लवंग खाण्याचे फायदे जाणून घेऊयात काय आहेत?

0
694
लवंग खाण्याचे फायदे
लवंग खाण्याचे फायदे

 

नमस्कार, मित्रांनो लवंग  सगळ्यांनाच माहिती आहेत. अगदी छत्रीच्या आकारासारखे छोटेसे फळ आहे व त्यावर फुल डायमंड ठेवलेला सारखा मोती आहे. लवंग आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. एवढ्याश्या छोट्याशा लवंग पासून, आपल्याला भरपूर फायदे होतात. लवंग हा मसाला पदार्थात वापरला जाणारा पदार्थ आहे. जर तुम्ही तुमच्या आहारात तिचा वापर केला तर तुम्हाला भरपूर फायदे होतात. तसेच लवंग मध्ये ऑंटी एक्सीडेंट व अँटिबायोटिक गुणधर्म असतात. तसेच लवंग मध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक, फायबर्स, विटामिन्स,  यासारखे गुणधर्म असतात. त्यात हे गुणधर्म असल्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदे होतात. जर तुम्ही रोजच्या रोज तुमच्या आहारात लवंगाचे उपयोग केला तर अनेक आजार तुमच्यापासून दूर पळतील. लवंग पासून त्याची तेलही तयार करतात. ते तेलही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच लवंग मधून आवश्यक ते गुणधर्म तुमच्या शरीराला मिळाल्यामुळे, तुम्हाला अनेक आजारांपासून सामना करण्याची शक्ती मिळेल. तसेच दातासाठी लवंग  उपयोगी आहेत. लवंग अजून तुमच्या शरीरासाठी कशा प्रकारे व कशी वापरू शकतात? हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग लवंग खाण्याचे फायदे व लवंग पासून तुम्हाला कसे फायदे करून घेता येतात? ते जाणून घेऊयात. 

लवंग खाण्याचे फायदे:-

मित्रांनो लवंग खाण्याचे तुमची शरीरासाठी खूप फायदा आहे, मग ते नेमके कोणते? चला तर मग जाणून घेऊयात! 

मळमळ होत असेल तर लवंग खा:

बऱ्याच वेळेला खूप जणांना प्रवास करताना मळमळ होते, अक्षरशः असे कसेतरी वाटते असे ते म्हणतात. त्यांना तोंड बेचव झाल्यासारखे वाटते अशा वेळी लवंग चा तुकडा तोंडात चघळत रहावे. त्याने तोंडाला चव येते. तसेच गर्भवती महिलांना सतत मळमळल्या सारखे वाटते. अशा वेळी जर त्यांनी लवंग चा तुकडा सतत चघळत राहिला, तर त्याने त्यांना फायदा मिळतो. शिवाय मळमळल्या सारखे वाटत नाही. 

वाचा  माशाचा काटा घशात अडकल्यास काय करावे या समस्येवर विविध घरगुती उपाय ?

दात दुखी वर फायदेशीर ठरते:

जर तुमचे दात दुखत असतील दाड दुखत असेल, अशावेळी जर तुम्ही लवंग चा वापर केला तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. त्यासाठी तुम्हाला लवंग ही दात दुखते दाढ दुखते अशावेळी दात मध्ये घट्ट दाबून धरावी, त्यामुळे दाताचे दुखणे कमी होते. 

तसेच तुम्ही लवंग तेल हू वापरू शकतात. ते तुम्हाला मेडिकल स्टोअर्स मध्ये मिळू शकते. तसेच तुम्ही लवंग चे तेल कापसाच्या बोळ्यावर  घेऊन, दाढीचा जो भाग दुखतो त्याठिकाणी लाऊन ठेवावा. त्यामुळे तेथील दुखणे हे त्वरित थांबते. अगदी घरगुती रामबाण उपाय आहे हा वरून बघा. 

तोंडाची दुर्गंधी दूर करते:

काही लोकांच्या तोंडाचा खूप घाण वास येतो. त्यांच्याजवळ अक्षरशः उभे राहू नये असे वाटते. अशा वेळी तर त्या लोकांनी तोंडात लवंग चा तुकडा  सतत चघळत राहिला, तर त्यांचे मुख-दुर्गंधीही लवकर जाण्यास मदत मिळते. 

सर्दी-खोकल्यावर आराम मिळतो:

लवंग ही कफनाशक आहे. लवंग जर तुम्ही तोंडात सतत चघळत राहिले, तरी तुमचा खोकला हा थांबतो. तसेच काही लोकांचा कफ हा एकदम पिवळसर घट्ट असतो अशा वेळी त्यांनी  लवंग ची पावडर करून, त्यामध्ये मधाचे काही थेंब टाकून त्याचे चाटण केले, तर त्यांना कफ लवकर बाहेर निघण्यास मदत मिळतेय. शिवाय सर्दी खोकल्यावर लवकर आराम मिळतो. तसेच अशा लोकांनी लवंग तव्यावर भाजून त्याची धुनी म्हणजेच वाफ घ्यावी, त्याने त्यांना आराम मिळेल. 

