अंगावरून पांढरे जात असेल तर

0
118
अंगावरून पांढरे जात असेल तर
अंगावरून पांढरे जात असेल तर

नमस्कार मित्रांनो. महिलांना वाढत्या वयानुरूप एक ना अनेक प्रकारच्या समस्या उद्भवत असतात आणि या समस्यांचे निदान करण्यासाठी ते डॉक्टरांची मदत घेत असतात किंवा स्त्री रोग तज्ञांकडे जाऊन मार्गदर्शन अथवा उपचार देखील घेत असतात. महिलांना समस्या म्हटल्यात तर अनेक प्रकारच्या या समस्या येत असतात. त्यातीलच एक समस्या ती म्हणजेच अंगावरून पांढरे जाणे या समस्येबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.बऱ्याच महिलांना याबद्दल तक्रार असते. अनेकांना ही समस्या उद्भवत असते. महिलांना पाळी येण्यापासून तर पाळी बंद होईपर्यंत म्हणजेच रजो निवृत्तीपर्यंत शिवाय त्यानंतरही एक ना अनेक प्रकारच्या  समस्यांना सामोरे जावे लागत असते. अंगावरून पांढरे जाणे ही देखील एक मोठी समस्या असून जर या समस्या कडे दुर्लक्ष केले तर त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. तर मित्रांनो, अंगावरून पांढरे जात असेल तर ही समस्या निर्माण का होते? या समस्येची काय कारणे असू शकतात? शिवाय, या समस्येवर आपण कुठल्या प्रकारची उपाय करू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊया!

अंगावरून पांढरे जाण्याची कारणे:-

मुलगी ही जसजशी मोठी होते तसतसे वाढत्या वयानुरूप तिला अनेक प्रकारच्या समस्यांना देखील सामोरे जावे लागत असते. आणि पाळी आल्यानंतर देखील अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अनेक महिलांना  अंगावरून पांढरे जाण्याची समस्या येत असते. अंगावरून पांढरे जाणे म्हणजे योनीमार्गातून एक चिकट पांढऱ्या रंगाचा स्राव निघत असतो, यालाच अंगावरून पांढरे जाणे असे म्हटले जाते. अंगावरून पांढरे जाणे आणि पुन्हा ते बंद होणे असे असल्यास ही समस्या फारसी मोठी नसते. परंतु, जर बऱ्याच काळापासून अंगावरून पांढरे जात असेल आणि तेही जास्त प्रमाणात जात असेल,तर ती गंभीर बाब असू शकते. म्हणून यावर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच उपचार घेतलेले बरे. अंगावरून पांढरे झाल्यावर या मागील अनेक प्रकारचे कारणे असू शकतात जसे की, शारीरिक संबंध ठेवल्यामुळे अंगावरून पांढरे जाण्याची समस्या येत असते. गर्भधारणेनंतर इस्ट्रोजेनचे प्रमाण हे कमी झाले आणि प्रोजेस्ट्रोन चे प्रमाण वाढले, तर त्यामुळे ही समस्या येत असते. यामुळे देखील अंगावरून पांढरे जाण्याची समस्या येत असते. अंतर्गत जागेची स्वच्छता न घेतल्यामुळे देखील ही समस्या निर्माण होऊ शकते. गर्भपात झाल्यानंतर देखील अंगावरून पांढरे जाण्याची समस्या येत असते.

वाचा  छोटी-मोठी कामे केल्यानंतर धाप लागणे कारणे आणि घरगुती उपाय :-

काही तज्ञांच्या मतानुसार, थोड्याशा प्रमाणात जर अंगावरून पांढरे जात असेल, तर ही एक सामान्य जाते. कारण, यामुळे गर्भपिशवीतील मृत पेशी या बाहेर टाकल्या जात असतात. तसेच त्यामुळे योनी मार्गाचे देखील संरक्षण होण्यास मदत होते आणि शरीरातील केमिकल्स हे देखील योग्य प्रमाणात राहण्यास मदत होत असते. परंतु, जर हे प्रमाण जास्तीचे असेल, तर मात्र ही गंभीर स्वरूपाची बाब असू शकते. जर योनी मार्गात जंतुसंसर्ग झाला असेल तर अंगावरून पांढरे जाणे याचा रंगही पिवळसर होऊ लागतो शिवाय त्याला एक विशिष्ट प्रकारचा वासही येऊ लागतो असे असल्यास, त्याला ल्युकोरिया ही समस्या म्हटली जाते. आणि अशी समस्या असल्यास डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार घेणे गरजेचे ठरते.

