

तुमचे पचन संबंधित तक्रारी दूर होतात :

बऱ्याच वेळेला काहीजणांना पित्त, अपचन, अजीर्ण, ढेकर येणे, यासारख्या तक्रारी होतात. कारण तुमच्या पचन क्रियेत बिघाड झाला, की यासारख्या तक्रारींना तुम्हाला समोरे जावे लागते. जर तुम्ही तुमच्या आहारात खसखस चा वापर केला, तर ती तुमच्या पचनाची संबंधित तक्रारी दूर करते. कारण ती ऑंटीबॅक्टरियल असते आणि तिच्या मध्ये पोटॅशियम, फायबर यासारखे गुणधर्म असतात. जर तुम्ही खसखस पावडर दूधात किंवा पाण्यात घालून पिले, तर तुमच्या पचनसंस्थेतील येणारे अडथळे दूर होऊन, तुमच्या पचनाचे संबंधित तक्रारी दूर होतात. 

वाचा  श्वास घेताना त्रास होणे या समस्येवर घरगुती उपाय 

हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरते :

खसखस मध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, फायबर, मिनरल्स, झिंक, काॅपर याचे गुणधर्म असल्यामुळे, ते आपल्या हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर असते, त्यासाठी त्यांनी त्यांच्या आहारात खसखसच्या वापर करायला हवा. तसेच खसखस चे तेल मिळते,  त्याने गुडघ्यांना, सांध्यांना मसाज केल्याने गुडघेदुखीवर आराम मिळतो. खसखस खाण्याचे फायदे आपल्या हाडांना खूप होतात.

खसखस चे दुध केसांसाठी फायदेशीर ठरते :

हो खसखस  दूध केसांसाठी फायदेशीर ठरते. जर तुमचे केस अकाली गळत असतील, तुकडे पडत असतील, केसांमध्ये कोरडेपणा आला असेल, टाळू आग मारत असेल, अशावेळी तुम्ही खसखस चा वापर करावा. त्यासाठी तुम्हाला खसखस एक ते दीड तास पाण्यामध्ये भिजवून ठेवावे, तिला वाटतांना थोडे पाणी टाकून, वाटून घ्यावे. या प्रकारे खसखस चे दुध तयार होते. तसेच त्यामध्ये तुम्ही नारळाचे दूध एकत्र करून, तुमच्या केसांना वीस ते पंचवीस मिनिटे लावून ठेवावे. त्यामुळे केसांना मुलायमपणा येतो. शिवाय चमकदारपणा येते, तसेच केस गळती च्या समस्या कमी होतात. 

टीप:- मित्रांनो ज्यावेळी तुम्ही खसखस चा वापर करत असाल, त्यावेळी ती प्रमाणातच घ्यावी. जर तिचे प्रमाण चुकले, तर तुम्हाला शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. तसेच खसखस चा वापर करण्यापूर्वी तुम्ही स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. घेताना तिला निवडून घ्यावी व चांगले दुकानातूनच घ्यावे. तसेच तुम्हाला जर कसली ऍलर्जी असेल, तर तुम्ही खसखस चा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. 

चला तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला खसखस खाण्याचे फायदे कोणते ते सांगितले. खसखस तुमच्या शरीरासाठी कशा प्रकारे फायदेशीर ठरू शकते, हे सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगावेत. 

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here