डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

0
781
डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?
डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

नमस्कार मित्रांनो. हल्ली सर्वच जण हे मोबाईलचा सर्रास वापर करताना दिसून येत आहे. अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत सर्वजण हे मोबाईलशी जास्त कनेक्टेड झालेले दिसून येतात. तसेच जेवण करताना देखील आपण टीव्ही बघत बघत जेवण करत असतो. त्यामुळे आपण काय जेवण करतोय, ताटात नेमकं काय वाढलेले याकडे देखील आपले दुर्लक्ष होत असते. तसेच बऱ्याच लोकांचे काम हे संगणक, मोबाईल आणि लॅपटॉप शिवाय होत नसते. परंतु या सर्वांचा परिणाम हा डोळ्यांवर होताना दिसून येत असतो. मोबाईल मधनं पडणारा प्रकाश, तसंच लॅपटॉप, टीव्ही, संगणक यावरील जास्त जो प्रकाश आहे त्या प्रकाशाचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होत असतो. परिणामी, डोळ्यांच्या संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत असते. चला तर मग जाणून घेऊयात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

तसेच आता कामाचा व्याप असणे, अपुरी झोप होणे, खूप ताण-तणाव असणे यामुळे देखील त्याचा परिणाम हा आपल्या डोळ्यांवर अधिक होताना दिसून येत असतो. मित्रांनो आपल्या शरीराचे प्रत्येक अवयव आहे आपल्यासाठी किमती मोल असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवांची जास्तीत जास्त आपण काळजी घेऊ, तितके आपले आरोग्य चांगले राहील. तसेच आपले आधुनिक जीवन शैली, आपण नियमित आहारात काय घेतोय, काय नाही या सर्व गोष्टींचा प्रभाव आपल्या शरीरावर दिसून येतो परिणाम डोळ्यांवर देखील दिसून येत असतो. आपले डोळे चांगले राहण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे? तसेच आपण आहारात काय गोष्टींचा समावेश केला पाहिजे?तसेच आपले डोळे चांगले राहण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो  आज आपण डोळ्यांची काळजी कशी घ्यावी? याविषयी खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

डोळ्यांवर कोणत्या गोष्टींमुळे परिणाम होत असतो?

मित्रांनो, शरीरातील प्रत्येक अवयव हे मौल्यवान असतात. त्यापैकी डोळा हा खूप मौल्यवान असा अवयव आहे. त्यामुळे आपण डोळा या नाजूक अवयवाची जेवढी चांगली काळजी घेऊ तेवढी आपल्या आरोग्यासाठी चांगले ठरेल. डोळ्यां द्वारे  सुंदर आणि रंगीबिरंगी जग आपल्याला बघायला मिळत असते. अनेक जण हे तासन तास मोबाईल मध्ये व्यस्त झालेले दिसतात. तर काहीजण सारखी सतत टीव्ही बघत असतात. परंतु या सर्वांचा परिणाम डोळ्यांवर होताना दिसून येतो. तर डोळ्यांवर कोणत्या गोष्टींमुळे परिणाम दिसून येतो, हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

  • बरेच जण हे मोबाईल आणि टीव्ही सारखे सारखे बघत असतात. त्यामुळे त्या प्रकाशाचा परिणाम हा डोळ्यांवर होताना दिसून येतो परिणामी डोळ्यांची नजर कमी होण्याचा त्रास उद्भवू शकतो.
  • वाढत्या वयानुसार देखील डोळ्यांमध्ये बदल होताना दिसून येतो त्यामुळे नजर कमजोर होऊ शकते.
  • बऱ्याच जणांचे ऑफिसमधले काम हे मोबाईल आणि लॅपटॉप किंवा संगणकाशिवाय होत नसते. त्यामुळे लॅपटॉप अथवा संगणकावरील स्क्रीन वरील प्रकाश पडतो, त्या प्रकाशाचा डोळ्यांवर परिणाम होत असतो. परिणामी नजर कमी होऊ शकते अथवा चष्मा लागण्याची संभावना असते.
  • उन्हाळा म्हटला की उष्ण वातावरण आलेच आणि उष्ण वातावरणाचा आपल्या डोळ्यांवर परिणाम होताना दिसून येतो.
  •  उन्हाळ्यातील उष्ण वातावरणात कुठे बाहेर जरी गेले तरी डोळे जळजळ होणे, डोळे लाल होणे अशी समस्या निर्माण होत असते.
  • कामाचा अति व्याप असल्यामुळे ते सतत ताणतणाव नैराश्य स्थिती असल्यामुळे त्याचा परिणाम डोळ्यांवर दिसून येतो. परिणामी, डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागते.
  • चुकीची जीवनशैली तसेच रात्री उशिरापर्यंत जागरण होणे, विश्रांती अपुरी घेणे यामुळे देखील डोळ्यांवर परिणाम होताना दिसून येतो आणि यामुळे डोळ्यांखालील काळे डाग पडायला लागतात.
  • नेहमीच्या आहारामध्ये पौष्टिक घटकांचा, तत्वांचा तसेच हिरव्या पालेभाज्यांचा समावेश न केल्यामुळे देखील डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडण्याची समस्या उद्भवू शकते.
वाचा  वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची पद्धत कशी हवी

