कपाळावर मुरूम / पुरळ येण्यामागील कारणे व काही घरगुती उपाय

0
1389
कपाळावर मुरूम पुरळ येण्यामागील कारणे व काही घरगुती उपाय
कपाळावर मुरूम पुरळ येण्यामागील कारणे व काही घरगुती उपाय

 

नमस्कार, हल्लीच्या वाढत्या प्रदूषणामुळे, तसेच अवेळी खानपान मुळे, आपल्या चेहऱ्यावर कपाळावर मुरूम व पुरळ  येण्याच्या समस्या आपल्या आपल्या बघावयास मिळतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर चे सौंदर्य कमी होते, मुरूम आल्यामुळे, आपल्या चेहऱ्यावर काळे डाग चट्टे ही पडतात. त्यामुळे आपली चिडचिड होते, पण मुरूम येण्यामागील कारणे काय असतील बरे? चला तर मग जाणून घेऊया ! की मुरूम पुरळ येण्यामागील कारणे? 

मुरुम व पुरळ येण्या मागील काही कारणे ?

वाढत्या प्रदूषणामुळे व बदलत्या जीवनशैलीमुळे, धावपळीच्या युगात चेहऱ्यावर, कपाळावर मुरूम व पुरळ बघावयास मिळतात. तर ते कशामुळे येतात, कोणत्या कारणामुळे येतात, ते जाणून घेऊयात ! 

  • धुळीमुळे व प्रदूषणामुळे चेहऱ्यावर पुरळ व मुरूम येतात. 
  • वयात येताना किशोरवयीन मुलांना- मुलींना चेहऱ्यावर मुरूम पुरळ येण्याच्या समस्या होतात. 
  • तसेच मुलींना मासिक पाळी जवळ येते, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर, कपाळावर मुरूम व पुरळ येण्याची समस्या होतात. 
  • हार्मोन इनबॅलन्स होऊन चेहऱ्यावर पुरळ व मुरूम येण्याची समस्या होऊ शकते. 
  • तेलक पदार्थ, बाहेर उघड्यावरचे पदार्थ, खाल्ल्यामुळे ही पिंपल्स मुरूम व येण्याची समस्या होतात. 
  • तसेच रसायनयुक्त, केमिकलयुक्त क्रीम्स वापरल्या मुळे ही त्यांच्या चेहऱ्यावर इन्फेक्शन होऊन, पिंपल्स व मुरूम येण्याची संभावना असते. 
  • ज्या लोकांची स्किन ऑईली असते, अशा लोकांना उन्हाळ्याच्या सीझनमध्ये पिंपल्स येण्याची समस्या जास्त प्रमाणात असते. 
  • जर तुमचे पोट हे साफ नसेल, तसेच तुम्हाला, ऍसिडिटी, पित्त या सारख्या समस्या असतील, तर या वेळी तुम्हाला पिंपल्स व मुरूम चेहऱ्यावर येतात, तसेच पित्त असल्यामुळे तुमच्या अंगावरही  फुटकळ येण्याची संभावना असते. 
  • जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल, तर त्याचा प्रभाव तुमच्या चेहऱ्यावर ही पडतो. केसातील कोंडा असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स व मुरूम येण्याच्या समस्या बघायला मिळतातच. 
वाचा  जेवणानंतर गुळ खाण्याचे फायदे

मुरूम पुटकुळ्यावर काही घरगुती उपचार

चला, तर मग आपण वरील दिलेल्या माहितीमध्ये फुटकुळ्या मुरूम येण्याची कारणे सागितलेली आहेत. तर मग या कारणांमुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरूम येत असतील, तर त्यावर कोणकोणते घरगुती उपचार आपण करायला हवेत? ते जाणून घेऊयात! 

चनाडाळीचे पिठाचा वापर करून बघा :

ज्या वेळी तुमच्या चेहऱ्यावर पुटकुळ्या,मुरुमे येतात. ते फुटून त्या जागी तुम्हाला काळे डाग पडतात. त्यावेळी जर तुम्ही बेसन+ दूध+चिमुटभर हळद यांचे मिश्रण एकजीव करून, चेहर्‍याला पंधरा मिनिटे लावावेत. त्याने तुम्हाला फरक जाणवेल. 

