हिरडा खाण्याचे फायदे

0
1350
हिरडा खाण्याचे फायदे
हिरडा खाण्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो, हिरडा हा सगळ्यांनाच माहिती असेल. कारण त्याचा वापर आयुर्वेदिक वनस्पती मध्ये केला जातोय. तसेच प्रसिद्ध त्रिफळा चूर्ण मध्ये याचा वापर केला जातो. त्रिफळा चूर्ण म्हणजे आवळा, हिरडा आणि बेहडा या फळांचे मिश्रण होय. या फळांचे मिश्रण हे समप्रमाणात घेतल्यावर, त्याचे त्रिफळाचूर्ण तयार होते. त्रिफळा चूर्ण मध्ये प्रत्येक फळाचे विशिष्ट महत्त्व आहे. त्यामध्ये हिरडा खाण्याचे पण खूप फार महत्त्व आहे. जर तुम्ही तुमच्या आहारात घेतले, तर तुम्हाला खूप सारे फायदे होतात.

पूर्वीच्या काळापासून असे म्हणतात, की स्वर्गात देवांसाठी अमृत ठेवलेले होते, मग ते अमृत पृथ्वीवर पडले आणि त्याचे हिरडे झाले. अशी म्हण आहे. हिरडा चा वापर हा आयुर्वेदातील महत्त्वाचे स्थान आहे. हिरड्या चे औषध जर तुम्ही नेहमी घेतले, तर तुम्ही निरोगी व स्वस्थ राहणार. शिवाय तुम्ही तरुण दिसणार. तसेच आज आपण याच विषयावर जाणून घेणार आहोत, की हिरडा खाण्याचे फायदे कोणते, व तुम्ही तुमच्या शरीरासाठी कोणकोणते फायदे करून घेऊ शकतात? चला तर मग जाणून घेऊयात ! 

हिरडा खाण्याने तुमच्या शरीराला होणारे फायदे ? 

मित्रांनो, हिरडा खाल्ल्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. मग ते नेमके कोण कोणते? चला तर जाणून घेऊयात. 

तुमची पोटदुखी थांबते  :

बऱ्याच वेळेला काही लोकांना पचनसंस्थेचे निगडित समस्या असतात. मग त्यामुळे त्यांना ऍसिडिटी, पित्त, पोट दुखणे, पोटात गॅसेस होणे, यासारख्या समस्या होतात. अश्यावेळी जर त्यांनी हुरडा खाल्लात, तर त्यावर त्यांना फरक पडेल. त्यासाठी त्यांनी हिरडा पावडर करून, एक चमचा पावडर कोमट पाण्यात प्यायचे आहे. त्यावर तुम्हाला लगेच फरक पडतो. तसेच तुम्ही जर नियमित घ्याल, तर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही व तुमचे पोट नियमित साफ राहते. 

वाचा  कडुनिंबाची पाने खाल्ल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

वजन कमी होते :

वाढत्या जीवनशैलीमध्ये यावेळी खानपान, पुरेशी झोप न होणे, जागरण करणे, तसेच बाहेरील जंकफूड खाने, यासारख्या गोष्टींमुळे तुमच्या वजनावर परिणाम होतो. त्यामुळे तुमचे वजन वाढते.  जर तुम्ही नियमित तुमच्या आहारात हिरडा पावडर खाल्ली, तर तुम्हाला या सारख्या समस्येवर आराम मिळेल. त्यासाठी तुम्हाला हिरडा पावडर ही सकाळ-संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यायचे आहे. त्याने तुम्हाला वजन वाढीचे समस्येवर आराम मिळेल. 

खोकला व दमा यावर लाभकारी आहे :

बदलत्या वातावरणामुळे, थंड गरम हवेमुळे, आपल्याला व्हायरल इन्फेक्शन लवकर होते. त्यामुळे त्यात खोकला खूप लागतो, तसेच काही जणांना दम्याचा त्रास असतो. ज्यावेळी खोकला लागतो, तेव्हा अक्षरशः खोकून-खोकून पोटात दुखते. अशावेळी जर तुम्ही हिरड्याचा वापर केला, तर तुम्हाला लगेच फरक पडेल. त्यासाठी तुम्हाला दोन ग्रॅम हिरडा घ्यायचा आहे, त्यामध्ये एक ग्रॅम सुंठ पावडर टाकायची आहे, त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये मध टाकून, याचे चाटण दिवसातून दोन वेळा करायचे आहे. असे केल्यास, तुमचा खोकला व दमा यासारख्या समस्या कमी होतात. तसेच हे चाटण केल्यानंतर, तुम्हाला कोमट पाणी प्यायचे आहे. असा हिरडा खाण्याचे फायदे तुम्हाला खोकल्यावर होईल. 