मित्रांनो वरील सर्व गोष्टींमुळे डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होताना दिसून येतो. डोळे हे खूप नाजूक अवयव आहेत. त्यामुळे आपण डोळ्यांची जितकी चांगली काळजी घेऊ तितके आपले डोळे चांगले राहतील. डोळे चांगले राहण्यासाठी आपण सतत टीव्ही बघत बसणे टाळणे गरजेचे आहे. तसेच मोबाईल फक्त आपण कामापुरते हाताळू तितकी आपल्या डोळ्यांसाठी चांगले राहील. डोळ्यांवर अपाय होणाऱ्या गोष्टी आपण जितका जास्तीत जास्त  टाळू तितके आपल्या आरोग्यसाठी चांगले राहील. तसेच डोळ्यांसाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी देखील जाणून घेणे महत्वाचे आहे. डोळ्यांची कशी काळजी घ्यावी? तसेच डोळ्यांसाठी कोणते घरगुती उपाय करता येतील याविषयी आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

डोळ्यांची काळजी कशापद्धतीने घ्याल?

मित्रांनो, वाढता ताणतणाव, आधुनिक जीवनशैली, तसेच निद्रानाश, पुरेपूर विश्रांती न घेणे, अति कामाचा व्याप त्यामुळे तान घेणे, नैराश्य इत्यादी कारणांचा परिणाम हा आपल्या डोळ्यांवर दिसून येत असतो. डोळ्यांची काळजी हे कशा पद्धतीने घ्यावी हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  1. ज्यांना डोळ्यांखाली काळी वर्तुळे झालेली असतील त्यांनी काकडीच्या थंडगार सत्या आपल्या डोळ्यांवर ठेवाव्यात. ह्या चकत्या तुम्ही 20 मिनिटे ठेवावे. असे केल्यामुळे असे नियमित केल्यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे जाण्यासाठी मदत होऊ शकते.
  2. डोळ्यांची त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी डोळे बंद करून गुलाब पाण्यात भिजवलेले कापसाचे बोळे दहा ते पंधरा मिनिटं ठेवावेत. आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे गुलाब पाण्यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. असे केल्यामुळे डोळ्यांची त्वचा ही स्वच्छ होण्यास मदत होऊ शकते.
  3. तसेच थंडगार दुधामध्ये भिजवलेले कापसाचे बोळे पंधरा मिनिटं डोळ्यांवर ठेवावेत असे केल्यामुळे देखील डोळ्यांखालची काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. हा उपाय तुम्ही दिवसातून दोन अथवा तीन वेळा देखील करू शकतात.
  4. डोळे स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही कोरफडीचा रसाचा देखील वापर करू शकतात त्यासाठी ताज्या कोरफडीच्या रसाने डोळ्याखालील त्वचेला हळुवारपणे मसाज करावी असे केल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे जाण्यासाठी मदत होऊ शकते.
  5. तसेच आपले डोळे निरोगी राहावेत यासाठी तुम्ही संगणक, मोबाईल, टीव्ही यांचा जितका कमीत कमी वापर कराल तितके तुमच्या डोळ्यांसाठी ते फायदेशीर ठरू शकेल.
  6. उन्हाळ्यात अति उष्णता असल्यामुळे डोळ्यांमध्ये मध्ये जळजळ तसेच डोळ्यातून पाणी येण्याचे प्रकार वाढत असतात. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात डोळ्यांची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. तसेच बाहेरून आल्यावर डोळे हे थंडगार स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यावेत.  बाहेर गेल्यामुळे जे बारीक आणि अतिसूक्ष्म धुळीचे कण डोळ्यात गेलेले असतात ते निघून जाण्यास मदत होते.
