नमस्कार, आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपण बघितले असेल, की आपण आपल्या शरीराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतो. ढकलती गाडी करतो. पण असे करू नका, आपले आरोग्य हे आपण जपायला हवेत. त्याकडे दुर्लक्ष केले, तर अजून मोठ्या समस्या उद्भवू शकतात. आपण आपला आहार योग्य रित्या घ्यायला हवा, या धावपळीच्या जीवनात आपण जेवण सुद्धा वेळेवर करत नाही. तसेच चहा-कॉफीचे प्रमाण आपण जास्त वाढवतो. बाहेरचे जंक फ्रूट खातो, उघड्यावरचे खातो, कुठलेही पाणी पीतो. त्याच्यामुळे आपल्या शरीरावर खूप मोठा परिणाम होत आहे. झोपेत श्वास घेण्यास त्रास होणे सारख्या समस्या डोके वर काढत आहे. त्यामुळे तुमची वजन वाढी तसेच ऍसिडिटी, आम्लपित्त, यासारख्या समस्या तुम्हाला उद्भवू शकतात.
बाहेरील पदार्थ खाल्ल्यामुळे, पोटात बिघाड होऊन तुम्हाला शारीरिक व मानसिक ताणही होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या शरीराची योग्यरीत्या काळजी घ्यायला हवी. हिरव्या पालेभाज्या, फळे खायला हवेत. आपल्या आरोग्यासाठी आहेत एवढे सोपे काम आपण करत नाही. जर आपल्या शरीरात वजन वाढी च्या समस्या झाल्या, तर आपल्याला झोपेमध्ये श्वास घेताना त्रास होतो. तसेच बाहेरचे थंड पदार्थ खाल्ल्यामुळे सर्दी-पडसे होते. त्या वेळी श्वास घ्यायला त्रास होतो. तुमची कफ प्रवृत्ती होऊन जाते, आज आपण बघणार आहोत, की झोपेत श्वास घ्यायला त्रास का होतो? त्याची नेमकी कारणे कोणती? चला तर मग जाणून घेऊयात !
Table of Contents
झोपेत श्वास घेताना त्रास होण्याची कारणे ?
झोपेत श्वास घेण्यास त्रास होण्याची अनेक कारणे आहेत. चला तर मग बघूयात.
- जर तुमचे वजन जास्त असेल, तर झोपेत श्वास घेताना त्रास होतो.
- झोपेत श्वास घेताना त्रास होण्याच्या समस्येला, स्लीपएप्निया असे म्हणतात.
- सर्दी पडसे सारख्या वायरल इन्फेक्शनमध्ये, झोपेत श्वास घेताना त्रास होतो.
- जर तुम्हाला बाहेरील वातावरणातील, धुळीची ॲलर्जी असेल. तरीही झोपेत श्वास घेताना त्रास होतो.
- तसेच मानसिक ताण-तणाव चिंता या गोष्टींनी हा त्रास होतो.
- टीबी, दमा यासारखे आजार असेल, त्यांना झोपेत श्वास घेण्यासारखे समस्या होऊ शकतात.
- हृदयाशी गंभीर आजार असल्यानेही, झोपेत श्वास घेताना त्रास होतो.
- तसेच हार्ट अटॅक चे लक्षणमुळे, ही झोपेत श्वास घेताना त्रास होतो. छातीत चमका येतात.
- रात्री घोरण्याची समस्या असणाऱ्याना, ही झोपेत श्वास घेताना त्रास होऊ शकतो.
- ज्या लोकांना जुना खोकला असेल, अशा लोकांनाही झोपेची श्वास घेताना त्रास होऊ शकतो.
- जर तुम्हाला अमली पदार्थांचे व्यसन असेल, जसे की सिगारेट जास्त प्रमाणात ओढत असतील, तर अशा लोकांची फुफ्फुसे कमजोर होऊन, त्यांना झोपेत श्वास घेताना त्रास होऊ शकतो.
झोपेत श्वास घेताना त्रास होण्याची काही लक्षणे ?
वरील दिलेल्या माहितीमध्ये आपण जाणून घेतले आहेत, की श्वास घेताना त्रास होण्याची कारणे, आता श्वास घेताना त्रास होण्याची काही लक्षणे आपण जाणून घेऊयात !
- झोपेत श्वास घेताना दम लागतो,
- झोप लागत नाही,
- डोकेदुखी होते,
- जीव घाबरल्यासारखे वाटते,
- चिडचिड होते,
- सकाळी उठल्यावर थकल्यासारखे वाटते.
- कोंडल्यासारखे वाटते.
- सारखे सारखे या कुशीवरून त्या कुशीवर झोपावे असे वाटते.
- झोपेतून सारखे उठून बसावे, असे वाटते.
या कारणांमुळे तुम्हाला कोणत्या आजारांना सामोरे जावे लागू शकते बघुयात !
रात्री झोपेत श्वास घेताना त्रास होणाऱ्या समस्येमुळे तुम्हाला अनेक आजारांना, सामोरे जावे लागू शकते. ते आज आपण जाणून घेऊया, चला तर मग बघुयात.
- तुम्हाला हृदयविकाराची संबंधित आजार होऊ शकतात.
- हार्ट अटॅक येण्याची समस्या होऊ शकते.
