कडुलिंबाच्या पानाचे फायदे

0
1418
कडुलिंबाच्या पानाचे फायदे
कडुलिंबाच्या पानाचे फायदे

नमस्कार, मित्रांनो, चैत्र महिन्याचे आगमन हे गुढीपाडव्याचे होते. गुढीपाडवा चा मुहूर्त आला की, घरोघरी, दारोदारी कडू लिंबाचे पत्ते गुढीला लावले जातात. चैत्र महिन्याची पहाट कडुलिंबाच्या पानापासून आपल्या घरादारावर शोभून दिसते. कडूलिंब हे आयुर्वेदिक वनस्पती असल्यामुळे, त्याला खूप मान आहेत. हल्ली गावोगावी, घरोघरी, आपल्या परिसरात कडुनिंबाची झाडे सगळ्यांनीच बघितली असेल. कडुनिंबाची झाडे आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरतात. कडू लिंबाचे पाने ही चवीला कडू असतात, पण त्याचे गुणधर्म फार असतात. कडूलिंबाचे फळ झाड हे सगळे बहुगुणी उपयोगी आहेत. कडूलिंब हा उष्णता शोषून घेण्याचे काम करतो.

म्हणूनच तर त्याचे आयुर्वेदिक वनस्पती मध्ये, त्याचा वापर करण्यात येतो तसेच कडुलिंबाच्या पानांचा वापर सौंदर्यावर ही आपला फार फायदेशिर ठरतो. पूर्वीच्या काळापासून कडुलिंबाचा उपयोग, आपल्या आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. पूर्वीचे लोक घरगुती उपाय म्हणून, कडूलिंबाचा वापर करायचे. तसेच हल्ली वाढत्या वयामध्ये, तरुण-तरुणींनी कडूलिंबाच्या पानाचा उपयोग केला, तर त्यांना खूप फायदे होतात. तर मित्रांनो, अनेकांना कडुलिंबाच्या पानांचे फायदे माहिती नसतात. तर आज आपण याच बाबतीत जाणून घेणार आहोत, कडुलिंबाच्या पानाचे फायदे आपल्या आरोग्यासाठी कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकतात ? चला तर जाणून घेऊयात ! 

कडूलिंबाच्या पानांचे फायदे नेमके कोणकोणते? 

कडूलिंबाचे पान आपल्यासाठी खूप फायदेशीर असतात. चला तर मग जाणून घेऊयात. 

कडूलिंब मधील गुणधर्म :

मित्रांनो कडुलिंबाच्या पानामध्ये ऑंटीफंगल, अँटिबायोटिक्स, ऑंटी इन्फेक्शनल, अँटीव्हायरल गुणधर्म असतात. त्यामुळे ते आपल्या शारीरिक समस्येवर फार फायदेशीर ठरतात. 

दात व हिरड्यांवर फायदेशीर ठरते :

ज्या लोकांचे हिरड्या सुजतात, व त्यातून रक्त येते, तसेच दात दुखतात, दात सळसळ करतात, दातांमध्ये किडे झाले असतील, अशा वेळी त्यांनी त्यांच्या आरोग्यामध्ये, कडूलिंबाचा वापर करायला हवा. त्यांनी कडुलिंबाच्या पाण्याने चूळ भरून ती बाहेर काढून टाकायला हवीत. तसेच कडू लिंबाची काडी दंतकांती म्हणून वापरावे, त्यांनी कडू लिंबाची काडी तोडून, तिला वरतून थोडे सोलून, तासून त्या काडीने ब्रश करतो, तशा प्रकारे दातांवर घासावेत. त्यामुळे दातांमधील इन्फेक्शन, हिरड्यांवरील सूजही कमी होण्यास मदत मिळते.पूर्वीच्या काळापासून हा उपयोग केला जात आहेत, आणि तो प्रभावशाली ही आहे. 

वाचा  चिडखोर मुलांना कसे हाताळावे

फंगल इन्फेक्शन झाल्याचा फायदेशीर ठरते :

काही लोकांच्या अंगावर सारखी खाज येणे, त्यावर लाल रॅशेश होणे, तसेच त्या जागेची आग होणे, जळजळ होणे, यासारख्या समस्या असतात. त्यांना कसली ॲलर्जी झाली असेल, तरी त्या जागेवर खाज येते, व तिथे दुखते. अशा वेळी त्यांनी कडूलिंबाचा वापर, त्यांच्यासाठी करायला हवा. अंगावर फंगल इन्फेक्शन कुठेही असेल, त्या ठिकाणी त्यांनी कडूलिंबाची पाने वाटून, त्यात चिमूटभर हळद टाकून ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झाले आहे, त्याठिकाणी तो लेप लावावा. त्यामुळे त्याचे इन्फेक्शन पसरत नाही, व ते लवकर जाण्यास मदत मिळते. शिवाय कडुलिंबाची वीस ते पंचवीस पाने आंघोळीच्या पाण्यात उकळून, त्या पाण्याने अंघोळ करावीत. त्यामुळे फंगल इन्फेक्शन पसरत नाही व लवकर जाते. 

