लहान वयात केस पांढरे

0
1194

बऱ्याच वेळेस लहान वयात केस पांढरे होतात याचे अनेक लक्षणे देखील असू शकतात व याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत देखील असू शकतात. सर्वात महत्त्वाचा म्हणजे यामध्ये आपले राहणीमान आपला आहार बदलती जीवनशैली ही मुख्यता कारणीभूत असू शकते. कारण पूर्वीचे लोक खूप वर्षे जगायचे त्यांचे आयुष्य खूप मोठे होते पण आज काल आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपले आयुष्य छोटे होत चाललेले आहे. तसेच याचा मोठा परिणाम आपल्या केसांवर सरळसरळ दिसून येतो म्हणजेच केस तुटणे केस गळणे केस पातळ होणे आणि मुख्यता म्हणजे केस पांढरे होणे.

अनेक वेळा लहान मुलांचे जर केस पांढरे होत असतील तर पालक लक्ष देत नाही पण जर का केस जास्त संख्येमध्ये पांढरे होत असतील तर ही गंभीर बाब आहे. यावर त्वरित लक्ष द्यावे तसेच मुलांची चौकशी करावी की त्यांना काही मानसिक ताण तणाव आहे की नाही. कारण मानसिक ताण तणाव याला एक मोठे कारण असू शकते केस पांढरे होण्याचे त्याचबरोबर शरीरामध्ये काही कमतरता किंवा विटामिन्स ची कमी जाणवली तरी देखील केस पांढरे होण्याची शक्यता असते. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत लहान वयामध्ये मुलांचे केस पांढरे होत असतील तर त्याची लक्षणे कोणती? तसेच केस पांढरे होण्याची कारणे कोणती? त्याचबरोबर त्यावर काही उपाय देखील आपण जाणून घेणार आहोत चला तर मग बघुया.

लहान वयात केस पांढरे होण्याची कारणे

बऱ्याच वेळेस काही अशी कारणे असतात जे आपण दुर्लक्ष करतो आणि बऱ्याच वेळेस तीच करणे केस पांढरे होणे यावर कारणीभूत ठरतात तर आपण जाणून घेऊया नक्की कोणत्या कोणत्या प्रकारची कारणे असू शकतात आपली केस पांढरे होण्याची चला तर मग बघुया.

वाचा  उंची वाढवण्यासाठी कोणते व्यायाम करावे

अतिविचार/मानसिक तणाव

अनेक वेळा लहान मुले मोठ्या लोकांना त्यांच्या अडचणी सांगत नाही तसेच काही घडले नाही घडले असेल तरीदेखील ते त्यांना सांगत नाहीत. तर अनेक वेळा बरेच पालक कामांमध्ये गुंतलेले असतात जेणेकरून तेच मुलांकडे आपुलकीने विचारत नाही की त्यांना काही अडचण आहे की नाही. त्यांना योग्य असा सल्ला देखील देत नाही. मग अशावेळी तीच मुलं तो सल्ला घेण्यासाठी इकडे तिकडे बाहेर जातात व योग्य सल्ला न भेटल्यामुळे अति विचार किंवा मानसिक तणाव घेतात आणि या वयामध्ये अशा प्रकारचा मानसिक ताण तणाव घेतल्यामुळे देखील आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. तसेच आपले केस पांढरे होण्यासाठी हे एक मोठे कारण देखील असू शकते. म्हणून अशा वेळी पालकांनी वेळीच सावध होऊन त्यांच्या पाल्याला काही अडचण आहे की नाही याची तपासणी करावी व या वयामध्ये त्यांच्या मानसिक तणावाचे वेळीच उपाय काढून त्यांना योग्य तो सल्ला द्यावा. जेणेकरून त्यांचा मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होईल व त्यांच्या आरोग्यावर व तसेच मुख्य तात्यांच्या केसांवर लहान वयापासून परिणाम होणार नाही.

आनुवंशिकी/नैसर्गिक असू शकते

 बऱ्याच वेळेस केस पांढरे होणे हे आनुवंशिकी असू शकते. म्हणजेच पिढ्यान् पिढ्यान् नुसार केस पांढरे होऊ शकते या विषयामध्ये अधिक समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ या म्हणजेच जर आजी-आजोबांन मधील कोणाचे केस लवकर पांढरे होत असतील. तर त्यांच्या मुलांचे देखील लवकर केस पांढरे होतील. तसेच त्यांच्या मुलांचे देखील अशाप्रकारे हे केस पांढरे होणे आनुवंशिकी असू शकते. केस पांढरे होणे हे देखील नैसर्गिक म्हणजेच जर केस पांढरे होत असतील आणि हे आनुवंशिकी देखील नसेल तर समजावे की हे नैसर्गिक आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचे धोका नाही.

