थंडीत ड्राय स्काल्पमुळे केस गळतात?

0
799
थंडीत ड्राय स्काल्पमुळे केस गळतात
थंडीत ड्राय स्काल्पमुळे केस गळतात

नमस्कार मित्रांनो, कोणताही माणूस असो त्याचे सौंदर्य वाढण्यामध्ये केसांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते. सुरुवातीला एक दोन केस गळाले किंवा एखादा केस पांढरा झाला तर काही वाटत नाही. परंतु केसान विषयी अधिक समस्या वाढत गेल्यात, तर मात्र  केसांची काळजी घेणे फार महत्वाचे ठरते. मित्रांनो, वातावरणाचा परिणाम आपल्या केसांवर होत असतो. त्यामुळे प्रत्येक वातावरणानुसार केसांची काळजी घेणे हे गरजेचे असते.  थंडी म्हटली की थंड वातावरण हे आलेच. थंडीत सुद्धा तुम्ही तुमच्या केसांची काळजी योग्य रीतीने घेतली पाहिजे. थंडीत तुमचे केस कोरडे होत आहे का? थंडीत केसांमध्ये कोंडा वाढतोय का? थंडीत ड्राय स्काल्प मुळे केस गळत आहेत का ? मित्रांनो या समस्या तुम्हाला जर होत असेल तर तुम्ही थंडीमध्ये केसांची काळजी कशी घ्यावी? याविषयी जाणून घ्यायला हवे. 

            आज आपण थंडी मध्ये केसांची काळजी कशी घ्यायची, केसांचे आरोग्य कसे जपायचे याविषयी माहिती करून घेणार आहोत. सौंदर्य जपण्यासाठी त्वचेची काळजी घेण्यासोबतच केसांची ही काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. ज्या प्रमाणे वातावरण बदलत जाते तसा त्याचा परिणाम हा आपल्या स्किन वरती सुद्धा होतो. हिवाळा सुरू होताच  कोरड्या त्वचेचा आपल्याला सामना करावा लागतो.स्काल्प म्हणजेच डोक्याची त्वचा हे ड्राय होते त्यामुळे केसांमध्ये कोंडा यांचा त्रास वाढू लागतो. कोंड्यामुळे केसांचे सौंदर्य कमी होते. त्यामुळे केसांवरती उपाय करणे गरजेचे असते. यासोबत थंडीत ड्राय स्काल्प होतो मात्र थंडीमुळे तुमच्या केसांची हानी  होणार नाही यासाठी काय काळजी घ्यायची, याविषयी देखील माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. 

थंडीतमध्ये ड्राय स्काल्प मुळे केस गळण्याची कारणे ?

मित्रांनो, हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी पडते त्यामुळे डोक्याच्या वरची त्वचा ज्याला आपण स्काल्प म्हणतो, तीही कोरडी पडू लागते केसातील त्वचा कोरडी झाल्यामुळे केसात कोंडा होण्याची दाट शक्यता असते. थंडीच्या दिवसात केसांच्या गरजा व समस्या बदलतात. त्यामुळे केसांची अधिक काळजी घ्यावी लागत असते. केसांची निगा राखण्यात चूक केल्यामुळे कोंड्याची समस्या ही वाढून केस कमकुवत होऊ शकतात . त्यामुळे केस गळण्याची प्रमाण खूप वाढून लागते. केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या अधिकच वाढत असते त्यामुळे कोंडा वाढल्याने परिणामी केस गळती सुरू होते. म्हणून थंडीत ड्राय स्काल्प होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक ठरते. खालील प्रमाणे केसांची काळजी न घेतल्यास केस गळतीची समस्या होऊ शकते.

