पांढरे तीळ खाण्याचे फायदे जाणून घेऊया काय आहेत?

0
4341
पांढरे तीळ खाण्याचे फायदे
पांढरे तीळ खाण्याचे फायदे

 

 

नमस्कार मित्रांनो हे सगळ्यांनाच माहिती आहे संक्रांतीचा सण आला, की सगळ्यांच्या घरोघरी तीळचे व गुळाचे लाडू राहतात. अगदी लहानांपासून ते वयस्कर लोकांना सगळ्यांना आवडतात. ही उष्ण असते. आपल्या भारतीय वर्षाच्या पहिल्या सणाला तिळगुळ चे मुख्य स्थान आहे. तीळ खाल्ल्याने आपल्याला खूप सारे फायदे होतात. तीळ चे दोन प्रकार असतात, एक काळे तीळ आणि दुसरे पांढरे तीळ असते. हे घरोघरी वापरले जाणारे पदार्थ आहेत. तसेच तीळ मध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. म्हणूनच पूर्वीच्या काळापासून आयुर्वेदिक औषधांमध्ये तिळाचा सुद्धा वापर केला जातो. तीळ आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. पांढरे तीळ पासून आपण चटणी, तिळगुळाचे लाडू, तिळाची चिक्की, तसेच मिठाइ मध्ये हिचा वापर केला जातोय. तसेच तीळ पासून तेल तयार केले जाते. जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. तर आज आपण पांढरा तीळ विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत, तीळमध्ये आपल्या कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचे गुणधर्म असतात. पांढरे तीळ खाण्याचे फायदे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आणि गुणकारी असतात.

 यामध्ये लोह, कॅल्शियम, मॅगनीज, तांबे, मॅग्नेशियम, खनिज तत्वे, विटॅमिन, जीवनसत्वे, पॉलिसॅच्युरेटेड फॅटीॲसिड, आयन, फायबर, ओमेगा सिक्स, यासारखे गुणधर्म असल्यामुळे, ती आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. चला तर मग पांढऱ्या दिली खाल्ल्यामुळे, आपल्या शरीराला  कोण कोणते फायदे होऊ शकतात? ते जाणून घेऊयात! 

पांढरे तीळ खाल्ल्यामुळे शरीराला होणारे फायदे? 

मित्रांनो, पांढरे तीळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणते फायदे होतात. तर मग ते नेमके कोणकोणते? चला तर मग जाणून घेऊयात. 

रक्तदाबाचा त्रास नियंत्रणात येतो.

ज्या लोकांना रक्तदाबाचा त्रास आहे. ज्यांना हायपर  टेन्शन आहे, अशा लोकांनी त्यांच्या आहारात तीळ जरूर खावे. कारण तीळमध्ये कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचे गुणधर्म असतात. तसेच तीळ मध्ये झिंक, फायबर, मॅग्नेशियम यासारखे घटक असल्याने, ते आपले रक्तदाब नियंत्रणात आणण्यास मदत होते. त्यामुळे रोज तुम्ही तुमच्या आहारात समावेश करा. हे आहेत पांढरे तीळ खाण्याचे फायदे जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

तीळ खाल्ल्याने दात मजबूत होतात.

तीळ खाल्ल्याने दात मजबूत होतात. कारण तीळ मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम  असते. त्यामुळे ते आपल्या दातांसाठी फायदेशीर असते. जर तुम्ही रोज सकाळी व संध्याकाळी एक चमचा तीळ जरी खाल्ली, तरी तुमचे दात मजबूत होतात व पांढरेशुभ्र होण्यास मदत मिळते. हे आहेत पांढरे तीळ खाण्याचे फायदे जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

वाचा  स्वप्नात शाळा दिसणे शुभ की अशुभ

बाळांतीन साठी फायदेशीर ठरते.

