शारीरिक कसरत करण्याचे फायदे !

0
484
शारीरिक कसरत करण्याचे फायदे
शारीरिक कसरत करण्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊ शारीरिक कसरत करण्याचे फायदे ! हल्लीचे जग हे खूपच धावपळीचे आहे. प्रत्येकजण कामाच्या धावपळीत कामाच्या अतिरिक्त ताणतणावामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. तर काहीजण हे आपल्या शरीराचे आरोग्य स्वास्थ्य हे चांगले असावे यासाठी प्रयत्न करत असतात. आपल्या शरीराचे आरोग्य स्वस्त असावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या नियमित च्या आहारामध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या, फळभाज्यांचा, ड्रायफ्रुट्स तसेच फळांचा समावेश करायला पाहिजे.

जर तुम्ही नियमित हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करत असेल फळभाज्या खात असाल शिवाय नियमित एका फळाचे तरी सेवन करत असाल, तर यामुळे तुमच्या शरीराचे आरोग्य हे दीर्घकाळ चांगले राहण्यास मदत होऊ शकते.आपले शारीरिक स्वास्थ्य हे दीर्घकाळापर्यंत चांगले असावे, यासाठी आपण आपल्या नेहमीच्या आहारामध्ये योग्य त्या पोषक तत्वांचा, पोषक घटकांचा, पालेभाज्यांचा, प्रोटिन्स, लोहयुक्त पदार्थांचा समावेश आवर्जून करायला हवा. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रकारे असावी व ती चांगल्या पद्धतीने क्षमतेने वाढावी, यासाठी देखील आपण व्यायामाचा सराव देखील करायला हवा.

आपण सकाळी लवकर उठून दिवसाची सुरुवात ही व्यायामाने केले तर अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होण्यास मदत होते. कोरोना काळात एक गोष्ट मात्र नक्की समजली, की आपले शारीरिक स्वास्थ्य याशिवाय इतर कुठलीही गोष्ट महत्वपूर्ण नाही. आपल्या शरीर स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या चांगल्या पटीने वाढली पाहिजे तसेच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही योग्य प्रमाणात असली पाहिजे जेणेकरून आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो जर तुम्ही नियमित व्यायामाच्या सराव करत असेल तर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत असते.

तर मित्रांनो आज आपण शारीरिक कसरत करण्याचे फायदे या विषयाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला, तर मग शारीरिक कसरत करण्याचे फायदे कोणते होऊ शकतात? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  छातीत धडधडणे घरगुती उपाय

शारीरिक कसरती करण्याचे होणारे फायदे :-

आपले शारीरिक स्वास्थ्य चांगले असावे. शिवाय आपले शरीर हे लवचिक असावे यासाठी आपण शारीरिक कसरती करणे आवश्यक ठरते. शारीरिक कसरती केल्यामुळे कोणत्या प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात याबद्दल आपण आता जाणून घेऊयात.

