डोके जड होणे यावर घरगुती उपाय

0
3688
डोके जड होणे यावर घरगुती उपाय
डोके जड होणे यावर घरगुती उपाय

 

हल्लीच्या धावपळीच्या जीवनात डोके दुखणे, डोके जड होणे, ही एक सामान्य बाब आहे. कारण असे कोणीच नाही की, त्यांची एवढी धावपळ करून डोके दुखत नसेल, डोके जड होत नसेल, आजच्या धावपळीत आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, त्याच्या अभावी आपल्याला या समस्यांना तोंड द्यावे लागते. ज्यावेळी डोके जड होते, त्यावेळी अक्षरशा आपल्या आजूबाजूला आपल्याला कोणीच नकोसे असते. डोके जड होण्याची अनेक कारणे आहेत, जसे की झोप न होणे, अवेळी खानपान करणे, तसेच अंमली पदार्थांचं करणे, जास्ती वेळ लॅपटॉप, मोबाईल वर काम करून डोके जड होते. हल्ली तर आता सगळेच घरी बसून वर्क फ्रॉम होम करतात, अशा वेळी जास्तीतजास्त आठ ते दहा तास आपली नजर लॅपटॉप कॉम्प्युटर वर असते,  त्यांमुळे डोके जड होण्याचे समस्या भरपूर प्रमाणात बघावयास मिळते.

तसेच अशक्तपणा, मायग्रेन,सायनस मुळे आपले डोके जड होते. तसेच ऍसिडिटी ,आम्लपित्त होणे, डीहायड्रेशन मुळे डोके जड होते. आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होऊन डीहायड्रेशन होते. अशावेळी आपल्याला जास्तीचा आवाजही सहन होत नाही, तसेच प्रदूषणामुळे, उग्र वासामुळे ही डोके जड होण्याच्या समस्या होतात. तसेच स्त्रियांनाही किचन मध्ये काम करून तेलकट वासामुळे डोके जड होण्याच्या समस्या होतात व मासिक पाळी दरम्यान यांचे डोके जड होते, त्यामुळे त्यांना चिडचिड होते. वातावरणातील बदलामुळे सर्दी-पडसे नंतर डोकेदुखीची समस्या होते. मग अशावेळी आपण कोणते घरगुती उपाय करायला हवेत ? काय खायला हवे ? चला तर मग जाणून घेऊया, की डोके जड होत असेल, दुखत असेल तर, त्यावर काही घरगुती उपाय ! 

आलें युक्त चहा पिऊन बघा :

सर्दी पडसे नंतर डोकेदुखी च्या समस्या हल्ली बघायला मिळतात. ज्यावेळी डोके दुखते जड होते, त्यावेळी आपली चिडचिड खूप वाढते, अशावेळी तुम्हाला आले युक्त चहा फायद्याचे ठरेल. डोके दुखणे जड होणे या साठी रामबाण उपाय आहे. तुम्ही काळी चहा त्यात अद्रक किसून तो चहा पिल्याने तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्या चे काम सुरळीत होते, आणि त्यामुळे डोक्यात रक्तवाहिन्या तील सूज कमी होऊन, तुमच्या डोकेदुखीच्या व डोके जड होण्याच्या समस्या कमी होतात. 

वाचा  व्हिटॅमिन ई कॅप्सुल चे फायदे

लिंबू पाणी पिऊन पहा :

हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपले जेवण वेळेवर होत नाही, त्यामुळे आपल्या जेवणाचा टाईम चुकतो, त्याच्यामुळे तुम्हाला डोके जड होणे, डोकेदुखी चे समस्या होतात. आणि त्यामुळे तुम्ही अवेळी जेवल्यामुळे तुम्हाला मळमळणे, आम्लपित्त होणे अशा समस्या होऊन, डोके दुखते, डोके जड होते, त्यासाठी तुम्ही निंबुपाणी पिउन बघा. 

लिंबू पाणी कसे तयार करावेे ?

  • एक लिंबू घेऊन त्यात काळे मीठ+ जिरे पूड + खाण्याचा सोडा  घालून लिंबू पाणी प्यावे. 
  • लिंबू पाणी कोमट पाण्यात सकाळी उपाशीपोटी पिल्याने डोकेदुखीचे डोके जड होण्याच्या समस्यांवर आराम मिळतो. 
  • शरीरातील ऍसिडचे प्रमाण कमी झाल्याने, डोकेदुखीची, डोके जड होण्याची समस्या होते. अशावेळी तुम्ही निंबु आणि मध याचे चाटण  केले, तर तुम्हाला फरक जाणवेल. 

लवंग चा वापर करून बघा :

तुम्ही म्हणाल, की लवंग हा मसाल्याचा पदार्थ आहे, तर  लवंग आयुर्वेदिक उपचारही आहे, आणि तो घराघरात असतो. जर तुमचे डोके दुखत असेल, डोके जड होत असेल, त्यावर तुम्ही लवंगाची धुनी करून, त्याचा वास घ्या. तसेच तुम्ही लवंग वाटून, त्यात काळी मिरी पूड आणि मध घालून त्याच्या चाटण करू शकतात. 

भरपूर प्रमाणात पाणी प्या :

आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पाण्याची गरज असते. जर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता झाली, तर आपल्याला डीहायड्रेशन होते.  तर अशावेळी आपले डोके जड होणे, अंग दुखणे,  थरथरणे अशा समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. त्यासाठी तुम्ही दिवसातून सात ते आठ लिटर पाणी प्या ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे. 

