तळपायात काटेरी भवरा होणे यावर उपाय

0
384
तळपायात काटेरी भवरा होणे यावर उपाय
तळपायात काटेरी भवरा होणे यावर उपाय

नेहमी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. जर आपले आरोग्य चांगले असेल तर सर्व काम आपण व्यवस्थित रित्या पूर्ण करू शकतो. मित्रांनो, अनेक वेळा कामाच्या धावपळीमध्ये आपण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना आपणास सामोरे जावे लागू शकते. तळपायात काटेरी भवरा होणे यावर उपाय कोणते आहेत हे आपण बघुयात.

आज अशाच एका समस्या बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तळपायात काटेरी भवरा होणे ही समस्या कशामुळे होते? यामागील काय कारणे असू शकतात? आणि यावर आपण कुठल्या प्रकारचे उपाय करू शकतो? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

ऑफिसला घराबाहेर पडताना आपण बूट परिधान करत असतो. अनेकांना बूट घालने खूप आवडत असते. बूट घातल्यामुळे कम्फर्टेबल पण वाटते आणि पायाला जखम होण्यापासून आपला बचाव होत असतो. पण जर तुम्ही दिवसभर कंटिन्यू बूट घालून ठेवत असाल तर यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे समस्या येऊ शकतात. त्यातीलच ही एक समस्या म्हणजे तळपायात काटेरी भवरा होणे ही समस्या देखील उद्भवू शकते.

मित्रांनो, तळ पायात काटेरी भवरा होण्यामागील अजून कोणती कारणे असू शकतात? यावर आपण कुठला उपाय करू शकतो? चला तर मग, याबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत.

तळपायात काटेरी भवरा होण्यामागील कारणे:-

अनेक वेळा आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. त्यामुळे अनेक प्रकारचे समस्या देखील उद्भवू शकतात. यातीलच एक समस्या ती म्हणजेच तळपायात काटेरी भवरा होणे. तळपायात काटेरी होणे म्हणजेच याला आपण एक प्रकारे फोड येणे असे देखील म्हणू शकतो. ही समस्या येण्यामधील कारणे या प्रकारचे असू शकतात जसे की,

  • घट्ट बुटे परिधान केल्यामुळे
  • सतत एकाच ठिकाणी उभे राहून काम केल्यामुळे
  • अनवाणी पायी चालल्यामुळे
  • खडी किंवा रेतीवरून घाई गडबडीत चालल्यामुळे
  • पायाला दगड टोचल्यामुळे
  • जास्त हिल वाली सॅंडल घातल्यामुळे
  • जास्त पळाल्यामुळे
  • चप्पलचा किंवा सॅंडलचा चुकीचा नंबर घातल्यामुळे
वाचा  गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे काय?

     अशा प्रकारच्या सर्व कारणांमुळे तुमच्या तळपायाला काटेरी भवरा होण्याची शक्यता असते. तळ पायाला गाठ येण्याची शक्यता असते. आणि यामुळे अनेक प्रकारच्या असह्य वेदना देखील सहन कराव्या लागतात जसे की,

तळपायाला सूज येऊ लागते, चालताना खूप त्रास होऊ लागतो वगैरे. तर ही समस्या जाण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकतो. चला तर मग, यावर आपण कोणते उपाय करू शकतो? याबद्दल आता जाणून घेऊयात.

उपाय:-

जास्तीत जास्त वेळ बूट घातल्यामुळे आपल्या पायांना घाम येऊ लागतो आणि यामुळे देखील तळपायांना काटेरी भवरा होण्याची शक्यता असते. तसेच अजून अनेक कारणांमुळे ही समस्या येऊ शकते, याबद्दल आपण जाणून घेतलेले आहे. तरी या समस्येवर आपण काही उपाय करू शकतो जसे की,

कॅस्टर ओईल:-

ही समस्या जाण्यासाठी एरंडीच्या तेलाचा वापर आपण करू शकतो. ज्या ठिकाणी तुम्हाला तळपायाला काटेरी भवरा झालेला आहे तर त्या ठिकाणी तुम्ही एरंडीचे तेल घेऊन कापसाच्या मदतीने त्या ठिकाणी हळुवारपणे लावून घ्यायचे आहे. दिवसातून तुम्ही असे दोन ते तीन वेळा करावे. असे एक हप्ता केल्यामुळे तुमची ही समस्या जाण्यास मदत होऊ शकते.