आहारातील बदल/विटामिन्स ची कमतरता

आहारातील बदलांमुळे देखील केस पांढरे होऊ शकतात म्हणजेच बऱ्याच वेळेस अति तेलकट तुपकट आहारातून पुरेशी प्रोटीन आणि विटामिन्स न भेटल्यामुळे देखील केस पांढरे होण्याची शक्यता असते. तसेच बऱ्याचदा शरीरामध्ये विटामिन 12 च्या कमतरते मुळे देखील मुख्यता केस पांढरे होण्याची शक्यता असते. म्हणून जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा आहार घेत असाल तर त्या आहार मधून तुम्हाला पूर्ण प्रमाणामध्ये विटामिन्स मिळतील याची काळजी घ्यावी.

वाचा  इंटरनेट वापरण्याचे फायदे व तोटे

केस पांढरे होत असेल तर कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी

आपण केस पांढरे होण्याची कारणे तर बघितली आता आपण त्याच बरोबर जाणून घेऊया की आपण कोणत्या प्रकारे केस पांढरे होण्यापासून रोखू शकतो चला तर मग बघुया.

पालेभाज्या/फळांचे सेवन

मुख्य म्हणजे या वयामध्ये जर तुम्ही उत्तम प्रकारे आहार घेतला किंवा सर्वच पालेभाज्यांचे सेवन आणि दिवसातून एकदा तरी एका फळाचे सेवन केले. तरीदेखील तुमच्या शरीरामध्ये जर कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर ती दूर होण्यास मदत होते. जेणेकरून शरीराला योग्य प्रमाणामध्ये प्रोटीन विटामिन्स मिळतील आणि केस पांढरे होणे या पासून तुमचा बचाव देखील होईल. तसेच आहारामध्ये आवळा किंवा आवळ्याचा रससा चा समावेश करा. तसेच लहान मुलांना आवळ्याची चटणी देखील करून देऊ शकतो जेणेकरून ते आवडीने देखील खातील आणि त्यांचे केस काळे होण्यास मदत होईल.

शुद्ध नारळाचे तेल लावा

लहान मुलांना तेल लावलेले आवडत नाही पण पालकांनी याची काळजी घ्यावी की दोन दिवसातून एकदा तरी त्यांच्या केसांना तेल लावावे. जेणेकरून केसांची वाढ चांगल्या रीतीने होईल व केस पांढरे होण्या पासून देखील तुमच्या मुलांचा बचाव होईल.

भोपळ्याची भाजी खावी

भोपळ्याची भाजी देखील पांढरे केस होणे यावर फार उपयुक्त ठरू शकते कारण भोपळ्याच्या भाजी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक असणारे प्रोटिन्स व विटामिन्स असतात. जेणेकरून तुमच्या मुलांचे केस पांढरे होण्यापासून बचाव होईल तसेच केसांची वाढ देखील सुधारेल.

थंड पाण्याने केस धुवावे

  लहान मुलांना अनेक वेळेस गरम पाण्याने अंघोळ करावी लागते पण गरम पाण्याने कधीच लहान मुलांचे केस धुवू नये. कारण गरम पाण्याने लहान मुलांचे केस धुतल्याने त्यांचे केसांचे आयुष्य कमी होते असे बघितले गेले आहे. म्हणून लहान मुलांचे केस धुताना नेहमी ते थंड पाण्याने धुवावे व आंघोळ झाल्यावर ते केस कोरडे करून त्यावर तेल लावावे.

वाचा   नाकाचा शेंडा कसा वाढवायचा

केस पांढरे होण्याचे लक्षणे कोणती

लहान मुलांचे आरोग्य चांगले राहील याची काळजी घ्यावी तसेच मुलं जर सतत आजारी पडत असतील तर त्यांच्या केसांवर व त्यांच्या आरोग्यावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. याचप्रकारे दूध, दही, पनीर हे पदार्थ आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरते. सुरुवातीस केस पांढरे होण्याची लक्षणे म्हणजे चेहऱ्यावरील तेज कमी होणे व हळूहळू पांढरे केस निदर्शनात येणे.

तर आज आपण केस पांढरे होण्याची कारणे व उपाय देखील बघितले याच प्रकारे आपण याची लक्षणे देखील बघितली. तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता. तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

लहान मुलांचे वजन कसे कमी करावे

 

             

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here