ओठांवर जर येणे कारणे व उपाय

0
17311
ओठांवर जर येणे कारणे व उपाय
ओठांवर जर येणे कारणे व उपाय

 

नमस्कार,  ओठांवर जर येणे म्हणजे नेमकी काय ? तर ओठांच वर जर येणे, म्हणजे ओठांच्या आजूबाजूला लालसर फंगल इन्फेक्शन होणे होय. तसेच तोंडातून ही आतील भागात छाले पडणे, होय. हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये अवेळी खाणे, यामुळे अनेक जणांना यासारख्या समस्या होऊ शकतात. ज्यावेळी तुमच्या ओठांवर जर येते, त्यावेळी ती जागा आग मारते व त्या ठिकाणी बारीक सी पुरळ होऊन, फुटण्याची शक्यता असते. आणि त्या जागी लालसरपणा येतो. मग त्या जागेवर तुम्ही हात न लावता, त्या जर वर योग्य ते औषधी उपचार केले, तर तुम्हाला फरक पडेल. जर असल्यास, त्या जागेवर तुम्ही फोडण्याचा प्रयत्न केला, तर अजून इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ही जागा अजुन पसरते. तर मग जर येण्याची कारणे, नेमकी कोण कोणती ते जाणून घेऊयात ! 

ओठांवर जर येण्याची कारणे

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला सांगितले की, ओठांवर जर हा कसा येतो. कोणत्या कारणांमुळे जर येते, ते जाणून घेऊयात ! 

 • अतिशय तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे, 
 • अंगात बारीक ताप असल्यामुळे, 
 • उष्णतेचा त्रास असल्यामुळे, 
 • अति पावर फुल औषधी घेतल्यामुळे, 
 • केमिकलयुक्त क्रीमचा वापर केल्यामुळे, 
 • लिप्स्टिक चे प्रमाण जास्ती वापरल्यामुळे, 
 • पोटात बिघाड झाल्यामुळे, 
 • वातावरणातील बदलामुळे, 
 • तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे, 
 • अमली पदार्थांचे सेवन जसे की दारू, सिगरेट, तंबाखू यासारख्या मुळे, 
 • चहा-कॉफी यांचे अतिसेवन केल्यामुळे, 
 • शारीरिक थकवा मुळे.

ओठांवर जर आल्यास काही घरगुती उपचार

वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की ओठांवर जर येण्याची नेमकी कारणे कोणकोणती, तर मग अशावेळी तुम्ही कोणकोणते घरगुती उपचार करू शकतात, ते बघूयात ! 

वाचा  प्रेगा न्यूजची माहिती व वापर कसा करायचा

कोरफडचा गर वापरून बघा

 कोरफडला घृतकुमारी असेही म्हणतात. कोरफड ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. कुठल्याही आयुर्वेदिक औषधांमध्ये कोरफडीचा वापर हा केला जातो. ज्यावेळी तुम्हाला फंगल इन्फेक्शन किंवा ओठांवर येणे, तोंडाचा अल्सर होणे, यासारख्या समस्या असतील, अशा वेळी जर तुम्ही कोरफड ज्यूस हा दिवसातून दोन ते तीन वेळेस घेतल्यास, तुम्हाला यासारख्या समस्यांवर आराम मिळेल. तसेच तुम्ही कोरफडचा गर काढून, ओठांवर जर असलेल्या ठिकाणी  लावावे. त्याने  ओठांवरील फंगल इन्फेक्शन हे कमी होईल, असे तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळेस केल्यास, तुमच्या ओठांवरील जर हा कमी होण्यास मदत मिळते. 

हळदीचा वापर करा

हळद ही अंटीबॅक्टरियल आहे. हळदीमध्ये कोणत्याही व्हायरल इन्फेक्शन वर मात करण्याची क्षमता असते. जर तुम्हाला ओठांवर जर, तोंडात छाले पडले असतील, अशा वेळी जर तुम्ही  दूध+हळद टाकून पिल्यास, तुमच्या पोटातील इन्फेक्शन व व्हायरल इन्फेक्शन यावर मात मिळेल. तसेच तुम्ही हळद+ खोबरेल तेलात मिसळून सकाळ संध्याकाळ, ओठांवर जर असलेल्या ठिकाणी लावावी. त्याने तुमचे ओठांवरील इन्फेक्शन हे कमी होण्यास मदत मिळेल. 

मधाचा वापर करून बघा

जर तुमच्या ओठांजवळ तसेच तोंडात छाले आले असतील, अशा वेळी तुम्ही मधाचा वापर करून बघा. कारण मध्ये अँटीसेफ्टीक, अंतीबॅक्टरियल, ऑंटीमायक्रोबल, असते. जे तुमच्या फंगल इन्फेक्शन होण्यापासून रोखते. त्यासाठी तुम्ही मध हे  पाण्यात मिक्स करून प्यावे, तसेच तुम्ही मधाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. तुमच्या पोटात इन्फेक्शन असेल, ते बाहेर निघण्यास मदत मिळते. तसेच तुम्ही मध ओठांवर जर असलेल्या ठिकाणी, तसेच तोंडात फंगल इन्फेक्शन असलेल्या ठिकाणी लावावे. ज्यावेळी मध तुम्ही ओठांवर व तोंडात छाले असलेल्या ठिकाणी लावणार त्यावेळी तुमचे ओठांची थोडी आग होईल पण, घाबरून जाऊ नका. ते करून बघा. 