अंगावरून पांढरे जात
अंगावरून पांढरे जात

अंगावरून पांढरे गेल्यास महिलांना आढळणारी लक्षणे:- Symptoms

बरेच वेळा जर अंगावरून पांढरे जात असेल तर बऱ्याच महिलांमध्ये काही लक्षणे आढळून येतात जसे की,

  • डोकेदुखीची समस्या.
  • बद्धकोष्ठता.
  • मूत्रमार्गामध्ये खाज येणे.
  • अस्वस्थ वाटणे
  • खूप दमल्यासारखे होणे.
  • चक्कर येण्याची समस्या

अशा प्रकारची लक्षणे ही अंगावरून पांढरे जात असल्यास येत असतात. त्यामुळे आपण जर या समस्येवर उपचार केलेत काही घरगुती उपाय केले किंवा डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले तरी या समस्येपासून आपण दूर होऊ शकतो.

अंगावरून पांढरे जात असल्यास काही घरगुती उपाय: Gharguti Upay

अंगावरून पांढरे जात असल्यास आपण काही सोपे घरगुती उपाय करू शकतो. तर हे घरगुती उपाय कोणते? चला तर मग, याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

भेंडीच्या पाण्याचे सेवन करणे : Bhendichya Panyache Sevan

भेंडीचे पाण्याची सेवन केल्यामुळे तुम्हाला या समस्येपासून आराम मिळू शकतो आणि त्यात जर ल्युकोरिया ची समस्या असेल, तर हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरतो. त्यासाठी, शंभर ते दीडशे ग्रॅम भेंडी ही अर्धा लिटर पाण्यामध्ये भेंडीचे काप टाकून ती चांगली खळखळ उकळून घ्या. पाणी हे अर्धे होईपर्यंत उकळा आणि पाणी गार झाल्यानंतर किंवा कोमट झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा मध मिक्स करून घ्या आणि या पाण्याची सेवन करा. काही दिवस हा उपाय केल्यामुळे तुम्हाला या समस्या पासून आराम मिळेल तसेच ही समस्या दूर होण्यास मदत होईल.

वाचा  झोपेत ठसका लागणे या समस्येवर विविध घरगुती उपचार

अंजीर चे सेवन करणे : Anjirche Sevan Karne

अंगावरून पांढरे जाणे या समस्येसाठी अंजीर चे सेवन करणे हा एक आयुर्वेदिक तसेच रामबाण उपाय आहे. जर तुम्हाला ही समस्या आली असेल तर यासाठी तुम्ही चार ते पाच अंजीर हे एका बाऊलमध्ये रात्री भिजण्यास ठेवावे. सकाळी उठल्यानंतर हे अंजीर व्यवस्थितपणे सेवन करावेत आणि अंजीर चे सेवन केल्यानंतर थोडे कोमट पाणी प्यावे असे केल्यामुळे देखील एक महिन्यातच तुमची ही समस्या दूर होण्यास मदत होईल.

केळीचे सेवन करावे : Keliche Sevan Karne

जर ल्यूकोरिया ची समस्या तुम्हाला असेल, तर यासाठी तुम्ही केळीचे सेवन करून बघू शकतात त्यासाठी एक ग्लास दुधामध्ये देसी गाईचे अर्धा चमचा तूप व्यवस्थितपणे दुधात मिक्स करून घ्यावे. त्यानंतर एक केळी स्मॅश करून दुधामध्ये मिक्स करून घ्यावी. दूध, तूप आणि केळी हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून याचे सेवन करावे. काही दिवस हा उपाय केल्यामुळे तुम्हाला या समस्येपासून आराम मिळेल ही समस्या जाण्यास मदत होईल आणि त्यासोबतच तुम्हाला जो काही शारीरिक थकवा आलेला असेल तर तो थकवा दूर होण्यासही मदत होईल.

आवळ्याच्या रसाचे सेवन करा : Aavlyachya Rasache Sevan Kara

अंगावरून पांढरे जात असल्यास अथवा ल्यूकोरियाची समस्या असल्यास तुम्ही या समस्येसाठी आवळ्याच्या रसाचे सेवन केले पाहिजे. त्यासाठी आवळा स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा एका बाऊलमध्ये आवळा स्मॅश करून त्याचा रस काढून घ्यावा या रसामध्ये अर्धा चमचा मध मिक्स करून घ्यावे आणि हे मिश्रण तयार झाल्यानंतर याचे सेवन करावे. असे दिवसातून तुम्ही दोन वेळा करावे असे केल्यास काही दिवसातच तुमच्या अंगावरील पांढरे जाणे ही समस्या दूर होण्यास मदत होईल आणि या समस्येपासून तुम्हाला आराम मिळेल.

मित्रांनो, अंगावरून पांढरे जाणे ही समस्या असल्यास आपण कुठल्या प्रकारचे घरगुती उपाय करू शकतो? याबद्दल आपण जाणून घेतले आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

वाचा  मणक्याच्या वेगवेगळ्या आजारावर व विविध समस्यांवर वेगवेगळे घरगुती उपचार :-

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here