पायाला चटका लागण्याची कारणे आणि उपाय

0
190
पायाला चटका लागण्याची कारणे आणि उपाय
पायाला चटका लागण्याची कारणे आणि उपाय

नमस्कार मित्रांनो. आपल्या आरोग्य चांगले असेल तर आपले सर्वच काम हे व्यवस्थितरित्या पूर्ण होत असतात. म्हणून आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, अनेक वेळा आपल्या अनावधानामुळे काही समस्या निर्माण होत असतात. कधी कधी आपण कामाची घाई करायला गेलात, तर त्यामुळे आपलेच नुकसान होऊन बसते. म्हणून आपण कुठलेही काम अगदी सावकाशपणे तसेच सावधगिरीने केले पाहिजेत. जेणेकरून, आपल्याला कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही परंतु, आजकालच्या या धावपळीच्या जगामध्ये आपली सतत धावपळ चाललेली असते. परंतु, या धावपळीमुळे देखील आपण आपले स्वतःचे नुकसान करून बसतो.  जसे की, ऑफिसला निघण्याच्या धावपळीमुळे जर गरम गरम चहा प्यायलात तर जिभेला चटका लागण्याची शक्यता असते. तर कधी धावपळ केल्यामुळे पडण्याची देखील शक्यता असते. तर कधी कामाच्या धावपळीमध्ये आपण अगदी आपल्या जेवणाकडे देखील दुर्लक्ष करत असतो. परंतु, यामुळे आपल्या शरीराचे तंत्र देखील बिघडू शकते.आज आम्ही तुम्हाला अशाच एका समस्या बद्दल सांगणार आहोत.पायाला चटका लागण्याची कारणे आणि उपाय याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. कधी कधी अचानकपणे आपल्याला पाहायला चटका लागण्याची समस्या निर्माण होत असते. तर ही समस्या का निर्माण होऊ शकते? यामधील काय कारणे असू शकतात? आणि या समस्येवर आपण कुठले प्रकारचे उपाय करू शकतो? चला तर मग, याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

पायाला चटका लागण्याची कारणे:-

मित्रांनो, पायाला चटका लागण्याची कारणे अनेक प्रकारचे असू शकतात. एखादा कामाच्या घाई गडबडीच्या निमित्ताने किंवा एखाद्या कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी धावपळ केल्यामुळे अंघोळ करण्यासाठी घेतलेले गरम पाणी हे थंड न करताच अचानक पायांवर पडल्यामुळे, पायाला चटका लागू शकतो पाय भाजू शकतो. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे देखील पाय भाजू शकतात. गाडीच्या सायलेन्सर चा चटका लागल्यामुळे पाय भाजण्याची शक्यता असते. गाडीचा सायलेन्सर चा चटका लागल्यामुळे 30 टक्के इतक्या प्रमाणात भाजले जात असते. अनावधानाने जर एखाद्या गरम भांड्याला पाय लागल्यामुळे देखील पायाला चटका लागू शकतो पाय भाजला जाऊ शकतो. दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाक्यांच्या अपघातामुळे देखील पाहायला चटका लागू शकतो.असे अनेक प्रकारची कारणे असू शकतात यामुळे पायाला चटका लागू शकतो. पायाला चटका लागल्यास पाय भाजला गेल्यास यावर आपण तत्काळ काही उपाय केले पाहिजेत. शरीरावर कुठेही जखम झाल्यास अथवा भाजले गेल्यास पायाला चटका लागल्यास असह्य अशा वेदना सहन कराव्या लागतात. आणि त्या जागेची भयंकर आग देखील होऊ लागते. चला तर मग यावर आपण कुठल्या प्रकारचे उपाय करू शकतो याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

वाचा  डिलिव्हरी नंतर काय खावे?
पायाला चटका लागण्याची कारणे
पायाला चटका लागण्याची कारणे

चटका लागल्यास त्यावरील उपाय:- Chataka Laglyas Tyavril Upay

पायाला चटका लागण्यामागील कोणत्या प्रकारची कारणे असू शकतात याबद्दल आपण आता जाणून घेतलेले आहे. मित्रांनो, शरीरावर कुठल्याही प्रकारे चटका लागल्यास भाजले गेल्यास तुम्ही काय उपाय करू शकतात? कुठली तुम्ही काळजी घ्यायला हवी? तर याबद्दल आपण आता माहिती जाणून घेऊयात!

