डोक्यावरील केस विरळ होत असेल तर काय करावे

0
1146
डोक्यावरील केस विरळ होत असेल तर काय करावे
डोक्यावरील केस विरळ होत असेल तर काय करावे

                 बऱ्याच वेळेस डोक्यावरील केस विरळ होण्यासाठी आपली बदलती जीवनशैली कारणीभूत असते. तसेच याला वयमान देखील कारणीभूत असू शकते प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे असते म्हणून प्रत्येकावर त्या तत्त्वांचा किवा त्या वातावरणाचा परिणाम होतोच असे नाही. पण बऱ्याच वेळेस आजकाल असे बघितले गेले आहे की बऱ्याच लोकांची डोक्यावरील केस विरळ होतात किंवा टक्कल पडते असे समस्या रोज बघण्यास मिळत आहे. माणसाला त्याचे रूप खूप महत्त्वाचे असते त्यामध्येही स्त्रियांना त्यांचे रूप खूप मौल्यवान आहे. असे वाटते कारण स्त्रियांचे सौंदर्य देखील त्यांच्या केसांवर अधिक असते.

तसेच त्यांच्या केसांमुळे त्या अधिक सुंदर देखील दिसतात म्हणून कोट्यावधी रुपये खर्च करून आपल्या केसांवर शस्त्रक्रिया किंवा इतर प्रकारचे उपचार घेतात पण बऱ्याच वेळेस हवा तसा परिणाम दिसून येत नाही. केस विरळ होत जातात किंवा केसांना फाटे फुटणे अशा बरेच समस्या समोर येतात. अशा वेळी समजत नाही काय केले पाहिजे? कोणाकडे गेली पाहिजे? कोणाच्या योग्य सल्ला घेतला पाहिजे तर आपणास याच विषयावर काही माहिती बघणार आहोत. तसेच केस विरळ होण्याचे कारणे बघणार आहोत आणि याच बरोबर यावर काही घरगुती उपाय देखील आपण जाणून घेणार आहोत.

केस विरळ होण्याची कारणे :-

              तर आपण केस वीर होण्याबाबत थोडीशी माहिती बघितली आता आपण जाणून घेऊया यावरची काही कारणे चला तर मग बघुया.

अनुवांशिक असू शकतो :

              बऱ्याच वेळेस केस विरळ होणे हे अनुवांशिक असू शकतो. म्हणजेच पिढ्या नुसार आपले केस विरळ होतात असतील तसेच बरेच वेळेस प्रत्येकाच्या शरीर वेगळे असतो. म्हणून तुमच्या आई वडिलांचे केस दाट असतील किंवा विरळ असतील तर तुमचे केस तसेच होतील याची कोणतीही शाश्वती नाही.

वाचा  मास्क का व कसा वापरावा

राहणीमान :

              केस वीर होण्याचे सर्वात मोठे कारण हे राहणीमान असू शकते कारण तुमच्या राहणीमानावर तुमचे शारीरिक स्वास्थ्य अवलंबून असते. तसेच जर तुमचे राहणीमान अनुसार तुम्ही खूपच प्रदूषणाच्या ठिकाणी राहात असाल किंवा खूपच धूळ माती या ठिकाणी नेहमी जात असेल तर त्याचा सरळ सरळ परिणाम तुमच्या केसांवर दिसून येतो. तसेच तुमची केस वीर होणे किंवा केस तुटणे केसाला फाटे फुटणे अशा बऱ्याच समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते म्हणून याची काळजी तुम्ही नक्की घ्यावी.

केमिकल्सचा वापर :

               बऱ्याच वेळेस आपण सुंदर दिसण्यासाठी किंवा आपले केस सुंदर दिसण्यासाठी आपण त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स लावतो. आणि याच केमिकल्स साईड इफेक्ट होऊन आपल्या केसांवर त्याचा परिणाम दिसू लागतो. बरेच चांगले परिणाम देखील होतात पण बरेच वेळेस केसांवर त्याचा वाईट परिणाम देखील दिसून येतो. कारण बऱ्याच वेळेस केमिकल किसमत लागतो पण त्यासोबतच ते केमिकल्स आपल्या कवटीच्या त्वचेला देखील लागतो जेणेकरून नवीन येणारे केस विरळ होत.

केस विरळ होणे यावर उपाय

               तर आपण केस विरळ होण्याची थोडी माहिती बघितली त्याचबरोबर त्यावर काही कारणे देखील बघितली आता आपण त्यावर काही उपाय जाणून घेणार आहोत चला तर मग बघुया.

आहार बदला :

               बऱ्याच वेळेस आपल्या आजारांना किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्यांना आपला आहार जबाबदार असतो. तुमची केस जर तुटत असेल किंवा केसांना फाटे फुटत असतील किंवा तुमची केस विरळ होत असेल तर नक्कीच तुमच्या आहारामध्ये पोषणतत्वांची कमी असू शकते. तसेच तुम्हाला ते पोषक तत्व कोणत्या पद्धतीने भेटतील ते आपण बघू या तर सर्वप्रथम तुम्ही पालेभाज्यांचे सेवन केले पाहिजे तुम्ही पालेभाज्या कोणत्याही पद्धतीने खाऊ शकता म्हणजेच उघडून देखील खाऊ शकता किंवा भाजी करून देखील करू शकता. याचप्रकारे दिवसभर मधून एक तरी फळ खावे त्यानंतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे म्हणजेच दूध, दही, ताक, पनीर यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असतात जे तुमचे नवीन केस चांगल्या पद्धतीने उगवण्यासाठी फारच फायदेशीर ठरतात.

वाचा  पाय मुरगळणे या समस्येवर वेगवेगळी घरगुती उपाय

कोरफडीचा वापर करावा :

                 केस विरळ होत असल्यास किंवा काही इतर समस्या असल्यास सर्वात उत्तम उपाय म्हणजे कोरफडीचा गर. कोरफडीचा गर तुमच्या केसांना लावल्यास केसांचा ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या कमी होण्यास मदत होते तसेच कोरफडीचा गर लावताना तुम्ही ताज्या कोरफडीचा गर हवा व थोड्या वेळानंतर केशर गरम पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी.

शाम्पू बदला किंवा तेल बदला :

                आपण जर केमिकलयुक्त शाम्पू आपल्या केसांवर लावत असेल तर तो त्वरित बंद करावा तसेच हरबल मुक्त शाम्पू केसांवर लावावा तसेच तेल देखील शुद्ध नारळाचे तेल केसांवर लावावे किंवा ऑलिव्ह ऑइल केसांवर लावावे जेणेकरून केसांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही.

                तर आपण आज यशस्वी होण्यावर थोडी माहिती बघितली यावर कारणे देखील बघितली आणि यावर घरगुती उपाय देखील जाणून घेतले. तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. 

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here