एप्पल साइडर विनेगर:-

तळपायातील काटेरी भवरा जाण्यासाठी तुम्ही एप्पल साइडर विनेगर चा उपयोग करू शकतात. थोडेसे कोमट पाणी एका भांड्यात घेऊन त्यामध्ये ॲपल साइडर विनेगरचे दोन चमचे टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडा वेळ तुमचे तळ पाय बुडवून ठेवायचे.

थोड्या वेळानंतर पाय व्यवस्थित एका कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचेत. आणि त्यानंतर पुन्हा एप्पल साइडर विनेगर घेऊन रुईच्या सहाय्याने तळपायाना लावून हळुवारपणे लावून घ्यायचे. असे केल्यामुळे ही समस्या जाण्यास मदत होऊ शकते.

बेकिंग सोड्याचा वापर:-

तळ पायातील काटेरी भवरा जाण्यासाठी बेकिंग सोडा हा एक प्रकारे अँटीसेप्टिक क्रीम प्रमाणे काम करतो. त्यासाठी तुम्हाला थोडासा बेकिंग सोडा घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट तयार करून घ्यायची आहे.

वाचा  रात्री लवकर झोपल्या मुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला ही पेस्ट तुमच्या तळपायाला लावायची आहे अशी क्रिया तुम्ही एक आठवडा भर करायची आहे असे केल्यामुळे तुमची ही समस्या जाण्यास मदत होणार आहे.

आईस क्यूब चा वापर:-

तळपायातील काटेरी भवऱ्यामुळे तळपाय खूप आग होऊ लागतात. अनेक असह्य वेदना सहन कराव्या लागतात. त्यासाठी तुम्ही आईस्क्यूबचा देखील वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला आईस क्यूब एका कपड्यांमध्ये घेऊन तळपायांना हळुवारपणे शेकायचे आहे. असे केल्यामुळे, देखील ही समस्या जाण्यास मदत होऊ शकते आणि वेदना देखील कमी होण्यास मदत होऊ शकते.

लसणाच्या पाकळ्यांचा उपयोग:-

लसूण चा उपयोग हा अनेक प्रकारच्या रोगांवर होत असतो. तळपायातील काटेरी भवरा जाण्यासाठी देखील तुम्ही लसणाच्या पाकळ्यांचा उपयोग करू शकतात. यासाठी लसणाची पाकळी घेऊन तिची साल काढून तिला मधोमध कट करायचे आहे. त्यानंतर हळुवारपणे तळपायांवर लसणाची पाकळी फिरवायची आहे.

लसणामध्ये अनेक प्रकारचे अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात. तसेच रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही लसणाची पाकळी तळपायांवर ठेवून तिला बँडेज पट्टी बांधून रात्रभर तसेच राहू द्यायचे आहे आणि सकाळी उठल्यावर सोडायचे आहे.हे तुम्हाला तीन ते चार दिवस करायचे आहे. असे केल्यामुळे, देखील तुमची ही समस्या जाण्यास मदत होणार आहे.

मित्रांनो, हे उपाय करून देखील जर तुमची ही समस्या जात नसेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यायला हवेत. कारण या समस्येकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला चालण्यास देखील त्रास होणार आहे आणि ही समस्या वाढू देखील शकते. म्हणून आपण योग्य वेळीच उपचार घेतलेले बरे.

तर मित्रांनो, आम्ही सांगितलेले उपाय तुम्हाला कसे वाटले? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here