जखम असल्यास भरून निघते :

अंगावर लागणे, कापले जाणे, तसेच कुठे जखम असेल, किंवा भाजल्याचे डाग असतील, अशावेळी कडुलिंबाची पाने फायदेशीर ठरतात. त्यामुळे ते लवकर जाण्यास मदत मिळते. त्यासाठी तुम्हाला दहा ते पंधरा कडूनिंबाची पाने वाटून, त्यामध्ये हळद यांचे मिश्रण करून, ज्या जागेवर तुम्हाला लागले असतील, किंवा काही असतील, तर त्या जागेवर लावावेत. असे नियमित केल्यास ती जखम लवकर भरून निघण्यास मदत मिळते आणि कडूलिंब हा ऑंटी इन्फेक्शनल असल्यामुळे, त्याचे इन्फेक्शन तुम्हाला होत नाही. 

तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते :

ज्या लोकांना सारखे व्हायरल इन्फेक्शन होते, सतत आजारी पडतात. अशा लोकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असणे, असे असते. कडूलिंबा मध्ये ऑंटीबॅक्टरियल, ऑंटीव्हायरल इन्फेक्शन वर मात करण्याची क्षमता असते. त्यामुळे तुमच्या शरीरात कोणतेही व्हायरल इन्फेक्शन लवकर होत नाही. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत मिळते. त्यासाठी तुम्ही नियमित तीन ते चार कडुलिंबाची पाने खावीत, व त्यावर कोमट पाणी प्यावेत. 

तुमचे शरीर रिटॉक्स होते व रक्त शुद्ध होते :

आपले शरीरातील रक्त शुद्ध राहिले, तर आपण निरोगी राहतो. आपल्याला शारीरिक समस्या लवकर होत नाही, अशा वेळी तुम्ही तुमच्या आहारात कडूलिंबाचा वापर करायला हवा. कारण कडुलिंबाच्या पानांमध्ये खूप गुणधर्म असतात, ते आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच कडुलिंबाची पानांचे सेवन केल्यामुळे, तुमच्या शरीरातील सगळी घाण बाहेर डिटॉक्स होते, व तुमचे रक्त शुद्ध होण्यास मदत करते. त्यासाठी तुम्हाला नियमित कडुलिंबाची पाने व त्यामध्ये तीन ते चार थेंब मध, यांचे एकत्र मिश्रण करून पाण्याबरोबर प्यावेत. त्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. 

वाचा  कोथिंबीरीचे फायदे

डायबिटीस चा धोका टळतो :

तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमित कडूलिंबाच्या पानांचे सेवन केले, तर तुम्हाला मधुमेह म्हणजे डायबेटीस चा धोका टळतो. डायबेटीस सहसा करून तुमच्या रक्तामध्ये साखरेची पातळी वाढली, तर होतो. तर मग कडुलिंबाची पाने हे रक्तातील साखरेचे पाणी पातळी ही नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे तुम्हाला त्यावर आराम मिळतो. 

ज्यांना गुडघेदुखी तसेच संधिवाताचा त्रास आहे त्यांना फायदेशीर ठरते :

कडूलिंबा मध्ये अँटिबायोटिक्स गुणधर्म असतात. तसेच ज्या लोकांना गुडघेदुखी, तसेच संधिवाताचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ते फायदेशीर ठरते. अशा वेळी त्यांनी कडुलिंबाचे तेल घेऊन, त्याने तुमच्या गुडघ्यांवर, तसेच सांध्यांवर मसाज करावा. त्यामुळे तुमच्या नसा मोकळ्या होतात, व तुम्हाला तो त्रास कमी होतो. कडुलिंबाचे तेल हे तुम्हाला मेडिकल स्टोअर्स मध्ये मिळेल, तसेच आयुर्वेदिक भंडार मध्ये ही मिळेल. 

कॅन्सरचा धोका टळतो :

कडूलिंबा मध्ये ऑंटीबॅक्टेरियल तसेच ऑंटीॲक्सिडेंट, ऑंटीफंगल इन्फेक्शन गुणधर्मांमुळे ते आपल्याला फायदेशीर ठरते. त्यामुळे आपल्याला कॅन्सरचा धोका टळतो, कारण या सर्व गुणधर्मामुळे ते आपल्या कॅन्सरच्या पेशीवर प्रतिबंध करतो, त्यामुळे आपल्या कॅन्सरच्या पेशी जागृत होत नाही. व आपण आपण त्याच्या पासून आपला बचाव होतो. 

पोटातील जंतू जातात :

हल्ली लहान मुलांच्या पोटात जंत होणे, हे  स्वभाविकच आहे, पण त्यामुळे मुले जेवत नाही. पोटात दुखतात, तसेच संडास साफ होत नाही, कारण त्यांची सवय असते, की कोणतेही गोष्ट  तोंडात घालने, तसेच माती खाणे, खडू खाणे, पेन्सिल खाणे, तसेच गोड पदार्थ जास्त खाणे, चॉकलेट जास्त प्रमाणात खाणे, या साऱ्या गोष्टींमुळे जंतू होणे हे स्वाभाविकच असते. अशावेळी तुम्ही त्यांना कडुलिंबाचे चार ते पाच पाने वाटून, ते एक ग्लास पाण्यात मिक्स करून, त्यात थोडं म टाकून, ते पाणी मुलांना प्यायला द्यावेत. त्यामुळे जंतू असतील, तर ते बाहेर निघतात व मुलांना आराम मिळतो. 