- डायबिटीस होऊ शकतो.
- हाय ब्लड प्रेशर ची समस्या होऊ शकते.
- डोकेदुखी, चिडचिड होऊ शकते.
- मानसिक व शारीरिक थकवा येऊ शकतो.
- त्यामुळे तुम्हाला अनिद्रा होऊन, झोपेच्या गोळ्या घ्यावा लागू शकतात.
रात्री झोपेत श्वास घेताना त्रास होत असल्यास, काही घरगुती उपाय !
रात्री झोपेत श्वास घेताना त्रास होणे, यावर आम्ही आज तुम्हाला काही कारणे, लक्षणे व त्यामुळे कोणते आजार संभवू शकतात, ते सांगितले आहेत. आज आपण त्यावर काही घरगुती उपाय जाणून घेऊया, चला तर मग जाणून घेऊयात !
अद्रक वापरून बघा :
हो अद्रक मध्ये अँटिबायोटिक, ऑंटीसेप्टीक, गुणधर्माने भरलेले आहेत. ज्या वेळी तुमच्या शरीरात पचनाची संबंधित, तसेच डोकेदुखी यासारख्या समस्या असतील, अशा वेळी जर तुम्ही अद्रक कडक चहा पिला, तर तुमच्या श्वासनलिकेतील अडथळे येणारे, पदार्थ मोकळे होऊन, तुम्हाला झोपेत श्वास घ्यायला त्रास होणार नाही. शिवाय श्वासनलिका मधील सूज, ही अद्रक चहाने कमी होते.
शुद्ध गावठी तूप चा वापर करून बघा :
ज्यावेळी तुमच्या नाकामध्ये बाहेरील संक्रमण असेल, अशा वेळी तुम्हाला झोपेत श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. अशा वेळी जर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचे, दोन थेंब दोघ नाकपुड्या मध्ये टाकल्यास, तुम्हाला ही समस्या हळूहळू कमी होऊ शकते, व नाक श्वास घेण्यास मोकळे होऊ शकते.
गरम पाण्याची वाफ घ्या :
हो, नाकामध्ये इन्फेक्शन असेल, तसेच नाकाच्या श्वासनलिकेत सूज वगैरे असेल, अशा वेळी तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. अशा वेळी जर तुम्ही दिवसातून दोन वेळेस गरम पाण्याची वाफ घेतली, तर तुम्हाला यासारख्या समस्या वर आराम मिळेल, व तुम्हाला नाकपुड्या मधील श्वासोच्छ्वासाची क्रिया सुधारेल, व तुम्हाला शांत झोप मिळेल.
श्वास घेताना त्रास होत असेल तर तुम्ही व्यायाम करा :
हो, तुम्ही जर श्वास घेताना त्रास होत असेल, अशावेळी श्वासाचे व्यायाम करावेत. मग ते कोणते? तर ते आज आपण जाणून घेऊयात, तुम्ही कपाल भारती, अनुलोम विलोम, प्राणायाम यासारखे श्वास श्वासाचे व्यायाम करू शकतात. तसेच तुम्ही रोजच्या रोज व्यायाम केला, तर तुम्हाला हायपरव्हेंटिलेशनची समस्या दूर होईल, शिवाय तुमच्या आरोग्यही चांगले होईल.
योग्य आहार द्या :
हल्लीच्या धावपळीच्या जीवनात आपण आपला आहार व्यवस्थित घेत नाही, तुम्ही तुमच्या आहारात बाहेरची पदार्थ, उघड्यावरचे पदार्थ, तेलकट पदार्थ, तुपकट, तिखट असे पदार्थ खातात. चायनीज पदार्थ खातात. त्यामुळे त्यांचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. त्यामुळे तुम्हाला वजन वाढी सारखे समस्या असल्यासारखे सुस्ती आल्यासारखे वाटते. तसेच जाड असल्याने, श्वास घेताना त्रास होण्यासारख्या समस्या होऊ शकतात. तुम्हाला दम लागू शकतो, त्यासाठी तुम्ही तुमचा आहार बदलायला हवा. तुम्ही योग्य तो आहार घ्यायला हवा. आता योग्य तो आहार म्हणजे काय ?
हिरव्या पालेभाज्या, विटामिन्स युक्त फळे, ज्वारीची, नाचणीची, बाजरीची भाकरी. तसेच जुना तांदूळ चा भात, मुग, जवस, कुळीत, लसूण, अद्रक, हिंग तुम्ही तुमच्या आहारात समावेश करायला हवा. जेणेकरून तुमचा आरोग्य सुरळीत राहील, आणि तुम्हाला अशा समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. तसेच तुम्ही शरीरासाठी पुरेसे पाणी प्यायला हवे, आपल्या शरीराला जेवढे लागते तेवढे, तरी आपण करू शकतो ना! त्यामुळे आपण आजारांना दूर ठेवतो. ही काळजी आपण घ्यावी.
चला, तर आज आम्ही तुम्हाला झोपेत श्वास घेताना होणारे त्रास, त्यावर त्याची कारणे लक्षणे व काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत. तसेच हे उपाय करूनही, जर तुम्हाला फरक पडत नसेल, तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना भेटायला जावे. तसेच आम्ही सांगितलेले घरगुती उपायांमध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवावे.
धन्यवाद !