निरोगी व्यक्तीच्या हृदयाचे ठोके प्रति मिनिट किती असावे

0
1374
निरोगी व्यक्तीच्या हृदयाचे ठोके प्रति मिनिट किती असावे
निरोगी व्यक्तीच्या हृदयाचे ठोके प्रति मिनिट किती असावे

               तर आजचा चर्चेचा विषय म्हणजेच निरोगी कसे राहावे ? निरोगी कोणाला म्हणावे ? आपण कोणत्या पद्धतीने निरोगी राहू शकतो? कारण आजच्या या धावपळीच्या जगामध्ये आपले शरीर निरोगी ठेवणे फार गरजेचे आहे. कारण एक सोपी गोष्ट आहे जर आपले शरीर निरोगी असेल तर आपण असू नाहीतर आपल्या कामाचा आपल्या पैशाचा काय उपयोग. म्हणून सर्वात पहिले म्हणजे आपण आपल्या शरीराच्या आरोग्याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. तसेच शरीराला काय हवे काय नको याच प्रकारे स्वतःच्या शरीराची काळजी घेणे स्वतःच्या शरीराची निगा राखणे त्याला स्वच्छ ठेवणे इतकेच नाही तर आपल्या आहारामध्ये काही अशा गोष्टींचा समावेश करणे जेणेकरून त्याचा फायदा आपल्या शरीराला होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या हृदयाला फायदा होईल कारण आपल्या शरीरामधील आपले हृदय निरोगी असेल तर आपण निरोगी असून.

                  पण जर का हृदय निरोगी नसेल म्हणजेच आपल्याला लवकर दम लागत असेल कोणती काम करण्यासाठी अडचण येत असेल. तर ही एक गंभीर बाब आहे पण काळजीचे कारण नाही. आपण काही उपायांनी किंवा काही असे मार्ग आहेत जेणेकरून आपण आपल्या हृदयाचे स्वास्थ चांगले करू शकतो. चला तर मग आपणही याच विषयावर बोलणार आहोत याच प्रकारे आपण एक मोठी गोष्ट देखील जाणून घेणार आहोत की एका निरोगी व्यक्तीच्या रूदयाची ठोके प्रति मिनिट किती असतात चला तर मग जाणून घेऊया.

निरोगी व्यक्ती कोणाला म्हणावे ?

                तर सर्वात पहिले आपण हे जाणून घेऊया की निरोगी व्यक्ती कोणाला म्हणावे? कारण सर्वांनाच आपण निरोगी व्यक्ती म्हणू शकत नाही तर नेमकं निरोगी व्यक्ती कोणाला म्हणावे. तर जो कोणतेही काम करताना त्याला आळस येत नाही. तसेच त्याचे शरीर सुदृढ आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे हृदयाचे ठोके नियंत्रण मध्ये आहे कधीही जास्त आजारी पडत नाही प्रतिकारशक्ती चांगली आहे. शरीराची निगा चांगल्यारितीने ठेवलेली आहे व सतत कोणतेही काम करण्यासाठी उस्फुर्त सकारात्मक विचारात राहणे याला पण एक निरोगी व्यक्ती नक्कीच म्हणू शकतो.

वाचा  नाकात तूप टाकल्याने होणारे विविध फायदे

निरोगी व्यक्तीच्या छातीचे ठोके किती असावे ?

              चला तर आपण आता महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊ या की एका निरोगी व्यक्तीच्या छातीचे ठोके किती असावे. तर साधारण एका सासरी पुरुषाचे हृदयाचे ठोके हे प्रतिमिनिट 60 पासून 100 पर्यंत असतात. पण जर का तुमच्या रूदयाची ठोके 40 च्या खाली गेली तुम्हाला डोकेदुखी, अशक्तपणा जाणवू शकतो तसेच चक्कर आल्यासारखे देखील वाटू शकतो. म्हणून जर तुम्हाला एक निरोगी हृदय हवे असेल तर तुमचा दिनक्रम ठरवा व त्यानुसार सर्व काम करा कामामध्ये इतके गुंतून जाऊ नका की तुम्हाला तुमच्या शरीराकडे देखील लक्ष द्यायला वेळ भेटणार नाही.

निरोगी शरीर ठेवण्यासाठी पावसाळ्यातील आहार :

                 तर आपण निरोगी व्यक्ती म्हणजे काय हे जाणून घेतले तसेच निरोगी व्यक्ती कोणाला म्हणावे हे देखील बघितले. आता आपण जाणून घेऊया की एका निरोगी व्यक्तीचा पावसाळ्यातील आहार कसा घ्यावा.

पौष्टिक व फायबरयुक्त पदार्थ :

                 गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, ओट्स अशा गोष्टींचे जर तुम्ही आपल्या आहारामध्ये समावेश केला तर नक्कीच तुमचे शरीर सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल. या सर्वमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतात जेणेकरून तुमचे पोटभरे व तुमच्या शरीराला पोषक तत्वे मिळण्यास देखील मदत होईल.

