हळदीचे पाणी पिण्याचे फायदे

0
950

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत हळदीचे पाणी पिण्याचे फायदे  हल्ली आजच्या काळामध्ये सर्व जण कामामध्ये व्यस्त असताना दिसून येत असतात. त्यामुळे बरेच जण आपल्या शारीरिक स्वास्थ्याकडे देखील दुर्लक्ष करताना दिसून येत असतात. सध्या तर अनेक प्रकारचे रोग निघालेले आहेत. त्याचप्रमाणे, अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजारही आहेत. मित्रांनो जर आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ति ही जर चांगली असेल तर आपण कुठल्याही प्रकारच्या आजारापासून संसर्गजन्य रोगांपासून दूर राहू शकतो. हल्लीच्या काळात सगळेजण कामांमध्ये व्यस्त दिसून येत असतात. परंतु, आपल्या शरीराचे स्वास्थ्य देखील चांगले असायला हवे. याकडे देखील दुर्लक्ष करायला नको. म्हणून आपल्या शरीराच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला हवे आपण आपली जास्तीत जास्त रोग प्रतिकारक शक्ती वाढवायला हवी. जेणेकरून, कुठल्याही प्रकारची एलर्जी व संसर्गजन्य रोगांपासून आपण सहज रित्या दूर राहू शकतो. मित्रांनो आपल्या संपन्न घरात असे अनेक मसाले पदार्थ आहेत की ज्यांचा आपण सहज रित्या आपल्या आरोग्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो.

      स्वयंपाक घरातील अगदी छोटे-छोटे मसाले पदार्थ देखील आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी खूप लाभदायक ठरू शकतील. स्वयंपाक घरात जेवण करण्यासाठी तरी या मसाले पदार्थांचा उपयोग होतो शिवाय या पदार्थांचा आपण आपल्या आरोग्यासाठी चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो. मसाले पदार्थ म्हटले तर ते अनेक प्रकारचे येत असतात. आम्ही ज्या विषयी तुम्हाला सांगत होतो तो एक पदार्थ म्हणजेच “हळद” होय मित्रांनो, हळद हि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत बहुगुणी आहे. हळदीचा उपयोग हा स्वयंपाक घरातील जेवण बनवताना तर होतच असतो. त्याशिवाय हळदीचा आपण आपल्या आरोग्यासाठी देखील उपयोग करून घेऊ शकतो. अनेक वेळा घरातील लहान मुले खेळता खेळता पडली तर आई पटकन ज्या ठिकाणी मुलांना जखम झालेली असेल ती जखम स्वच्छ करून त्या ठिकाणी हळद लावत असते. कारण हळदीमध्ये अनेक अँटीबॅक्टरियल गुणधर्म आहेत. ज्यामुळे हळद जखमेवर लावल्यावर जखमे मधील बॅक्टेरिया जाण्यास मदत होते. आणि जखम लवकर बरी होण्यास देखील मदत होते. अगदी काहीजण शेविंग करताना जर ब्लेड चुकून दाढीला लागली असेल, तर त्या ठिकाणी पटकन हळदीचा लेप लावतात. कारण यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही व जखम लवकर बरी होण्यास मदत होत असते.

         मित्रांनो, घरात लग्नकार्य असेल तर त्यासाठी देखील म्हणजेच मंगल कार्यासाठी हळद ही हमखास वापरली जात असते. लग्नाच्या आधी हळदीचा कार्यक्रम असतो त्या दिवशी हळद ही नवरदेव मुलाला व नवरी मुलीला लावत असतात. हळद आल्यामुळे त्वचा गोरी होण्यास मदत होत असते. हळदीचे म्हटलं तर एक ना अनेक फायदे आपल्याला होत असतात. हळद फक्त वरून त्वचेवर लावल्याने फायदे होतात असे नाही, तर हळद आपण जर पोटातून घेतली तर त्यामुळे देखील अनेक फायदे आपल्याला होत असतात. तर मित्रांनो, आज आपण हळदीचे पाणी पिण्याचे फायदे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, हळदीचे पाणी पिण्याचे फायदे नेमके आपल्याला कशा प्रकारे होऊ शकतात? काय काय फायदे होऊ शकतात? याविषयी आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

हळदीचे पाणी पिण्याचे फायदे कोणते असू शकतात?