मुळव्याध वर फायदेशीर ठरतो :

हो, ज्या लोकांना मूळव्याधीचा त्रास असतो. अशा वेळी त्या लोकांना शौचास बसताना खूप त्रास होतो. तसेच संडास करताना अगदी दुखते व रक्त येते, असे वेळी जर त्यांनी नियमित ही पावडर गरम पाण्याबरोबर घेतली, तर त्यांना संडास करताना त्रास होत नाही, शिवाय पोट लवकर साफ होते. पोटात मुरडा येत नाही, त्यामुळे संडास करताना नाही जास्त दुखत नाही व शौचास साफ न झाल्यामुळे मूळव्याधीच्या समस्येवरही आराम मिळतो. 

युरिन इन्फेक्शन वर प्रभावशाली ठरतो :

काही लोकांना उन्हाळ्यात युरिन इन्फेक्शन खूप बघावयास मिळते. त्यांना उष्णतेचा त्रास होतो. लघवी करताना जळजळ होते, आग होते, अशावेळी जर त्यांनी दिवसातून दोन वेळेस सकाळ-संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर हिरडा पावडर घेतली, तर त्यांना यासारख्या समस्येवर आराम मिळतो. तसेच ज्यांना पावडर आवडत नसेल, अशा वेळी त्यांनी ती पावडरमध्ये मध टाकून, त्याचे चाटण केले तरी चालते. 

वाचा  पाय मुरगळणे या समस्येवर वेगवेगळी घरगुती उपाय

जखम असल्यास लवकर भरते :

हो, पूर्वीच्या काळापासून जखम असल्यास हिरड्याची पावडरचा वापर करतात. माझी आजी मी खेळतांना पडायची, त्यावेळी हिरड्याची पावडर मला ज्या जागेवर लागले आहे, त्या जागेवर लावायची. आजी म्हणायची की, या पावडरला बाळहिरडा असे म्हणतात. तसेच आयुर्वेदात बाळहिरडा हा जखम लागल्यास, भरण्यासाठी उपयोगी पडतो व त्यांनी जखमा लवकर भरून येतात. तेही कोणतेही साईड इफेक्ट न होता. 

तोंडात झाले असल्यास तसेच दात चमकवण्यासाठी फायदेशीर ठरतो :

बऱ्याच वेळेला काही लोकांच्या तोंडात छाले येतात, तोंड येते, तोंडात जखमा होतात, तसेच काही जणांचे दात पिवळसर असतात. त्यांनी त्याचा तोंडात हिरडा पावडर जखमांवर लावली, तसेच या पावडर ने जर तुम्ही दात घासले, तर तुमचे दात चमकदार होण्यास मदत मिळतात. शिवाय तुमची मुखशुद्धी ही होते तोंडातून घाण वास येत नाही. तोंडातले छाले जाण्यास मदत मिळते. 

केसांच्या वाढीसाठी व चमकदारपणा साठी फायदेशीर असते :

बऱ्याच वेळा प्रदूषणामुळे केसांची वाढ खुंटते, केस गळतात. तसेच केसांमध्ये कोरडेपणा येतो, अशा वेळी जर तुम्ही हिरडा पावडर गरम पाण्यात टाकून, त्या पाण्याने केस धुतले, तर तुमचे केसांची वाढ होते. शिवाय केस चमकदार होण्यास मदत मिळते. 

नॅचरल स्क्रब करू शकतात :

काही लोकांच्या चेहऱ्यावर पिंपल्स व मुरूम यांचे डाग असतात. तसेच ब्लॅक हेड्स असतात, अश्यावेळी जर तुम्ही हिरडा पावडर, त्यात मध व पाणी यांचे मिश्रण एकजीव करून, चेहऱ्यावर पाच ते दहा मिनिटे त्याने चेहऱ्यावर स्क्रब करू शकतात. शिवाय मुरूम जाण्याचे ही मदत मिळते. 

हिरडा पावडर खाण्याची पद्धत ! 

खूप जणांना हे हिरडा पावडर खाण्याची पद्धत ही माहिती नसते. तर हिरडा पावडर ही उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूंमध्ये घेतलेली चांगली असते. पण ऋतूंच्या टेंपरेचर नुसार पावडर खाणे, तुम्हाला फायदेशीर ठरेल. जसे की उन्हाळ्यामध्ये, जर तुम्ही गुळासोबत खाल्ली, तर तुम्हाला खूप सारे फायदे होतात. तसेच पावसाळ्यामध्ये जर तुम्ही तिला सेंदवमिठ सोबत खाल्ले, तर तुम्हाला फायदे होतात. तसेच हिवाळ्यामध्ये जर तुम्ही हिरडा पावडरमध्ये, मध घेतले, तर तुम्हाला खूप फायदे होतात. तसेच हिरडा पावडरचा वापर हा तिला गर्भवती आहे, त्यांनी घेऊ नये. तसेच ज्यांना अति उष्णतेचा त्रास आहे, त्यांनी हिरडा पावडर कमी प्रमाणात घ्यावीत.

वाचा  वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषध

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला हिरडा खाण्याचे फायदे सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका असेल, तर तुम्ही डॉक्टरांना विचारूनच खावे. तसेच दिलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका – कुशंका असेल, त्यांनी कमेंटबॉक्स मध्ये जरूर सांगावे. 

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here