चेहऱ्यावर पिंपल्स होणे किंवा मुरूम निर्माण होणे या समस्या वर घरगुती उपाय

0
1098
चेहऱ्यावर पिंपल्स होणे किंवा मुरूम निर्माण होणे या समस्या वर घरगुती उपाय
चेहऱ्यावर पिंपल्स होणे किंवा मुरूम निर्माण होणे या समस्या वर घरगुती उपाय

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते. त्याचबरोबर आपल्या चेहर्‍यावरील सौंदर्य हे ताजे व टवटवीत असावे, असे देखील प्रत्येकाचे स्वप्न असते. पण काही वेगवेगळ्या गोष्टींमुळे किंवा समस्यांमुळे आपल्या चेहऱ्यावरील सौंदर्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा आपले सौंदर्य बिघडू शकते जसे कि चेहऱ्यावर पिंपल्स होणे. आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य बिघडू नये म्हणून आपण आपल्या चेहऱ्याची खूप काळजी घेत असतो.अनेक वेळा बऱ्याच लोकांना त्यांच्या चेहर्याचे निगडित विविध समस्या उद्भवतात किंवा त्यांना तोंड द्यावे लागते. त्यांना अशा या वेगवेगळ्या अडचणी किंवा समस्या उद्भवल्या मुळे त्यांना वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जावे लागू शकते. त्याच बरोबर त्यांच्या चेहर्‍यावरील सौंदर्या यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा विविध केमिकल युक्त क्रीमचा वापर करून त्यांच्या चेहर्‍यावरील सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न करतात. पण यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर विविध प्रकारचे साईड इफेक्ट देखील होऊ शकते.

   

चेहऱ्यावर पिंपल्स होणे व त्या होण्याची कारणे

बऱ्याच लोकांना चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येणे अशा समस्या उद्भवतात. बऱ्याच लोकांनी या समस्येचा वेगळ्या प्रकारे अनुभव देखील घेतला आहे. चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची विविध कारणे असू शकतात. चेहऱ्यावर मुरूम येणे किंवा पिंपल्स येणे आणि समस्या अधिक तर तरुण मुला-मुलींमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. त्याचबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स आल्यामुळे त्यांची त्वचा खडबडीत होते किंवा कोरडी होण्यास सुरुवात होते किंवा चेहऱ्यावर डाग सुद्धा निर्माण होतात.

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचे कारणे कोणती आहेत व कोणकोणते घरगुती उपाय करून आपण या समस्येपासून आराम मिळवू शकतो ? चला तर मग बघुया !

  • हवेत असणाऱ्या प्रदूषणामुळे पिंपल्स उद्भवू शकतात :-

चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचे विविध कारणे असू शकतात. या मधील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे हवेत असणारे प्रदूषण. हवेतील प्रदूषणाचे कण आपल्या त्वचेला किंवा चेहऱ्याला चिटकतात. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर विविध धुळीचे कण सुद्धा येतात. त्यामुळे आपल्या बऱ्याच लोकांना चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येणे अशा समस्या उद्भवतात. बऱ्याच लोकांनी या समस्येचा वेगळ्या प्रकारे अनुभव देखील घेतलेला असतो. चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची विविध कारणे असू शकतात. चेहऱ्यावर मुरूम येणे किंवा पिंपल्स येणे आणि समस्या अधिक तर तरुण मुला-मुलींमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. व मुरूम निर्माण होणे अशा समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर जर तुमचा चेहरा हा अस्वच्छ असेल तर त्यामुळे देखील चेहऱ्यावर पिंपल्स व मुरूम निर्माण होणे अशा समस्या आपल्याला उद्भवू शकतात.

  • चेहरा सतत तेलकट असणे :-

जर तुमचा चेहरा सतत तेलकट असेल किंवा तो अस्वच्छ असेल तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स व मुरूम येणे अशा समस्या उद्भवू शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे चेहरा तेलकट असल्यामुळे आपल्या चेहऱ्यामुळे धुळीचे कण किंवा जंतू आपल्या चेहऱ्यावर चिटकतात व त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स व मुरूम निर्माण होणे अशा समस्या आपल्याला उद्भवू शकतात. त्यामुळे आपण आपल्या शरीराचे योग्य प्रमाणात काळजी घेणे फार महत्वाचे आहे.

वाचा  ड्राई स्किन ची काळजी व त्यासाठी फेस वॉश

चेहऱ्यावर निर्माण झालेले पिंपल्स व मुरूम घालवण्यासाठी घरगुती उपाय :-

तर मित्रांनो वरील भागात आपण बघितले की चेहऱ्यावर पिंपल्स व मुरूम निर्माण होण्याची कारणे कोणकोणते आहेत ? आता आपण बघणार आहोत की चेहऱ्यावरील पिंपल्स आपण कोण कोणते घरगुती प्रभावशाली उपाय करू शकतो ?

  • चेहऱ्याला कोरफडीचा जेल लावून बघा :-

आयुर्वेदानुसार कोरफडीला एक महत्त्वाचे व मौल्यवान स्थान प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर कोरफड ही अत्यंत गुणकारी व उपयुक्त आहे असे देखील आयुर्वेदात दर्शविले आहे. बऱ्याच वेळेस विविध कामांसाठी कोरफडीचा वापर केला जातो. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स व मुरूम आले असतील व ते घालवायचे असतील तर तुम्ही चेहऱ्यावर कोरफड जेल किंवा गर लावावा. रोज रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा ताजा गर काढून चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे फेस पॅक प्रमाणे ठेवावा व नंतर स्वच्छ कोमट पाण्याने आपला चेहरा धुऊन घ्यावा. असे जर तुम्ही 15 ते 20 दिवस केले तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर निर्माण झालेली पिंपल्स किंवा मुरूम दूर जाण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते.

  • चेहऱ्याला लिंबाची पेस्ट लावून बघावी :-

कडुलिंब हे जरी कडू असले तरी त्याचे गुण अत्यंत गुणकारी आहेत. कडूलिंबाचा वापर विविध कामांसाठी केला जातो. त्याचबरोबर कडू लिंबाच्या झाडापासून आपल्याला विविध फायदे होऊ शकतात. तुमच्या चेहऱ्यावर निर्माण झालेली पिंपल्स किंवा मुरूम घालवण्यासाठी तुम्ही चेहऱ्याला कडुनिंबाची पेस्ट लावू शकतात.

कडूलिंबाची पेस्ट कशी तयर कराल ?

कडुनिंबाचे पाच ते दहा पाने घेऊन ती चांगली बारीक करुन घ्यावी व नंतर थोडे गरम पाणी टाकून त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्यावी. ही तयार झालेली पेस्ट चेहर्‍यावर ज्या ठिकाणी तुम्हाला पिंपल्स किंवा मुरूम आले असतील त्या ठिकाणी लावावे. असे दिवसातून एकदा तरी आपण केले पाहिजे जर तुम्ही असे सतत केले तर तुमच्या चेहऱ्यावर निर्माण झालेले पिंपल्स किंवा मुरूम दूर होण्यास तुम्हाला मदत मिळू शकते.

वाचा  लाल केळी खाण्याचे फायदे

चेहऱ्यावर कडुनिंबाची पेस्ट लावताना ही पेस्ट जास्त वेळ चेहऱ्यावर राहू देऊ नका, कारण की जर ही पेस्ट चेहऱ्यावर जास्त वेळ राहिली तर त्यामुळे आपल्या चेहऱ्याला विविध नुकसान होऊ शकते.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले चेहऱ्यावर मुरूम येण्याची कारणे कोणती? त्याचबरोबर त्याचा  घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here