मित्रांनो, हळद हि भरपूर औषधी घटक गुणधर्मांनी संपूर्ण असते. ज्याप्रमाणे हळद लावल्यामुळे अनेक फायदे आपल्या होत असतात तसेच हळद आपण पोटातून घेतल्यामुळे देखील आपला एक ना अनेक प्रकारचे फायदे होत असतात. हळदीचे पाणी पिण्याने कुठल्या प्रकारचे साईड इफेक्ट होत नाही परंतु फायदे मात्र अनेक प्रकारचे आपल्याला होऊ शकतात. तर मित्रांनो हळदीचे पाणी प्यायल्याने आपल्याला कोणते कोणते फायदे होऊ शकतात याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  व्हिटॅमिन ई कॅप्सुल चे फायदे

हळदीचे पाणी प्यायला ने रोगप्रतिकारक शक्ती मध्ये वाढ होते

मित्रांनो जर तुम्ही सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामधून हळदीचे सेवन करत असाल तर यामुळे अनेक आजारांपासून व रोगांपासून दूर राहू शकतात. कारण जर तुम्ही हळदीचे पाणी नियमितपणे घेत असाल तर यामुळे तुमची शरीरासाठी आवश्यक ती रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते. हळद मध्ये अनेक प्रकारचे अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे आपल्या शरीराला त्याचा भरपूर फायदा होत असतो. अनेक लोक हे सतत आजारी पडत असतात. तसेच कुठल्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाच्या संपर्कात आले तर लवकरच ते आजारी पडत असतात. तसेच त्यांना कुठल्याही प्रकारची ऍलर्जी देखील लवकर होत असते. आणि असे होण्यामागचे कारण म्हणजे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी असणे. हो मित्रांनो जर आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी असेल तर आपण कुठल्याही आजाराच्या संपर्कात आल्याने आपल्याला तो आजार होत असतो. आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे आपण सारखे सारखे आजारी पडू लागतो. असे होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही नियमितपणे सकाळी उठल्यावर कोमट पाणी करून त्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करून ते पाणी प्यायला हवे. असे नियमित केल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही जलद रीतीने वाढण्यास मदत होईल. व तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकतात.

हळदीचे पाणी प्यायल्याने मासिक पाळीत होणारा त्रास कमी होऊ शकतो

अनेक महिलांना मासिक पाळीच्या वेदना या जास्त प्रमाणात होत असतात. अर्थातच मासिक पाळीच्या वेळी संपूर्ण शरीर दुखू लागते. तर अनेकांना पोट दुखी, कंबर दुखी, पाय दुखी, डोकेदुखीचा त्रास होत असतो. म्हणजेच मासिक पाळीच्या वेळी असहनीय वेदना सहन कराव्या लागत असतात. तर अनेक महिलांची हार्मोन्स बदल मुळे चिडचिड देखील होत असते. त्यामुळे सतत आराम करावासा वाटत असतो. कारण अशामुळे काम करावेसे देखील वाटत नाही. जर तुम्हाला हा त्रास होऊ नये अथवा कमी प्रमाणात व्हावा असे वाटत असेल तर तुम्ही नियमित पाण्याचे सेवन करायला हवे. यामुळे नक्कीच तुमचा त्रास कमी होऊ शकतो. शिवाय तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधामध्ये चिमूटभर हळद टाकून ते गरम करून प्यायल्याने देखील तुम्हाला चांगल्याप्रकारे आराम मिळण्यास मदत होऊ शकते. तर तुम्ही हा उपाय करून बघा नक्की यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत होऊ शकेल.