तीळ हे उष्ण असते.तसेच तिच्या मध्ये आवश्यक घटक असतात.तीळ बाळांतीन साठी फायदेशीर असते. ज्या स्त्रियांना दूध कमी येत असेल, त्यांना तीळ वाटून त्यामध्ये गूळ टाकून ते खायला द्यावे. त्याने बाळाला भरपूर प्रमाणात दूध येते. शिवाय अंगावरून जाणारा रक्तस्रावही सुरळीत होतो. तसेच तिळाच्या तेलाने मालिश केली, तर तिच्या शरीराला स्निग्धता मिळते. शिवाय डिलिव्हरी नंतर चे सुटलेले पोट, स्ट्रेच मार्क जाण्यास मदत मिळते. 

केसांना मजबुती मिळते.

तीळ मध्ये स्निग्धता असते. तसेच तीळ हे शरीरासाठी फायदेशीर असते. तीळ मध्ये विटामिन्स असतात. जे केसांसाठी फायदेशीर ठरतात. जर तुम्ही रोज तुमच्या केसांना तिळाचे तेल लावले, तर तुम्हाला फायदा होतो. तसेच जर तुम्ही संध्याकाळी केसांना तिळाच्या तेलाने केसांना मालिश केली, तर केसांना मजबुती येते व केस वाढीसाठी फायदेशीर राहतात. केसांमध्ये कोरडेपणा, मुळापासून तुटणे, अकाली तुटणे पांढरे होणे, यासारख्या समस्या वर आराम मिळतो. तसेच जर तुम्ही तुमच्या आहारात तीळ एक चमचा जरी खाल्ले, तरी केसांना आवश्यक पोषण मिळते. 

हाडांना मजबुती येते.

तीळमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक यासारखे गुणधर्म असतात. त्यामुळे तीळ खाल्ल्याने तुमच्या हाडांना मजबुती येते. तसेच गुडघेदुखी, सांधेदुखी, यासारख्या समस्या असतील, तर अशा वेळी तुम्ही तिळाच्या तेलाने तुमच्या गुडघ्यांना मालिश करावी, तसेच सांधेदुखी असेल तर तीळ तेलाने मालिश करावी. जर संपूर्ण अंगाला तिळाच्या तेलाने मालिश केली, तर तुमच्या शरीरातील स्नायू मध्ये लवचिकता वाढते व हाडे मजबूत होतात. 

कानदुखीवर फायदेशीर ठरतं.

सर्दीमुळे कान दुखत असेल, ठणकत असेल तर अशावेळी तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर करू शकतात. तसेच कानामध्ये किडा गेला असेल, तरी तोही बाहेर निघण्यास मदत होतो. त्यासाठी तुम्हाला तीळ तेल त्यामध्ये लसुन ची पाकळी तळून नंतर ते  वस्त्रगाळ करून, ते तेल कानात टाकायचे आहे, त्याने कानातील किडा बाहेर येत नसेल  तर बाहेर निघतो आणि कान ठणकत दुखत असेल, ते थांबण्यास तर मदत मिळते. हे आहेत पांढरे तीळ खाण्याचे फायदे जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

वाचा  फुटाणे खाण्याचे फायदे

तुमचा चेहरा मुलायम राहण्यास मदत मिळते.

बाहेरच्या वातावरणामुळे, आपल्या चेहऱ्यावर त्याचा प्रभाव होतो. आपली त्वचा रुक्ष होऊन जाते. कोरडी पडते. अशा वेळी जर तुम्ही तिळाचा वापर तुमच्या चेहऱ्यासाठी केला, तर तुम्हाला खूप फरक जाणवेल. त्यासाठी तुम्हाला तिळाचे तेलाने चेहऱ्यावर रात्री झोपण्यापूर्वी मसाज करायचा आहे, त्यामुळे चेहऱ्यावर चमकदारपणा व मुलायमपणा येतो. तसेच चेहऱ्यावर काळे डाग, वांगचे डाग, मुरूमाचे डाग असतील, तर अशा वेळी तुम्ही तीळ वाटून चेहर्‍यावर, त्याने मालिश केल्यास, तुमच्या चेहऱ्याला मुलायमपणा येतो. व डाग असतील तर  जाण्यात मदत मिळते. तसेच एक चमचा तीळ जरी तुम्ही रोजच्या आहारात घेतली तर तुमचे सौंदर्य फुलते. 

मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात.

तीळ हे उष्ण असल्यामुळे, ती आपल्या मासिक पाळी साठी फायदेशीर ठरते. ज्या स्त्रियांना मासिक पाळी अनियमित येत असेल, तसेच मासिक पाळीमध्ये अंगावरून रक्तस्राव कमी प्रमाणात होत असतील, अशा वेळी जर त्यांनी त्यांच्या आहारात तीळ खाल्ली, तर त्यांना यासारख्या समस्या वर आराम मिळतो. शिवाय मासिक पाळी मध्ये होणारा त्रास, कंबर दुखी, पोट दुखी, यासारख्या समस्येवर आराम मिळतो. त्यासाठी त्यांना दररोज त्यांच्या आहारात एक चमचा तीळ तरी खाउन व त्यावर पाणी प्यावे. तसेच मासिक पाळी दरम्यान पोटावर तिळाच्या तेलाने मालिश केली, तर त्यांचा मासिक धर्म सुलभरीत्या होतो. शिवाय ओटीपोटात दुखणे, कंबरदुखीचा त्रास असेल, तर तोही जाण्यास मदत मिळते. 

डोकेदुखी वर फरक पडतो.

काही जणांची डोकेदुखी तीव्र असते त्यामुळे डोके ठणकते, कपाळपाटी च्या नसा ठणकतात. अशावेळी जर त्यांनी तिळाच्या तेलाचा वापर केला, तर त्यांना फरक पडेल. त्यासाठी त्यांनी तिळाचे तेल माथ्यावर व केसांना लावावे. माथ्यावर तेल लावल्यावर केसांना मालीश करावे. त्यामुळे डोक्याला आराम मिळतो. तसेच कपाळाच्या पाटीवर तिळाच्या तेलाने सर्कुलेशन पद्धतीने मसाज करावा. त्यामुळे डोकं दुखीवर आराम मिळतो. हे आहेत पांढरे तीळ खाण्याचे फायदे जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

वाचा  खडीसाखर याचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

शरीरावरील अतिरिक्त चरबी तेल लावल्याने जाण्यास मदत मिळते.

हो, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल. पण तिळाच्या तेलात आपल्या शरीराला आवश्यक ते घटक असतात. तसेच त्वचेमध्ये व शरीरामधील तिळाच्या तेलाने मालिश केल्याने लवचिकता येते. तसेच तुमच्या शरीरावर पोटावर, कंबरेला, मांड्यांवर हातावर, दंडाखाली जर चरबीचे प्रमाण असेल, तर तुम्ही नियमित रात्री झोपताना तिळाच्या तेलाने संपूर्ण अंगाला मालिश करावी. त्यानंतर सकाळी उठून कोमट पाण्याने अंघोळ करावी. असे जर तुम्ही सलग चार ते पाच महिने केले, तर तुमच्या शरीरावरील चरबी हळू जाण्यास मदत मिळेल. करून बघा तुम्हाला फरक वाटेल. 

तीळ कोणी खाऊ नये? 

तीळ खाल्ल्याने जर आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. पण तीळ ही उष्ण असते. ज्या लोकांना उष्णतेचा त्रास होतो,  अशा लोकांनी तीळ होऊ नयेत. काही लोकांना तीळ गरम पडू शकते व जुलाब लागू शकतात. तसेच स्त्रियांना गर्भधारणेची तयारी करायचे आहे, आणि तीळचे सेवन कमी प्रमाणात करावेत. कारण की उष्ण असल्यामुळे गर्भधारणा होण्यासाठी वेळ लागतो. तसेच ज्या लोकांची स्किन अगदीच सेंसिटिव असेल, त्या लोकांनी तिळाच्या तेलाने मालिश करू नये आणि करायचे असल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावेत. 

चला, तर मित्रानो मग आज आम्ही तुम्हाला की तीळमध्ये आपल्या शरीरासाठी कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात,ते आम्ही सांगितलेले आहेत. आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका असेल, तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तीळ खाऊ शकतात. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

 

                        धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here