पिकलेल्या केळाचा वापर करून बघा :

केळ्यामध्ये विटामिन प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ही त्यांचा फायदा होतो. जर तुम्ही पिकलेले केळे घेऊन, एका बाऊल मध्ये कुस्करुन, त्यात मधाचे दोन ते तीन थेंब टाकून, एकजीव करून तो लेप तुम्ही तुमच्या फुटकळ्या व मुरूम असलेल्या ठिकाणी लावावे, आणि दहा ते पंधरा मिनिटाने धुऊन टाकावे. बघा तुम्हाला त्यावर त्वरित आराम मिळेल, चेहऱ्यावरील पुरळ व मुरूम यांची आग, जखमा होणे, यासारख्या समस्या वर तुम्हाला त्वरित आराम मिळू शकतो. 

कडुलिंबाची पाणी वापरून बघा :

हो, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की कडूलिंबाची पाने ही किती कडू असतात. पण ती चेहर्यासाठी कशी उपयोगी होऊ शकतात, तर खरच कडुलिंबाच्या पानांची मध्ये अँटी फंगल इन्फेक्शन वर मात करण्याची क्षमता असते. त्यामुळे तुमचे चेहऱ्यावर पिंपल्स व मुरूम तसेच पुरळ येऊन फोड येण्याची समस्या असेल, त्यावेळी तुम्ही कडूलिंबाची आठ ते दहा पाने घेऊन ती वाटून, तुम्ही पुरळ असलेल्या ठिकाणी लावून बघा. असे सात ते आठ आठवडे केल्यास फरक जाणवेल.  शिवाय तुमच्या केसांमध्ये कोंडा येण्याची, खाज खुजली होण्याच्या, समस्या असतील, त्याही दूर होतील. तसेच तुम्ही जर कडुलिंबाची पाने  आंघोळीच्या पाण्यात उकळून, त्या पाण्याने अंघोळ केल्याने, केसांशी निगडीत कोणतीही समस्या असो, त्यावर तुम्हाला फरक नक्की जाणवेल. अगदी साधा सोपा आणि घरगुती उपाय आहे, करून बघा. 

वाचा  पायाची नस दुखणे या समस्येची कारणे व घरगुती उपाय

पुदिना वापरून बघा :

आता तुम्ही म्हणाल की, पुदिना हा चटणीसाठी असतो, तर पुदिना हा फक्त स्वयंपाक घरातच नाही, तर तुमच्या सौंदर्यावर ही फार गुणकारी असतो. कारण पुदिना मध्ये अनेक विटामिन असतात. तसेच पुदिना हा भरपूर काळापासून औषधी गुणधर्म मध्ये वापरला जातोय, पुदिन्याच्या वापराने तुमची शारीरिक पचन संस्था नियंत्रित करण्याचे काम होते. जर तुमचे शरीर स्वच्छ व निरोगी राहिले, तर तुम्हाला पिंपल्स येण्याच्या समस्याही कमी होते, तसेच तुम्ही पुदिना च्या पानांचा लेपही करू शकतात, पुदिन्याची आठ ते दहा पाने घेऊन, ती वाटून त्या पानांचा लेप  तुमच्या पुटकळ्या असलेल्या ठिकाणी लावा. त्याने तुमची दाह कमी होईल व तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील, तेही कमी होतील व तुमचा चेहरा उजळेल. 

चंदन पावडर मुलतानी मातीचा लेप लावून बघा :

