घरात रूम फ्रेशनर मारण्याचे फायदे

0
596
घरात रूम फ्रेशनर मारण्याचे फायदे
घरात रूम फ्रेशनर मारण्याचे फायदे

नमस्कार, मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया घरात रूम फ्रेशनर मारण्याचे फायदे. प्रत्येकाला आपले घर अगदी स्वच्छ आणि सुंदर निर्मळ असावे, असे वाटते. त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे आपलं घर सजवतो. त्यामध्ये एक प्रकारचा सुवास दरवळायला हवा, असे वाटते. ज्या वेळी आपण घरातून कामानिमित्त बाहेर जातो, त्यावेळी कामाची दगदग, थकवा, ताण- तणाव येतो, आणि गर्दीतुन जेव्हा आपण घरी येतो, त्यावेळी आपल्या घरातील प्रसन्न वातावरण बघून आपल्याला अगदी फ्रेश आणि आनंदी वाटते. अशा वेळी आपण घरात चांगल्या कंपनीचा ब्रँडेड सुवास मारायला हवेत.

बाहेरून कामावरून घरी येईपर्यंत, आपण वेगवेगळ्या गर्दीला, तसेच सुवासांना तोंड देतो. त्या वेळी धुळीचे प्रदूषण, परत कचराचा डब्याचा वास, परत घरात घुसल्यावर बाहेरील काही जणांच्या बुटांचा, पायमोजे चा वास, घामाचा वास,  त्यानंतर घरात बसल्यावर किचनच्या तडक्याचा वास, तर कधी फिनाईल चा वास मनात दरवळतो. त्यामुळे आपल्याला कधी-कधी अशा वासामुळे चिडचिड आणि ताणतणाव आल्यासारखे वाटते. आपण सारखा राग- राग करतो, पण आपल्याला या गोष्टी लवकर कळून येत नाही. त्यासाठी आज आपण याच बाबतीत जाणून घेणार आहोत, की घरात रूम फ्रेशनर मारल्याने कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात ? चला तर मग जाणून घेऊयात ! 

घरात रूम फ्रेशनर कशा प्रकारचे वापरावे ? 

मित्रांनो, घरात रूम फ्रेशनर मारल्यावर मन अगदी आनंदी आणि उत्साही वाटते. तसेच रूम फ्रेशनर घेताना, तुम्ही चांगल्या कंपनीचा तसेच ब्रँडेड वापरावा. तसेच हल्ली मार्केट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रूम फ्रेशनर आलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही फुलांचा सुवास, नैसर्गिक सुवासिक घ्यावेत. तसेच कापूर युक्त मनाला फ्रेश वाटणारे, असे घ्यावे. तसेच अजून काही नावे आहेत, आम्ही तुम्हाला ते सांगत आहोत, चला तर जाणून घेऊयात! 

वाचा  कढीपत्त्याचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे

ओडोनील :-

ओडोनील  फ्रेशनर सर्वांना माहितीच आहे. हे अगदी तसेच नावाजलेले फ्रेशनर आहे, तुम्ही टीव्हीवर वगैरे त्याची ॲडवटाईज बघितली असेलच. हे तुम्ही बाथरुम, टॉयलेटमध्ये लावल्यास, तुमच्या त्या भागातील दुर्गंधीही नाहीशी होते, आणि ज्या वेळेस तुम्ही बाथरूममध्ये जातात. त्या मनाला फ्रेश आणि उत्साही वाटते. 

गोदरेज एयर फ्रेशनर :-

हे सुद्धा नावाजलेले फ्रेशनर आहे, याचा वापर केल्याने तुमच्या मनाला आनंदी आणि उत्साही वाटते. त्यावेळी तुम्ही घराची साफसफाई करतात, त्यानंतर जमजा तुमच्या घरी कोणी पाहुणे येत आहे, त्यावेळी तुम्ही घरात याचा वापर केल्याने, मनाला अगदी उत्साही वाटते. तसेच येणारे पाहुणे घरात येतात, त्यांनाही तो सुहास दरवळतो. मनाला अगदी फ्रेश अन ताजेतवाने वाटते. 

आंबी प्युवर फ्रेशनर :-

हेसुद्धा ब्रांडेड फ्रेशनर आहे. याच्या वापराने तुमच्या घरात जी काही दुर्गंधी येत असेल, तर ती नाहीशी होते. हा पूर्ण घरात कानाकोपऱ्यात त्याच्या सुवास पसरवतो. तसेच त्यात ऑडोक्लिअर गुणधर्म असल्यामुळे, ते हवेतील दुर्गंधी नाहीसे करतात. व मन अगदी फ्रेश आणि उत्साही वाटते.बाहेरचा राग- ताण- तणाव या सुवासाने निघून जातो. 

एअर फ्रेशनर किट :-

हे किट तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही सहज रित्या उपलब्ध होतील. हा कीट तुम्ही घरात वापरू शकतात. तसेच तुम्ही बाथरूम मध्ये हि लाऊ  शकतात. तसेच तुम्ही तुमच्या गाडीमध्ये ही लावू शकतात. गाडी मध्येही एसीच्या वास, तसेच कुबट असा वास असेल, तर याच्या वापराने तो वास नाहीसा होतो, व मनाला अगदी फ्रेश व ताजेतवाने वाटते. 

कापूर दाणी :-

कापूर दाणी ही कोरोना आल्यापासून हल्ली मार्केटमध्ये कुठेही मिळते आहे. कारण कोरोना सारखे तसेच बाहेरील इन्फेक्शन हे कापूर दाण्याच्या सुवासाने नष्ट होतात. ही कापूर घालून तयार केलेली असते ती तुम्हाला कुठेही मेडिकल स्टोअर्समध्ये मिळू शकते. ही लावलाने घरात कापुरचा सुहासही जाणवतो, आणि मनाला ताजेतवाने वाटते. तसेच कापूर वास घेतल्याने, श्वासाचे क्रियेमध्ये सुधार होतो. सर्दी- कफ सारख्या समस्या होत नाही. 

वाचा  सिझेरियन डिलिव्हरी म्हणजे काय त्याबद्दल काही शंका-कुशंका जाणून घेऊयात

तर मित्रांनो, असे काही एअर फ्रेशनर ची आम्ही तुम्हाला माहिती दिलेली आहेत. त्यांचा वापर करून बघा आणि आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. 

एअर फ्रेशनर वापरतानाही काळजी जरूर घ्यावी ? 

वरील दिलेल्या माहितीमध्ये, आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहेत, की एअर फ्रेशनर वापरल्याने तुम्हाला कोणत्या प्रकारचे फायदे होतात. तसेच एअर फ्रेशनर वापरण्यापूर्वी, तुम्ही काळजी जरूर घ्यावी. कारण एअर फ्रेशनर मध्ये गॅसेसचे प्रमाण असते. तसेच जर तुम्ही किचन मध्ये स्वयंपाक घरामध्ये एअर फ्रेशनर मारले, तर घरात आग लागण्याची शक्यता असते, ही काळजी घ्यावी. कारण  एअर फ्रेशनर आगीशी संबंध आल्यावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. तसेच एअर फ्रेशनर मारतांना, हे कोणाच्या नाका तोंडाजवळ मारू नये, कोणी नसताना मारावे. वापरतांना लहान मुलांपासून दूर ठेवावे. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला घरात एअर फ्रेशनर मारल्याने, तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात, ते सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितल्या लेख तुम्हाला आवडला असेल, व आम्ही सांगितलेल्या लेखांमध्ये तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here