वाचा  दाढ किडणे या समस्यावर घरगुती उपाय

हळदीचे पाणी प्यायल्यामुळे त्वचा गोरी होण्यास मदत होते

मित्रांनो, जर तुम्ही सकाळी उठल्यावर नियमितपणे कोमट पाण्यातून हळदीचे सेवन करत असाल तर तुमच्या शरीराला याचे एक ना अनेक फायदे तर होताच शिवाय तुमची त्वचा देखील गोरी होऊ लागते. म्हणजेच हळदीचे पाणी नियमित प्यायल्यामुळे तुमच्या त्वचेचा रंग उजळण्यास मदत होत असते. तसेच हळदीचा आपली त्वचा डाग दूर होण्यास देखील फायदा होत असतो. तर नक्कीच तुम्ही हळदीचे पाणी सकाळी उठल्यावर घ्यायला हवे जेणेकरून तुमची त्वचा गोरी होण्यासाठी मदत होईल.

हळदीचे पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते

हळदीचे पाणी नियमित सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी होऊ लागते. म्हणजे एक प्रकारे अतिरिक्त चरबी ही जळू लागते. शिवाय आपण जे काही अन्न खात असतो त्याचे पचन देखील व्यवस्थित व सुलभ होते. हळदीमध्ये अनेक प्रकारचे घटक असतात. अनेक गुणधर्मांनी युक्त हळद असते. तसाच हळदीला अँटीसेप्टिक असे देखील म्हटले जाते. हळदीचे पाणी प्यायल्यामुळे एक प्रकारची ऊर्जा आपल्या शरीराला मिळत असते. त्याचप्रमाणे अपचनाचा त्रास होऊन अतिरिक्त चरबी शरीरामध्ये जमत असते तर ती चरबी जळण्यास हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यास उपयोग होऊ शकतो. म्हणजे चे प्रकार हळदीचे पाणी प्यायल्यामुळे वजन नियंत्रित राहते व पचन क्रिया वाढीस लागते.

हळदीचे पाणी प्यायल्यामुळे आपण कोणत्या आजारांपासून दूर राहू शकतो?

मित्रांनो सकाळी उठल्यावर जर तुम्ही नियमितपणे हळदीच्या पाण्याचे सेवन करत असाल तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकतात. हल्लीचा जमाना हा हायब्रिडचा जमाना आहे. अगदी शेतामध्ये जे काही भाज्या पिकवले जातात तर त्यावर फवारणी देखील करत असतात. आणि अशा भाज्या आपण व्यवस्थित न धुता त्यातच चिरून बनवतो त्यामुळे आपल्या शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. तसेच अनेक जणांना ह्या कारणामुळे देखील कॅन्सरची समस्या निर्माण होत असते. म्हणून मित्रांनो कुठलीही भाजी आधी नमक आणि हळदीच्या पाण्याने स्वच्छ धुऊन टाकायला हव्यात. त्यामुळे त्यांच्यावर बारीक बारीक प्रकारचे बॅक्टेरिया निघून जाण्यास मदत होईल. आणि जर तुम्ही हळदीच्या पाण्याचे सेवन करत असाल तर या कॅन्सर सारख्या रोगांपासून तुम्ही दूर राहू शकतात. कारण ज्या कॅन्सर होण्याच्या पेशी कारणीभूत ठरत असतात तर त्या पेशींना नष्ट करण्याचे काम हळदीचे पाणी पिल्याने होत असते. म्हणून तुम्ही नियमितपणे हळदीच्या पाण्याचे सेवन करायला हवे. अनेक जणांच्या शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे ते सारखे सारखे आजारी पडण्याची शक्यता असते तर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी देखील तुम्ही हळदीच्या पाण्याचे नियमित सेवन करायला हवे त्यामुळे तुम्ही कुठल्याही आजारांपासून दूर राहू शकतात. अनेक जणांना संधिवाताची समस्या येत असते तर यासाठीदेखील हळदीच्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो.

वाचा  जुळी मुलं का आणि कशी जन्माला येतात

हळदीचे पाणी पिण्यासाठी नेमके ते कशाप्रकारे तयार करता येईल?