चंदन व मुलतानी माती हे थंड असते. चंदन हे दोन तीन प्रकारचे असते. रक्त चंदन, लाल चंदन, सफेद चंदन चेहर्यासाठी असते. या तिघांमध्ये तुम्ही कोणतेही चंदन वापरले तरी चालेल, पण ज्यावेळी तुम्हाला मुक्का मार लागलेला असेल, अश्या वेळी तुम्हाला त्या जागी रक्तचंदन फार उपयोगी पडते. त्याने तुमच्या लागलेल्या या जखमा लवकरात लवकर दूर होण्यास मदत मिळते. तसेच मुलतानी माती ही तुम्हाला कोणतेही किराणा, मेडिकल स्टोअर्स मध्ये मिळेल. मुलतानी माती ही थंड असते. तुमच्या चेहऱ्यावर फुटकळ्या मुरूम व मुरूम येऊन, डाग काळे चट्टे पडले असतील, तर त्यावर तुम्ही मुलतानी माती ची पावडर व चंदन पावडर व त्यात हळद दूध यांचे मिश्रण एकजीव करून, त्या चेहऱ्याला लावले, तर तुम्हाला नक्की फरक जाणवेल. 

तुम्ही तुमचा आहार जपायला हवा :

चेहऱ्यावर मुरूम पुटकुळ्या येऊन, डाग पडणे, ही सामान्य बाब आहे. पण तेच तुमच्या सौंदर्यावर परिणाम करते, त्यामुळे तुम्ही कितीही तयारी केली, कितीही मेकअप केला, पण त्याचे ग्रहण तुमच्या चेहऱ्यावर दिसून येते. त्यामुळे तुम्ही आता उदास होऊ नका, जर तुम्हाला अशा समस्या असतील, तर तुम्ही तुमची स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. तुम्ही बाहेरील जंक फ्रूट, मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ, उघड्यावरचे पदार्थ, खाणे टाळावे. यासाठी तुम्ही हिरव्या पालेभाज्या, काकडी, संत्री-मोसंबी, विटामिन सी युक्त फळे, भाजीपाला, कडधान्य, तसेच फळे या गोष्टी खायला हव्यात. त्या गोष्टी खाल्ल्यामुळे तुमचे पोट हे साफ राहून, तुमचे सौंदर्य ही खुलते व तुम्हाला अशा समस्या उद्भवन्या पासून आराम मिळू शकतो. 

वाचा  ताप येणे या समस्या वर काय खावे आणि काय खाऊ नये

चेहऱ्यावर मुरूम पुटकुळ्या व मुरूम एकच असतील तर त्या वेळी कोणती काळजी घ्यावी ?

जर तुमच्या चेहऱ्यावर मुरूम पुटकुळ्या येत असतील, तर त्यावेळी तुम्ही तुमच्या चेहऱ्याची कशाप्रकारे काळजी घ्याल, चला तर मग ती जाणून द्यावे. 

  • तुम्ही तुमचा चेहरा दिवसातून चार ते पाच वेळेस थंड पाण्याने धुवायला हवा. 
  • तुमच्या चेहऱ्यावर मुरूम पुटकुळ्या मोठ्या प्रमाणात असतील, तर त्यांना बर्फाने शेक द्यावे. कारण बर्फ तुमच्या मुरूम पुटकुळ्या यांना सूज असेल, तर ती कमी होते. 
  • तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर मुरूम पुटकुळ्या आले असतील, तर ते फोडू नका, उलट  फोडल्यामुळे त्यातील पु निघून स्किन वर लागून, तुमच्या त्वचेला फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. 
  • जर तुमच्या चेहऱ्यावर पुरळ व मुरूम असतील, तर तुम्ही शक्यतो, कोणतीही क्रीम वापरणे टाळावे. कारण आपल्या चेहऱ्यावर रोम  छिद्र असतात आणि जर तुम्ही क्रीम लावली, तर ती छिद्रे बंद होऊन, अजून पुरळ वाढण्याची शक्यता असते. 
  • जर तुम्हाला चेहऱ्यावर पुरळ पिंपल्सची समस्या असेल, आणि तुम्ही काही घरगुती उपचार करूनही तुम्हाला फरक जाणवत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांना जरूर दाखवावे. 

चला, तर आज आम्ही तुम्हाला कपाळावर मुरूम पुरळ येण्याची काही कारणे, सांगितली आहेत.  त्यावर काय घरगुती उपचार करावेत, ते ही सांगितलेले आहेत, आणि जर तुमच्या चेहऱ्यावर मुरूम पुरळ येत असतील, त्यावर कोणती काळजी घ्यावी? तेही सांगितले आहेत. आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका-कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. 

                        धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here