मासिक पाळी मध्ये काय खावे काय खाऊ नये.

0
1553
मासिक पाळी मध्ये काय खावे काय खाऊ नये.
मासिक पाळी मध्ये काय खावे काय खाऊ नये.

नमस्कार मित्रांनो. प्रत्येक स्त्री चार जीवनामध्ये मासिक पाळी येणे ही एक नैसर्गिक क्रिया घडत असते. मासिक पाळी येणे ही एक प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील अविभाज्य घटक असतो. प्रत्येक स्त्रियांना मासिक पाळीच्या वेदना सहन करावा लागत असतात. मासिक पाळी याशिवाय प्रत्येक स्त्री जीवन हे अपूर्ण असल्यासारखे होते. कारण मासिक पाळी मुळे स्त्रीला मातृत्व प्राप्त होत असते. महिन्यातून येणाऱ्या स्रीची मासिक पाळी मध्ये तिला अनेक असह्य अशा वेदना सहन करावा लागत असतात. अर्थातच त्या काळात होणाऱ्या वेदना ह्या सहन न होणाऱ्या असतात. मासिक पाळी च्या काळामध्ये स्त्रियांना पोटदुखी या समस्येला सामोरे जावे लागत असते.

मासिक पाळी मध्ये फक्त पोटात दुखत नाही तर कंबर देखील दुखत असते तसेच डोके देखील दुखू लागते काही काहींचे तर पूर्ण अंग दुखू लागते. त्याचप्रमाणे मासिक पाळी मध्ये पायाच्या पोटऱ्या देखील दुखु लागतात. म्हणजेच मासीक पाळीच्या कालावधीत काळात असह्य वेदना सहन कराव्या लागत असतात. बऱ्याच वेळा तर मासिक पाळीच्या काळामध्ये अनेक महिलांची चिडचिड देखील होत असते. कारण मासिक पाळीच्या कालावधीमध्ये हार्मोन्स बदल होत असतात. त्यामुळे, स्वभाव हा त्या ठराविक काळात चिडचिड होत असतो.

अनेक स्त्रियांना या कालावधीमध्ये मळमळ होणे तसेच उलट्या होण्याचा त्रास देखील येत असतो. त्याचप्रमाणे मासिक पाळीच्या काळामध्ये अनेकांना खूप सुस्तपणा जाणवतं. तर काहींना खूप थकल्यासारखे देखील वाटत असते. तर काहींना एकदम अशक्तपणा येत असतो. मासिक पाळीच्या काळामध्ये अनेक स्त्रियांना एक ना अनेक वेदना सहन करावेच लागतात. मासिक पाळी ही जर एक प्रकारे नैसर्गिक असली परंतु त्याचा त्रास हा सहन करावाच लागतो. बऱ्याच जणांना मासिक पाळी मध्ये काम देखील करावेसे वाटत नाही त्या काळात आराम जेवढा केला तेवढा फायदेशीर ठरत असतो.

मासिक पाळीच्या काळामध्ये काही गोष्टी अश्या असतात कि ज्या खाल्ल्यामुळे अजून वेदना जास्त सहन करावे लागत असतात. म्हणून मासिक पाळीच्या काळामध्ये काय खायला पाहिजे व काय खाऊ नये याविषयी आपल्याला जाणून घ्यायला हवेत. जेणेकरून त्या वेदना थोड्याफार तरी कमी प्रमाणात होतील. तर आज आपण मासिक काळात काय खायला हवे व काय खायला नको याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग मासिक पाळीच्या काळामध्ये काय खायला हवे व काय खाऊ नये ? या विषयाबद्दल खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

मासिक पाळी येण्याआधी समजते काय ?

पाळी ही स्त्रियांमध्ये असणारी एक नैसर्गिक क्रिया असते. पाळी येणे ही स्त्रियांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक असतो. कारण मासिक पाळी मुळे स्त्रियांना मातृत्व प्रदान होत असते.मासिक पाळीच्या वेदना या प्रत्येक स्त्रियांना सहन करावे लागतात. प्रतिक महिन्यानुसार ठराविक वेळेला प्रत्येक स्त्रियांची मासिक पाळी ही ठरलेली असते. म्हणजेच तारखेनुसार मासिक पाळी दर महिन्याला येत असते. तर मासिक पाळी येणे आधी देखील त्रास होत असतो. म्हणजेच मासिक पाळी येण्याच्या एक दोन दिवस आधी पासून पोटाच्या डाव्या उजव्या साईडला दुखणे तसेच कंबर दुखणे हा त्रास सुरू होतो.

