मेथीचे लाडू खाण्याचे फायदे

0
2699
मेथीचे लाडू खाण्याचे फायदे
मेथीचे लाडू खाण्याचे फायदे

नमस्कार, मित्रांनो हिवाळा ऋतु आला, की गावोगावी तसेच घरोघरी या ऋतूंमध्ये मेथीचे लाडू बनवतात. त्याला डिंकाचे लाडू असेही म्हणतात. मेथीचे लाडू खाल्ल्याने, आपल्याला खूप सारे फायदे होतात, पण काही लोकांना मेथी आवडत नाही. अशा वेळी त्यांनी मेथीचे लाडू बनवताना, गुळाचे प्रमाण जास्त केले, की त्यातील कडवटपणा निघून जातो. त्यामुळे ते लाडू चविष्ट आणि स्वादिष्ट लागतात. तसेच मेथीचे लाडू मध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे घटक असतात. मेथी मध्ये आयरन पोटॅशियम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, लोह, विटामिन्स, झिंक, कार्बोहायड्रेट, फायबर्स, याचे प्रमाण असते. त्यामुळे आपल्या शरीराला मेथीचे लाडू खाण्याचे खूप सारे फायदे होतात. तसेच मेथी मध्ये काजू, बदाम, अक्रोड, खारीक, खोबरे, गुळ, डिंक, गोडंबी, अळीव, तसेच शिंगडा हे पदार्थ टाकून, मेथीचे लाडू बनवतात.

तसेच मेथीचे लाडू बनवताना काहीजण शेंगदाणा तेल, तर काहीजण तूप टाकून बनवतात. त्यामुळे एवढ्या साऱ्या घटकांमध्ये विटामिन्स व आवश्यक ते घटक आपल्या शरीराला मिळाल्यावर, आपले शरीर निरोगी व तंदुरुस्त राहतेच. तसेच मेथीचे लाडू हे बाळांतीन साठी खूप फायदेशीर असतात. तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत, की मेथीचे लाडू पासून तुम्हाला कोणकोणत्या समस्या वर आराम मिळू शकतो? तसेच हे लाडू बनवण्याची पद्धत कशी आहे? व त्यांचे सेवन कोणत्या वेळी, कोणत्या प्रकारे करावे? हे जाणून घेऊयात. चला तर मग जाणून घेऊयात ! 

मेथीचे लाडू खाल्ल्याने होणारे फायदे? 

मित्रांनो मेथीचे लाडू खाल्ल्याने, आपल्याला खूप सारे फायदे होतात. तसेच तुमच्या शारीरिक समस्येवर मेथीचे लाडू खाण्याचे काय फायदे होतात. हे जाणून घेऊयात ! 

तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते :

मेथीचे लाडू खाल्ल्याने, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. काही लोकांना व्हायरल इन्फेक्शन खूप लवकर होते, ते सारखे आजारी पडतात. त्या यामागील कारण म्हणजे, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे होय. जर तुम्ही नियमित थंडीच्या दिवसात मेथीचे लाडू खाल्ले, तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच मेथीचे लाडू मध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, फायबर, झिंक याचे प्रमाण असल्यामुळे, तुमची रोगप्रतिकारक शक्तीला चालना मिळते. त्यामुळे नियमित एक लाडू नक्की खा. 

वाचा  उन्हाळ्यात आहार कसा असावा.

कंबर दुखी सांधेदुखीचा त्रास कमी होतो :

मित्रांनो, बदलत्या वातावरणामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. तसेच वाढत्या वयामध्ये खूप जणांना कंबर दुखी व सांधेदुखीचा त्रास होतो, गुडघेदुखीचा त्रास होतो, अशा वेळी त्यांनी मेथीचे लाडू खाल्ले, तर त्यांना फरक पडतो. कारण मेथीचे लाडू मध्ये डिंकाचे प्रमाण असते, डिंक हा आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतो. आपल्या शरीरातील जॉइंट्स पार्ट्स डिंकाचे लाडू खाल्ल्याने लवचिक बनतात. तसेच मेथीचे लाडू मध्ये तूप किंवा तेलाचा वापर होतो. त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते व कंबर दुखी व गुडघेदुखी चा त्रास होतो.  त्यासाठी दररोज सकाळी तुम्ही उठून ब्रश करून, उपाशीपोटी एक लाडू खाल्ला, तर यासारख्या समस्या वर तुम्हाला आराम मिळतो. 

