वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषध

0
1868
वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषध
वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषध

                  चला आज काल वजन वाढवणे किंवा वजन नियंत्रण मध्ये असणे ही फार मोठी समस्या झालेली आहे. कारण बऱ्याच लोकांचे वजन कमी असते म्हणून ते दुबळे वाटतात आणि त्यांचे प्रभुत्व देखील समोरच्यावर तितकेसे पडत नाही. याच वजन कमी असल्यामुळे आपला आत्मविश्वास देखील कमी होतो. म्हणून शरीराप्रमाणे एक विशिष्ट व सामान्य वजन असणे फार गरजेचे आहे. नाहीतर बऱ्याच वेळेस आपल्याला शाळा कॉलेजेसमध्ये वजनावरून चिडवले जाते. यामुळे बऱ्याच मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड देखील तयार होतो. पण काही लोकांचे असे म्हणणे आहे की ते कितीही खाल्ले तरी त्यांचे वजन वाढतच नाही किंवा त्यांनी कितीही व काहीही खाल्ले तरी त्यांच्या शरीरावर त्याचा काही परिणाम दिसून येत नाही. वजन वाढवण्यासाठी  केलेले अनेक उपाय हि व्यर्थ जातात.

              तर याचा अर्थ म्हणजे त्यांची एक तर पद्धत चुकीची असेल किंवा ते ज्या पदार्थांचे सेवन करत असणार ते पदार्थ वजन वाढवण्यासाठी इतके महत्त्वाचे ठरत नसतील. तर मित्रांनो आज आपण याच विषयी चर्चा करणार आहोत ही जर आपले वजन कमी असेल तर आपण आपले वजन कोणत्या परीने वाढू शकतो. तसेच आपण आपल्या रोजच्या दिनक्रमात मध्ये कोणत्या प्रकारे छोटा बदल करून मोठा फरक घडवून आणू शकतो चला तर मग बघुया.

कोणी वजन वाढवले पाहिजे ?

                तर सर्वात पहिले म्हणजे सर्वांनीच वजन वाढवले पाहिजे असे नाही बरेच लोक आहेत ज्यांचे वजन नियंत्रण मध्ये आहे किंवा त्यांना अजून वजन वाढवायची गरज नाही. तर आपण पाहिले हे समजणे कधीही योग्य ही कोणत्या लोकांनी वजन वाढवले पाहिजे. तर ज्या लोकांचे वजन खालील प्रमाणे नाही आहे त्या लोकांनी वजन वाढले पाहिजे 

  • म्हणजेच ज्या लोकांची उंची चार फूट आहे त्या लोकांचे किमान वजन 43 किलो पासून 50 किलो पर्यंत किमान पाहिजे.
  • ज्या लोकांची उंची पाच फूट आहे त्या लोकांचे किमान वजन 53 किलो पासून 61 किलो पाहिजे.
  • तुमची उंची जर सहा फूट असेल तर तुमचे वजन 62 किलो पासून 74 किलोपर्यंत पाहिजे.
  • याच प्रकारे तुमची उंची जर सात फूट असेल तर तुमचे वजन 75 किलो पासून 88 किलोपर्यंत किमान पाहिजे.
वाचा  जुळी मुलं का आणि कशी जन्माला येतात

                  तर वरील दिलेल्या माहिती प्रमाणे जर तुमचे वजन यामध्ये बसत असेल तर तुम्हाला वजन वाढवण्याची कोणतीही गरज नाही. पण या टप्प्यामध्ये जर तुमचे वजन बसत नसेल तर तुम्हाला वजन वाढवण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया साधे व सोपे उपाय जे आपण घरच्या घरी करून आपले वजन सहज वाढवू शकतो चला तर मग बघुया.

वजन वाढवण्यासाठी उपाय :

                 तर बऱ्याच वेळेस आपल्याला नेमका उपाय माहिती नसतो की कोणत्या प्रकारे आपण वजन वाढवू शकतो. तर आपण आज काही उपाय बघणार आहोत जेणेकरून तुम्ही तुमचं वजन अगदी सहज पद्धतीने वाढवू शकता चला तर मग बघुया.

पीनट बटर, खजूर व दूध :

                  सकाळी नाष्टा च्या वेळेस पीनट बटर, खजूर व दूध याचा आपल्या आहारामध्ये समावेश केल्यास आपल्याला वजन वाढवण्यासाठी बरीच मदत मिळू शकते. कारण पीनट बटर आणि खजूर मध्ये हाय प्रोटीन्स आणि मोठ्या प्रमाणामध्ये फॅट्स असतात. ज्यामुळे तुमचे वजन वाढण्यास फार मदत होते. याचप्रमाणे तुमचे पोट देखील भरते व तुम्हाला दिवसभरामध्ये काम करण्यासाठी एक चांगली ऊर्जा मिळते म्हणून तुम्ही यायला एक चांगले ऊर्जेचे स्त्रोत देखील म्हणू शकता. या प्रकारे तुम्ही दुग्धजन्य पदार्थांची देखील सेवन करायला पाहिजे म्हणजेच दुधासह दही, पनीर, लस्सी इत्यादी.