तुरटी चा वापर करा

हो, खरंच जर तुमच्या ओठांवर जर आले असेल, तसेच तोंडात अल्सर झाले असेल, अशा वेळी तुम्ही जर तुरटी पाण्यात मिसळून त्या पाण्याने गुळण्या केल्या, तर तुम्हाला ताबडतोब फरक जाणवेल. तुम्ही तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्या तर तोंडातील इन्फेक्शन हे बाहेर निघण्यास मदत होते. तसेच जर वर तुटीची पेस्ट करून, ओठांवर लावल्यास त्वचेची आग होणे, व जळजळ होणे, यासारख्या समस्यांवरही तुम्हाला आराम मिळेल. 

वाचा  थंड दुधाचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

त्रिफळा चूर्णाचा वापर करून बघा

त्रिफळा, म्हणजेच आवळा, हरड, बेहडा या तिघांचे मिश्रण म्हणजे त्रिफळा चूर्ण होय. त्रिफळा चूर्ण ला आयुर्वेदातील श्रेष्ठ स्थान आहे. जर तुम्हाला शारीरिक व मानसिक कोणत्याही समस्या असतील, अशा वेळी जर तुम्ही त्रिफळा चूर्णाचा वापर केला, तर त्याने तुम्हाला अधिक फायदा होईल. तसेच तुमची पचन संस्थेशी निगडीत कोणतीही समस्या असेल, तर त्रिफळा चूर्ण घ्यावे. तुमच्या चेहऱ्यावर तसेच तोंडावर जर येणे, यासारख्या समस्या असतील, तर तुम्ही त्रिफळाचूर्ण हे सकाळच्या व रात्रीच्या वेळी कोमट पाण्यात मिक्स करून ते पाणी प्यावे. त्याने तुमची पोट साफ होते, व जर येणे, यासारख्या समस्याही दूर होतात. तसेच तुम्ही त्रिफळा चूर्ण हे मधात मिक्स करून, तोंडावर जर असलेल्या ठिकाणी लावावे. त्यानेही तुम्हाला फायदा होईल. 

जिऱ्याचा वापर करा

हो, आता तुम्ही म्हणाल, ही जीरे हा मसाल्याचा पदार्थ आहे. आणि तो ओठांवरील जर कसा कमी करेल? तर खरंच तुम्ही जर तुमच्या आहारात नियमित जिरे खाल्ल्यास, जर येणे, तसेच तोंडात छाले पडणे, यासारख्या समस्यांपासून तुम्ही दूर राहणार. ओठांवर जर का येतो? जर तुमच्या शरीरात ताप असेल, तर तुमच्या ओठांवर उष्णतेचा त्रास होतो. मग तुम्ही म्हणाल तर माझे अंग तर गरम लागत नाही, तर कसे काय मला अंगात ताप आहे, तर नाही आपल्याला अंगात ताप हा जाणवत नाही, तुमच्या हाडांमध्ये हा बारीक ताप असतो. तुमच्या हाडांमध्ये ताप असल्यास, जिरे हे फार फायदेशीर ठरते. तुम्ही नियमित जिरे पावडर पाण्यात मिसळून पिल्याने, तुमच्या हाडांमधील ताप दूर होतो, आणि असे केल्यास तुमच्या ओठांवर जर येणे, या सारख्या समस्याही दूर होतात. 

लिंबू पाणी प्या

लिंबू मध्ये विटामिन सी असते. विटामिन सी आपल्या शरीरासाठी फार फायद्याचे असते. जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स तसेच, ओठांवर जर तोंडात, अल्सर, फोड येण्याच्या समस्या असेल, अशावेळी जर तुम्ही निंबु पाणी पिले, तर त्याने तुम्हाला फायदा होईल. कारण आपल्या शरीरातील कोणतीही समस्या ही, आपल्या पोटाशी निगडित राहते. जर तुम्हाला अपचन, ऍसिडिटी, यासारख्या समस्या असतील, तर त्याने तुमची पोट बिघडते. आणि तुमची पोट बिघडले  तर तुमच्या तोंडावर जर येण्यासारख्या समस्या होतात. यासाठी तुम्ही निंबुपाणी सतत पीत राहावे, या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. 

वाचा  ओठांवरील केस काढणे

खोबरे खा

जर तुमच्या ओठांवर जर, तसेच तोंडात फोड, अल्सर सारख्या समस्या असतील. अशा वेळी तुम्ही खोबरे चाऊन खावेत.  खोबरे  खाल्ल्यामुळे तोंडातील फोड व ओठांवरील जर जाण्यास मदत मिळते. 

तूपाचा वापर करा

तुप हा साधा सोपा घरगुती उपाय आहे. ज्यावेळी तुमच्या ओठांवर जर तोंडात फोडी असेल, अशावेळी जर तुम्ही तुपाचा वापर केला, तर त्याने तुम्हाला फायदा होईल. त्यासाठी तुम्ही घरगुती गाईचे तूप ओठांना लावू शकतात. त्याने तुमची त्वचा ही मुलायम होते. 

 

ओठांवर जर, अल्सर होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला तोंडात जर येण्याची कारणे व त्यावर काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत. तसेच आता जर तुम्हाला जर येऊ नये, यासाठी तुम्ही काय करावे, ते बघूयात. 

 • तिखट मसालेदार पदार्थ कमी खावे. 
 • जागरण करू नये. 
 • वेळेवर जेवण करणे. 
 • नियमित व्यायाम करणे. 
 • शौचास वेळेवर जाणे. 
 • तेलकट पदार्थ खाऊ नये. 

चला, तर आज आम्ही तुम्हाला तो ओठांवर जर व तोंडात छाले पडले, यावर काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत. आम्ही सांगितलेले घरगुती उपाय करूनही तुम्हाला फरक पडत नसेल, तर अशावेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. आम्ही सांगितलेल्या माहिती मध्ये, तुम्हाला काही शंका असेल, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

 

                       धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here