  7. तसेच डोळ्यांखालील काळी वर्तुळे जाण्यासाठी तुम्ही ग्रीन टी देखील वापर करू शकतात. थंडगार पाण्यामध्ये बुडवलेली ग्रीन टी ची बॅग काही का डोळ्यांवरती ठेवावीत तसेच डोळ्याच्या खालील काळा वर्तन वर थोडे हळुवारपणे  ती फिरवावी. असे केल्यामुळे देखील डोळ्याखालची-काळी-वर्तुळे जाण्यास मदत होते.
  8. कामाचा अति लोड,सतत संगणक व लॅपटॉप समोर बसून काम करणे, यामुळे डोळ्यांतून पाणी येऊ शकते. आणि डोळ्यांना देखील थकवा जाणवू शकतो. त्यासाठी तुम्ही थोडा एक दोन मिनिटांचा ब्रेक घेऊन डोळ्यांची एक्सरसाइज करायला हवी. यासाठी दोन्ही हाताचे तळवे एकमेकांना घासायची. नही जनरेट होईपर्यंत ती तळवे एकमेकांना घासावेत आणि त्यानंतर हळूवारपणे डोळे बंद करून डोळ्यांवर ठेवावेत. अशी क्रिया तुम्ही पाच-सहा वेळा तरी करावी, असे केल्याने तुमच्या डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होऊ शकते.
  9. तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी तुम्ही गाजराचा रस आणि पपई यांचा समावेश रोजच्या आहारात करावा. यामुळे तुमची डोळे निरोगी राहण्यास मदत होईल.
  10. तसेच तुमच्या नियमित च्या आराम मध्ये तुम्ही जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचा समावेश जरूर करावा.
  11. डोळ्यांची दृष्टी चांगली राहावी यासाठी त्रिफळा चूर्ण चा वापर देखील तुम्ही करू शकतात. त्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा त्रिफळा चूर्ण मिक्स करून एकजीव केल्यानंतर रात्रभर पाण्यामध्ये तसेच राहू द्यावे. आणि दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर ते पाणी व्यवस्थित वस्त्रगाळ करून ते पाणी डोळ्यांवर मारावे ही क्रिया तुम्ही महिनाभर केल्यामुळे तुमची दृष्टी सुधारण्यास मदत होऊ शकते.
  12. तसेच विटामिन सी युक्त फळांचा तुम्ही नेहमीच्या आहारात समावेश करावा.
  13. डोळ्यांची दृष्टी चांगली राहावी तसेच आपले डोळे हे निरोगी राहावे यासाठी तुम्ही डोळ्यांचे काही विशिष्ट व्यायाम करणे गरजेचे ठरते. डोळे चांगले राहावे यासाठी डोळ्यांच्या योगासनांचा सराव करावा.
वाचा  हिरडा खाण्याचे फायदे

मित्रांनो, वरील सर्व प्रकारे डोळ्यांची काळजी घेतल्यामुळे तुमचे डोळे निरोगी राहण्यास मदत होईल. तसेच तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील, तर ते जाण्यासाठी  वरील प्रमाणे साधे सोपे घरगुती उपाय तुम्ही करू शकतात. जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांविषयी अधिक तक्रारी असतील व अधिक समस्या असतील, तर तुम्ही त्वरित डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो सल्ला घेऊन उपचार घेणे आवश्यक ठरते.

जाणून घ्या : उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय

मित्रांनो,वरील प्रमाणे डोळ्यांची काळजी कशी घ्यावी? तसेच डोळे निरोगी राहण्यासाठी काय केले पाहिजे? याविषयी माहिती आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे. वरील प्रमाणे, आम्ही सांगितलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात. अधिक माहितीसाठी येथे जाणून घ्या.

धन्यवाद !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here