ही फळे प्रामुख्याने खावी :

                  साधारणता तुम्ही दिवस दिवसभर मधून एकतरी फळ खाल्लीच पाहिजे. पण पावसाळ्यामध्ये काही अशी फळ आहेत जी तुम्ही नक्कीच खावी आणि काही फळं तर त्या ऋतूमध्ये मिळतात बाकी ऋतूमध्ये मिळतच नाही. तसेच आम्ही काही फळांची नाव सांगणार आहोत जे तुम्ही पावसाळ्यामध्ये खाऊ शकतात. पीचपीच, जांभूळ, चेरी, लीची, ड्रॅगन फ्रुट, किवी अशी बरिचशी फळ आहे जे तुम्ही पावसाळ्यामध्ये खाऊ शकता. तसेच या फळांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन्स, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स असतात म्हणून प्रामुख्याने या फळांचे सेवन नियमित स्वरूपात करावे.

वाचा  नाकातून रक्त येणे यावर काही घरगुती उपाय

कोणत्या गोष्टी टाळाव्यात :

                   पावसाळ्यामध्ये बरेचसे जीवजंतू बाहेर आलेले असतात तसेच अनेक खाद्यपदार्थाचे रस्त्यावर मिळतात. ते बहुतांश वेळी दूषित झालेले असतात. आणि जर आपण असे खाद्य पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम देखील होऊ शकतो. सर्वात प्रथम म्हणजे पावसाळ्यामध्ये फास्ट फूड खाने टाळावे. कारण असे पदार्थ खाल्ल्याने हे पदार्थ तुमच्या शरीराला तर लागणार नाहीच. पण वातावरणाच्या बदलामुळे तुम्ही आजारी देखील पडू शकता. याचप्रकारे पावसाळ्यामध्ये पाणी गढूळ झालेले असते म्हणून फिल्टर चे पाणी कधीही पिणे योग्य पावसाळ्यामध्ये उघड्यावरचे पाणी कधी पिऊ नये.

निरोगी राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी ?

              तर आपण पावसाळ्यामध्ये कोणती फळे खावी हे बघितले आता आपण बघूया की जर आपल्याला निरोगी राहायचे असेल तर आपण कोणती काळजी घ्यावी चला तर मग जाणून घेऊया.

पुरेशा प्रमाणामध्ये विश्रांती :

                 जर तुम्हाला निरोगी शरीर हवे असेल तर त्याला विश्रांती देणे देखील आपले कर्तव्य आहे. जर आपण शरीराला पुरेशी विश्रांती दिली नाही तर बऱ्याच वेळेस आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. तसेच थोड्या थोड्या दिवसांनी आपले शरीर देखील कमकुवत होऊ लागते. कारण आपण बरेच वेळेस कामामध्ये इतके गुंतून जातो की आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. काळजी घ्या की असे होणार नाही आणि तुम्ही तुमच्या शरीराला साधारणता 7 ते 8 तास विश्रांती तर नक्कीच द्याल.

व्यायाम :

                  तर तुम्ही कुठे जात असाल किंवा काही करत असाल किंवा कितीही काम असेल तरी दिवस घरांमधून एक तास तरी तुम्ही तुमच्या शरीराला दिलाच पाहिजे. त्या वेळेमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारे व्यायाम करू शकता. म्हणजेच योगा देखील करू शकता किंवा कोणत्याही प्रकारचे मैदानी खेळ देखील खेळू शकता. पण तो एक तास तर शरीराला दिलाच पाहिजे. बरेच वेळेस आपण व्यायाम करत नाही किंवा कंटाळा करतो यामुळे आपण जाड होतो. तसेच आपल्या शरीराच्या स्वस्त देखील बिघडते. तर असे न करता आपण रोज व्यायाम केला पाहिजे आणि व्यायाम मध्ये देखील मुख्यता पळणे हा सर्वात चांगला व्यायाम आहे असा पण म्हणू शकतो

वाचा  रक्त शुद्ध करण्यासाठी घरगुती उपाय कोणते? 

पुरेशा प्रमाणामध्ये पाणी प्यावे :

                अनेक आजार हे आपल्या त्वचेपासून होतात. म्हणून जर तुम्हाला त्वचा निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही तुमच्या शरीराला पुरेशा प्रमाणामध्ये पाणी दिले पाहिजे. पाणी पिल्याने देखील बऱ्याच समस्यांचे समाधान मिळते. याच याच प्रकारे तुमचे शरीर देखील आत मधून स्वच्छ राहते. तसेच तुम्हाला किडनी स्टोन होण्याचा धोका देखील कमी होतो. तुम्ही पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीरामधील रक्त पुरवठा देखील योग्य पद्धतीने मेंदूपासून हृदयापर्यंत होतो. म्हणून तुम्ही शरीराला साधारणता दिवसभर मधून तीन ते चार लिटर पाणी दिलेच पाहिजे.

                तर आज आपण आपल्या हृदयाचे ठोके प्रतिमिनिट किती असावे हे जाणून घेतले. याच प्रकारे जर आपले शरीर निरोगी नसेल तर ते कसे ठेवावे किंवा यासाठी कोणती काळजी घ्यावी हे देखील आपण जाणून घेतले. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.   

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here