 

  • पाय भाजल्यानंतर प्राथमिक उपचार म्हणून तुम्ही सर्वप्रथम पायावर थंडगार पाणी टाकावे. असे केल्यामुळे तुमच्या पायाला तुमच्या पायाला थंडावा मिळेल आणि वेदना या कमी होण्यास मदत होईल.
  • पाय भाजल्यानंतर पायांची जळजळ कमी होण्यासाठी तुम्ही मेंदीची पाने घेऊन तिला व्यवस्थित वाटून त्याचा लेप तयार करावा आणि जखमेवर लावावे असे केल्यामुळे तुमच्या पायांची जळजळ कमी होऊ लागेल.
  • पायाला चटका लागण्याची जखम ही जर जास्त असेल, तर अशा वेळेस तुम्ही तुपामध्ये जिरे पावडर मिक्स करून त्या ठिकाणी त्याचा लेप लावावा.
  • खोबरेल तेल आणि मध हे व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण पायाला भाजलेल्या, चटका लागलेल्या जागेवर लावावे
  • पायाला चटका लागलेल्या ठिकाणी तुम्ही जात्याच्या तेलाचा वापर देखील करू शकतात. असे केल्यामुळे तुमच्या पायाचा दाह कमी होण्यास मदत होईल.
  • कोरफडी ही थंड प्रवृत्तीची असते भाजलेल्या ठिकाणी तुम्ही कोरफडीचा रस हा देखील लावू शकतात असे केल्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होईल.
  • चटका लागल्या ठिकाणचा डाग घालवण्यासाठी तुम्ही डिंक पाण्यात उगाळून त्याचा लेप लावू शकतात. डिंकाचा लेप लावल्यामुळे तुमचा डाग हा जाण्यास मदत होऊ शकते.
  • पायाला चटका लागलेल्या ठिकाणी तुम्ही बटाट्याचा देखील वापर करू शकतात बटाट्याचा कीस करून त्या जखमेवर त्याचा लेप लावावा असे केल्यामुळे तुमच्या वेदना कमी होतील आणि त्या ठिकाणी थंडावा मिळेल.
  • तीळीचा देखील लेप तुम्ही भाजलेल्या ठिकाणी लावू शकतात. त्यासाठी तीळ वाटून त्याचा लेप करून घ्यावा आणि जखमेवर लावा असे केल्यामुळे तुमचा दाह हा देखील कमी होईल आणि त्या ठिकाणी डाग देखील पडणार नाही.
  • जर जखम हे जास्तच खोलवर झालेले असेल, चटका जास्त प्रमाणात लागलेला असेल तर तत्काळ तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन उपचार केले पाहिजेत.
  • पायाला तुम्हाला ज्या ठिकाणी भाजलेले आहे तर अशा ठिकाणी तुम्ही हात लावू नये यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असते.
  • पायाला चटका लागल्यास तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी कोलगेटचा वापर करू शकतात असे केल्यामुळे तुमच्या पायाला फोड ही येणार नाही आणि होणाऱ्या वेदना देखील कमी होतील.
  • पायाला ज्या ठिकाणी चटका लागला असेल तर अशा वेळेस तुम्ही त्या ठिकाणी दूध देखील लावू शकतात त्यामुळे देखील तुम्हाला आराम मिळू शकतो.
वाचा  पायाला सतत खाज येणे या समस्या समस्येची कारणे व घरगुती उपाय :-

मित्रांनो, पायाला चटका लागल्यास तुम्ही अशा प्रकारची काळजी घेऊ शकतात. अशा प्रकारची काही घरगुती उपाय करू शकतात. जेणेकरून, चटक्यामुळे झालेल्या वेदना या देखील कमी होतील आणि तुमची जखमही बरी होण्यास मदत होऊ शकते.

तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here