वास्तुशास्त्र म्हणजे काय ? आणि याने काय होते

0
593
वास्तुशास्त्र म्हणजे काय ?
वास्तुशास्त्र म्हणजे काय ?

नमस्कार, मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत, की नेमके वास्तुशास्त्र म्हणजे काय ? 

आजच्या युगात तर अनेक लोकांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे, तर काही लोकांचा वास्तुशास्त्रावर अजिबात विश्वास नाही. ते म्हणतात की, वास्तुशास्त्र काय एवढे विशेष असते का ? काय आहे वास्तुशास्त्र ?

 

आपण , जसे आपले घर व्यवस्थित ठेवतो, त्यात राहतो, आपण कसे वागतो, त्याचे परिणाम आपल्यावर व आपल्या कुटुंबावर होतात पण ते तसे का होते ? आपल्याला त्यामागची कारणे  व नियमशास्त्राच्या माहीत नाही ना,

वास्तुशास्त्र एक असे शास्त्र आहे, की त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला हवा. प्रत्येकाचे शास्त्र वेगवेगळे असते, तसेच आपल्या घराचे म्हणजेच वास्तूचे वास्तुशास्त्र असते, मग ते असे असते की, प्रत्येकाची तशी  एक जागा असते, प्रत्येकाची जशी वागण्याची रीत असते, तशी प्रत्येक वस्तूंची वागण्याची रीत असते, तिची एक जागा ठेवलेली असते, आणि आपण ते नियम पाळायला हवेत. 

जसे की हॉलची त्याची जागा वेगळी असते, तर किचनची त्याची वेगळी जागा असते, बेडरूमची त्याची वेगळी जागा असते, तर बाथरूमची वेगळीच, टॉयलेटची वेगळी जागा आहे, ते सगळे एकाच जागी थोडे असतात. त्याचे  एक एक कप्पे असतात. त्यांचे काही नियम असतात. त्यानुसार त्यांचे शास्त्र असते. आणि यांना जर आपण त्यांच्या जागेवर ठेवले नाही, तर ते आपल्यावर एक प्रकारे रुसतात. आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदत नाही म्हणून आपण त्यांना वास्तुशास्त्रानुसार ठेवावे, यालाच म्हणतात वास्तुशास्त्र, आणि वास्तुशास्त्र नुसार आपण जर घरात काही पद्धती केल्या, तर काय होते, ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात ! 

वास्तुशास्त्र म्हणजे काय ? त्यानुसार घराची रचना केल्यास काय होते? 

वास्तुशास्त्र नुसार प्रत्येक वस्तूंची रचना ही वेगवेगळी असते, जसे की घरामध्ये, घर व त्याची दिशा, त्याचा उंबरठा, त्याचा दरवाजा, त्याच्या हॉल, बेडरूम, किचन, मास्टर बेडरूम, गॅलरी, टॉयलेट, बाथरूम, या सगळ्यांचे शास्त्र असते.

वाचा  मांड्या कमी करण्याचे उपाय

प्रत्येकाचे एक नियम असतात. त्या नियमानुसार जर आपण वस्तू ठेवली, तर

  • आपल्या घरात सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य, वैभव या सगळ्यांचा आपल्या घरात वर्षाव होतो.
  • घरात सतत आजारी पडण्याचे प्रमाण कमी होऊन घरातील सदस्यांना चांगले आरोग्य लाभते.
  • घरातील कमवत्या व्यक्तींना नोकरीमध्ये चांगली बढती मिळते, जर व्यवसाय असेल तर व्यवसायात वृद्धी होते.
  • घरावरील येणारे संकट दूर होते.
  • घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह असतो.

आणि जर या वस्तू जर तुम्ही त्यांच्या नियमानुसार नाही ठेवले आहेत, तर आपल्या घरात उलट प्रभाव होतो, तो कसा तर आता आपण जाणून घेऊयात ! 

वास्तुशास्त्र नुसार घरात रचना केली नाही, तर कोणते दुष्परिणाम बघावयास मिळतात? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगितले आहे की, वास्तुशास्त्रानुसार तुम्ही रचना केली, तर तुम्हाला कोण कोणते फायदे होऊ शकतात. आणि जर तुम्ही वास्तुशास्त्रानुसार तुमची घराची रचना नाही केली, तर तुम्हाला अनेक दुष्परिणाम बघायला मिळतात , तसेच घरात वास्तुदोष लागू शकतो, मग ते नेमके कोणकोणते आहेत, चला तर मग ते जाणून घेऊयात! 

  • तुमच्या घरात सारखी भांडणे होत असतात. 
  • घरात सगळे चिडचिडे वातावरण राहते. 
  • कोणी कुणाशी बोलायला बघत नाही. 
  • घरात पैशाची चणचण भासते. 
  • कोणत्याही कामात यश मिळत नाही. 
  • घरात सारखे आजारपण राहते. 
  • कर्जबाजारी होतो. 
  • घरात उत्साह असं वातावरण राहत नाही. कोणतेही काम करावेसे वाटत नाही. थकल्यासारखे वाटते. 
  • घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहू शकतो. 

जर तुम्ही वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराची रचना केली, तसेच दुकानाच्या जागेची पाहणी केली, तर तुम्हाला या गोष्टींपासून सुटका मिळू शकेल. तसेच तुम्हाला वास्तुदोष लागण्यापासून तुम्ही वाचू शकतात, आणि समजा तुमच्या घराची रचना झालेली आहे, आणि त्यात तुम्हाला थोडे काही फेरबदल करायचे आहे, तर तुम्ही एखाद्या वास्तुशास्त्रज्ञला बोलवून तुमच्या घरातील फेरबदल करू शकतात, आणि ते बदल इतके कठीणही नसतात, आणि जर तुम्हाला त्या वस्तूंची रचना, यामध्ये काही फेर बदलता करता येत नसेल, तर तुम्ही त्यावर काही तोडगे ही आहेत, तेही करू शकतात व तुमच्या घरात सुख समृद्धी नांदू शकते. 

वाचा  जेवण झाल्यावर पोटात दुखणे कारणे व उपाय

चला तर मग आज आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय आणि ते योग्य का असते ते सांगितलेले आहेत तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका कुशंका असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here