तूप आणि साखर :

                  तुम्ही जर तूप आणि साखरा चा समावेश आपल्या आहारामध्ये केला तर तुम्हाला वजन वाढण्यासाठी याची फार मदत होईल. कारण तूप आणि साखर मध्ये हाय प्रोटीन व मोठ्या प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. म्हणून तुमचे वजन वाढण्यासाठी तूप व साखर हे फार उपयुक्त ठरते. तसेच हिवाळ्यामध्ये तूप आणि साखर खाणे फार चांगले मानले जाते. पण हिवाळ्यामध्ये बहुतांश तूप हे घट्ट होतात म्हणून हिवाळ्यामध्ये तुपाचे प्रमाण कमी करावे आणि शक्यतो गावरानी तुपाचे सेवन करावे.

वाचा  स्वप्नात सुई दिसणे शुभ की अशुभ ?

आहारामध्ये काहीसा बदल :

                   तर जसा तुमचा दिवस सुरू होतो तसा तुम्ही दूध, पीनट बटर, ड्रायफूट मुख्यता ओली काळी खजूर याचा समावेश आपल्या नाश्ता मध्ये करावा. त्यानंतर प्रयत्न करा की तुम्ही दर दोन तासाला काही ना काहीतरी खावे. तसेच जर तुमच्या जेवणामध्ये आणि नाष्टा मध्ये वेळ असेल तर चणे पाण्यामध्ये भिजवून खाऊ शकता किंवा नुसते चणे देखील खाऊ शकता जेणेकरून तुमचे वजन वाढण्यास मदत होईल.

              याच प्रकारे जेवण झाल्यानंतर देखील एक वाटी दही जर रोज खाल्ली पाहिजे. त्यानंतर संध्याकाळ होईपर्यंत किमान दिवसाला चार केळी खावी याच बरोबर आपल्या दिनक्रमात जर तुम्ही शाकाहारी नसाल तर अंडी, चिकन व मटण यांचा समावेश देखील आपला आहार मध्ये करावा. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही शुद्ध शाकाहारी असाल तर तुम्ही सोयाबीनचे सेवन तुमच्या आहारामध्ये करू शकता. कारण सोयाबीन मध्ये देखील 70% प्रोटीन्स आणि फॅट्स असतात आणि तुमच्या शरीराला जितके गरजेचे आहे तितकी पाणीदेखील प्यावे.

वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय :

                  तर आपण वजन वाढवण्यासाठी काही उपाय बघितले पण आता आपण जाणून घेऊया की आपल्या आयुर्वेदामध्ये कोणते आयुर्वेदिक उपाय आहेत का? जेणेकरून आपण सोप्या पद्धतीने आपले वजन वाढवू शकतो चला तर मग बघुया.

अश्वगंधा :

                जर तुम्ही अश्वगंधा रोज रात्री झोपण्याआधी घेतली तर तुमचे वजन वाढण्यास फार मदत होईल. पण ती घ्यायची कोणत्या प्रकारे त्या पण आज बघूया चला तर मग तर सुरुवातीस पहिले आपण आपले जेवण झाल्यावर एक ग्लास गरम दूध करावे. दूध जास्त गरम करू नये त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा अश्वगंधा टाकून रोज रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यावे. असे केल्यास तुम्हाला झोप चांगली येईल पण त्याच बरोबर तुमची पचनक्रिया चांगली होईल. मग तुमचे वजन वाढण्यासाठी देखील तुम्हाला मदत होईल हा साधा आणि सोपा उपाय तुम्ही घरच्या घरी नक्कीच करू शकता.

वाचा  स्वप्नात अशोक चे झाड दिसणे शुभ की अशुभ.

काळे चणे  :

                  आपण जर आपल्या आहारामध्ये कळ्या चण्याचा समावेश केला तर आपल्या वजनामध्ये आपल्याला नक्कीच फरक जाणून येईल.  तर तुम्ही सकाळी उठल्यावर देखील खाऊ शकता किंवा तुमचा व्यायाम झाल्यावर देखील काळे चणे खाऊ शकता तसेच तुम्ही काळे चणे या सोबत गुळाचे देखील सेवन केले तर अतिउत्तम.     

                 तर आज आपण बघितले की आपले वजन नेमका किती असले पाहिजे आणि जर आपले वजन तेवढे नसेल तर आपण कोणत्या प्रकारे आपले वजन वाढवू शकतो. याचबरोबर आपण त्यामध्ये काही आयुर्वेदिक उपाय देखील बघितले. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.        

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here