वाचा  नाकातून रक्त येणे यावर काही घरगुती उपाय

पाळी येण्याच्या आधी बऱ्याच जणांची डोकेदुखी हा त्रास देखील तेव्हापासून सुरू होऊन जातो. तर काहींना पोट दुखी कंबर दुखी सोबतच पाय दुखी चा त्रास देखील जाणवू लागतो. तर काहींना मग होणे हा त्रास देखील जाणवू लागतो. मासिक पाळी येण्याच्या एक दोन दिवस आधी हा त्रास होऊ लागला तर समजून घ्यावे की, पाळी येणार आहे. त्याचप्रमाणे पाळी आल्यावर अनेक वेदना सहन कराव्या लागतात.  त्या वेदना असह्य अशाच असतात. वेदना तर सहन कराव्याच लागतील परंतु, जर आपण मासिक पाळी दरम्यान काही गोष्टी ची काळजी घेतली म्हणजेच काय खावे काय खाऊ नये याबद्दल काळजी घेतली तर त्या वेदना थोड्या फार कमी प्रमाणात होऊ शकतात.

मासिक पाळी दरम्यान काय खावेत ?

मित्रांनो,  मासिक पाळी दरम्यान च्या होणारा ज्या वेदना असतात, त्या खूपच असहनीय अशाच प्रकारच्या असतात. त्या वेदना तर आपण टाळू शकत नाही. परंतु, मासिक पाळी दरम्यान आपण जर खाण्याबाबत ची काळजी घेतली, तर त्यामुळे होणाऱ्या वेदना या थोड्या कमी प्रमाणात होतील. बऱ्याच वेळा आपल्याला माहीत नसते की मासिक पाळी दरम्यान आपण काय खायला हवे किंवा काय खाऊ नये. आणि अशावेळी जर आपण जे पदार्थ खायचे नाही ते खाल्ले तर त्यामुळे वेदना अजून जास्तीच्या वाढू शकतात. म्हणून आपण मासिक पाळी दरम्यान काय खायला हवे या विषयाबद्दल माहिती जाणून घेऊयात.

  1. मासिक पाळीच्या दरम्यान आपण आपल्या आहारामध्ये सर्व हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करायला हवा.
  2. त्याचप्रमाणे, मासिक पाळीच्या दरम्यान अनेक स्त्रियांना पोट दुःखीची समस्या निर्माण होत असते त्यासाठी तुम्ही आले खाल्ले पाहिजे. आले हे नुसतं न खाता तुम्ही गरम पाण्यात उकळून त्याचे पाणी प्यायला हवे. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. नाहीतर चहा मध्ये टाकून आल्याचा चहा प्यायल्याने देखील आराम मिळण्यास मदत होऊ शकेल. मासिक पाळी दरम्यान त्याची सेवन केल्यामुळे पोटातील वेदना कमी होण्यास मदत होते व आराम मिळू शकतो.
  3. बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळीच्या दरम्यान पोटात गॅस होण्याची समस्या येत असते. त्यासाठी मासिक पाळी दरम्यान जेवण झाल्यावर तुम्ही ओवा सेवन करायला हव्यात. तुमच्या पोटात गॅस तयार झाल्यामुळे पोट दुखी की समस्या येत असते त्यामुळे तुम्ही ओवा खाल्ल्या पाहिजेत. जेणेकरून तुला त्रास कमी होण्यास मदत होऊ शकेल.
  4. पाळी दरम्यान अनेक वेदना या सहन करावे लागत असतात. त्यामुळे तुम्ही तुळशीच्या पानांचा उपयोग करू शकतात. तर तुम्ही तुळशीच्या पानांचा काढा नाहीतर तुळशीची काही पाने तोडून चहा मध्ये टाकून पिल्याने तुम्हाला वेदना पासून सुटका होऊ शकते. व विज्ञान पासून आराम मिळण्यास मदत होऊ शकेल.
  5. पाळीच्या दरम्यान तुम्ही थंड पाण्याची सेवन न करता पाणी कोमट करून पिले पाहिजे. कारण जर तुम्ही मासिक पाळीच्या दरम्यान थंड पदार्थ खाल्ले तर त्यामुळे अपचनाची समस्या उद्भवते. आणि त्यामुळे अजून जास्तच या वेदना सहन कराव्या लागतात. म्हणून तुम्ही मासिक पाळीच्या दरम्यान कोमट पाणी पिणे तुमच्यासाठी योग्य ठरेल.
  6. त्याकाळात अनेक वेळा अपचनाची समस्या येत असते. अशा वेळेस तुम्ही पपईचे सेवन केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. पपईचे सेवन करताना ते थोड्या प्रमाणातच करावे जे करण जेणेकरून, अपचनाची समस्या येणार परंतु, पपई चे जास्त सेवन या काळात करू नये.
  7. मासिक पाळीच्या काळामध्ये तुम्ही केळीचे सेवन देखील आवर्जून करायला हवे.
  8. पाळीच्या वेळी डोकेदुखीचा त्रास येत असतो त्यामुळे तुम्ही सफरचंदाचे सेवन करायला हवे.
  9. तुम्ही नारळ पाणी देखील घ्यायला हवे जेणेकरून तुमचे शरीराचे डीहायड्रेशन होण्यापासून बचाव होऊ शकेल. आणि अशक्तपणा देखील दूर होऊ शकतो.
  10. पाळी दरम्यान तुम्ही फळांचे सेवन आवर्जून करायला हवे.
  11. पाळीच्या दरम्यान तुम्ही हिरव्या पालेभाज्यांचे सूप तसेच टोमॅटोचा सूप घेऊ शकतात. जेणेकरून तुमच्या शरीराला आराम मिळेल.
  12. त्या दरम्यान तुम्ही ग्रीन टी चे सेवन देखील आवर्जून करायला हवे.
  13. मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही आहारासोबत कोशिंबीर बनवून खायला हवी. त्यामध्ये कांदे, टोमॅटो, काकडी, दही, हिरवी कोथिंबीर यांचा समावेश असेल.
  14. त्या दरम्यान शक्यतो तुम्ही थंडगार जेवण न करता, जेवढे गरम गरम जेवण केले तेवढे तुमच्या आरोग्यासाठी देखील चांगले ठरू शकते.
वाचा  पायाला बजरंग लेप कधी व कसा लावल्याने फायदा होतो

मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही वरील सर्व गोष्टींचा तुमच्या आहारामध्ये समावेश केल्यामुळे तुमच्या वेदना या थोड्याफार प्रमाणात तरी कमी होण्यास नक्कीच मदत होऊ शकेल.

मासिक पाळीच्या दरम्यान काय खाऊ नये ?

मित्रांनो, मासिक पाळीच्या वेदना या किती असहनीय असतात, हे फक्त एक स्त्रीच सांगू शकते. या काळामध्ये महिलांचे हार्मोन्स देखील बदल होत असतात. त्यामुळे, त्यांच्या स्वभावात थोडा चिडचिडेपणा येत असतो. तर काही नाही एकदम अशक्तपणा व थकवा जाणवत असतो. आणि अशातच जर आपल्याला जे पदार्थ खायला नकोत, ते जर आपण खाल्ले तर यामुळे अजून वेदना जास्त वाढू शकतात. तर मासिक पाळीच्या दरम्यान काय खायला नको? याबद्दल आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • शक्यतो कोल्ड्रिंक्स घेणे टाळावे. कारण यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. जेणेकरून वेदना अजून जास्तीच्या वाढू शकतात.
  • मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही जे फॅट युक्त पदार्थ आहेत जसे की मैदा युक्त पदार्थ साखर युक्त पदार्थ खाणे शक्यतो टाळायला हवे. कारण या काळामध्ये हार्मोन्स बदल होत असतात आणि त्याचा परिणाम हा हार्मोन्स बदलावर होऊ शकतो.
  • तुम्ही शक्यतो थंडगार पाणी पिणे टाळायला हवे. कारण या दरम्यान शरीरातील हार्मोन्स बदल होत असतात आणि थंडगार पाणी पिल्यामुळे त्याचा प्रभाव त्यावर होऊ शकतो. म्हणून मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही शक्यतो कोमट पाणी पिणे योग्य ठरू शकते.
  • मासिक पाळीच्या दरम्यान कमी तेलकट पदार्थ खाण्याचे टाळायला हवे. आणि या काळात मिठाईचे सेवन देखील वर्ज करायला हवे.
  • तुम्ही फास्ट फूड पदार्थ खाणे शक्यतो टाळायला हवे.
  • मासिक पाळीच्या दरम्यान शक्यतो मद्यपान करणे वर्ज करावे. कारण या दरम्यान जर मद्यपान केले तर खूपच असहाय्य वेदना होत असतात.
  • तुम्ही शक्यतो कॉफी पिण्याचे टाळायला हवे. मासिक पाळीचे दरम्यान जर तुम्ही कॉफी असेल तर त्याचा परिणाम हा तुमच्या बी.पी.वर होण्याची शक्यता असते. ज्यामुळे तुमची अजूनच जास्त चिंता वाढू शकते. असे पाळीच्या दरम्यान तुम्ही कॉफी पिणे जितके टाळाल तितके तुमच्या आरोग्यासाठी चांगले ठरू शकेल.
वाचा  पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही वरील पदार्थांचे सेवन करणे शक्यतो जेवढे टाळले तेवढे तुमच्या वेदना कमी प्रमाणात होऊ शकतील. मासिक पाळी दरम्यान कुठल्या पदार्थांचे सेवन करू नये याविषयी आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहेत जेणेकरून तुमच्या वेदना या थोड्या फार कमी प्रमाणात होऊ शकतील.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून कळू शकतात.

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here