डोकेदुखी व मायग्रेन चा त्रास कमी होतो:

बऱ्याच वेळेला काही स्त्रियांना मायग्रेनचा त्रास हा भरपूर प्रमाणात बघावयास मिळतो. तसेच काहीना डोकेदुखीचा त्रास हा असतोच,अशावेळी जर त्यांनी लवंग चा वापर केला तर त्यांना फायदेशीर ठरेल. त्यासाठी त्यांना लवंगाचे तेल वापरावयाचे आहे. लवंग तेल हे कुठेही मार्केटमध्ये मेडिकल स्टोअर्समध्ये मिळते. ते तेल आणून तुम्ही कापसाच्या बोळ्यावर घेऊन, तुमच्या कपाळाच्या पाटीवर लावायचे आहे. त्याने डोकेदुखी व मायग्रेनचा त्रास हा कमी होतो व तुम्हाला आराम मिळतो. 

वाचा  गळू पिकण्यासाठी उपाय

पोट दुखी थांबवते:

बऱ्याच वेळेला काहीजणांना अपचन, ऍसिडिटी, गॅसेस, सारख्या समस्या झाल्यावर, त्यांना पोट दुःखी होते. अशा वेळी जर त्यांनी लवंगचा वापर केला, तर त्यांना फायदा मिळेल. तसेच काही जणांना पोट दुखते, अशा वेळी आव पडल्यासारखी संडास होते. अशावेळी जर त्यांनी लवंगचा वापर केला, तर त्याने त्यांना फायदा होईल. त्यासाठी त्यांना लवंग ची पावडर करून, त्यामध्ये मध टाकून, यांचे मिश्रण एकजीव करून, त्याचे चाटण करून, त्यावर कोमट पाणी प्यायचे आहे. त्यामुळे त्यांना संडास करताना  आव पडणे, शिवाय पोट दुखणे, पोटात मुरड येणे, यासारख्या समस्या त्वरित थांबतात. 

लवंग पासून अजून बरेच काही फायदे आहेत, चला तर मग जाणून घेऊयात. 

  • लवंग खाल्ल्याने तुम्हाला पचन संस्थेशी निगडित समस्या दूर होतात. 
  • लवंग खाल्ल्याने तुमची भूक वाढते. 
  • लवंग खाल्ल्याने मुखदुर्गंधी जाते. 
  • लवंग खाल्ल्याने दात दुखी कमी होते. 
  • लवंग खाल्ल्याने मळमळ होत नाही
  • लवंग चे तेल लावल्याने अंगदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी, डोकेदुखी, यासारख्या समस्या कमी होतात. 
  • तसेच लवंग मध्ये ऑंटीएक्सीडेंट चे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे तुमचे कर्करोगापासून बचाव होतो. 
  • तसेच लवंग खाल्ल्याने तुमची यकृत सुधारते. 
  • तसेच लवंग खाल्ल्याने तुम्हाला पोटात गॅसेस, आव पडणे, पोट दुखणे, अल्सर होणे, यासारख्या समस्यांपासून बचाव होतो. 

लवंग कोणी जास्त खाऊ नये? 

लवंग पासून दुष्परिणाम हे जास्त नाहीतच उलट लवंग खाल्ल्याने तुमच्या आरोग्य सुधारते. पण ज्या लोकांना जळजळ होण्याचा त्रास आहे अशा लोकांनी लवंग खाऊ नये. तसेच जे लोक रक्त पातळ होण्याची टेबलेट्स घेतात,अशा लोकांनी लवंग चा वापर कमी करावा. कारण लवंग चा वापर केल्यामुळे,आपल्या शरीरातील रक्त हे पातळ होते. त्यामुळे अशा लोकांनी लवंग त्यांच्या आहारात कमी घ्यावी. तसेच लवंग दिवसातून दोन ते तीन प्रमाणातच खावे. जास्त प्रमाणात बाहेर लवंग खाल्ल्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. ज्या लोकांना काही शारीरिक अजून त्रास असेल, तर अशा लोकांनी  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाऊ शकतात. ही काळजी घ्यावी. 

वाचा  डोळे लाल होणे घरगुती उपाय

चला तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला लवंग व लवंग तेल पासून तुम्हाला होणारे फायदे आम्ही आज तुम्हाला सांगितलेल्या आहेतच. तसेच लवंग पासून तुम्हाला काही त्रास असेल तर लवंग कमी प्रमाणात खावी असेही सांगितले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला कधी शंका-कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

                         धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here