एंडोस्कोपी म्हणजे काय?

0
142
एंडोस्कोपी म्हणजे काय?
एंडोस्कोपी म्हणजे काय?

नमस्कार मित्रांनो. आजच्या या वैज्ञानिक जगामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रियेच्या पद्धतीने निघालेल्या आहेत. कुठल्याही समस्येवर निदान करण्यासाठी त्या समस्येनुरूप शस्त्रक्रिया केली जात असते. या जगामध्ये असे अनेक व्यक्ती आहे ज्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारची समस्या ही येत असते. परंतु या वैज्ञानिक जगामध्ये प्रत्येक समस्येसाठी उपाय देखील असतो किंबहुना तो शोधला जात असतो आणि त्यावर शस्त्रक्रिया केली जात असते. मित्रांनो, आज आपण एंडोस्कोपी या पद्धती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. एंडोस्कोपी म्हणजे काय? ती कधी करतात? एंडोस्कोपी कशासाठी करावी लागते? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.एंडोस्कोपी हे नाव आपण बऱ्याच वेळा ऐकलेले असते. परंतु, ही नेमकी कुठली पद्धत असते? ही कुठली शस्त्रक्रिया असते? याबद्दल आपला फारसे माहीत नसते. शिवाय, एंडोस्कोपी यामध्ये देखील वेगळे प्रकार असतात प्रत्येक समस्यानुरूप एंडोस्कोपी ही त्या प्रकारानुसार केली जात असते. चला तर मग एंडोस्कोपी म्हणजे काय याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

एंडोस्कोपी म्हणजे काय?

एंडोस्कोपी यामध्ये पोटावर एक छिद्र केले जात असते. पोटावर छिद्र केल्यानंतर त्या वाटे एक दुर्बीण आत मध्ये टाकली जाते. आणि त्यानंतर कार्बन डाय-ऑक्साइड ने पोट फुगवले जात असते. दुर्बिणी द्वारे प्रकाशाच्या साह्याने पोटामधील निरीक्षण केले जाते आणि जर काही समस्या असेल तर त्यासाठी पोटावरच्या नाभी व तसेच अजून एक ते दोन छिद्र करून त्या वाटे शस्त्रक्रिया ही केली जात असते. एकंदरीत एंडोस्कोपी या शस्त्रक्रियेमध्ये पोटावर दोन किंवा तीन छिद्रे करून त्याची ऑपरेशन केले जात असते. त्यामुळे, पेशंटला वेदना या देखील अगदी कमी प्रमाणात होतात. तसेच पेशंटला हॉस्पिटलमध्ये जास्त दिवसही राहावे लागत नाही आणि या शास्त्रक्रियेनंतर पोटावर काही दिवसानंतर डागही दिसत नाहीत.

कधी कधी अचानक आपले पोट दुखू लागते. आपल्या पोटामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे अवयव असतात. आणि पोटदुखी ही नेमकी का होते हे देखील आपल्याला लवकर कळत नाही. पोट दुखी चे कारण शोधण्यासाठी सोनोग्राफी, सिटीस्कॅन अजून वेगवेगळ्या पद्धती अवलंब करूनही जर पोटदुखीचे कारण समजत नसेल तर अशा वेळेस आपल्याला एन्डोस्कोपी चा आधार घ्यावा लागतो. एन्डोस्कोपी यामध्ये दुर्बीण आणि कॅमेरा असलेली नळी तोंडावटे अथवा गुदाद्वारे आत टाकली जाते ही नळी एवढी लवचिक असते की अगदी ती पचन नलिकेच्या आत मध्ये देखील डोकावून बघू शकते. जेणेकरून, समस्या काय आहे हे आपला नेमके कळू शकते. हल्ली तर विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की छोट्याशा दुर्बिणीद्वारे कॅमेरा मधून देखील शरीराच्या आतील भागाचे फोटोज टीव्हीवर अगदी सहजरीत्या बघता येतात आणि त्याचे निदानही करता येते. तरीही सर्व प्रक्रिया एन्डोस्कोपी मध्ये केली जात असते जेणेकरून, समस्येवरील निदान करता येते.

वाचा  सायकलिंग मुळे होणारे फायदे

 फार पूर्वीच्या काळातही ही एंडोस्कोपी शस्त्रक्रिया केली जात असे. विशेषतः जर एखादी महिला ही आई होत नसेल तिला वंधत्व आलेले असेल, तर यासाठी एंडोस्कोपी ची मदत घेऊन शस्त्रक्रिया करून त्या समस्येवर निदान केले जात असे. तसेच, कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशन साठी देखील या पद्धतीचा वापर केला जात असे.

एंडोस्कोपी म्हणजे काय?
एंडोस्कोपी म्हणजे काय?

एंडोस्कोपी चा वापर कोणत्या समस्येसाठी केला जातो? : Endoscopy Cha Use Kontya Samsyesathi Kela Jato

एंडोस्कोपी चा वापर हा अनेक प्रकारच्या समस्यांसाठी केला जातो जसे की,

  • गर्भाशयावर सूज अथवा गाठी आल्या असतील तर एंडोस्कोपी द्वारे त्या काढल्या जात असतात.
  • गर्भाशयाच्या भोवताली जर रक्त जमा होऊन गर्भनलिका आतडे हे जर चिकटले असतील तर वंधत्वाची समस्या येत असते. तर या समस्येच्या निदानासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते.
  • जर गर्भाशय हे त्याच्या जागेवरून सरकले असेल, तर ते पूर्ववत करण्यासाठी देखील एंडोस्कोपी चा वापर केला जातो.
  • बऱ्याच महिलांना फायब्रॉइड च्या गाठींची समस्या येत असते आणि या समस्येमुळे अति प्रमाणात पोट दुखी होऊ लागते आणि ब्लीडिंग देखील जास्त होत असते. तरी या गाठी काढण्यासाठी देखील दुर्बिणीचा चा वापर केला जातो.

मित्रांनो, अशा सर्व प्रकारच्या समस्यांवर एन्डोस्कोपी केली जात असते त्या समस्येवरील त्या आजारावरील कारण शोधून त्याचे निदान केले जात असते.

एन्डोस्कोपी देखील अनेक प्रकार आहेत. जर एखाद्या व्यक्तीला ऍसिडिटी रक्ताच्या उलटा या प्रकारच्या समस्या असतील तर त्या व्यक्तीसाठी जठराची एन्डोस्कोपी करून त्यावर निदान केले जाते. त्याचप्रकारे कोलोनोस्कोपी, कॅप्सूल एंडोस्कोपी, अशा अनेक प्रकारच्या एंडोस्कोपीचे प्रकार आहेत. एकंदरीत व्यक्तीच्या समस्येवरील निदान करण्यासाठी त्या व्यक्तीच्या समस्येनुरूप एन्डोस्कोपी केली जात असते.

तर मित्रांनो, एंडोस्कोपी म्हणजे काय? एंडोस्कोपी कशासाठी वापरली जाते? कुठल्या प्रकारच्या समस्यांचे निदान या पद्धतीद्वारे केले जाते? याबद्दल आपण जाणून घेतलेले आहे. मित्रांनो, आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

वाचा  ज्येष्ठमध खाल्ल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here