  1. पहाटे लवकर उठून जर तुम्ही नियमित व्यायामाचा सराव केला, शारीरिक कसरती केल्यात तर, तुमचे शरीर हे लवचिक होण्यास तर मदत होतेच शिवाय तुमच्या शरीरातील ऊर्जेचे प्रमाण देखील व्यवस्थित राहण्यास मदत होत असते.
  2. नियमित शारीरिक कसरतींचा सराव केल्यामुळे आपल्या शरीरांमध्ये पुरेशी ऊर्जा तयार होते त्याचप्रमाणे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होत असते. अनेक प्रकारचे आजार शिवाय संसर्गजन्य रोग होऊ नये यासाठी आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रकारे असावी लागते. तर नियमित व्यायाम यांचा सराव व शारीरिक कसरती केल्या तर तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या शब्दाने वाढण्यास मदत होऊ शकते.
  3. नियमित शारीरिक कसरती केल्यामुळे आपले शरीर हे लवचिक बनते. शिवाय,आपण कुठलेही काम करायला गेलो अथवा कुठलेहीकाम आपण हाती घेतलेले असेल तर ते न थकता सहज रित्या आपण पूर्ण करू शकतो. शारीरिक कसरती केल्यामुळे आपल्या शरीरातील थकवा देखील निघून जाण्यास मदत होत असते.
  4. नेहमीच शारीरिक कसरती केल्यामुळे आपली भुक देखील वाढण्यास मदत होत असते. अनेक लोकांना भूक न लागण्याची समस्या येत असते. तर अशा लोकांनी नियमित शारीरिक कसरती करणे गरजेचे ठरते. जेणेकरून त्यांची भूक ही मरणार नाही. शरीराच्या कसरती केल्यामुळे भूक देखील वाढत असते. 
  5. बऱ्याच लोकांना त्यांच्या शरीराचे वजन वाढीमुळे समस्या येत असतात. खाल्लेले अन्न व्यवस्थित बसले नाही म्हणजेच पचन क्रिया ही मंदावली तर आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमत असते. म्हणजेच खाल्लेल्या अन्नाचे पचन न होता त्याचे शरीरामध्ये चरबी मध्ये रूपांतर होत असते. कालांतराने आपल्या शरीराचे वजन अधिक वाढते आणि लठ्ठपणा देखील येऊ शकतो. जर तुम्ही नियमित शारीरिक कसरती करत राहिलेत तर तुमच्या शरीराची पचनक्रिया हे देखील सुरळीत व व्यवस्थित सुरू होण्यास मदत होऊ शकते. शरीराचे पचन क्रिया हे व्यवस्थित असेल तर खाल्लेल्या अन्नाचे लवकर पचन होते व त्यामुळे लठ्ठपणा येत नाही.
  6. बरेच जण लठ्ठपणा या त्रासामुळे त्रासलेले असतात. जर तुम्ही नियमित सराव करत असाल शारीरिक कसरती करत असाल तर त्यामुळे तुमचा लठ्ठपणा जाण्यास मदत होऊ शकते शिवाय अधिक वाढलेले वजन हे कमी होण्यास मदत होऊ शकते.
  7. नियमित शारीरिक कसरती केल्यामुळे तुमच्या शरीराचे आरोग्य देखील सुधारते शिवाय, तुमच्या सौंदर्यामध्ये देखील भर पडतो. शरीर हे सुडोल बनते. शरीराची त्वचा हे कांतिमान होण्यास मदत होत असते. तुमच्या शरीराची तसेच चेहऱ्याची त्वचा हे मऊ मुलायम होण्यास देखील मदत होऊ शकते. चेहऱ्याचे सौंदर्य देखील वाढण्यास मदत होत असते.
  8. शारीरिक कसरती केल्या मुळे तुमच्या केसांचे आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होते केस निरोगी होतात. शारीरिक कसरती केल्यामुळे एक प्रकारे एनर्जी आपल्या शरीराला मिळत असते. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचे ब्लड सर्कुलेशन हे व्यवस्थित सुरळीत चालते. यामुळे शरीरातील प्रत्येक अवयव आम पर्यंत सर्व भागांमध्ये रक्ताचे संचरण होत असते त्याचप्रमाणे आपल्या केसांचे आरोग्य देखील सुधारते केस गळती समस्या कमी होते. शिवाय, केस घनदाट व काय बोर तसेच लांबसडक होण्यासाठी देखील मदत होऊ शकते.
  9. शारीरिक कसरती केल्यामुळे अनेक रोगांपासून आपण दूर राहू शकतो अनेक आजारांपासून आपले संरक्षण होऊ शकते.
  10. नियमित शारीरिक कसरती केल्यामुळे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रित राहण्यास मदत होते. आपण कुठलाही गोड पदार्थ खाल्ला, आणि त्यानंतर जर आपण बसूनच राहिलोत, शारीरिक कसरती केल्या नाहीत. थोडीही हालचाल केली नाही तर त्याचे रूपांतर हे चरबीमध्ये होत असते. शिवाय आपल्या रक्तातील साखर देखील वाढू लागते. जर तुम्ही नियमित शारीरिक कसरती करत असाल तर तुम्ही डायबिटीस या आजारापासून देखील दूर राहू शकतात.
  11. शारीरिक कसरती केल्यामुळे शरीरातील अवयवांचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. ज्यामुळे आपली काम करायची क्षमता यामध्ये वाढ होण्यास मदत होते. कुठलेही कार्य आपण तत्परतेने कमी वेळात करू शकतो.
  12. नेहमीच शारीरिक कसरती केल्यामुळे आपल्या शरीराचे आरोग्य तसेच, सौंदर्य देखील वाढीस लागते.
  13. शारीरिक कसरती,हालचाली केल्यामुळे आपला ताणतणाव तसेच मानसिक टेन्शन कमी होण्यास देखील मदत होत असते.
  14. नेहमीच शारीरिक कसरती केल्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. शरीरातला आत्मविश्वास वाढण्यास देखील मदत होत असते.
  15. शारीरिक कसरती केल्या मुळे आपल्या शरीराला एक योग्य आकार येण्यास मदत होत असते शिवाय ज्या लोकांची लहान मुलांची उंची कमी असेल तर त्यांनी नियमित शारीरिक कसरती केल्यामुळे त्यांची उंची देखील वाढण्यास मदत होत असते.
वाचा  पायातील अंगठ्यामध्ये नखोला होणे म्हणजे काय?

तर मित्रांनो, नेहमीच शारीरिक कसरती केल्यामुळे आपल्या शरीराचे आरोग्य सुधारते शिवाय आपल्या शरीराला योग्य येण्यास मदत होते म्हणजेच शरीर हेच सुडोल बनते. शिवाय नियमित शारीरिक कसरती केल्यामुळे, अनेक आजारांपासून आपले संरक्षण होत असते. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमताही चांगल्या पद्धतीने वाढण्यास मदत होत असते.

तुम्हालाही तुमच्या आरोग्य चांगले राहावे सुदृढ राहावे असे वाटत असेल तर तुम्ही नियमित शारीरिक कसरतींचा सराव केला पाहिजे. जेणेकरून तुम्ही दीर्घकाळापर्यंत तरुण दिसाल. नियमित शारीरिक कसरत केल्या मुळे तुम्ही दीर्घकाळ तरुण तर दिसालच त्याचप्रमाणे,कुठलेही आजार होण्याची शक्‍यताही कमी प्रमाणात असेल. आपली शरीराची काम करण्याची कार्यक्षमता देखील वाढण्यास मदत होते.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here