देवघरात महादेवाची पिंड कशी ठेवाल

0
5927
देवघरात महादेवाची पिंड अशी ठेवाल
देवघरात महादेवाची पिंड अशी ठेवाल

नमस्कार, आपल्या घरातील अशी एक जागा असते, जिथे आपल्या मनाला शांती मिळते. जिथे आपण प्रत्येक गोष्ट हक्काने त्यांच्याकडे सांगू शकतो, ती म्हणजे आपले देवघर होय. मग आपले देवघरात आपण देवाच्या मुर्त्या देवाचे फोटो कशाप्रकारे ठेवावेत, याबाबतीत अजून प्रत्येकाला काही माहिती नसते, आपल्या देवघरामध्ये गणपती, दुर्गा, लक्ष्मी, महादेव, अन्नपूर्णा, बाळकृष्ण, अशा प्रकारचे देव असतात. तसेच काहींच्या देवघरामध्ये  देवाचे टाक हे असतात. त्यांची पूजा आपण योग्य रित्या करायला हवी. जशी आपली माणसांची रचना  देवाने प्रत्येकाची वेगवेगळी केली आहे, तसेच देवांची ही रचना असते. देवघरामध्ये प्रत्येक देव ठेवण्याचे काही नियम असतात. त्या अनुसार आपण देव देवघरात ठेवायला हवेत. आता त्यातच आपल्याला आज माहिती करून घ्यायचे आहे, की देवघरात महादेवाची पिंड कशी असावी? आपण नुसते देव आणून देवघरात ठेवतो, पण त्याबद्दल माहिती आपल्याला नसते, मग त्याच्या अभावामुळे आपल्याला  घरात या शारीरिक व मानसिक त्रास होण्याची संभावना असते. त्यासाठी आपण देवघर ही योग्य वास्तुशास्त्रानुसार ठेवायला हवे. आता आपण जाणून घेऊया, की देवघर वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे? व  देवघरात महादेवाची पिंड कशी असावी ? चला तर मग जाणून घेऊयात कि देवघरात महादेवाची पिंड कशी ठेवाल या बद्दल. 

देवघरात महादेवाची पिंड अशी ठेवाल
देवघरात महादेवाची पिंड अशी ठेवाल

वास्तुशास्त्रानुसार देवघर कसे असावे? 

अनेकांना माहिती नसते, की आपले देवघर कोणत्या दिशेला असावे? वास्तुशास्त्रानुसार देवघर हे नेहमी ईशान्येला असावे, देवघर हे नेहमी लाकडाचे असावे, देवघर वर कळस नसावा, आणि देवघरात दरवाजे नसावे, आणि असल्यास ते नेहमी उघडे ठेवावेत, देवघरात सूर्याचा प्रकाश पडेल, अशा ठिकाणी ठेवावे. महादेवाच्या पिंडाच्या पन्हाळ्याची दिशाही उत्तरेकडे असावी. 

देवघरे कमीत कमी दीड ते दोन फुटांच्या वर नसावे. 

वाचा  मानवी हृदयाचे वजन किती ग्राम असते

देवघर हे भिंतीला अडकून ठेवू नये, आणि समजा जागेचा अभाव आला, आणि अशा वेळी तुम्हाला देवघर ठेवायला जागा नसेल, अशा वेळी तुम्ही भिंतीमध्ये एक लादी टाकून, त्या जागेवर देवघर  लावू शकतात. 

देवघराला एक, तीन, पाच अशी विषम संख्या मध्ये पायरी असेल तरी चालेल. 

देवघरात  देवाची पूजा करताना, आपले तोंड पूर्व, पश्चिम, उत्तर दिशेला असले, तरी चालेल. देवघराची दिशा ही दक्षिणेस नसावीत, आणि नेहमी देवघरात देव पूजा झाल्यावर शंख हा वाजवावा. म्हणजे जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर निघते. 

देवघराचा रंग हा नेहमी  तपकिरी असावा. जर तसा नसेल, तर तुम्ही त्याला पांढरा पिवळसर लाइट कलर देऊ शकतात, जेणेकरून तिथे तुम्हाला प्रसन्न वातावरण वाटेल. देवघर हे तुम्ही लाकडी, सागवानी, व संगमवर असेल तरी चालेल फक्त सलमाईकचे नसावे. फक्त ज्यावेळी तुम्ही देवघरा स्थापन कराल, तेव्हा शुभ दिवस बघून, एखाद्या ब्राह्मण कडून घरात प्राणप्रतिष्ठा करून घ्यावी. 

 

वास्तुशास्त्रानुसार महादेवाची पिंड कोणत्या दिशेला असावी? 