 • मित्रांनो, केसांसाठी तेल हे खूप महत्त्वाचे आहे. परंतु, हिवाळ्यात जास्त वेळा केसांना तेल लावल्याने त्वचेवर कोंडा वाढतो. त्यामुळे, डोक्याच्या त्वचेला पोषक हवा मिळत नाही व केसांचे आरोग्य बिघडते म्हणून केसांना सतत तेल लावल्याने देखील केस गळतीची समस्या उद्भवते.
 •  जास्त शाम्पू लावल्याने देखील केस गळतीची समस्या  होते. जास्त शाम्पू केल्याने डोक्यातील त्याच्या ही कोरडी  होते आणि त्यामुळे कोंड्याची समस्या खूप वाढते त्यामुळे डोक्यावर आणि कमकुवत केसांमध्ये खाज येण्याची समस्या देखील सुरू होते ज्यामुळे मोठ्या प्रमाणात केस गळती सुरू होते.
 • बरेच लोकं डोकं धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करता. त्यामुळे केसांची मुळे थोडीशी ढिली होतात आणि केस तुटण्याचा धोका जास्त असतो. अशा स्थितीत कंगवा केल्याने अजून केस गळतात आणि केस कमकुवत होतात. हिवाळ्यात केस सुकायला बराच वेळ लागत असल्याने केसांची काळजी घेण्याच्या संबंधित लोक अनेकदा चुकतात. त्याचबरोबर हेअर ड्रायरचा वापर केल्याने देखील केसांसाठी हानिकारक ठरू शकते.
वाचा  उंची वाढवणे स्वागत तोडकर

ड्राय स्काल्प मुळे केस गळत असल्यास उपाय ?

मित्रांनो थंडी मध्ये आपल्या केसातील त्वचा ही कोरडी पडत असते. त्यामुळे डोक्यामध्ये अधिक प्रमाणात कोंडा होऊन केस गळतीची समस्या येत असते. त्यामुळे केसांची योग्य ती काळजी  घेतली पाहिजे. थंडीत ड्राय स्काल्प  होऊन केस गळतीची समस्या निर्माण झाल्यास आपण काय उपाय केले पाहिजे या विषयी आता आपण जाणून घेणार आहोत.

 • मित्रांनो, आवळा हा आयुर्वेदिक उपाय यामध्ये सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे.आवळा ह हिवाळ्यात सहज उपलब्ध होत असतो. असे म्हटले जाते की ते केस पांढरे होण्यास प्रतिबंध करते. त्यामुळे रोज एका कच्च्या आवळ्याचा रस एक ग्लास पाण्यात मिसळून पिल्याने केस गळतीची समस्या कमी होते.
 • कोरफड लावून बघा.तुमच्या केसांची समस्या ही कमी व्हावी यासाठी कोरफड तुम्ही तुमच्या केसांना लावू शकतात. कोरफड हा त्वचा आणि केस या दोन्हींसाठी सर्वात उपयुक्त घटकांपैकी एक आहे. हिवाळ्यात हे एक नैसर्गिक शक्तिशाली  मॉइश्चरायझर म्हणून काम करते. त्वचा आणि केसांचा कोरडेपणा  दूर होण्यास देखील मदत होते. कोरफड मध्ये जस्त असते. त्याचा जखमा, बर्न आणि क्रक वर उपचार  प्रभावी असतो. कोरफड मृत् त्वचेच्या पेशी मऊ करते आणि त्यांना काढून टाकण्यात देखील मदत करत असते.
 • मित्रांनो, तान तनाव संबंधित परिस्थितीत ब्राम्ही फायदेशीर मानली जाते. कारण यामुळे तणाव कमी होतो. त्यात व्हालारीन असते जे केस गळणे, कोंडा आणि त्वचेच्या समस्यांसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. जर तुम्हाला ब्राह्मीची ताजी पाने मिळाली, तर त्या पानांची  पेस्ट बनवा आणि तुमच्या केसांना पॅक म्हणून तुम्ही लावू शकतात. पेस्ट बनवण्यासाठी थोडे पाणी+ ब्राम्हीची वाटून घ्या. आणि ह पॅक केसांना लावा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने तुमचे केस धुऊन टाका. तुम्हाला तुमच्या केसांना फरक जाणवून येईल.

