जेवणाचे ताट ओलांडू नये असे का म्हणतात ?

0
587
जेवणाचे ताट ओलांडू नये असे का म्हणतात?
जेवणाचे ताट ओलांडू नये असे का म्हणतात?

नमस्कार मित्रांनो. ‘अन्न हेच पूर्णब्रह्म’ तसेच जेवणाचे ताट ओलांडू नये असे का म्हणतात ? असे आपण लहानपणापासून ऐकत आलेले असतो. आणि हे खरे देखील आहे कारण, ऊन, पाऊस, वारा आणि अन्न या शिवाय आपण जीवन जगू शकत नाही. आपल्याला जगण्यासाठी ज्या प्रमाणे ऊन, पाऊस,वारा यांची गरज असते अगदी त्याप्रमाणेच अन्नाची देखील गरज असते. जीवन जगण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते. आणि अन्न भेटून जर आपल्याला त्याची किंमत नसेल किंवा आपण त्याची नासाडी करत असू तर हे एक मोठे पापच मानले जाते.

एकाबाजूला गरीब लोक हे अन्नाच्या एका कणासाठी वणवण फिरत असतात. उन्हातानात फिरून राबत असतात. मुला-बाळांसाठी अन्न मिळेल या आशेने इकडे तिकडे फिरत असतात. अन्न मिळवण्यासाठी राबराब राबून घाम गाळून काम करत असतात.

मात्र अनेक ठिकाणी श्रीमंत लोक ज्यांना कुठल्याही प्रकारची कमतरता नसल्यामुळे अन्नाचा अपमान करत असतात. अन्न पूर्ण न खाता अर्ध खाऊन ते तसेच टाकून देत असतात. अगदी लग्नाच्या ठिकाणी देखील अन्नाचा अपमान होत असतो त्यात जेवढे अन्न वाढले तेवढे पूर्ण न खाता अर्ध्यातूनच ऊठले जाते त्यामुळे अर्धे अन्न वाया जाते. यामुळे एक प्रकारे अन्नाचा अपमानच होत असतो.

परंतु मित्रांनो, अशा प्रकारे अन्नाचा अपमान कधीही करू नये. यामुळे अन्नपूर्णा माता नाराज होते. अन्न फेकणे एक प्रकारे अन्नपूर्णा मातेचा अपमानच होत असतो. अन्न मिळत असेल तरी ते जपून वापरावे. तसेच जेवताना कधीही ताट ओलांडू नये, यामुळे देखील एक प्रकारे अन्नाचा अपमान होत असतो. तर मित्रांनो, आज आपण जेवतनाचे ताठ का ओलांडू नये ? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, याविषयी आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

जेवणाचे ताट ओलांडू नये असे का म्हणतात ?

मित्रांनो, जीवन जगण्यासाठी आपल्याला अन्न हे देखील महत्वपूर्ण असते. जेवण केल्यामुळे आपल्याला एक विशिष्ट प्रकारची ताकत मिळत असते. म्हणजेच एनर्जी मिळत असते. जेवणामुळे आपला आणि पोषक घटक मिळत असतात आणि भरपुर प्रकारचे विटामिन्स प्रोटिन्स मिळत असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. जेवणाचा ताट ओलांडू नये असे आपल्याला लहानपणापासून सांगितले जात असते. म्हणजेच जेवणाचा ताट ओलांडू नये हे वाक्य आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलो असतो. जेवणाचा ताट ओलांडल्यामुळे एक प्रकारे अन्नाचा अपमानच होत असतो. आणि अन्नाचा अपमान म्हणजेच, अन्नपूर्ण मातेचा अपमान होत असतो. ज्यां अन्नासाठी आपण राबराब राबत असतो काम करत असतो आणि अशातच जर आपण त्यात जेवणाचा ताट ओलांडला तर ते एक प्रकारे अपमानच केल्यासारखा होतो. एका ठिकाणी गरीब लोकांना अन्न मिळत नसते ते अन्नासाठी, एकएक अन्नाचा कण मिळवण्यासाठी काबाड कष्ट करत असतात. आपल्या पोरां-बाळासाठी जेवण मिळावे म्हणून ते फिरत असतात. कष्ट करत असतात, म्हणजेच त्यांना अन्नाच्या एक-एक कणाची जाणीव असते. आणि अशा गरिबांसाठी आपण आपल्या अन्नातून थोडे अन्न त्यांना दिले पाहिजे या प्रकारे एक पुण्याचं काम देखील आपल्या हातून घडत असते. पुण्य मिळावे यासाठीच नव्हे तर एक प्रकारे  गरिबाचे पोट भरेल या हेतूने आपण त्यांना दिले पाहिजे. म्हणून मित्रांनो,जर अन्न मिळत असेल त्याचा  तर त्या अन्नाचा कधीही अपमान कधी करू नका.