चेहऱ्यावरील फुटकुळ्या असतील तर जातात :

हल्ली वाढत्या वयामध्ये किशोर वयामध्ये, तरुण-तरुणींना चेहऱ्यावर फुटकुळ्या होतात. मुरूम होतात, तसेच ज्यांची तेलकट त्वचा असते, त्यांची त्वचा काळवंडते. त्यांनी त्यांच्या आहारामध्ये कडूलिंबाच्या पानांचे उपयोग करायला हवा, त्यांना फायद्याचे ठरते. चेेहऱ्यावर काळे डाग असतील, तर तेही जाण्यास मदत मिळते. त्यासाठी त्यांनी दहा ते पंधरा कडुलिंबाचे पाने वाटून, त्यामध्ये चिमूटभर हळद घालून, थोडे मध, गुलाबजल, तसेच मुलतानी माती, यांचे मिश्रण एकजीव करून, चेहर्‍याला 20 ते 25 मिनिटे लावावेत. नंतर थंड पाण्याने धुवावेत. असे त्यातून तीन ते चार वेळेस केल्यास, त्यांच्या चेहऱ्यावरील डाग, मुरूम, पुटकुळ्या, या कमी होऊन, मुलायमपणा व चमकदारपणा येतो, शिवाय रंगही उजळतो. 

वाचा  कानातील मळ काढण्यासाठी उपाय

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते :

हल्ली वाढत्या प्रदूषणामुळे, बदलत्या जीवनशैलीमुळे, तसेच शरीरातील हार्मोन्स बदलामुळे, त्याचा परिणाम आपल्या केसांवरही होतो. तसेच अकाली केस गळणे, तुकडे पडणे, फाटे फुटणे, केसांमध्ये कोंडा होणे, यासारख्या समस्या भरपूर प्रमाणात बघावयास मिळतात. अशा वेळी कडूलिंबाचे पान हे फायदेशीर ठरतात. त्यासाठी त्यांनी तीस ते पस्तीस कडूलिंबाची पाने वाटून, त्यामध्ये दही मिक्स करून, हा लेप तुमच्या केसांवर लावल्यास, तुमच्या केसांमधील समस्या दूर होते. शिवाय टाळू मध्ये फोड असेल, तर तेही जाण्यास मदत होते. तसेच केसांमधील कोंडा कमी होतो. शिवाय तुमचे केस मुलायम व चमकदार होतात. करून बघा फार प्रभावशाली उपाय आहे. 

घरातील धान्य मध्ये कीड लागत नाही :

हल्ली आपण धान्य पुरवठा करून ठेवतो, म्हणजे धान्याचा साठा करून ठेवतो. जसे की डाळ-तांदूळ, हरभरे, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, मुंग, यासारखे धान्य आपण भरून ठेवतो. त्यामध्ये कीड लवकर लागते. तसेच वातावरणातील बदलामुळे, त्याचा परिणाम आपल्या धान्यावर होतो. त्यामुळे त्यामध्ये आळ्या हि होतात. अशा वेळी जर तुम्ही कडुलिंबाचा पाला तुमच्या धान्यामध्ये टाकला, तर तुमचे धन्य हे वर्षानुवर्षे टिकतात. शिवाय त्यामध्ये कीड व आळ्या होत नाही. 

कानामध्ये मळ असल्यास ती बाहेर निघण्यास मदत मिळते :

काही लोकांच्या कानामध्ये मळ असतो, त्यामुळे तो ठणकतो, तसेच त्या कारणाने कमी ऐकायला येते. त्यावेळी कानातला मळ काढण्यासाठी, जर तुम्ही कडुलिंबाचे तेल वापरले, तर मग भिजून लवकर बाहेर येण्यास मदत मिळते. शिवाय त्याची इन्फेक्शन होत नाही. तसेच तुम्ही कडुलिंबाची पाने उकळून ते पाणी वस्त्रगाळ करून, तुम्ही कानात टाकल्यास कानातील मळ भिजून बाहेर निघतो व कान मोकळा होतो. 

टिप:- वरील दिलेली माहिती आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेतच. कडू लिंबाचे पान वापरल्याने तुम्हाला फायदे होतातच, पण त्याचा उपयोग करण्यापूर्वी, तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला घेऊन घ्यावा. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला कडू लिंबाचे पाने वापरल्याने, तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात, ते सांगितलेले आहेतच. पण ज्यांना कडूलिंबाच्या पानापासून एलर्जी वगैरे असेल, तसेच, आम्ही सांगितलेल्या उपायांमध्ये, उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तसेच आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगावेत. 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here