मित्रांनो, वरील प्रमाणे तुम्ही तुमचे केस गळतीची समस्या कमी होण्यासाठी उपाय करू शकतात. हे उपाय अगदी घरगुती आयुर्वेदिक पद्धतीने तुम्हाला करता येतील.

वाचा  दाढ दुखीवर उपाय स्वागत तोडकर

ड्राय स्काल्प झाल्यास काय काळजी घ्यावी ?

मित्रांनो, हिवाळ्यात थंड वातावरण असल्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्या केसांवर होत असतो.तसेच आपल्या केसातील त्वचा ही कोरडी पडण्याची शक्यता असतेआणि त्वचा कोरडी पडल्यामुळे केसात कोंडा होत असतो. त्यामुळे सहाजिकच केसात कोंडा झाल्यामुळे केस गळतीची देखील समस्या निर्माण होत असते. यासाठी आपण आपल्या केसांची विशेष करून हिवाळ्यात योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. केसातील त्वचा कोरडी होऊ नये यासाठी आपण खालील प्रमाणे केसांची काळजी घेऊ शकतो.

 • रात्री झोपताना सुती कापडाचा स्कार्फ किंवा  रुमालाने तुमचे केस बांधायला हवे. 
 • यामुळे  रजाई किंवा चादरीने तुमचे केस कोरडे होत नाहीत.  
 • आंघोळ करताना किंवा केस धुताना खूप गरम असे पाणी वापरू नका. कारण, खूप गरम पाणी वापरल्यामुळे त्याच्या कोरडी पडते. यामुळे सहसा पाणी कोमट वापरा.
 • मध केसांना लावा.मध लावल्यामुळे तुम्ही आपल्या केसांना चमक आणू शकतात व त्यांची चमक ही कायम ठेवू शकतात आणि त्यामुळे तुमच्या केसांची  त्वचा देखील मऊ होऊ शकते तसेच केसांमध्ये खाज सुद्धा तयार होत नाही.
 •  हिवाळ्यामध्ये कोंड्याचा त्रास होत असेल, तर टी ट्री ऑइल मध्ये खोबरेल तेल मिक्स करून  केसांना व केसांच्या मुळांशी मसाज करा. याने नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. 
 • आंघोळीच्या आधी लिंबाने केसांना मसाज केला तर कोंडा निघून जाण्यास मदत होते. 
 •  केस धुतल्यानंतर ते तसेच न विंचरता केस सुकल्यानंतर मोठ्या दातांच्या कंगव्याने विंचारवेत.
 • महिलांनी केस धुवून घरा बाहेर जाणे  शक्यतो टाळावे. गेल्यास ओढणीने केस बांधायला हवेत.
 • हिवाळ्यामध्ये केसांना मेहंदी लावणे टाळावे. यामुळे केस अजून जास्त गळण्याची शक्यता असते व कोरडे देखील होत असतात.आणि जर मेहंदी लावायची असेल तर यामध्ये खोबरेल तेल मिक्स करून मगच ते लावावे. 

 मित्रांनो, हिवाळ्यात तुमच्या केसातील त्वचा कोरडी होऊन केस गळत असल्यास वरील प्रमाणे साधे सोपे उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकतात. हिवाळ्यात तुम्ही तुमच्या केसांचा योग्य त्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. तसेच तुमच्या केसांसाठी तुम्ही कुठल्याही हानिकारक केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरू नयेत.

वाचा  पांढरे केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

     वरील प्रमाणे आपण थंडीमध्ये केसातील त्वचा कोरडी पडून केस गळतीची समस्या कशा प्रकारे होऊ शकते, तसेच केस गळती रोखण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे आणि केसातील त्वचा कोरडी पडू नये यासाठी कुठली काळजी घेतली पाहिजे या विषयी ची माहिती आपण जाणून घेतलेली आहे. यांने देखील तुम्हाला मदत होत नसेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करू शकतात.आम्ही सांगितलेकी माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकतात.

 

     धन्यवाद !

         

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here