वाचा  शिंगाडा खाण्याचे फायदे व तोटे

जेवणाचा ताट ओलांडल्यास काय होते?

मित्रांनो, जेवनाला आपण नेहमी मान दिला पाहिजे. जेवताना ताट कधी ओलांडू नये असे आपण नेहमी ऐकत आलो आहोत. कारण जेवणाचा ताट ओलांडल्यामुळे  जेवणाचा अपमानच होत असतो. तसेच आपण जेव्हा ताटावरून ओलांडून जात असतो, तेव्हा आपल्या पायाचे न दिसणारे धुळीचे कण हे ताटात पडत असतात. त्याचप्रमाणे आपल्या पायाला लागलेली घाण आणि डोळ्याला न दिसणारे विषाणू हे देखील ताटामध्ये पडत असतात. त्यामुळे आपले अन्न हे दूषित होऊ शकते. तसेच,जेवताना आपण ज्यावेळी उठतो त्यावेळी, आपल्या कपड्यावरील असंख्य धुळीचे कण हे देखील आपल्या ताटामधील जेवनामध्ये पडू शकतात. आणि हे अन्नात पडल्यामुळे अन्न दूषित होते आणि आपण हे अन्नग्रहण केल्यामुळे आपल्याला पोटदुखीची समस्या उद्भवू शकते. म्हणजे पोटाचे विकार जडू शकतात. तसेच एखादा विषाणू देखील आपल्या पोटात घर करू शकतो. म्हणून शक्यतो जेवताना कधीही ताट ओलांडू नये. 

मित्रांनो, आणि या विषयाकडे आपण आध्यात्मिक दृष्टिकोनाने बघितले तर, जेवताना ताट ओलांडू नये असे का म्हटले जाते तर जेवताना जर ताट ओलांडला किंवा ताटात अन्न शिल्लक ठेवले तर एक प्रकारे लक्ष्मीचा अपमान होतो म्हणजेच अन्नपूर्णा मातेचा देखील अपमान होत असतो. त्यामुळे, आपल्याला जेवढे जेवण जाईल त्याप्रमाणे मोजमाप करून अन्न शिजवले पाहिजे. व ताटामध्ये जेवढे अन्न लागेल तेवढेच अन्न घ्यावे आणि जर जास्तीचे अन्न शिल्लक राहिले असेल तर ते एखाद्या गरिबाला दान करावे. नाहीतर एखाद्या झाडाखाली ते अन्न टाकावे. म्हणजे, त्यामुळे पक्षी व मुंग्या वगैरे प्राणी त्यांना खाऊ शकतील आणि यामुळे अन्नाचा अपमान देखील होणार नाही आणि त्यांची भूक भागेल. म्हणून मित्रांनो,आपल्याला जेवढं अन्न लागेल तेवढेच अन्न शिजवावे त्याचा अपमान कधीही करू नये. जास्तीचे अन्न बनल्यास गरजवंताला देणे योग्य ठरू शकते.

मित्रांनो, जेवताना ताट का ओलांडू नये? तसेच ओलांडल्यास काय होते? या विषयी आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे. वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून करू शकतात.

वाचा  पुदिन्याचे सेवन केल्यावर होणारे शरीराला विविध फायदे :-

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here