अंगावर सोने घालण्याचे फायदे

0
899
अंगावर सोने घालण्याचे फायदे
अंगावर सोने घालण्याचे फायदे

नमस्कार, मित्रांनो आज आपण जाणून घेऊया अंगावर सोने घालण्याचे फायदे याबद्दलची माहिती. कोणत्याही महिलेची शोभा ही अलंकारांनी होते. एखादा दागिना जरी घातला, तरी तिच्या रूपात अजून भर पडते. तसेच स्त्रीचे सौभाग्याचे लेण ही दागिन्याने सुरुवात होते. म्हणजेच मंगळसूत्र च्या दोन वाट्या, पायातील जोडवे, ही तिच्या सौभाग्याची निशाणी असते. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हे सोन्याचे असते, तर पायातील जोडवे हे चांदीचे असतात. 

मित्रांनो सोन्याच्या वस्तू घातल्याने, तिच्या सौंदर्यात अजून भर पडते. आपल्या मराठमोळ्या संस्कृतीत सोनू घालणे, ही प्रत्येकाची आवड झालेली आहेत. हल्ली पुरुषही सोन्याचे दागिने घालून फिरतात. सोन्याचे वेगवेगळे प्रकार असतात, मित्रांनो अंगावर सोन्याचे दागिने घालणे, ही फक्त आपली शोभाच नसून, तर त्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात. वाटल ना आश्चर्य ! तुम्हाला जाणून आश्चर्य वाटणारच, कारण सोन्याचे दागिने घालणे, हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. पण हे अनेकांना माहिती नसतात.

 चला, तर मग आज त्याच बाबतीत आपण बोलणार आहोत, ती सोन्याचे दागिने घातल्यावर तुम्हाला कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात ? चला तर जाणून घेऊयात ! 

सोने घातल्याने तुमच्या शरीराला होणारे फायदे ? 

मित्रांनो, सोने हे घालणेही प्रत्येकाची आवड असते. पण सोने आपल्या शरीरासाठी कसे फायदेशीर ठरू शकते? त्या बाबतीत आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात. 

तुमच्या शरीराला उबदारपणा देण्यासाठी फायदेशीर ठरते. 

सोने ही उष्ण असते, ज्या लोकांना सर्दी- कफ सारखे त्रास असतो, जर त्यांनी त्यांनी नियमित सोने घातले, तर त्यांच्या शरीराला उष्णता देण्याचे काम सोने करतो, म्हणजे सोने घातल्याने तुमच्या शरीरातील तापमान सुरळीत राहते. यामुळे तुम्हाला सर्दी सारखी या त्रासावर आराम मिळतो, आणि शरीराला एक प्रकारची उब मिळते. तसेच अशा लोकांनी अनामिका मध्ये अंगठी घालावी. 

वाचा  डाळिंब खाल्ल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे व तोटे :-

डोकेदुखी वर आराम मिळतो :

आता हे तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल!  की सोने घातल्याने डोकेदुखी वर कशाप्रकारे आराम मिळेल. तर हो, सोने घातल्याने तुमच्या डोकेदुखी वर आराम मिळू शकतो. कारण आपल्या शरीरातील नसा या पूर्ण एकमेकांशी कनेक्ट असतात, आणि मुख्य म्हणजे आपल्या हाताच्या नसा कनेक्टेड असतात. आपल्या हातातील बोट तर्जनी हा डोकेदुखी वर फायदेशीर ठरतो. जर तुम्ही तर तर्जनीमध्ये अंगठी घातली, तर त्याच्यावर दाब निर्माण होऊन, तुमची डोकेदुखी वर आराम मिळतो. 

सांधेदुखी सारख्या समस्येवर आराम मिळू शकतो :

पूर्वीचे लोक म्हणतात की,  जर तुम्ही अंगावर सोने घातले, तर तुम्हाला शारीरिक व्याधी कमी होतात. तसेच तुम्ही गळ्यामध्ये भरगच्च माळा वगैरे घातली, तर तुम्हाला सांधेदुखी सारखी या समस्येवर आराम मिळू शकतो. 

कानांवर च्या आजारावर फायदेशीर राहते :

म्हणतात, की सोने घातल्याने स्त्रीचे सौंदर्य खुलते. तसेच तिच्या आरोग्यावरही फायदे होतात. आपल्याकडे एक प्रथा आहे, लहानपणी बाळाचे कान टोचणे करतात. तेही सोन्याच्या ताराने, त्यामागे शास्त्रीय कारण असे आहे, की लहान मुलांचे कान टोचल्यावर कानांचे आजार आपल्याला होत नाही. तसेच टेन्शन ताणतणाव हा कानात सोने घातल्यामुळे कमी होतात. 

सोन्याचे दागिने घातल्याने रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होते :

सोन्याचे दागिने घातल्याने, आपल्या शरीरातील रक्ताभिसरण क्रिया ही सुरळीत राहते. म्हणजेच आपल्या शरीराला ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होतो. त्यामुळे आपल्याला हृदय विकार यासारख्या, तसेच उच्च रक्तदाब यासारख्या समस्या होत नाही. 

तुम्हाला सकारात्मक वाटते :

जर तुम्ही एखाद्या ताणतणावाखाली असाल, डिप्रेशनमध्ये असेल, तसेच मनात नकारात्मक असेल, तर तुम्ही तुम्ही नियमित सोने घाला. त्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह थिंग म्हणजे सकारात्मकता वाटते. कारण सोन्यामध्ये  उबदारपणा असतो. तसेच तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते, मग तुमचे विचार हे सकारात्मक होतात. 

शरीरावरील घावभरण्यासाठी फायदेशीर ठरते :

पूर्वीचे लोक म्हणायचे, की शरीरावर जर कुठेही घाव असेल, तसेच जखम लवकर भरत नसेल, तर त्यासाठी प्युअर सोने ते म्हणजे कोणते? तर तुम्हाला शुद्ध 24 कॅरेट ची सोन्याची वस्तू किंवा पावडर तुमच्या घावावर/ जखमेवर ठेवायची आहे. त्यामुळे तुमचे घाव लवकर भरून निघतात, व त्याचे संक्रमण तुमचे लवकर कमी होते. शिवाय 24 कॅरेट सोन्याचा वापर केल्यामुळे, तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. 

वाचा  तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय

तुमच्या सौंदर्यात भर पडते :

जर तुम्ही सोने घातले, तर तुम्हाला त्याचे फायदे होतात. तसेच तसेच जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमांमध्ये सोने घालून गेले, तर तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडते. कारण सोनी हि स्त्रियांची शोभा आहे. त्यामध्ये नाकात, कानात, गळ्यात, हातात, बोटांमध्ये अंगठी, वगैरे घातल्याने, तुमच्या सौंदर्यात खूप भर पडते व तुमचे सौंदर्य खुलते. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अंगावर सोने घातल्याने, तुमच्या शरीराला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात, ते सांगितलेले आहेतच. तसेच सोने घातल्याने तुमचे सौंदर्यही फुलते. हेही सांगितलेले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असेल, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवावेत. 

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here