हृदयाशी संबंधित त्रास कमी होतो :

हो,  तुम्हांला जाणून आश्चर्य वाटेल, पण मेथीचे लाडू खाण्याचे खूप फायदे आहेत त्याने हृदयाशी संबंधित समस्या कमी होतात. कारण मेथी मध्ये फायबरचे प्रमाण असते. ते रक्तातील कोलेस्ट्रॉल घटवण्याचे काम करते. त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो, शिवाय हृदयविकाराचा त्रास होत नाही. तसेच त्यांच्या शरीराला आवश्यक ते, विटामिन मेथीचे लाडू खाल्ल्यामुळे मिळतात. 

बाळांतीनसाठी फायदेशीर असतात :

मेथी ही उष्ण असते. त्यामुळे ती डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांसाठी फायदेशीर असते. मेथीचे लाडू खाण्याचे बालान्तिनीला फार फायदे आहेत. सहसा करून डिलिव्हरी नंतर, जर मेथीचे लाडू खाल्ले, तर त्याचा फायदा स्त्रियांना अधिक होतो. तसेच मेथीचे लाडू मध्ये डिंक, काजू, बदाम, अक्रोड, गुळ, खारीक, खोबरे, गहू हा सगळा आहार बाळंतपणानंतर स्त्रियांना दिला जातो. मग हे सगळे पदार्थ जर त्यांना एकाच लाडू मदत मिळत असतील, तर त्यापेक्षा फायदेशीर गोष्ट अजून कोणती नाही. त्यामुळे या डिलिव्हरी झाल्यावर मेथीचे लाडू खातात. कारण डिलिव्हरी नंतर त्यांचे गर्भाशय हे मेथीचे लाडू खाल्ल्यामुळे पुर्ववत रूपात येते.

तसेच पूर्वीच्या काळापासून मेथीचा खुराक दिला जातो, त्याने तिला पौष्टिक आहार मिळतो. शिवाय बाळाला तिचे दूध  हे पौष्टिक येते. शिवाय त्यांना कंबर दुखी, गुडघेदुखी यासारखे आजार कमी होतात. शिवाय त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच मेथीचे लाडू खाल्ल्यामुळे, त्यांना अंगावरून जाणारा रक्तप्रवाह सुरळीत होतो. तसेच डिलिव्हरीनंतरची, झीज ही मेथीचे लाडू खाल्ल्याने भरून येते. 

वाचा  झोपताना डोक्याची मालिश का करावी ? 

मधुमेहींसाठी फायदेशीर ठरतात :

मेथीचे लाडू मध्ये फायबर, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे गुणधर्म असतातच. तसेच मेथीचे लाडू मध्ये अमायनो ऍसिड असते, त्यामुळे ते इन्सुलिनची निर्मितीला चालना देतात, त्यामुळे मधुमेही लोकांनी जर त्यांच्या आहारात मेथीचे लाडू खाल्ले, तर त्यांना फरक पडेल. तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व इम्मुनिटी पावर वाढते. तसेच मेथीचे लाडू करताना गुळाचा वापर करावा. त्यामुळे मधुमेहींसाठी हे फायदेशीर ठरते. 

वजन नियंत्रणात राहते :

हो, मेथीचे लाडू खाल्ल्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते, कारण शरीरात वाढलेला कोलेस्टेरॉल हा मेथीचे लाडू खाल्ल्याने कमी होतो. शिवाय तुमच्या शरीराला फायबरचे प्रमाण मिळते, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारात मेथीचे लाडू खायचे आहेत. मेथीचे लाडू तुम्हाला दिवसातून एक वेळा सकाळी उपाशीपोटी खायचे आहेत. तसेच मेथीचे लाडू खाल्ल्यामुळे, तुमचे भुकेवर नियंत्रण राहते. त्यामुळे तुम्हाला सारखी सारखी भूक लागत नाही. त्यामुळे तुमची वजन वाढीच्या समस्या कमी होतात. शिवाय तुमची अतिरिक्त चरबी असेल, तर तीही जाण्यास मदत मिळते. 