निलगिरीच्या तेलाचा वापर करा :

हो डोकेदुखी, डोके जड होणे, स्नायूंमध्ये सूज येणे यावर निलगिरीचे तेल हे एक रामबाण उपाय आहे. हल्लीच्या काळात तर घरात निलगिरीचे तेल असायला हवे, कारण निलगिरीचे तेल हे औषधी ऑंटी बॅक्टेरियल, ऑंटी सेप्टीक गुणधर्म युक्त आहे. 

ज्यावेळी तुमचे डोके जड होत असेल, त्यावेळी तुम्ही तुमच्या कपाळावर निलगिरीचे तेल लावून त्याने मसाज करा. तसेच तुमच्या डोक्याच्या आजूबाजूच्या नसांना सूज आल्यामुळे डोके जड होण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात होतात. अशा वेळी भुवई च्या आजूबाजूच्या नसांना  निलगिरीच्या तेलाने वर्तुळाकार मसाज करून, प्रेशर पॉईंट वर प्रेस करा. बघा तुम्हाला लगेच फरक जाणवेल, कारण की निलगिरीचे तुमच्या स्नायूतील सुजन ही कमी होते. 

वाचा  लहान मुलांना कोणत्या लसी दिल्या जातात?

सफरचंद खाऊन बघा :

आता तुम्ही म्हणाल, की सफरचंद ने डोके जड होण्याच्या समस्या वर कसा उपाय करेल ? तर  खरच सफरचंदामध्ये विटामिन ए असते, ते आपल्या दृष्टिदोष तसेच मायग्रेनचा त्रास यावर त्वरित आराम देतो. ज्यावेळी तुमचे डोके जड होते, डोके दुखते किंवा मायग्रेन होते, अशावेळी तुम्ही सफरचंद खाऊन बघा. सफरचंद कसे खावे ? कोणत्या वेळी खावे ? ते बघूया. 

  • सफरचंद मध्ये विटामिन ए असल्यामुळे, तुमच्या डोकेदुखीच्या समस्यांवर फार गुणकारी आहे. त्यासाठी तुम्ही सकाळी उपाशीपोटी सफरचंद कापून, त्यात काळे मिरे पूड + सेंदवमिठ लावून खा. जर मायग्रेनचा त्रास असेल किंवा डोके जड होण्याची समस्यावर त्वरित आराम मिळेल. 

डोके जड होणे या समस्या रोखण्यासाठी काय करावे ?

आता आपण डोकेदुखी डोके जड होणे, या समस्यांवर काही घरगुती उपाय बघितलेले आहेत. तसेच डोके जड होणे, ही समस्या रोखण्यासाठी आपण काय करायला हवे ते बघूयात ! 

  • डोके जड होण्याची समस्या आपल्याला भरपूर प्रमाणात बघायला मिळतात, तशा वेळी आपली चिडचिड होते, अशावेळी आपण आपल्या स्वतःची काळजी योग्यरीत्या घेतली पाहिजे. अशावेळी आपण मेडिटेशन करायला हवे, योग्य तो व्यायाम करायला हवा, मोकळ्या हवेत, गार्डनमध्ये फिरायला जायला हवे. 
  • तसेच बाहेरील रस्त्यावरचे उघडे पदार्थ, तेलकट, मसालेदार पदार्थ, जंक फूड, फास्ट फूड या पदार्थांचं सेवन  कमी प्रमाणात करावे. 
  • आपल्या शरीराला जास्तीत जास्त पाण्याची गरज असते, अशा वेळी आपल्या शरीराला पाणी कमी पडले, तर आपल्या डोके जड होण्याच्या समस्या व डिहायड्रेशन होते. त्यासाठी तुम्ही जर नियमित योग्य पाणी प्यायला हवे. 
  • आपल्या शरीराला  सात ते आठ तासांची झोप मिळायला हवी, हल्ली घरी बसून वर्क फ्रॉम होम असल्यामुळे, आपले लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वर जास्त नजर लावल्यामुळे, आपल्याला डोके जड होण्याच्या समस्या होतात. तसेच पुरेशी झोप न झाल्यामुळे डोके दुखते, आपली किमान सात ते आठ तास  झोप व्हायला हवी. 
  • आपला आहार संतुलित असावा, आपण आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा फळांचा समावेश करायला हवा. जास्तीत जास्त व्हिटॅमिन असलेली फळे आपल्या शरीराला मिळायला हवी, त्यामुळे  डोके जड होण्याची समस्यांपासून आपल्याला आराम मिळतो. 
वाचा  स्वप्नात वांगे दिसणे शुभ की अशुभ!

चला, तर आज आम्ही तुम्हाला डोके जड होणे, डोके दुखणे, यावर कोण कोणते घरगुती उपाय करावेत ? ते सांगितलेले आहेत. तसेच डोके जड होऊ नये, यासाठीही आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगितले आहे. आपण काय करायला हवे ? काय खायला हवेत ? हे सांगितलेले आहेत, पण जर एवढे करूनही तुम्हाला आराम मिळत नसेल, तर तुम्ही  डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, तुम्हाला काही शंका कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. 

                       धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here