हळदीचे पाणी प्यायल्यामुळे वरील प्रमाणे किती प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात याबद्दल आपण जाणून घेतलेले आहेत. अनेक जणांना हळदीचे पाणी नेमके कसे तयार करावे? हा प्रश्न पडलेला असतो. म्हणजेच हळदीचे पाणी नेमके कशाप्रकारे बनवावे. तर मित्रांनो हळदीचे पाणी बनवणे जास्त अवघड नाही. हळदीचे पाणी बनवण्याची एकदम सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगत आहोत. एका पातेल्यामध्ये तुम्ही एक ग्लास पाणी टाकून घ्यावे. आणि त्यामध्ये घरगुती पद्धतीने बनवलेली अर्धा चमचा हळद टाकून घ्यावी. मित्रांनो, यासाठी तुम्ही शक्यतो घरगुती पद्धतीने बनवलेल्याच हळदीचा उपयोग करायला हवा. ज्यामुळे तुम्हाला त्याचे अनेक प्रकारचे फायदे होण्यास मदत होईल. सध्या बाजारात रेडीमेड हळद देखील मिळते. परंतु, ती केमिकल रहित असू शकते. म्हणून तुम्ही जेवढी घरगुती पद्धतीने बनवलेली हळदीचा उपयोग कराल तेवढे तुमच्या शरीरासाठी चांगले ठरेल. पाण्यामध्ये हळद मिक्स केल्यावर ते पाणी चांगले उकळून घ्यावे. जर तुम्हाला नुसतेच हळदीचे पाणी प्यायला आवडत नसेल, तर त्यात मध्ये तुम्ही थोडेसे मध देखील घालू शकतात. आणि हे पाणी कोमट झाल्यावर त्या पाण्याची सेवन करायला हवे. सकाळी उठल्यावर जर तुम्ही या पाण्याचे नियमित सेवन करत असाल, तर नक्कीच तुम्हाला एक ना अनेक प्रकारचे फायदे होण्यास सुरुवात होईल.

हळदीचे पाणी पिताना घ्यावयाची काळजी?

मित्रांनो, हळदीचे पाणी नियमित घेतल्यामुळे एक ना अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात. हळदीचे पाणी प्यायल्यामुळे आपण अनेक रोगांपासून आजारांपासून दूर राहू शकतो. अनेक जणांना उष्णतेचा त्रास होत असतो. म्हणजे शरीरातील हिट वाढण्याचे प्रमाण जास्त असते. तर ज्या लोकांना शरीरात हिट वाढण्याचा त्रास होत असेल, तर अशा लोकांनी हळदीचे पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यायला हवा. तर काही जणांना मुतखडा या संदर्भात देखील त्रास होत असतो. ज्या लोकांना या संदर्भात त्रास होत असेल तर आपल्या अशा लोकांनी देखील हळदीचे पाणी पिण्याचे टाळायला हवे आणि घ्यायचे असेल तर त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. त्याचप्रमाणे ज्या लोकांना डायबेटीस ची समस्या असेल तर अशा लोकांनी देखील हळदीचे पाणी पिण्याचे टाळायला हवे. हळदीचे पाणी घ्यावयाचे असेल तर तत्पूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरेल. हळदीचे पाणी पिणे हे शरीरासाठी इतर फायदेशीर असते परंतु जर काही आजार हे आधीपासून असतील तर अशावेळी त्यांनी हळदीचे पाणी पिणे शक्यतो टाळायला हवे आणि जर तुम्हाला घ्यायचे असेल तर त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

तर मित्रांनो, हळदीचे पाणी पिल्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारचे फायदे होऊ शकतात? तसेच आपण कुठल्या प्रकारच्या आजारापासून दूर राहू शकतो? आणि हळदीचे पाणी हे कशा प्रकारे बनवता येते? याविषयी आपण माहिती जाणून घेतली आहे. हळदीचा उपयोग आपल्या त्वचेसाठी तर होतोच. परंतु, हळद ही जर पोटातून घेतली तर त्यामुळे देखील अनेक फायदे आपल्याला होत असतात.

    मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकता.

धन्यवाद.

गावरण तूप खाण्याचे फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here