वास्तुशास्त्रानुसार महादेवाची पिंड कोणत्या दिशेला असावी, हे अनेक जणांना माहिती नसते. वास्तुशास्त्रानुसार घरात महादेवाच्या पिंडीला महत्त्वाचे स्थान आहे. लोकांना गैरसमज आहेत की, महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी, पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावीत, देवघरात असावी, कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतो, शालिग्राम हा महाविष्णू चे प्रतीक असतो.      तुळशी मधला काळा दगड म्हणजे शालीग्राम होय. 

घरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी, पण तुम्ही फोटो घरात ठेवू नये, आणि जर फोटो ठेवायचा असेल, तर पूर्ण परीवारचा ठेवू शकतात. कारण सिंगल महादेवाचा फोटो हा स्मशानात असतो. तसेच घरात महादेवाची मूर्ती  ठेवू नये, महादेवाची पिंड ही फार मोठी असू नये.

 घरात महादेवाची पिंड  ही अडीच ते तीन इंच याच्यावर असू नये. शिवाय पिंड ही दगडी असेल, तर अति उत्तम आणि दगडी नसेल, तर पितळाची ठेवली तरीही चालेल.

वाचा  हळदीचे पाणी पिण्याचे फायदे

 महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा, शिवाय महादेवाच्या पिंडीला सोबत नंदीही नसावा. महादेवाची पिंड ही फक्त सिंगल असावी, नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो, तो देवघरात नसावा. महादेवाची पिंड  न्यायप्रिय, लोकप्रिय असते. कारण महादेव भोलेनाथ असतात , महादेवाच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती असावी, आणि गणपतीचे डाव्या हाताला महादेवाची पिंड असावी. आता आपण महादेवाची पिंड कशी असावी, ते बघितले आहेत. आता महादेवाची पिंडाला पूजा कशी करावी, ते जाणून घेऊयात. 

महादेवाची पिंडीची पूजा कशी करावी? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की देवघरात महादेवाची पिंड कशी ठेवावी. आता आपण जाणून घेऊया की महादेवाची पूजा कशी करावीत. 

नेहमी महादेवाचा अभिषेक करावा. महादेवाचा अभिषेक हा दुधाने +तुपाने+ पाण्याने +मध यांचे मिश्रण करून करावाच. त्यालाच पंचामृत असे म्हणतात. पंचामृत वाहून झाल्यावर, देवाला स्वच्छ कपड्याने पुसून, देवघरात ठेवावा.

 महादेवाला पांढरी गणगोळी लावावीत. देवाला कुंकू, गुलाल चढवू नये. शिवाय महादेवावर तुम्ही  पांढरी अक्षता लावू शकतात. महादेवाची पुजा झाल्यावर, तुम्ही महादेवावर बेलपत्री व्हावीत. महादेवावर कधीही तुळशीपत्र वाहू नये. तसेच महादेवावर पांढरे फूल जसे की, सोनचाफा, धोत्र्याचे फुल, धोत्र्याच्या फळ, बेलाचे फळ, किंवा गोकर्णाची फुले वाहू शकतात. खास करून श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर बेलाची पाने व धोत्र्याचे फळ याला खूप महत्त्व असते. 

शिवाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये मंदिरामध्ये शिवमूठ वाहिली जाते, ते म्हणजे  तीळ, जवस, मुंग, तांदूळ, सातू ,अशा प्रकारे शिव मुठ महादेवाच्या पिंडीवर वाहिली जाते. अशाप्रकारे तुम्ही महादेवाच्या पिंडीची पूजा करू शकतात. शिवाय तुम्ही मंदिरात ज्या वेळी पूजा करायला जाल, तेव्हा महादेवाच्या पिंडीला पूर्ण फेरी ना मारता, तुम्ही नेहमी अर्धी फेरी मारावी. 

जाणून घ्या :कपाळावर गंध का व कुठे लावायचे ?

चला, तर मग आज आम्ही तुम्हाला सांगितले आहे, की वास्तुशास्त्रानुसार महादेवाची पिंड कशी, कोणत्या रंगाची व कोणत्या उंचीची असावी,  शिवाय महादेवाच्या पिंडीवर तुम्ही कोणत्या प्रकारे पूजा करू शकतात, तेही सांगितलेले आहेत. तसेच वास्तुशास्त्रानुसार तुमचे देवघर कुठे व कशा ठिकाणी असावे, तेही सांगितलेले आहेत. आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका – कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे व अजून काही माहिती देवघरात महादेवाची पिंड कशी ठेवाल बद्दल विचारायची असेल तर नक्की विचार आणि जाऊन घ्या. अधिक माहितीसाठी येथे देखील माहिती पाहू शकता.

वाचा  वेलदोडा खाण्याचे फायदे काय आहे जाणून घेऊयात

धन्यवाद !!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here