तुमचे सौंदर्य खुलते :

हो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, की या मेथीचे लाडू पासून आपले सौंदर्य कसे काय फुलेल. पण मेथी मध्ये आपल्या शरीराला लागणारे विटामिन्स असतात. तसेच त्यामध्ये काजू, बदाम, खारीक, खोबरे यासारखे गुणधर्म असतात. ते आपले शरीरातील त्वचा एकदम निरोगी राखण्यास मदत करतात. व तुमचे केस गळती च्या समस्याही कमी होतात. तसेच तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या, काळे डाग असतील, तर यासारखे गोष्टी तुमच्या कमी होतात व तुमच्या त्वचेचे रक्षण होते. 

मेथीचे लाडू बनवण्याची पद्धत :-

मेथीचे लाडू बनवण्याची प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. त्यामध्ये मेथीचे लाडूंची चवही राहते. शिवाय त्यांचे गुणही आपल्या शरीराला मिळतात. काहीजण मेथीचे लाडू करताना, मेथी+ खारीक+ खोबरे+ काजू+बदाम+ अक्रोड+ मनुके तसेच अश्वगंधा+ शतावरी यासारखे पदार्थ टाकून,  मेथीचे लाडू बनवतात. तसेच ते गुळा ऐवजी साखरही टाकतात. तसेच काही लोकांचे मेथीचे लाडू चे प्रमाण हे – किलो गहू+ त्यात पाव किलो मेथी+ 200 ग्रॅम काजू+ 200 ग्रॅम बदाम+ एक किलो खारीक+ एक किलो खोबरे +अर्धा किलो शिंगाडा पीठ +दीड किलो शेंगदाणा तेल +दीड किलो गूळ+ पाव किलो डिंक या गोष्टी घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला गहू आणि मेथी भाजून गिरणीतून दळून आणायचे आहेत.

वाचा  तळपायाला घाम येणे

दळून आणल्यावर त्यामध्ये तुम्हाला काजू, बदाम, खारीक, खोबरे यासारख्या गोष्टी जाडसर दळून त्यात मिक्स करायचे आहे. त्यानंतर एका पातेल्यात तेल टाकून, त्यात गुळ फोडून गरम वितळून घ्यायचे आहे. तसेच तुम्हाला , डिंक तळून त्या पिठात टाकायचा आहे, त्यानंतर हे तेलगुळ चा पाक गरम झाल्यावर, तुम्हाला त्या पीठात टाकायचे आहे. मग एकजीव करून हे लाडू तुम्हाला बांधायचे आहे. लाडू बनवण्याची सोपी पद्धत आहे. तसेच हे लाडू चविष्ट आणि रुचकर असतात. तसेच हे लाडू खाल्ल्यामुळे, तुमच्या शारीरिक दुखणे कमी होते, तसेच मेथीचे लाडू खाल्ल्याने तुमचे रक्त ही वाढते. शिवाय तुमची तब्येत चांगली राहते. तुम्ही निरोगी राहतात. 

मेथीचे लाडू कोणी खाऊ नये ? 

 ज्यांना अति उष्णतेचा त्रास आहे, त्यांनी हा लाडू त्यांच्या आहारात कमी प्रमाणात खावा. कारण मेथीचे लाडू जास्त खाल्ल्यामुळे, त्यांना जुलाब होण्याची संभावना असते, त्यावेळी त्यांनीही काळजी घ्यावी. 

चला, तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला मेथीचे लाडू खाल्ल्याने, तुमच्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात, ते सांगितलेले आहेतच. त्याचप्रमाणे मेथीचे लाडू बनवण्याची पद्धतही सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या, माहितीमध्ये जर तुम्हाला शंका- कुशंका असेल, तर तुम्ही आम्हाला, आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here